Skip to main content

भुलाबाई आणि भुलोजी

:)
बरेच दिवस झाले अनुदिनीकडे पाहुन..म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस तसं काहीसं झालं असावं. लहानपणी नवीन फ़्रॉक, चप्पल, कंपॉस किंवा काहीही घेतलं तरी मला रात्रभर झोपेतही छान वाटत असे.
तसंच काहीसं या अनुदिनीबाबतीत झालं. विषय शोधायला लागले मी आपोआप आणि उतरवत गेले जसं वाटेल तसं..काहीवेळा हातच्या कामाकडे दुर्लक्ष करुन, रविवार असाच वाया नं घालवता सकाळी उठुन अशी काहीशी माझ्याही अनुदिनी ची पाने भरली आणि त्याला योग्य ते प्रतिसादही मिळाले...
एका नववधूची एका नव्या जागेत नव्या वातावरणात होणारी गम्मत..तिला तिच्या भाषेचं, तिच्या लोकांचं वाटणारं कौतुक, सणंवारं, माहेरची सतत येणारी आठवण हे सगळं भरभरुन मला इथे उतरवता आलं..
नुकतीच माहेरी जाऊन आले...माझी बर्‍याच दिवसाची इच्छा पूर्ण झाली...येतांना एकटीच आली कारण श्रीमंत आधीच परतले होते :) मग काय गाडीने जसा जसा वेग घेतला तशी तशी मी अंतर्मुख होऊ लागले..
आम्ही लहानपणी भुलाबाई बसवत असु..अजुनही विदर्भात कोजागिरीला भुलाबाई बसवतात..आणि वेगवेगळे पदार्थ प्रसादाकरिता बनवुन मोहल्ल्यातल्या पोरी गाणी म्हणतात..त्यादिवशी घरातल्या मोठ्या अपत्याला खास नविन ड्रेस दिल्या जातो. त्याला "आसनी" असे म्हणतात..माझ्या डोक्यात सगळी भुलाबाईची गाणी आली..आणि सगळ्यात आवडतं गाणं..
"आला माझ्या माहेरचा वैद्य,
डोक्याला टोपी भरजरी
अंगात सदरा रेशमी
तोंडात वीडा केशराचा
हातात काठी चंदनाची
कसा गं दिसतो राजावानी बाई राजावानी..
...............................................
आला माझ्या सासरचा वैद्य
डोक्याला टोपी फ़ाटकी तुटकी
अंगात सदरा मळलेला
हातात काठी जळकं लाकुड
कसा गं दिसतो भिकार्‍यावानी बाई भिकार्‍यावानी
आणि माझंच मला खुद्कन हसु आलं.
कशी गम्मत असते नाही सासरची आणि माहेरची..??
असंच अजुन एक गाणं...
अककण माती चिक्कन माती...
जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई
रवा पीठी दळावी
अश्शी पिठी सुरेख बाई
करंज्या कराव्या
अश्श्या करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा
अश्शी पालखी सुरेख बाई
माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडुनी मारीतं
पाठवणीच्या वेळी मी खुप रडले होते..शेवटी अगदी नं राहवुन, हे सगळं जणू काही फ़क्त आपल्यामुळेच होतंय असं वाटुन श्रीमंतांनी मला दर दोन महीन्यानी माहेरी धाडायचं प्रॉमिस दिलं होतं ;) "अस्सं सासर द्वाड बाई कोंडुनी मारीतं" हे म्हणतांना मला त्यांचा माझ्या रडण्याने लहानसा झालेला चेहरा आठवला..आणि वाटलं काय जादु असते नाही??एवढ्या एकाच माणसासाठी आपण सगळं सोडुन एवढ्या लांब रहायला तयार होतो..अगदी काही विचार नं करता...
भुलाबाई आणि भुलोजींची जोडी नाही म्हणता म्हणता रंगतेच संसारात..तसंच काहीसं माझं झालं आणि थोड्या फ़ार फ़रकाने तुमचं ही नाही???
सासर किती जरी द्वाड असलं तरी ते आहे म्हणुन माहेराला किंमत आहे..
:)

बरेच दिवस झाले अनुदिनीकडे पाहुन..म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस तसं काहीसं झालं असावं. लहानपणी नवीन फ़्रॉक, चप्पल, कंपॉस किंवा काहीही घेतलं तरी मला रात्रभर झोपेतही छान वाटत असे. तसंच काहीसं या अनुदिनीबाबतीत झालं. विषय शोधायला लागले मी आपोआप आणि उतरवत गेले जसं वाटेल तसं..काहीवेळा हातच्या कामाकडे दुर्लक्ष करुन, रविवार असाच वाया नं घालवता सकाळी उठुन अशी काहीशी माझ्याही अनुदिनी ची पाने भरली आणि त्याला योग्य ते प्रतिसादही मिळाले...

एका नववधूची एका नव्या जागेत नव्या वातावरणात होणारी गम्मत..तिला तिच्या भाषेचं, तिच्या लोकांचं वाटणारं कौतुक, सणंवारं, माहेरची सतत येणारी आठवण हे सगळं भरभरुन मला इथे उतरवता आलं..

नुकतीच माहेरी जाऊन आले...माझी बर्‍याच दिवसाची इच्छा पूर्ण झाली...येतांना एकटीच आली कारण श्रीमंत आधीच परतले होते :) मग काय गाडीने जसा जसा वेग घेतला तशी तशी मी अंतर्मुख होऊ लागले..

आम्ही लहानपणी भुलाबाई बसवत असु..अजुनही विदर्भात कोजागिरीला भुलाबाई बसवतात..आणि वेगवेगळे पदार्थ प्रसादाकरिता बनवुन मोहल्ल्यातल्या पोरी गाणी म्हणतात..त्यादिवशी घरातल्या मोठ्या अपत्याला खास नविन ड्रेस दिल्या जातो. त्याला "आसनी" असे म्हणतात..माझ्या डोक्यात सगळी भुलाबाईची गाणी आली..आणि सगळ्यात आवडतं गाणं..

"आला माझ्या माहेरचा वैद्य,

डोक्याला टोपी भरजरी

अंगात सदरा रेशमी

तोंडात वीडा केशराचा

हातात काठी चंदनाची

कसा गं दिसतो राजावानी बाई राजावानी..

...............................................

आला माझ्या सासरचा वैद्य

डोक्याला टोपी फ़ाटकी तुटकी

अंगात सदरा मळलेला

हातात काठी जळकं लाकुड

कसा गं दिसतो भिकार्‍यावानी बाई भिकार्‍यावानी

आणि माझंच मला खुद्कन हसु आलं.

कशी गम्मत असते नाही सासरची आणि माहेरची..??

असंच अजुन एक गाणं...

अककण माती चिक्कन माती...

जातं ते रोवावं

अस्सं जातं सुरेख बाई

रवा पीठी दळावी

अश्शी पिठी सुरेख बाई

करंज्या कराव्या

अश्श्या करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या

अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं

अस्सा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा

अश्शी पालखी सुरेख बाई

माहेरी धाडावी

अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं

अस्सं सासर द्वाड बाई कोंडुनी मारीतं

पाठवणीच्या वेळी मी खुप रडले होते..शेवटी अगदी नं राहवुन, हे सगळं जणू काही फ़क्त आपल्यामुळेच होतंय असं वाटुन श्रीमंतांनी मला दर दोन महीन्यानी माहेरी धाडायचं प्रॉमिस दिलं होतं ;) "अस्सं सासर द्वाड बाई कोंडुनी मारीतं" हे म्हणतांना मला त्यांचा माझ्या रडण्याने लहानसा झालेला चेहरा आठवला..आणि वाटलं काय जादु असते नाही??एवढ्या एकाच माणसासाठी आपण सगळं सोडुन एवढ्या लांब रहायला तयार होतो..अगदी काही विचार नं करता...

भुलाबाई आणि भुलोजींची जोडी नाही म्हणता म्हणता रंगतेच संसारात..तसंच काहीसं माझं झालं आणि थोड्या फ़ार फ़रकाने तुमचं ही नाही???

सासर किती जरी द्वाड असलं तरी ते आहे म्हणुन माहेराला किंमत आहे..

-सासरी रुळलेली मुग्धा ;)

Comments

  1. कमाल बदलत चाललय बघ आयूष्य....मी पार विसरले होते मुलांना भूलाबाईबद्दल सांगायला....थँक्स ....पोस्ट छान झालीये....
    भूलाबाई मधे खाऊ ओळखणे.....टिपऱ्या खेळणे सगळच मागे पडतय.....आमच्या लहानपणी माझे बाबा गाणी म्हणत आमच्याबरोबर....त्यांना भूलाबाईची सगळी गाणी पाठ होती.....कारण सगळ्या बहिणींमधे गेलेले बालपण आणि स्वत:च्या मुलींवर असलेला प्रचंड जीव....मग आमच्या आनंदात सहभागी होण्याची प्रत्येक संधी ते साधायचे.....

    ReplyDelete
  2. nakki sang mulaanna bhulabainbaddal..aani kojagirila ganehi mhanat ja..
    babahi gani mhanayache aikun khup chhan watale...majhyasobat majhe sagale mama, aajoba mhanayache gani...
    khup gammat hoti nahi lahanpani..??
    pratisadabaddal dhanyavad...:)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटा...

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...