कित्येक दिवसांपासुन मी काही लिहिलेलंच नाहीए. कितीदा माझ्या डोक्यात विषय आले..अगदी पॅराग्राफ चे पॅराग्राफ तयार झाले पण टायपता मात्र आले नाही...
- अनेक घडामोडी झाल्या काही अपेक्षित काही अनपेक्षित..आजकाल काहीही झालं ना की माझ्या मनात एक विचित्र प्रकारची भिती भरते..आता उद्यापासुन श्राध्द पक्षाचे दिवस सुरु होणार...आई म्हणायची हे दिवस चांगले नसतात. Science च्या दृष्टीने पण पावसाळयात पाण्यात होणारे बदल, हवामानात होणारे बदल यांमुळे थोडं सर्दी पडसं ताप हे सगळं येणारंच त्यामुळे मलाही आजकाल हे खरं वाटू लागलंय.
- बाबांची ५ दिवसापासुन तब्येत बरी नाही. नेहमी हसता खेळता माणुस असा तापाने हैराण असला की खरंच वाईट वाटतं..माझं लक्षंच नाहिए कशात परवापासुन...त्यांची तब्येत बरी नाहिए आणि मी इथुन काहीच करु शकत नाही हे फ़ीलींग खुप बेकार आहे..इथुन डायरेक्ट फ़्लाईट का नाही नागपुरसाठी हा प्रश्न मला नेहमीच पडतो. :(
- आज बाप्पा जाणार गावाला. इतके दिवस स्वाईन फ़्लु च्या भितीत घालवल्यावर बाप्पाचे आगमन खरंच खुप आनंददायी होते."थांबा हो अजुन थोडे दिवस" असं म्हणावं वाटतंय बाप्पाला. ६ व्या दिवशी मोदक केले,छान झाले असं पब्लिक म्हणाली. मी स्वतःची पाठ थोपटुन घेतली. मोदक करणं माझ्या रक्तातंच आहे अशी बढाईही मारली :)
- कालपासुनचा आर्मी, एअर फ़ोर्स चा शोध आज मुख्यमंत्री राजशेखर रेड्डीं आणि त्यांच्या इतर सहप्रवाश्यांच्या सापडलेल्या शवांमुळे संपुष्टात आला. अश्या चांगल्या माणसाला आलेले दुर्दैवी मरण पाहुन मला खुप वाईट वाटले :(
- वजनाचा काटा काही केल्या ६९ च्या खाली उतरतंच नाहिए काय माहित काय झालंय त्याला? सगळं डाएट नीट करते तरीही कसला प्रोब्लेम आहे कळत नाही...जाऊ दे तो काही खुप महत्वाचा विषय नाही.
- सुनामीग्रस्त लोकवस्तीत जाऊन आले..एक मोठ्ठा लेख होवु शकतो त्यावर खरंतर..भयंकर अवस्था आहे त्यांची :(
- मागच्या हफ़्त्यात माझी मैत्रिण येऊन गेली..मला खुप छान वाटलं. मैत्रिणीची जागा कुणीच घेऊ शकत नाही खरं पाहिलं तर. तिच्याशी गप्पा मारतांना रोज मी खरंच काहीतरी मिस करतेय असं वाटल्याशिवाय राहिलं नाही..तिलाही मुंबईला परतल्यावर मलेरिया झाला :(
आत्तासाठी एवढं पुरे...
- खिन्न :( मुग्धा :)
कित्येक दिवसांपासुन मी काही लिहिलेलंच नाहीए. कितीदा माझ्या डोक्यात विषय आले..अगदी पैराग्राफ चे पैराग्राफ तयार झाले पण टायपता मात्र आले नाही...
अहो मुग्धाताई.. गुलमोहर असा खिन्न का? चित्रात तर मस्त फुललेला दिसतो आहे, त्याला असाच फुललेला ठेवा ना..
ReplyDeleteओ गोरी जरा हसदे तु.. हसदे तु.. हसदे जराsssss!!
मुग्धा.. कशाला उगिच काळजी करायची? जाउ दे.. होईल कमी कधी तरी. डायटींग तरी किती करायचं नां? आणि श्राध्द पक्षाचे दिवस खुप चांगले असतात बरं कां... कारण माझा जन्मंच झालाय पंचमीला.. पक्ष पंधरवड्यामधे. माझी मागची कार वॅगन आर मी चक्क माझ्या तिथी नुसार वाढदिवसालाच घेतली होती.
ReplyDeleteखिन्नं वाटतंय़?? जुन्या छान छान गोष्टी आठवा.... हे गाणं माझं फेवरेट आहे बरं कां..
http://www.youtube.com/watch?v=XHTN4Jvi6lg
अरेच्चा अशा गोष्टींमुळे असं उदास का व्हावं ? उन्हाळयानंतर पावसाळा येतोच ना आणि मग मेलेलं गवत पुन्हा हिरवंगार होतं. तसंच आपलही असतं, काही दिवस असतातच असे ज्यावेळेस आपण एकदम डाऊन फील करतो. ती वेळ सरली की मग बघ गुलमोहर पुन्हा फुलेल. जेव्हा सगळी झाडं पानं गाळतात तेव्हाच गुलमोहर फुललेला असतो, बरोबर ना ? तसंच स्वत:लाही ठेव, नेहमी फुललेलं.
ReplyDeleteआपलं आयुष्यच किती असतं, इन मीन ५० वर्षे, त्यातल अर्ध सरलं, राहीलेल्यातला प्रत्येक दिवस हा खुप महत्त्वाचा आहे आणि तो मी हसतच घालवणार असा एकदा विचार कर आणि मग बघ...तुझ्या आजुबाजुला सुद्धा सगळं काही चांगलच घडेन.
तु़झे बाबा लवकर बरे होवोत ही शुभेच्छा !
-अजय
"वजनाचा काटा काही केल्या ६९ च्या खाली उतरतंच नाहिए काय माहित काय झालंय त्याला? सगळं डाएट नीट करते तरीही कसला प्रोब्लेम आहे कळत नाही…जाऊ दे तो काही खुप महत्वाचा विषय नाही."
ReplyDeleteVajankata badaloon tak :D
ho aata tasach karava lagel :P
ReplyDeleteगुलमोहर कल मुरझाया था, आज फुलला आहे ;)
ReplyDeleteआमच्या घरी तब्येतीच्या कुरबुरी चालु असतात या दिवसांत म्हणुन "हे दिवस खराब" असं वाटतं.
ReplyDeleteपण तुमचा जन्मंच झालाय या दिवसांत म्हंटल्यावर हे दिवस तितके वाईट नाहीत ;)
सगळी झाडं पानं गाळतात तेव्हाच गुलमोहर फुललेला असतो>> हो ना म्हणुन तर मला एवढ्या झाडाफुलांत गुलमोहर आवडतो...
ReplyDeleteपुन्हा हेच म्हणते "गुलमोहर कल मुरझाया था, आज फुलला आहे ;)"
बाबा आता बरे आहेत.
धन्यवाद अजय!!
nagpur sathi direct flight aahe ki...www.goindigo.in war bhet dya...
ReplyDeleteHope you are feeling better :-) .... अगं आणि काही दिवसांपुर्वी मी तुला ऑफलाईन मेसेज ठेवला होता माझ्या ई मेल आय डी चा... मिळाला का? तुझं काहिच उत्तर आलं नाही. म्हणुन विचारलं.
ReplyDelete