बाहुबली २

पहिला भाग बाहुबलीचा मी टीव्ही वर पहिला होता आणि म्हंटले होते की पुढचा भाग मी नक्की थेटर मध्ये बघणार. बस्स, बाहुबली २ रिलीज  झाला आणि अगदी दुसऱ्याच दिवशी आम्ही बघायला गेलो.
उत्कंठा तर होतीच, नयनरम्य ग्राफिक्स बघायची पण त्याहूनही जास्त मला अमरेंद्र बाहुबली ला प्रभास नी कसे पोर्ट्रे केलं आहे ते बघायचं होतं. अमरेंद्र बाहुबली ला मी मनात घरी घेऊनच परत आले एवढा छान न्याय या भूमिकेला प्रभास नी दिलाय. पहिल्या भागात सुध्दा अमरेंद्र बाहुबली होतेच पण ह्या भागात जरा अजून छान व्यक्तिमत्व दाखवलं आहे असे मला वाटले.
मोहक स्मित, साधा चेहरा आणि लोकांसाठी करण्याची वृत्ती (हे सांगणे नं लगे)ह्यामुळे ही अमरेंद्र बाहुबली चे महिष्मती मध्ये असलेलं फॅन फॉलोविंग अगदी बरोबर आहे असे वाटते.  


अनुष्का फारच  सुंदर दिसली आहे. तिची देवसेना पण मनात घर करून राहते. तामिळ मध्ये तिचे डायलॉग्ज एकदम कातिल आहेत. कुठेही अति अभिनय नाही. एकदम समतोल भूमिका केली आहे. राजामौळी यांनी तिला खूप सुंदर दाखवण्याचा प्रयत्न केला जो अगदी यशस्वी झाला. ती खरोखरी राणी वाटते आणि राजकन्येपासून राणी होण्यापर्यंत चा प्रवास तिने खूप छान प्रकारे आपल्या भूमिकेतून साकारला. राणी असल्यावरचा तिचा पॉइस थोड्यावेळाकारता थक्क करून जातो. वेषभूषा टीम ला  १०० मार्क्स! प्रत्येक भूमिकेची वेशभूषा फारच विचार करून केलेली आहे. काय नवीन त्यात? मागच्या भागातही अशीच तर वेशभूषा होती. हो होती, पण ह्यावेळी प्रत्येक भूमिकेच्या वयाचा फरक ही ध्यानात घेण्यासारखी बाब. अमरेंद्र बाहुबली तिशीच्या आसपास आणि थोडी लहान देवसेना, मधल्या वयातली देवी शिवगामी आणि तिशीतला बल्लाळदेव. 

 अमरेंद्र  बाहुबली चे कपडे त्यांच्या वयाचा आणि मुख्यतः हुद्द्याकडे लक्ष देऊन ठरवले आहेत असे वाटले. गुलाबी, मरून , मोरपंखी, हिरवे शेड्स असे गडद चे रंग वापरून आधीच उमदा दिसणारा प्रभास अजूनच छान दिसतो आणि खरोखरीच राजा वाटतो.  हत्तीवरचा तो स्टंट तर एकदम पाहण्याजोगा आहे खरोखरी लार्जर दॅन लाईफ अनुभव. महिष्मती च्या द्वाराशी  असलेले  दोन हत्तीची  शिल्पं केवळ कलात्मकतेचा कळस. 
देवसेनेचा प्रासाद फार सुंदर दाखवला आहे. एक मला विसंगती जाणवली ती म्हणजे, देवसेनेचा प्रदेश बर्फाळ दाखवला आहे, पण तिथेच बरेचसे शेतकरी आणि त्यांची शेती दाखवली आहे. विसंगत आहे खरं  पण तेवढी क्रिएटिव्ह लिबर्टी आपण द्यायला हवी. 

राणा बल्लाळदेवाच्या भूमिकेला न्याय देतो. वेशभूषा, आणि बॉडी लँग्वेज अगदी छान जमवून आणली आहे राणा ने. काही सिक्वेन्स मध्ये बल्लाळदेव भाव खाऊन जातो अमरेंद्र बाहुबली पेक्षा. दोघांनीही शरीर सौष्ठव कमावले आहे आणि त्या त्या भूमिकेला अजून उठाव आणण्याचा प्रयत्न केलाय. याबाबतीत मोठेमोठे सलमान, ह्रितिक यांना पाणी पाजवण्याचे काम राणा आणि प्रभास नी केलेय असे वाटले. 
अनुष्का आणि प्रभास चे एकच गाणे ग्राफिक्स नी अतिशय सुंदर केले आहे. प्रत्येक ठिकाणी काहीतरी सिम्बॉलिक आहेच, हे गाणे ही खूप अंशी सिम्बॉलिक गाणे आहे असे मला वाटले.  
कटप्पा ची भूमिका साकारणाऱ्या सत्यराज बद्दल तामिळ नाडू मध्ये काही प्रॉब्लेम झाला होता. म्हणून २८ ला इथे रिलीज झाला नाही चित्रपट. पण त्यांनी दुसऱ्या भागाच्या पहिल्या अंकात थोडी विनोदी भूमिका छान निभावली आहे. प्रभास ने पण त्या विनोदी भूमिकेला बरीच साथ दिलीये. नासिर बद्दल तर सांगायलाच नको. मला बऱ्याच अंशी शकुनी मामा आठवले (महाभारतातले) नासिर ला बघून. 
राजमाता शिवगामी - रम्या कृष्णन एकदम सुंदर दिसते. तिच्या मनातली घालमेल, तिचे चुकलेले निर्णय आणि लगेच चुकीची माफी मागण्याची प्रवृत्ती तिने अभिनयातून फार छान चितारली आहे. यावेळेला तिच्या भूमिकेला थोडा ग्रे शेड दिला गेलाय पण ती त्यातही छानच दिसते. साड्या तशाच एक से एक. दागिने राजमातेला साजेसे आणि त्यात तिचे ते ठळक कुंकू. अतिशय सुंदर. 
राजमौळीं यांनी लोकांच्या उत्कंठेला न्याय दिला आणि पहिल्या भागाइतकाच दुसरा भागही छान जमलाय. मला तर बाहुबली ३ पण बघायला आवडेल. Comments

Popular posts from this blog

अविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा