मनं माझे...

मनं नाही थार्‍यावर

मनं नाही अवाक्यात

गुंफ़ियेल्या आठवणी

तुझ्या प्रितीच्या मनात

*****************

मनं सारखे धावते

मनं सारखे हरते

मनं आठवुनं तुला

कधी हसते रडते..

*****************

मनं अवखळ भारी

मनं चोरटे खट्याळ

मनं डोळ्यातले पाणी

मेघ भरले आभाळ...

*****************

मनं पांढरा कागद..

मनं रंगाचा कुंचला

मनं रंगते रंगात..

जसे रंगवावे त्याला..

*****************

मनं असे शांत कधी

गंभीर ही रागदारी..

मनं कधी असे मुग्ध..

कधी लटके ठुमरी..

*****************

मनाची ही कैक रुपे..

तर्‍हा वेगळीच त्याची

थांग त्याचा लावायला.

बुद्धी तोकडी मुग्धाची..

Comments

 1. काय सुन्दर कविता लिहिलीत तुम्ही हो राव . अप्रतिम !!!

  ReplyDelete
 2. धन्यवाद अमित!! ही कविता करण्यामागचा हेतु "अष्टाक्षरी" छंद शिकणे हा होता..
  तुम्हाला आवडली हे पाहुन आता पुढे जाण्यास हरकत नाही...:)

  ReplyDelete
 3. धन्यवाद महेंद्रजी..
  सध्या छंदशास्त्र शिकण्याचा प्रयत्न चालु आहे..
  तुम्हाला कविता आवडली ह्याचा आनंद झाला...

  ReplyDelete
 4. मन मनातले काही
  मन मौनाचा आवाज
  मन शाईची धिटाई
  मन फुलांचा सुवास

  मस्त आहे तुमची पोस्ट, नविन चाळा दिल्याबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete
 5. :) छान आहे चारोळी..मस्तं..

  ReplyDelete
 6. माझी पोस्ट ’माझिया मना’ http://vikrantdeshmukh.blogspot.com/2009/06/blog-post.html

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

बाहुबली २