सकाळच्या प्रसन्नतेचा पहिला नैवेद्य घेताना सूर्यनारायण खुष होऊन अजूनच तेजस्वी दिसायला लागले आहेत. ढगांनीही रात्रभर आकाशाच्या अंगणात खेळ खेळून आता निरोप घेतलाय. काही उनाड ढग आहेतच तरी कट्ट्यावर बसलेली टवाळक्या करत.झाडाझाडावरील पक्ष्यांची लगबग सुरू झालीए. आज पावसाने हजेरी नं लावल्याने सगळेच एकंदरीत खुष आहेत. कावळ्याच्या घरात मात्र अजूनही सगळे झोपलेच आहेत. कावळे काकू येऊन दारासमोर रांगोळी टाकून गेल्या. "आज पाऊस का आला नाही? अजून थोड्या वेळ झोपायला मिळालं असतं ना" असे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव होते. नेहमीच घाईत असलेल्या खारुताईंचा मूड मात्र वेगळाच आहे. आज त्यांनी सुट्टी घेतली आहे अर्धी! मुलगी आलीए घरी बाळंतपणाला, तिच्यासाठी घराची डागडुजी करायची आहे म्हणून. नारळे काका काकूंना विचारपूस चाललीए त्यांची घराबाबतीत. नारळेंना तसा या गोष्टींचा बराच अनुभव आहे. कावळे काकूंची मुलगी बाळंत झाली, तेव्हाही ते मदतीला सरसावले होते. शेजारधर्म आजवर त्यांनी अगदॊ चोखपणे पाळलाय. कावळे काकूंचा सल्ला ही बराच मोलाचा ठरतो कारण मोहल्ल्यातील सगळ्य़ांपेक्षा वयाने आणि अनुभवाने त्या मोठ्याच आहेत. खारूताईचा जा...
गप्पागोष्टी, खाद्यभ्रमंती आणि सगळ्या मनाला भिडलेल्या गोष्टींची बखर!