Skip to main content

रॅंडम थॉट्स...

कित्येक दिवसांपासुन मी काही लिहिलेलंच नाहीए. कितीदा माझ्या डोक्यात विषय आले..अगदी पॅराग्राफ चे पॅराग्राफ तयार झाले पण टायपता मात्र आले नाही...
  • अनेक घडामोडी झाल्या काही अपेक्षित काही अनपेक्षित..आजकाल काहीही झालं ना की माझ्या मनात एक विचित्र प्रकारची भिती भरते..आता उद्यापासुन श्राध्द पक्षाचे दिवस सुरु होणार...आई म्हणायची हे दिवस चांगले नसतात. Science च्या दृष्टीने पण पावसाळयात पाण्यात होणारे बदल, हवामानात होणारे बदल यांमुळे थोडं सर्दी पडसं ताप हे सगळं येणारंच त्यामुळे मलाही आजकाल हे खरं वाटू लागलंय.

  • बाबांची ५ दिवसापासुन तब्येत बरी नाही. नेहमी हसता खेळता माणुस असा तापाने हैराण असला की खरंच वाईट वाटतं..माझं लक्षंच नाहिए कशात परवापासुन...त्यांची तब्येत बरी नाहिए आणि मी इथुन काहीच करु शकत नाही हे फ़ीलींग खुप बेकार आहे..इथुन डायरेक्ट फ़्लाईट का नाही नागपुरसाठी हा प्रश्न मला नेहमीच पडतो. :(

  • आज बाप्पा जाणार गावाला. इतके दिवस स्वाईन फ़्लु च्या भितीत घालवल्यावर बाप्पाचे आगमन खरंच खुप आनंददायी होते."थांबा हो अजुन थोडे दिवस" असं म्हणावं वाटतंय बाप्पाला. ६ व्या दिवशी मोदक केले,छान झाले असं पब्लिक म्हणाली. मी स्वतःची पाठ थोपटुन घेतली. मोदक करणं माझ्या रक्तातंच आहे अशी बढाईही मारली :)

  • कालपासुनचा आर्मी, एअर फ़ोर्स चा शोध आज मुख्यमंत्री राजशेखर रेड्डीं आणि त्यांच्या इतर सहप्रवाश्यांच्या सापडलेल्या शवांमुळे संपुष्टात आला. अश्या चांगल्या माणसाला आलेले दुर्दैवी मरण पाहुन मला खुप वाईट वाटले :(

  • वजनाचा काटा काही केल्या ६९ च्या खाली उतरतंच नाहिए काय माहित काय झालंय त्याला? सगळं डाएट नीट करते तरीही कसला प्रोब्लेम आहे कळत नाही...जाऊ दे तो काही खुप महत्वाचा विषय नाही.

  • सुनामीग्रस्त लोकवस्तीत जाऊन आले..एक मोठ्ठा लेख होवु शकतो त्यावर खरंतर..भयंकर अवस्था आहे त्यांची :(

  • मागच्या हफ़्त्यात माझी मैत्रिण येऊन गेली..मला खुप छान वाटलं. मैत्रिणीची जागा कुणीच घेऊ शकत नाही खरं पाहिलं तर. तिच्याशी गप्पा मारतांना रोज मी खरंच काहीतरी मिस करतेय असं वाटल्याशिवाय राहिलं नाही..तिलाही मुंबईला परतल्यावर मलेरिया झाला :(
आत्तासाठी एवढं पुरे...

- खिन्न :( मुग्धा :)
कित्येक दिवसांपासुन मी काही लिहिलेलंच नाहीए. कितीदा माझ्या डोक्यात विषय आले..अगदी पैराग्राफ चे पैराग्राफ तयार झाले पण टायपता मात्र आले नाही...

Comments

  1. अहो मुग्धाताई.. गुलमोहर असा खिन्न का? चित्रात तर मस्त फुललेला दिसतो आहे, त्याला असाच फुललेला ठेवा ना..

    ओ गोरी जरा हसदे तु.. हसदे तु.. हसदे जराsssss!!

    ReplyDelete
  2. मुग्धा.. कशाला उगिच काळजी करायची? जाउ दे.. होईल कमी कधी तरी. डायटींग तरी किती करायचं नां? आणि श्राध्द पक्षाचे दिवस खुप चांगले असतात बरं कां... कारण माझा जन्मंच झालाय पंचमीला.. पक्ष पंधरवड्यामधे. माझी मागची कार वॅगन आर मी चक्क माझ्या तिथी नुसार वाढदिवसालाच घेतली होती.
    खिन्नं वाटतंय़?? जुन्या छान छान गोष्टी आठवा.... हे गाणं माझं फेवरेट आहे बरं कां..
    http://www.youtube.com/watch?v=XHTN4Jvi6lg

    ReplyDelete
  3. अरेच्चा अशा गोष्टींमुळे असं उदास का व्हावं ? उन्हाळयानंतर पावसाळा येतोच ना आणि मग मेलेलं गवत पुन्हा हिरवंगार होतं. तसंच आपलही असतं, काही दिवस असतातच असे ज्यावेळेस आपण एकदम डाऊन फील करतो. ती वेळ सरली की मग बघ गुलमोहर पुन्हा फुलेल. जेव्हा सगळी झाडं पानं गाळतात तेव्हाच गुलमोहर फुललेला असतो, बरोबर ना ? तसंच स्वत:लाही ठेव, नेहमी फुललेलं.
    आपलं आयुष्यच किती असतं, इन मीन ५० वर्षे, त्यातल अर्ध सरलं, राहीलेल्यातला प्रत्येक दिवस हा खुप महत्त्वाचा आहे आणि तो मी हसतच घालवणार असा एकदा विचार कर आणि मग बघ...तुझ्या आजुबाजुला सुद्धा सगळं काही चांगलच घडेन.
    तु़झे बाबा लवकर बरे होवोत ही शुभेच्छा !

    -अजय

    ReplyDelete
  4. "वजनाचा काटा काही केल्या ६९ च्या खाली उतरतंच नाहिए काय माहित काय झालंय त्याला? सगळं डाएट नीट करते तरीही कसला प्रोब्लेम आहे कळत नाही…जाऊ दे तो काही खुप महत्वाचा विषय नाही."

    Vajankata badaloon tak :D

    ReplyDelete
  5. ho aata tasach karava lagel :P

    ReplyDelete
  6. गुलमोहर कल मुरझाया था, आज फुलला आहे ;)

    ReplyDelete
  7. आमच्या घरी तब्येतीच्या कुरबुरी चालु असतात या दिवसांत म्हणुन "हे दिवस खराब" असं वाटतं.
    पण तुमचा जन्मंच झालाय या दिवसांत म्हंटल्यावर हे दिवस तितके वाईट नाहीत ;)

    ReplyDelete
  8. सगळी झाडं पानं गाळतात तेव्हाच गुलमोहर फुललेला असतो>> हो ना म्हणुन तर मला एवढ्या झाडाफुलांत गुलमोहर आवडतो...
    पुन्हा हेच म्हणते "गुलमोहर कल मुरझाया था, आज फुलला आहे ;)"
    बाबा आता बरे आहेत.
    धन्यवाद अजय!!

    ReplyDelete
  9. nagpur sathi direct flight aahe ki...www.goindigo.in war bhet dya...

    ReplyDelete
  10. Hope you are feeling better :-) .... अगं आणि काही दिवसांपुर्वी मी तुला ऑफलाईन मेसेज ठेवला होता माझ्या ई मेल आय डी चा... मिळाला का? तुझं काहिच उत्तर आलं नाही. म्हणुन विचारलं.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक