कित्येक दिवसांपासुन मी काही लिहिलेलंच नाहीए. कितीदा माझ्या डोक्यात विषय आले..अगदी पॅराग्राफ चे पॅराग्राफ तयार झाले पण टायपता मात्र आले नाही... अनेक घडामोडी झाल्या काही अपेक्षित काही अनपेक्षित..आजकाल काहीही झालं ना की माझ्या मनात एक विचित्र प्रकारची भिती भरते..आता उद्यापासुन श्राध्द पक्षाचे दिवस सुरु होणार...आई म्हणायची हे दिवस चांगले नसतात. Science च्या दृष्टीने पण पावसाळयात पाण्यात होणारे बदल, हवामानात होणारे बदल यांमुळे थोडं सर्दी पडसं ताप हे सगळं येणारंच त्यामुळे मलाही आजकाल हे खरं वाटू लागलंय. बाबांची ५ दिवसापासुन तब्येत बरी नाही. नेहमी हसता खेळता माणुस असा तापाने हैराण असला की खरंच वाईट वाटतं..माझं लक्षंच नाहिए कशात परवापासुन...त्यांची तब्येत बरी नाहिए आणि मी इथुन काहीच करु शकत नाही हे फ़ीलींग खुप बेकार आहे..इथुन डायरेक्ट फ़्लाईट का नाही नागपुरसाठी हा प्रश्न मला नेहमीच पडतो. :( आज बाप्पा जाणार गावाला. इतके दिवस स्वाईन फ़्लु च्या भितीत घालवल्यावर बाप्पाचे आगमन खरंच खुप आनंददायी होते."थांबा हो अजुन थोडे दिवस" असं म्हणावं वाटतंय बाप्पाला. ६ व्या दिवशी मोदक केले,छान झाले असं...
गप्पागोष्टी, खाद्यभ्रमंती आणि सगळ्या मनाला भिडलेल्या गोष्टींची बखर!