टाटा मेमोरिअल मधे तर जणु काही जत्राच भरली होती..पहिल्या दिवशी आईला डे केअर मध्ये किमोथेरेपी घ्यायला सांगितली...तिला अजिबात सहन न झाल्याने चार दिवसांची लांब किमो सुरु केली..टाटा मेमोरिअल ही एक खुप मोठी संस्था आहे..कुठेतरी सगळेच सुन्न असल्यासारखे वाटतात तिथे...एक मात्र लक्षात आलं तिथे कॅंसर ची कुठलीच जात नाही...टाटाला सगळेच सारखे..
तिथे राहणे हा एक भयंकर अनुभव होता...आईजवळ हॉस्पिटल मध्ये फ़क्त एकच व्यक्ती राहु शकायची त्यामुळे आम्हाला बाहेर कुठेतरी लॉज बघणं आवश्यक होतं..परेल सारख्या ठिकाणी लॉज मिळणं कठीण..शेवटी आमच्या बजेटमधली रहायची जागा गवसली...आईची एक किमो झाल्यावर २ महिन्यानी पुन्हा मुंबईला यायला सांगितलं होतं..नागपुरला अजुन २ किमोथेरेपीच्या सायकल्स घेउन मग पुन्हा मुंबईला जायचं होतं..किमोथेरेपी ने तिच्या अन्ननलिकेभोवती असलेलं लेजन कमी व्हायला हवं होतं..
नागपुरला आल्यावर जरा हायसं वाटलं..हा तिच्यासोबत घालवलेला सुंदर काळ होता..
तिला हे माहित होतं की आता आपले केस जाणार आपण विचित्र दिसणार..पण सुदैवाने असं काही झालं नाहि..तिला त्रास व्हायचा खुप जेवतान्ना..मुग्धा मल नं लोणचं भात खाव वाटतो गं म्हणायची..माझं उत्तर ठरलेलं असत असे.."बस तु थोडि बरि हो आपण मज्जा करु"
तिला तिखट खायला जमायचं नाही म्हणुन आम्हीही तिच्याच सारखं जेवायला सुरुवात केली..तिला आवडेल तेच करायचो आणि खायचो..
मला झोपल्या झोपल्या अशी फ़ोडणी घाल, तसं वरण कर..अश्या सूचना मिळत असत..तेवढ्यात कुणीतरी आमच्या भांडॆवाल्या बाईला आई ला कर्करोग झालाय असे सांगितले आणि तिने काम सोडले..तिच्या हरामखोर पणाची मला प्रचंड चीड आली होती तेव्हा..आईची किमो....सतत दवाखान्याच्या येरझार्या, घर सांभाळणे आणि स्वयंपाक..भयंकर परिस्थिती..देवानेच एवढी ताकद दिली सहन करायची..कुठेतरी एक आशा असते माणसाला की आई बरी होईलंच नक्की...हे सगळे डॉ वेडे आहेत...
पुन्हा मुंबईला गेलो..तेव्हा लेजन २ सेमीच कमी झालं होतं..५ सेमी होतं अजुन बाकी..:( डॉ नी रेडिएशन घ्यायला लावलं..मुंबईहुन येण्याची फ़्लाईट कँसल झाली तो दिवस होता लक्ष्मी पुजन..भर दिवाळीत आम्ही (मी, आई, बाबा) मुंबईच्या रस्त्यावर होतो..परिक्षा पहायची ठरवली देवाने की असं होतं..
घरी आल्यावर तिला उगाचच आम्ही रेडिएशन च्या मोठठ्या फ़रनेस मध्ये ढकलले असे मला अजुनही वाटते..ती नाही म्हणत असतांना केवळ ती बरी होईल या आशेने तिने २५ रेडिएशन्स घेतले...काही दिवस खुप छान गेले..तिने तिच्या आवडीचा लोणचं भातंही खाल्ला..तिला वाटलं आपण बरे झालो आणि आम्हालाही..तिच्यासोबर पोटभर जेवणाचा आनंद घेता आला आम्हाला या काळात...मला अजुनही "मी नं आज २ पोळ्या भात खाल्ला मुग्धा किती दिवसांनी" असं म्हणणारी आई अजुनही आठवते...
हळुहळु तिचं खाणं बंद झालं..अन्ननलिका आकुंचन पावली आणि बंद झाली..तिचं अन्नपाणि बंद झालं...तिला विचारलं तर म्हणायची अगं चातुर्मास सुरु आहे मुग्धा..देवाला माझ्याकडुन उपास करवुन घ्यायचा असेल...तिचं वजन झपाट्याने कमी होत गेलं..आता अगदी मुटकुळं झालं होतं शरीराचं
तिला भंडार्याला नेलं होतं फ़क्त तिच्या इच्छेखातर तब्येत खुप खराब झाली तिची तिथे..मी मुंबईला होते..तेव्हा..मला बोलवण्यात आलं..
मी दवाखान्यात पोचले तेव्हा माझी आई लहान बाळासारखी झाली होती..निमोनियामुळे श्वास घेता येत नव्हता बोलता येत नव्हतं...श्वासातल्या घरघरीकडे दुर्लक्श करुन तिने माझा चेहरा ओंजळीत धरला...आणि म्हणाली मला नागपुरला चांगल्या दवाखान्यात घेऊन चल..बाबा पुरते हादरुन गेले होते..मी सुध्दा..
आईला लगेच नागपुरला आणलं अँबुलंस मधुन..म्हणुन आजही रस्त्यावर कुठे अँबुलंस दिसली तर अंगावर शहारा येतो..
ऍडमीट केलं तेव्हा खुप वाटत होतं की काहीतरी चांगलं होईल पण नाहि....१ दिवस आईची तब्येत बरी होती..दुसरे दिवशी ढासळता ढासळता रात्री ११.०० वाजता खुप खराब झाली..आय.सी.यु मध्ये मी आणि छकु तिला हार्ट रेट वाढवायला सारखं सांगत होतो..२.३० वाजता तिने धीर सोडला आणि ४.३० वाजता डॉ नी मला बोलावलं..ते म्हणाले..."त्या जातायत आता"..मी स्तब्ध उभी होते तिचा हात हातात घेऊन..त्या वेळी कुणालाही, बाबांना, छकुला फ़ोन करवुन बोलवण्यापेक्षा मला तिच्या पुढच्या प्रवासाची साक्षीदार व्हायचं होतं..तिच्यासोबत रहायचं होतं..हळुहळू तिचा श्वास बंद झाला..एव्हाना छकु आली होती...मी म्हणाले.."गेली आई"....आम्हा दोघिंच्या डोळ्यातले अश्रु ओघळले...बाबा,मी आणि छकु...एका सेकंदात पोरके झालो..
"अंगणात गमले मजला संपले बालपण माझे, खिडकीत एकटा तेव्हा कंदिल तेवत होता" असे काहिसे मला आठवले..आणि आम्ही आईचा पुढचा प्रवास सुकर व्हावा या तडजोडीत लागलो...
आजही कुठला छानसा ड्रेस घातला की डोळे मिचकावणारी आई समोर येते..आणि म्हणते "छान दिसतेय राणू माझी".....

डोळ्यांत पाणी तराललं वाचुन...अजुन काय सांगु ? शब्दच सापडत नाहीयेत मुग्धा
ReplyDeleteमुग्धा अगं एकदम डोळ्यात पाणी आलं. कदाचित हे सर्व लिहुनही तुझ्या मनाची तगमग शांत होणार नाही असं का वाटतंय??
ReplyDeleteकाल हे सगळं कसं काय लिहिलं गेलं कुणास ठाउक? आजवर हिंमतच झाली नाही हे सगळं लिहायची..
ReplyDeleteआपण आईचाच एक अंश असतो..त्यामुळे ती गेल्यावरही आपल्याला ती जाणवत असते आणि आपल्याबरोबरच असते सतत असा माझा अनुभव आहे..:)
तगमग कधीच शांत होणार नाही हे खरंय..आणि नकोच व्हायला असं मला वाटतं..
ReplyDeleteआपण आयुष्याला इतकं टेकन फ़ॉर ग्रांटेड घेतो कि एखाद्या अश्याच बेसावध क्षणी नियती संधी साधुन घेते..आणि आपल्याला वेळंच देत नाही काही करायला…
म्हणुन मी नेहमी सगळ्यांना सांगत असते..आईची, बायकोची काळजी घ्या…स्वतःची तर घ्याच घ्या…तेवढंच आहे शेवटी आपल्या हातात..मृत्यु तर आहेच पुढे वाढलेला..
आज आईच्या आजारपणाने आणि तिच्या जाण्याने मला खुप काही शिकवलं...
मी एक बायको म्हणून, लेक, आई म्हणुन स्वतःची आधी काळजी घेते..हे सगळं लिहील्याने कुणा एकाला जरी माझ्यासारखं वाटलं तरी भरुन पावला हा लेख नाही का?
:-(
ReplyDelete[:'(]
ReplyDelete:'(
ReplyDeletemost cruel thing god can do to us if he exists..
ReplyDeleteSadness surrounds..
by the way.. Majha blog
ReplyDeletehttp://gnachiket.wordpress.com
Hi, kay lihu khare tar shabd ch nahi yet tumhala sagalya na dev hyatun savarnyas madat tuza Baba na jasti .......... kalaji ghe
ReplyDeleteTuzya blog var aaj first time alo ahe ni sagla blog vachun kadhtoy me....mala kharach kautuk vatta tuza yaar !
ReplyDeleteमला माझ्या मामाची आठवण झाली. ६ महिने झाले त्याला जाऊन आता. Blood cancer होता त्याला आणि सगळ्यात वाईट म्हणजे तो एक महिना हॉस्पिटल मध्ये admit होता, पण डॉक्टरांना cancer च dignosis झालं नाही. आणि ज्या दिवशी त्याचे reports positive आले त्याच्या दुसऱ्या दिवशी तो गेला. कोणतीही treatment न घेता. खूप खूप खूप वाईट आणि असहाय्य वाटलं होत त्या दिवशी. आजही ती सल मनात तशीच आहे.
ReplyDelete