Posts

Showing posts from May, 2017

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती - मुरुक्कू

Image
मुरुक्कू म्हणजे तांदळाच्या पिठाची केलेली चकली. हा माझ्या घरातल्या सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. थोडक्यात थोडे कुरुम कुरुम काहीही आवडणारे माझ्या घरचे गडी आहेत त्यात मग पापड, चिप्स, मुरुक्कू, अगदी फरसाणही चालून जातं. जेवतांना रोज पापड हवाच असा हट्ट आमच्याकडे रोज असतो आणि तो पूर्ण करावाच लागतो. तर दिंटीकल  वरून येतांना असेच एक मुरुक्कू चे गाव लागले त्याचे नाव "माणप्पारै ". इथले मुरुक्कू फारच फेमस आहेत म्हणून रस्त्याच्या कडेला थांबलो एका दुकानात. तिथे जवळपास १० प्रकारचे वेगवेगळे मुरुक्कू होते.एवढ्या प्रकारचे मुरुक्कू मी पहिल्यांदाच बघत होते. चकल्या जश्या आपण घरी करतो तसे मुरुक्कू ही करतात पण खूप वेळ लागतो आणि आजकाल सगळे दुकानात मिळत असल्याने दिवाळीशिवाय कुणी मुरुक्कू करायला धजत नाही. तर माणप्पारै या गावी हे मुरुक्कू अगदी स्वस्त, तेलविरहित मिळतात. माणप्पारै  बऱ्यापैकी कावेरी  नदीच्या तीरावर वसलेलं आहे. हे मुरुक्कू तांदळाचे केलेले असतात. तिथे पिकणारा तांदूळ आणि पिढ्यानपिढ्या मुरुक्कू करणारे कारागार हे तंत्र जुळले आहे त्यामुळेही ह्या पदार्थाला एक वेगळी चव असते. दुकानात पु…

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती - सुंडल

Image
चेन्नई तिरुचिरापल्ली हायवे वर ९९ नावाचे एक हॉटेल आहे.परवा दिंटिकल ला जातांना तिथे थांबलो. ऐन छोट्या भुकेची वेळ. कॉफी पण प्यायची होती. नेहेमी ग्रँड स्वीट्स किंवा अड्यार आनंद भवन मध्ये मिळणारी खाण्याची वस्तू, अशी हायवे वरच्या हॉटेलात मिळेल असे वाटलेही नव्हते. पण मस्तपैकी शेंगदाण्याचे सुंडल (साधेच), केळफुलाचे वडे, आणि कॉफी चा आस्वाद घेतला. 
सुंडल हा प्रकार अतिशय सोपा, वेळेनुरूप आहे असे मला नेहेमी वाटते. ४-५ वाजता पोटात कावळे ओरडायला लागतात, तेव्हा अगदी खूप जास्त नाही आणि कमीही नाही असे "काहीतरी" खायला हवे असते. असेच काहीतरी म्हणजे सुंडल. चणे, शेंगदाणे, चवळी, हिरवे मूग, राजमा, कुळीथ असे कुठलेही कडधान्य सुंडल मध्ये वापरता येते. अगदी साधी सोपी पद्धत आहे सुंडल करण्याची, लक्षात ठेवून कुठलेही कडधान्य आदल्या रात्री भिजत घालावीत, सकाळी त्यातून पाणी निथळू द्यावे , एका सुती कापडात बांधून ठेवावे. मूग, मोट आणि मोड येणारी कडधान्ये थोडी एक दिवस जास्त बांधून ठेवायला लागतात. पण काळे चणे, काबुली चणे, राजमा, चवळी, शेंगदाणे वगैरे ला रात्री भिजवून छानपैकी उकळून घेतले की ही मंडळी सुंडल साठी सज्ज अ…

कथा कहे सो कथक !

Image
माणूस मोठा जरी झाला नं, तरी त्याला लहानपणी दिलेले संस्कार आणि अजून काही त्याला  आवडलेल्या गोष्टी कधीच सोडू शकत नाही. बस्स थोडा वेळ मिळावा आणि राहून गेलेल्या आवडत्या गोष्टी, छंद जोपासण्याची संधी मिळावी. आजकालच्या धकाधकीच्या काळात मी छंद जोपासण्याला कोपिंग मेकॅनिसम म्हणते. हल्ली बऱ्याच गोष्टीला मी रिलेट करू शकत नाही. जसे व्हाट्स अँप, फेसबुक, आजूबाजूचे अगदी बदललेले सतत धावणारे जग. लहानपणी हे असे नव्हते, साधे सोपे आणि सरळ होते असं मला वाटतं. तेवढा वेळ पुन्हा मागे जाऊन येणे शक्य नाही हे ही माहिती आहे, पण मनाला तेवढी शांतता देता यावी ह्या उद्देशाने मी कथक शिकायला सुरु केलं. खरंतर अजून ३ वर्षे थांबली असती तर कदाचित कृष्णवी सोबतच शिकता आलं असतं. पण आपण आधी शिकावे म्हणजे तिला जरा सांगता येईल असे वाटले.  चेन्नई म्हणजे भरतनाट्यम, भरतनाट्यम म्हणजे चेन्नई असं समिकरण वर्षानुवर्षे घट्ट बसलेलं आहे. मार्गळी महिना पूर्ण भरतनाट्यम चे चेन्नईत मोठे प्रोग्रॅम्स होत असतात. म्युसिक अकॅडेमी, नारद गान सभा, कृष्ण गान सभा, मैलापुर फाईन आर्ट्स क्लब, अश्या मोठ्या आणि नामवंत हॉल्स मध्ये मोठे मोठे कलाकार परफॉर्म कर…

One for the road!!

Image
३ दिवसात जवळपास १००० किमी चा पल्ला गाठत आम्ही चेन्नई ला परतणार होतो. कूर्ग वरून सरळ घरी नं येता, आम्ही केरळ ला जायचे ठरवले. मी १० वर्षांपासून तामिळ नाडू त राहते पण मी आजवर कधी केरळ ला गेले नव्हते. ऐकून आश्चर्य वाटेल पण माझ्या दोन अतिशय खास मैत्रिणी केरळ च्याच आहेत. वेळ यायला लागते कदाचित कुठेही जायची. कूर्ग वरून निघालो ते वटकरा या गावी जायला, आमचे खूप प्रिय मित्र श्रीजीत ह्यांचे तिथे घर आहे आणि अनायासे ते संपूर्ण कुटुंबासकट आपल्या गावी होते. सकाळी लवकर निघायचे ते जरा उशिराच निघालो. ब्रेकफास्ट केला तो कर्नाटकी कोळुकट्टइ (म्हणजे तांदुळाचे मुठिये) आणि छानसा सांबर, बटाट्याची भाजी आणि गरमागरम डोसे, गंगाधरन सरांच्या घरी हा मेनू होता. पद्मा मावशींनी म्हणजे गंगाधरन सरांच्या बायकोनीं सगळी सुंदर व्यवस्था केली होती. ५० वर्षे पद्मा मावशी घराची धुरा साम्भाळतायत.  प्लांटेशन्स मध्ये आयुष्य खूप सोपे नसते कधी. कोणी येणार नाही, जाणार नाही, घर आणि एकटेपणा अशी बरीच वर्षे पद्मा मावशींनी गंगाधरन सरांसोबत काढली आहेत, त्यांना आम्ही गेल्याने फारच छान वाटले. त्यांनी केलेल्या कॉफी चा स्वाद अगदी वेगळा होता.  नि…

साहेबाचा बंगला आणि चिरतरुण कॉफी

Image
होसूर - कूर्ग  खूप सुंदर असा रस्ता, आजूबाजूला गुलमोहराची झाडे, तेवढ्या गर्मीत आणि उन्हात दिमाखात आपली सुंदर लाल फुले घेऊन उभी असलेली. मजल दरमजल करत आणि वाट चुकत चुकत आम्ही कूर्ग ला पोचलो. खरेतर कूर्ग ला गेलोच नाही, कूर्ग ला बायपास करून टाटा ची कोटाबेट्टा कॉफी इस्टेट आहे, तिकडे निघालो. जसे जसे उंचावर जात होतो तसे तसे थंड वाटत होते. उंचावर येता येता गुलमोहराची साथ केव्हा सुटली कळालेच नाही. आजूबाजूला कॉफी ची झाडे आणि अधून मधून एखादे काळीमिरीच्या वेलाच्या मिठीत असल्यासारखे सिल्वर ओक चे झाड.  बस विराजपेट पासून सुरु झालेले हे कॉफी चे जंगल अगदी परतीच्या प्रवासात सुध्दा बहुतांशी सोबत होते. दुपारच्या टळटळत्या उन्हात सुध्दा ही झाडे एकदम छान टवटवीत दिसत होती. 

मन कसं असतं नं? थोडं काही नवीन दिसलं कि रमलं तिथेच. पण कॉफी इस्टेट मला काही नवीन नव्हती. मला फक्त पुन्हा पहिल्यासारखा आस्वाद घ्यायचा होता, ह्या सुंदर कॉफी आणि चहा नि लगडलेल्या भव्य डोंगरांचा.. त्यांची युगायुगांपासून सुरु असलेली साधना मला पुन्हा अनुभवायची होती. ह्या डोंगरांचा सतत सुरु असलेला "सोहम" चा जप मला ऐकायचा होता. आपण खूप …

रोडट्रिप!

Image
रोडट्रीप:  चेन्नई - आंबूर 
हे वर्ष अतिशय व्यस्त असे काही सुरु झाले, जानेवारी मध्ये माझा कथक चा प्रोग्रॅम होता त्याची प्रॅक्टिस, मग मॅरेथॉन पोस्टपोन होत होत अगदी प्रोग्रॅम च्या आजू बाजूलाच ठरली होती.. हे सगळे होते ना होते तेच माझ्या नणंदेचं लग्न आणि नंतर माझ्या बहिणीची डिलिव्हरी. डिलिव्हरी नुकतीच संपते आणि ती थोडी सेटल होते ना होते तोवर आमचे शिफ्टिंग चे सुरु झाले.. त्यात जवळपास १ आठवडा गेला. मी आणि कृष्णवी दोघींनी ठरवलेच होते की जश्या सुट्ट्या लागल्या तसे कुठेतरी जायचेच. कदाचित हीच अगदी बरोबर वेळ होती बाहेर निघायची आणि थोडा आराम करायची. एका दिवसात प्रोग्रॅम ठरला आणि आम्ही निघालो रोडट्रीप ला. पहिली रोड ट्रिप!  दरवर्षी कृष्णवी लहान म्हणून आम्ही जवळच्या ठिकाणी जाऊन परत येत असू. पण ह्यावेळी तिनेच आग्रह धरला की बाबा दूर जाऊया. आम्ही दोघेही जीआयएस प्रोफेशनल्स असल्याने एक १० वर्षांपूर्वी कॉफ़ी, चहा एस्टेट्स चा सर्वे केला होता, आणि कूर्ग हे ठिकाण तेव्हा आम्हाला फार आवडलं होतं. विशेष म्हणजे तेव्हा तिथे राहण्याचा बंदोबस्त एका ब्रिटिशकालीन  बंगल्यात केला होता. २०१० मधेही गेलो होतो कूर्ग ला पण ती …

बाहुबली २

Image
पहिला भाग बाहुबलीचा मी टीव्ही वर पहिला होता आणि म्हंटले होते की पुढचा भाग मी नक्की थेटर मध्ये बघणार. बस्स, बाहुबली २ रिलीज  झाला आणि अगदी दुसऱ्याच दिवशी आम्ही बघायला गेलो. उत्कंठा तर होतीच, नयनरम्य ग्राफिक्स बघायची पण त्याहूनही जास्त मला अमरेंद्र बाहुबली ला प्रभास नी कसे पोर्ट्रे केलं आहे ते बघायचं होतं. अमरेंद्र बाहुबली ला मी मनात घरी घेऊनच परत आले एवढा छान न्याय या भूमिकेला प्रभास नी दिलाय. पहिल्या भागात सुध्दा अमरेंद्र बाहुबली होतेच पण ह्या भागात जरा अजून छान व्यक्तिमत्व दाखवलं आहे असे मला वाटले. मोहक स्मित, साधा चेहरा आणि लोकांसाठी करण्याची वृत्ती (हे सांगणे नं लगे)ह्यामुळे ही अमरेंद्र बाहुबली चे महिष्मती मध्ये असलेलं फॅन फॉलोविंग अगदी बरोबर आहे असे वाटते.  

अनुष्का फारच  सुंदर दिसली आहे. तिची देवसेना पण मनात घर करून राहते. तामिळ मध्ये तिचे डायलॉग्ज एकदम कातिल आहेत. कुठेही अति अभिनय नाही. एकदम समतोल भूमिका केली आहे. राजामौळी यांनी तिला खूप सुंदर दाखवण्याचा प्रयत्न केला जो अगदी यशस्वी झाला. ती खरोखरी राणी वाटते आणि राजकन्येपासून राणी होण्यापर्यंत चा प्रवास तिने खूप छान प्रकारे आप…