Skip to main content

Posts

Showing posts from June, 2009

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने..

त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता...

http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related

त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं....

"Man In The Mirror" : -

I'm Gonna Make A Change,

For Once In My Life

It&…

We will miss you Michael!!

एखाद्या कलाकाराच्या आजुबाजुला असलेले वलय इतके जबरदस्तं असते की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करुच शकत नाही..तुम्हाला त्याची दखल घ्यावीच लागते..असाच कलाकार होता होता मायकल जॅक्सन.

त्याच्या आत्म्याला शांती मिळो हीच सदीच्छा!!

आई...

कधी कधी आईची एवढी आठवण येते नं की काही सुचतच नाही...आज मी तिची आठवण कागदावर उतरवायचा प्रयत्न केला आहे..

आई..रंग सारे
दुनियेतले
फ़िके झाले
तुझ्या नसण्याने

शब्द सारे
लेखणीतील
सुन्न झाले
तुझ्या नसण्याने

चांदणे डोकावले
नेत्र हे ओलावले...
भोवती सगळे स्तब्ध झाले
तुझ्या नसण्याने..

कुठेयस तु?
कुठे गेलीस तु?
आक्रोशही..मूक झाला..
तुझ्या नसण्याने..

असशील तेथे रहा जपुनी..
इथे आहे तुझे कुणी.. असे समजुनी..
क्षण हे...फ़क्त एक प्रमाण झाले
तुझ्या नसण्याने..

केळाची सुकी भाजी (वाळक्काय पोरियल)

चेन्नईत आल्यावर माझा केळाशी जवळचा संबंध आला. इथे केळ हे रोज जेवणानंतर नियमित खाल्ल्या जाते(आमच्या घरी तरी) .खाण्यासाठी सोनकेळाचा(छोट्या केळाचा) जास्त वापर केला जातो. केळाच्या फ़ुलाची आणि झाडाच्या खोडाची सुध्दा भाजी केली जाते.केळीच्या पानाबद्दल तर काही बोलायलाच नकॊ..
मी सध्द्या दाक्षिणात्य पाककलेच्या बालवाडीत आहे असं इथल्या मंडळींचं मत आहे. त्यानुसार मी शिकलेली ही सोप्पी भाजी. कमी तेलातली ,स्वादिष्ट आणि कमी वेळात तयार होणारी..
करुन बघा आणि सांगा कशी झालीए ते...
जिन्नस
* १ कच्चे केळ
* १ चमचा धणेपूड
* १ चमचा जीरेपुड
* १ चमचा तिखट
* १ हिरवी मिरची
* कोथिंबीर..
* १/२ चमचा तेल
* चवीपुरता मीठ
मार्गदर्शन
* केळाला सोलून घेऊन त्याचे पातळ चिप्स सारखे काप करावे.
* हे काप तिखट, मीठ, धणे पुड जीरे पूड घालून पाच ते दहा मिनीटाकरीता मुरू द्यावे.
* कढईत १ चमचा तेल गरम करावे
* त्यात १/२ चमचा मोहरी घालावी, कढीलिंबाची ४-५ पाने घालावी, हिरवी मिरची उभी चिरून टाकावी..
* नंतर हे केळीचे काप घालावेत.
* वरून थोडा कोथिंबीर पेरावा...


* झाकण लावून ५ मिनीटे शिजू द्यावे...


टीपा

खारूताईचा उद्योग...

झुंजुमुंजु झालं की ही खारुताई बाजुच्या नारळाच्या झाडावर येते , तिच्या उद्योगाला टिपण्याचा हा प्रयत्न...---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अवियल

जिन्नस१५० ग्रॅ. मद्रास सुरण
६-७ फ़रसबी
१ बटाटा
१ गाजर
१ शेवग्याची शेंग
२ वाटया दही किंवा ताक
३-४ हिरव्या मिरच्या
१/२ बोटाएवढं आलं
१ चमचा जीरं
४ चमचे नारळाचा किस..
कढिपत्ता
१/२ चमचा नारळाचे किंवा गोडे तेल
हळद मार्गदर्शनसुरण धुऊन त्याचे उभे मध्यम बारीक काप करावेत.
फरसबी बारीक चिरून घ्यावी.
बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा नेहमी प्रमाणे चिराव्या.
गाजराचे उभे काप करावेत.. (अर्ध्या बोटाएवढे)
कढई ता नेमके पाणी घेऊन या सगळ्या भाज्या उकळायला ठेवाव्यात...
हिरव्या मिरच्या, जिरे, आलं, नारंळ . मीरे आणि चवीप्रमाणे मीठ यांची पेस्ट तयार करावी..
भाज्या उकळल्यावर, थोडे पाणी कढईत ठेवून बाकीचे(जास्त असल्यास) टाकून द्यावे..
तयार केलेली पेस्ट कढईत घालावी आणि २ मिनिटे हालवावे
दह्याचे ताक करावे आणि त्यात थोडीशी हळद घालावी.
हे ताक कढईत टाकावे..
वरून दोन ते तीन कढीपत्त्याची पाने घालावीत
२ चमचे साधे किंवा नारळाचे तेल घालावे.
२ मिनिटांनंतर आचे वरून काढावे.. टीपाअवियल हा मलयाली पदार्थ आहे.
गरम भाताबरोबर किंवा फुलक्याबरोबर या पदार्थाची गट्टी छान जमते.
यात तोंडली, वांगी, दुधी भोपळा अश्या अनेक भाज्या टाकता येतात.
वर लिहितांना मद्रास सुरण असे लि…

जगी सर्व सुखी.....

नु़कतीच एका मराठ्मोळ्या संकेतस्थळावर कुणीतरी लिहिलेली पोळी बद्द्लची व्यथा वाचली,आणि मला "जगी सर्व सुखी असा कोण आहे" हे रामदास स्वामींचे म्हणणे पुन्हा एकदा पटले(नेहमीच मी या त्यांच्या श्लोकाला पडताळुन पाहत असते. कुणीही कुठेतरी "मी खुप सुखी आहे" असं म्हणावं आणि त्यांचं हे म्हणणं थोडंतरी खॊटं ठरावं असा त्यामागचा माझा उद्देश असतो...)

खरंतर पॊळी भाजी वरण भात या पदार्थांनी मला "टाटा" करुन चार महीने झाले..
कुठ्ल्याही नववधुला अगदी लगेचच स्वय़ंपाक करता येणे अशी सासरी फ़ारशी अपेक्षा नसतेच..पण जेव्हा घरात दोघेच असतात तेव्हा मात्र त्या जेवणापायी झोप उडाल्याशिवाय राहत नाही..मग भात करायचा असो...किंवा पोळ्या...

माझेही अगदी असेच झाले...पण पोळीच्या बाबतीत न होता भाताच्या बाबतीत..आहे की नाही गम्मत?
मला भात करता येत नाही असं मुळीच नाही.पण तमिळ कुटुंबात आल्यावर इतक्या सगळ्या वेगवेगळ्या खाण्याच्या पद्धती पाहुन मला जे यायचे ते ही येईनासे झाले...अगदी भातासारख्या भातानेही फितुरि केली
प्रत्येक भाज्यांचे वेगवेगळे प्रकार, तीन ते चार प्रकारचा रसम, चार पाच प्रकारचा सांबार, खुप सार्‍या प…

माय मराठी!!

मराठी ही अतिशय हळवी भाषा आहे असं मला नेहमी वाटतं (शिव्या जरी लक्षात घेतल्या तरी). माझ्या आणि कितीतरी हळव्या मराठमोळ्या मनांच्या व्यथा तिने आजवर व्यक्त करण्यास हातभार लावला आहे.

पहीला शब्द मी बोललेला "आदा" (आई) हा होता असं आई म्हणायची...मला हिन्दीतल्या मा, ईंग्रजीतल्या मम्मी..तमिळमधल्या अम्मा..पेक्षा आई हा शब्दच अधिक श्रवणीय वाटतो.आई नंतर बाबा..मामा, आजोबा,आजी..मावशी, काका आणि नंतर व्यवहारीक शब्दं अशी माझी मराठीतील वाटचाल सुरु झाली.

भाषा म्हंटलं की समाजातील प्रत्येक थरातील व्यक्तीचा तिच्यावर प्रभाव पडत असतो.भंडार्यात एका वेगळ्याच प्रकारे मराठी बोलली जाते त्यात हिन्दी तील काही शब्दही वापरले जातात.मी जास्तं काही सांगायला नकोच याबद्दल.पु.लं नी आधिच लिहुन ठेवलेलं आहे.लहानपणी भंडारा, नागपूर ला असल्यामुळे विदर्भातील मराठी भाषाच कानावर पडली.बरेचशे शब्द अजुनही ऐकले की त्याच लहानपणीच्या दिवसांची आठ्वण होते.ही वर्हाडी भाषा बोलण्यात मात्र एक वेगळीच मजा आहे.मी नागपुरला गेले की हमखास "का गं?" च्या ऐवजी " काऊन गं?", " कुठे जातोयस?" च्या ऐवजी"कुठे जाऊन राहील…

दहीवाली...

रस्त्यावरुन जाता जाता दिव्यांची रांग बघताना माझ्या मनात लहानपणापासुन मनात साठवुन ठेवलेले सगळे लोकं नकळत येतात...आणि थोड्या वेळाने अगदी नाहिसे होतात...मग पुन्हा कधितरि असेच आठ्वतात, म्हणुन आज त्यांच्याबद्दल लिहावं वाटतंय...काही लोकं उगाच आठ्वणीत राहतात...त्यापैकीच हे काही...
सगळ्यात पहीली आठ्वण ही आमच्या घरी येणार्या दहीवालीची तिला माझा विशेष लोभ होता.मी लहान असतांना आजीकडे रहायचे...पार सहावीपर्यंत.घरात मामा, मावशी, आजी आजोबा आणि मी असे पाच जणं असायचो. वाड्यात आजोबांचे दोन भाऊ आणि त्यांची मुले असे मिळुन आम्ही १५ जणं रहायचो...माझी आई या सगळ्या भावंडात मोठी असल्याने तिचं सगळ्यांच्या आधी लग्नं झालं...आणि मी झाले.घरी सगळ्या मामा मावश्य़ांपेक्षा लहान असल्याने माझे खुप लाड होत.घरात प्रत्येक येणार्या जाणार्याला माझं खुप कौतुक वाटायचं..दिसायलाही गुट्गुटीत होते(आजही आहे) त्यामुळे लोकांना माझा लोभ येणं साहजिकच होतं. अंगणात बरेच लोकं यायचे...दहीवाली, बोरंवाली, केळंवाली वगैरे..
तर..ही दहीवाली जरा म्हातारी होती.तिचं गाव होतं टवेपार..(भंडारा शहराजवळच आहे हे गाव) .ती तिथुन पायी यायची,डोक्यावर टोपलं घेऊन…

मोठा पाऊस!!!

पाऊस झाला काल चेन्नईत..ऒफ़िस मधुन निघाले आणि मस्त शिरवा आला... पण काय माहीत जरा उदासच वाटत होती स्वारी...पावसाचे थेंब पडत होते गाडीच्या काचेवर पण ते खुप उदास वाटत होते...एरवी हसता खेळता येणारा पाऊस असा उदास पाहुन माझ्या लहानपणीच्या निखळ निरागस पावसाची आठवण आली...अगदी मनापासुन..
आज पाऊस पडत होता पण वेळेचं, वाहतुकीचं, लोकांचं भान असलेली मी अगदी रुक्षपणे त्याच्याकडॆ बघत होते... कदाचित हेच कारण असावं त्याच्या उदास असण्याचं..
लहानपणी अगदी आमच्यातलाच एक वाटणारा पाऊसही आता मोठा झाल्यासारखा वाटला...माझ्यासारखाच..!!
त्यालाही आज भान असल्या सारंखं वाटत होतं लोकांचं, वेळेचं..म्हणून लगेचंच थांबला...लोकांची गैरसोय होतेय हे बहुदा लक्षात आले असावे त्याच्या;)
लहानपणी किती मज्जा असायची नाही पावसाची...कागदाच्या होड्या आणि चिखलात खेळ....घरी आईने केलेले कांदे भजे...आणि टि.व्ही वरील..एखादा आवडता कार्यक्रम...
आता मात्र ए.सी ऒफ़ीस च्या चार भिंती बाहेरचे पावसाचे अस्तित्व...ऒफ़िसातुन सुटल्यावरच जाणवते...याचं एकमेव कारण म्हणजे काचबंद खिडक्या ...
पावसाचं आणि खिडकीचं ही काही नातं असावं कारण जेव्हा जेव्हा हा पाउस बरसतो तेव…

मराठी पाऊल पडते पुढे?

काल सा रे ग म प चा एपिसोड बघितला... सगळ्याची गाणी छान झाली...मला अमृताचं "गुणी बाळ असा" गाणं आवडलं..ते तिने गायले म्हणुन नव्हे तर मुळ गाणंच छान आहे..
मधुराचं "ही वाट दूर जाते"... छानं च गायली...पण आताशा हे सा रे ग म प ही बोअर व्हायला लागलं आहे...
गाणी म्हणण्याचा कार्यक्रम मग त्यात जुजबी माहीती न देता परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेली मंडळी उगाचच्या गोष्टीवर का बोलतात हे मल न उलगडलेले कोडे आहे.. मलाही प्रत्येक गाण्याच्या मागे असलेल्या गमतीजमती माहीती करुन घ्यायला आवडते पण मग त्यासाठी एखादा वेगळा कार्यक्रम असावा (इतिहास..गाण्याचा) वगैरे नावचा
खरंतर आता सगळेच प्रोग्राम्स, सगळ्याच मालिका अगदी रटाळ वाटतात विशेषतः झी मराठीवरच्या..अगदी बोटावर मोजण्याइतकेच प्रोग्राम्स..मालिका तर सगळ्याच प्रेडिक्टेबल..सकाळच्या घाईत कुणाला वेळ आहे "गुड मॉर्निंग महाराष्ट्र" बघायला...कुठलीही छान गाणी जर लावलीत तर गृहीणी...कामावर जाणारी लोकं सगळेच काम करता करता गाणी ऐकु शकतात..जेव्हापासुन हे चैनल सुरु झाले आहे तेव्हापासुन गुड मॊर्निंग महाराष्ट्र सुरु आहे पण त्यात काहीही बदल नाही...आणि हे तरी…