ऑफिसला यायला मला नेहमीच १.५ तास लागतॊ...मनावर कधिमधी आलेले मळभ झटकण्याचे काम मी या वेळात करते
.गाडितुन जात असतांना आजुबाजुला असणार्या दुकानाचे, लोकांचे एक चित्र बनत जाते आणि मनावर हळुच्कन उमटतात त्याचे पडसाद...
ऑफिसला यायला मला नेहमीच दीड तास लागतॊ...मनावर कधीमधी आलेले मळभ झटकण्याचे काम मी या वेळात करते.गाडीतुन जात असतांना आजुबाजुला असणार्या दुकानाचे, लोकांचे एक चित्र बनत जाते आणि मनावर हळुचकन उमटतात त्याचे पडसाद...
मॉन्सुनमुळे असणारं ढगाळ वातावरण, रस्त्यावरची वर्दळ खरोखर मनाला भावुन जाते..नारळाच्या झाडांची सकाळची प्रसन्न चर्या मन सुखावुन जाते. मला प्रत्येक नारळाचं झाड एखाद्या युगपुरुषासारखं वाटतं..सगळ्यांना भरभरुन देणारं आणि काही ही मोबदला नं मागणारं..
ढगाआड असल्यामुळे सूर्यदेवांबद्दल उन्हाळ्यात माझ्या मनात असलेला राग आता कमी झालाय :) त्यांनी असेच राहुन स्वतःचा आणि दुसर्यांचा ताप वाढवु नये असं वाटल्याशिवाय राहत नाही..
रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलातील मोठमोठाले काळे तापलेले तवे, त्याच्यावर पाणि टाकले की येणारा चर्रर्र असा आवाज आणि वाफ़.....वाफ़ ओसरली की तव्यावरुन गोल फिरणारी दोश्याच्या पीठाची वाटी...एखाद्या चहा, कॉफीच्या टपरीवर गिर्हाईकाची वाट पाहत असलेली बापुडवाणी इडली...हे सगळं कुठेतरी मनात घर करुन जातं..
प्रत्येक घरासमोर टाकलेला सडा आणि ठिपक्यांना वगळुन काढलेली सुंदर रांगोळी..जणु कटु आठवणींना वगळल्यास आयुष्यात येणारी सुबकता दर्शवते...
गल्लीतल्या एखाद्या देवळासमोरच्या दुकानात असलेले मोगरा- तुळशीचे गजरे मन कितीही खिन्न असले तरी सहज प्रसन्नता आणतात...समोरुन जाणारे एखादे कपाळावर भरपुर विभुती लावलेले, पांढरशुभ्र धोतर (वेष्टी) आणि जानवं घातलेले कृश बांध्याचे आजोबा....त्यांनी आजवर पाळलेल्या शिस्तीचा धडा देवुन जातात....
रस्त्याच्या अगदी मधोमध पोलीसकाका रस्ता ओलांडणार्यांच्या मदतीला धावुन येतात आणि आम्हाला गाडी थांबवावी लागते..बाजुलाच असलेल्या बसमधील गर्दी मात्र पाहवत नाही..बसच्या खिडकीतुन जरा आत डोकावले की दिसतात काही चेहरे..काही माझ्याच सारखे, काही वेगळे...समोरच्या सीट वर डोकं टाकुन पेंगुळलेले,
फोनवर बोलत असलेले, गाणी ऐकत असलेले असंख्य ओळखीचे पण अनोळखी चेहरे...
कापडाच्या, सोन्याच्या दुकांनांत चालु असलेली साफ़ सफ़ाई, पुजा..सबंध दिवस दुकान नीट चालु दे अशी प्रार्थना करणारे धनाढ्य मालक यांच्यावरही नजर जाते..
एव्हाना सगळे रस्ते दुचाकी चारचाकीने तुडुंब भरले असतात.रस्त्यावरचे सिग्नल आपले काम अगदी चोखपणे बजावत असतात..लोकांची मनं त्यांच्या आधीच ऑफिसमधे जाऊन बसलेली असतात...सगळेच वाहतुकीच्या जाळ्यातुन सुटण्याच्या प्रयत्नात..
नकळत दूरवर एक कटाक्ष जातो सोनेरी चकाकणार्या वाळुकडे ...अथांग निळ्या समुद्राकडे....आणि मन नकळत अभिवादन करतं त्याच्या उदात्ततेला.
लगेच आठवतो तो "जगन्नियंता". जो बघतोय ही सगळी घडामोड..इथे प्रत्यक्ष जरी येऊ शकत नसला तरी सगळ्यांना देतो जगण्याची उमेद त्यानी घडवलेल्या प्रत्येक गोष्टीतून..त्यानी घडवलेल्या प्रत्येक माणसाकडुन....
mast ekdum ...jhakas..!!!!!
ReplyDelete