लिसा रे ला कँसर झाला आणि कँसर ला ग्लॅमर प्राप्त झालं.. :) आहे ही तो रोग तसा..रोगांचा राजा म्हणु शकतो आपण त्याला..हळुचकन कुठलीही चाहुल नं लागता येतो आणि आपली धांदल उडवतो..
आपल्या देशाच्या कॅंसरच्या इतिहासावर एकदा या निमित्त्याने नजर टाकुया..यावरुन लक्षात येईल की कुणालाही म्हणजे अगदी कुणालाही हा रोग होऊ शकतो..माझ्या माहितीप्रमाणे रामकृष्ण परमहंस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सिने सॄष्टीतल्या नरगिस दत्त यांसारख्या दिग्गजांना पण या रोगानेच पछाडले होते. माझ्या ओळखिच्या अगदी साळसूद, कुठल्याही प्रकारची वाईट सवय नसलेल्या व्यक्तींनाच या रोगाने ग्रासले होते. लहानपणी दारु पिणार्यांना, सिगारेट ओढणार्यांनाच कॅंसर होतो अशी माझी ठाम समजुत होती..
१ वर्षापासुन आईला काहीही खाल्लं की तिखट लागत असे..अगदी साधं वरण सुध्दा, तिचं वजन कमी व्हायला लागलं होतं, चिड्चीड वाढली होती...आम्हाला वाटायचं की उपास करते म्हणुन कदाचित वजन कमी होत असावं, आमचे फ़ॅमिली डॉक्ट्र म्हणायचे काही हरकत नाही हो वजन कमी असलं तरी..असंच एके दिवशी जेवता जेवता आईला प्रचंड उलटी झाली डॉ कडे गेले असता त्यांनी ताबडतोब एंडोस्कोपी करायला सांगितली..तो ही फ़ार भयानक प्रकार असतो म्हणाले बाबा..रिपोर्ट आल्यावर कळले की आईला अन्ननलिकेचा कर्करोग झाला आहे..बाबांनी मला सांगितल्यावर माझ्या पायाखालची जमीन खरोखरी सरकली..त्या वाक्प्रचाराचा अर्थ मला तेव्हा अगदी स्पष्ट्पणे कळला...
मी घरात मोठी असल्याने मला धीर ठेवणे अत्यंत आवश्यक होते...तशीच आईजवळ गेले..आई शांतपणे माझ्याकडॆ बघुन मला म्हणाली काय झालंय गं मला? मी हळुचकन सांगितले की अजुन रिपोर्ट आलाच नाहिए गं...बघु काय होतंय ते..एव्हाना तिला ऍडमीट केले होते..सगळ्यांचे उतरलेले चेहरे पाहुन ती अजुनच अस्वस्थ होत होती..शेवटी तिला सांगायचे ठरले आणि सांगितलेही..
ती म्हणाली "अगं तुकडोजी महाराजांना सुध्दा कँसर झाला होता मग माझी काय बिषाद" तिने एवढं ब्रेव्हली घेतलेलं पाहुन मला धीर आला...बाबा आणि छकुही सावरले..पण आमच्यासाठी मात्र आमचं विश्व प्रत्येक दिवसागणिक आमच्यापासुन दूर चाललं होतं...
आत्ता कुठे आमचा आणि तिचा कर्करोगाशी सामना सुरु झाला होता...
तिच्या ट्रीटमेंट साठी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलला जायचे ठरले. त्या वर्षी प्रचंड पाऊस होता मुंबईला..लवकर नेलं नाही तर आईलाच काही होऊन बसेल अशी भिती वाटत असे..एकदाचा दिवस आला मुंबईला जायचा..आई, बाबा आणि मी विमानाने जाणार होतो..आम्हा तिघांचीही पहीली वेळ विमानात बसायची..माणुस कसा स्वार्थी असतो नाही?? मी तेव्हाही खिडकीजवळ बसले आईला बसु दिलं नाही..अजुनही मला ही गोष्ट प्रचंड सलते.मी तर अजुन कितीतरीदा विमानात बसली असती पण आई कदाचित कधीच नाही..मी हा विचार तेव्हा केलाच नाही :(
विमान मुंबईला पोहोचले आणि आम्ही माझ्या एका मैत्रिणीकडॆ उतरलो..ठाण्याला..त्या वेळी माझ्या सगळ्या मित्रांची मैत्रिणींची झालेली मदत अगदी अविस्मरणीय आहे...माणुस आधीच रोगाच्या नावानेच इतका भयभीत असतो की त्याला पदोपदी आधाराची गरज असते..नेमकी त्याच वेळेला टॅक्सी ड्रायव्हर पासुन सगळ्यांची झालेली मदत खरंच सुखावुन जाते.
टाटा मेमोरिअलचा पहिला दिवस...
लिसा रे ला कँसर झाला आणि कँसर ला ग्लॅमर प्राप्त झालं.. :) आहे ही तो रोग तसा..रोगांचा राजा म्हणु शकतो आपण त्याला..हळुचकन कुठलीही चाहुल नं लागता येतो आणि आपली धांदल उडवतो..आपल्या देशाच्या कॅंसरच्या इतिहासावर एकदा या निमित्त्याने नजर टाकुया..यावरुन लक्षात येईल की कुणालाही म्हणजे अगदी कुणालाही हा रोग होऊ शकतो..माझ्या माहितीप्रमाणे रामकृष्ण परमहंस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सिने सॄष्टीतल्या नरगिस दत्त यांसारख्या दिग्गजांना पण या रोगानेच पछाडले होते. माझ्या ओळखिच्या अगदी साळसूद, कुठल्याही प्रकारची वाईट सवय नसलेल्या व्यक्तींनाच या रोगाने ग्रासले होते. लहानपणी दारु पिणार्यांना, सिगारेट ओढणार्यांनाच कॅंसर होतो अशी माझी ठाम समजुत होती..
१ वर्षापासुन आईला काहीही खाल्लं की तिखट लागत असे..अगदी साधं वरण सुध्दा, तिचं वजन कमी व्हायला लागलं होतं, चिड्चीड वाढली होती...आम्हाला वाटायचं की उपास करते म्हणुन कदाचित वजन कमी होत असावं, आमचे फ़ॅमिली डॉक्ट्र म्हणायचे काही हरकत नाही हो वजन कमी असलं तरी..असंच एके दिवशी जेवता जेवता आईला प्रचंड उलटी झाली डॉ कडे गेले असता त्यांनी ताबडतोब एंडोस्कोपी करायला सांगितली..तो ही फ़ार भयानक प्रकार असतो म्हणाले बाबा..रिपोर्ट आल्यावर कळले की आईला अन्ननलिकेचा कर्करोग झाला आहे..बाबांनी मला सांगितल्यावर माझ्या पायाखालची जमीन खरोखरी सरकली..त्या वाक्प्रचाराचा अर्थ मला तेव्हा अगदी स्पष्ट्पणे कळला...
मी घरात मोठी असल्याने मला धीर ठेवणे अत्यंत आवश्यक होते...तशीच आईजवळ गेले..आई शांतपणे माझ्याकडॆ बघुन मला म्हणाली काय झालंय गं मला? मी हळुचकन सांगितले की अजुन रिपोर्ट आलाच नाहिए गं...बघु काय होतंय ते..एव्हाना तिला ऍडमीट केले होते..सगळ्यांचे उतरलेले चेहरे पाहुन ती अजुनच अस्वस्थ होत होती..शेवटी तिला सांगायचे ठरले आणि सांगितलेही..
ती म्हणाली "अगं तुकडोजी महाराजांना सुध्दा कँसर झाला होता मग माझी काय बिषाद" तिने एवढं ब्रेव्हली घेतलेलं पाहुन मला धीर आला...बाबा आणि छकुही सावरले..पण आमच्यासाठी मात्र आमचं विश्व प्रत्येक दिवसागणिक आमच्यापासुन दूर चाललं होतं...
आत्ता कुठे आमचा आणि तिचा कर्करोगाशी सामना सुरु झाला होता...
तिच्या ट्रीटमेंट साठी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलला जायचे ठरले. त्या वर्षी प्रचंड पाऊस होता मुंबईला..लवकर नेलं नाही तर आईलाच काही होऊन बसेल अशी भिती वाटत असे..एकदाचा दिवस आला मुंबईला जायचा..आई, बाबा आणि मी विमानाने जाणार होतो..आम्हा तिघांचीही पहीली वेळ विमानात बसायची..माणुस कसा स्वार्थी असतो नाही?? मी तेव्हाही खिडकीजवळ बसले आईला बसु दिलं नाही..अजुनही मला ही गोष्ट प्रचंड सलते.मी तर अजुन कितीतरीदा विमानात बसली असती पण आई कदाचित कधीच नाही..मी हा विचार तेव्हा केलाच नाही :(
विमान मुंबईला पोहोचले आणि आम्ही माझ्या एका मैत्रिणीकडॆ उतरलो..ठाण्याला..त्या वेळी माझ्या सगळ्या मित्रांची मैत्रिणींची झालेली मदत अगदी अविस्मरणीय आहे...माणुस आधीच रोगाच्या नावानेच इतका भयभीत असतो की त्याला पदोपदी आधाराची गरज असते..नेमकी त्याच वेळेला टॅक्सी ड्रायव्हर पासुन सगळ्यांची झालेली मदत खरंच सुखावुन जाते.
टाटा मेमोरिअलचा पहिला दिवस...
क्रमश:
kasetarich jhale.. Vichitr Hurhur lagoon rahate..kramash lihoo naka please.. Continuous liha..
ReplyDeleteआधिच्या हलक्याफूलक्या पोस्टनंतर किती गंभीर विषय घेतलास गं.......एरवी क्रमश: पाहिलं की लवकर लिहा पुढचा भाग वगैरे लिहीतो आपण पण तुझ्या या पोस्टला काय लिहू गं?
ReplyDeleteमाझी आजीही याच कॅन्सरने गेलीये....माझ्या जन्माच्या दोन महिने आधी.......बाबांचे वय अवघे २३ होते तेव्हा..... आजही ते मला पहातात तेव्हा म्हणतात की माझी आईच परत आलीये....थोडावेळ सुन्न गेला बघ....
तन्वी
मुळात हे सगळं लिहिण्याचा उद्देश कुणालाही वाईट वाटावं असं नाहिए..पण ते वाटणारंच हे ही मला माहित आहे...
ReplyDeleteआपण आयुष्याला इतकं टेकन फ़ॉर ग्रांटेड घेतो कि एखाद्या अश्याच बेसावध क्षणी नियती संधी साधुन घेते..आणि आपल्याला वेळंच देत नाही काही करायला...
म्हणुन मी नेहमी सगळ्यांना सांगत असते..आईची, बायकोची काळजी घ्या...स्वतःची तर घ्याच घ्या...तेवढंच आहे शेवटी आपल्या हातात..मृत्यु तर आहेच पुढे वाढलेला..
काल परवा लिसा ला कमेंट टाकली..की तुला कदाचित माहिती आहे की तुझं आयुष्य १० वर्षच आहे अजुन...आम्हाला पण तेवढंच माहित आहे गं..हाय काय आणि नाय काय..कँसर वगैरे काय निमित्त..असंच मी आईलाही सांगत असायचे..
absolutely right you are..I have no courage to buy your this thought..
ReplyDeleteNot knowing is much better than knowing..let it be 10 years or 100