Skip to main content

Posts

Showing posts from June, 2019

सैलाब

१९९६ चा काळ होता तो. एकच टीव्ही चॅनेल तेव्हा तुफान प्रसिद्ध होतं ते म्हणजे झी टीव्ही. 
बऱ्याच मालिका हिट पण होत्या. माझ्या टीव्ही प्रेमाची सुरुवात झाली शांती या मालिकेने, स्वाभिमान आणि मग एखाद वर्षाने देख भाई देख. या मालिकांनी डेली सोप चं दुकान उघडलं होतं. मग झी वर तारा, बनेगी अपनी बात, हम पांच, आणि असे अनेक धारावाहिक सुरु झाले. वेळ पण लागोपाठ असायची, संध्याकाळी अभ्यास करून झाला की बस सुरु व्हायचे हे कार्यक्रम. थोडे मोठे झाल्यावर एक खूप साधी मालीका सुरु झाली सैलाब नावाची. रेणुका शहाणे, सचिन खेडेकर, प्राजक्ती देशमुख हे प्रमुख कलाकार, रोहिणी हट्टंगडी, निनाद कामत आणि बाकीचेही दर्जेदार कलाकार यात होते. साधी स्टोरी पण सगळ्यांचा अभिनय मात्र लाजवाब. प्रत्येक एपिसोड असा वाटायचा की अगदी बाजूलाच घडतंय सगळं. 
शिवानी आणि रोहित चं एकमेकांवरचे प्रेम, त्याला होणारा विरोध आणि पर्यायाने शिवानी चे लग्न अविनाश ( महेश ठाकूर) सोबत असा साधा प्लॉट होता. पण घेतलेली सेटिंग, प्रत्येक एपिसोड चे डायलॉग म्हणजे एकदम दिल खल्लास.  रेणुका शहाणे, शिवानी च्या भूमिकेत छान वाटली पण सगळ्यात भावली ती प्राजक्ती देशमुख गायत…

नवाबाचे शहर आणि हैदराबाद

आपलीकडे सुट्टीच्या दिवसात मामाच्या गावाला जायचा प्रघात आहे, आता उद्या शाळा सुरु होतेय तेव्हा सुट्टीत काय काय केले हा प्रश्न सालाबादाप्रमाणे विचारला जाईलच म्हणून ही छोटी निबंधवजा पोस्ट :)  यावेळी मामाच्या गावाला तर आम्ही गेलोच पण त्याहीपेक्षा exciting अश्या नवाबाच्या गावाला जायचा योग आला. कामानिमित्त हैदराबाद ला ६-७ महिने राहिले आहे, तेव्हा काही खूप प्रगत नव्हते शहर. एकच जागा होती पॅरॅडाईस. बावर्ची पण अगदी नवेच होते तेव्हा. आणि मी अगदी शहराबाहेर होते राहायला, त्यामुळे माझा शहराशी जास्त संबंध आलाच नाही. माझा पहिला जॉब असल्याने मला जास्त फटकता आले नाही तेव्हा. यावेळी मात्र हॉलिडे मूड मध्ये असल्याने बऱ्यापैकी फिरणे झाले. 
पहिला स्टॉप म्हणजे कामथ हॉटेल, आम्ही नामपल्ली रेल्वे स्टेशन ला उतरलो, सकाळची वेळ होती, ड्राइवर नी पिक अप केल्यावर, चहा प्यायला थांबलो कामथ ला, हॉटेल स्टेशन च्या अगदी जवळ आहे. चेन्नई च्या संगीता, सर्वना भवन ची सवय असलेलो आम्ही. चहा बोलावला, इडली, डोसा ऑर्डर केला. लगेच छानपैकी चहा, गरम इडल्या,परपु पोडी, गोडसर असा कानडी सांबार आणि दोन चटण्या आल्यापण टेबल वर. आमची दाक्षिणात…