Skip to main content

डायरी...

काल "सहजच ब्लॉग" वरील "आज मै खुशं हूं" पोस्ट वाचता वाचता अचानक लक्षात आलं की आपण बरेच दिवसांत डायरी लिहिली नाहिए..
लहानपणापासून मला वाटायचं की डायरी लिहिणारी पब्लिक खूप मोठ्ठी होत असते. म्हणजे जे सगळे पुढारी, क्रांतीकारी, लेखक वगैरे असतात ते सगळे डायरी लिहितात हा माझा मीच करून घेतलेला (गैर) समज होता.
प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला बाबांना कार्यालयाकडून डायरी मिळत असे. १० वी पास झाल्यावर मी बाबांना ही नवी कोरी डायरी मागून घेतली. त्यात नियमित लिहिणं होणार आहे का नाही, मी काय लिहिणार आहे वगैरे गोष्टींचा मला तेव्हा अजिबात पत्ता नव्हता. बस्स!! मला डायरी लिहायचीय हेच माहीत होतं.
१० वीत चांगले गुण मिळवूनही मी जरा नाराजंच होते. माझ्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नसल्याने मला लिहिण्यासाठी पहिला वहीला विषय मिळाला. भरभर मला काय वाटतं ते लिहिलं आणि छान हलकं वाटायला लागलं.
मुळात कुणीतरी आपलं ऐकतंय हीच कल्पना किती छान आहे. मला खूप सांगायचं असायचं त्या दिवसात पण कुणाला सांगू? हा कायम प्रश्न असायचा माझ्यासमोर. आई, बाबा, छकु होतेच, पण आई एक वेगळीच मैत्रीण होती. वेळोवेळी चुकलं की सावध करणारी आणि मोठेपणी मुलींनी कसं वागावं कसं राहावं हे सांगणारी. बाबा माझे बेस्ट फ़्रेंड..मस्तं मजा करायची मी त्यांच्यासोबत. माझ्या परीक्षांच्या वेळी मला सकाळी उठवणे, मला झोप येऊ नये म्हणून माझ्यासोबत जागणे हे ते अगदी प्रेमाने करत असत. कुठलाही चित्रपट बघताना त्यांच्यासारखी कंपनी मला कधीच मिळाली नाही. माझी बहीण माझ्यापेक्षा वयाने लहान होती. मला बऱ्याच गोष्टी शेअर करता यायच्या तिच्याशी.
हे तिघे एवढे मोकळे आणि छान असताना खरंतर मला अजून कुणाची आवश्यकताच नव्हती मन मोकळं करण्यासाठी . पण तरीही आपल्या मनातला एक कोपरा असा असतो म्हणतात की त्यातल्या गोष्टी कुणालाही सांगण्यासारख्या नसतात. तसंच काहीसं होतं त्यावेळी. अश्याच जपून ठेवलेल्या अनेक गोष्टीचा घडा मी डायरी जवळ वेळॊवेळी रिता केला.
११ वीत मला जे महाविद्यालय मिळालं ते ख्रिस्ती मिशनरीज चं होतं. तिथे सगळ्या मुली स्कर्ट्स, फ्रॉक, जीन्स वगैरे घालून यायच्या. इंग्रजी बोलायच्या. मी त्यातल्या त्यात काकूबाई असल्याने तेव्हा मला हे सगळं नवीनच होतं. नवीन लोक, नवीन जागा, नवीन तऱ्हा.. बापरे! :( मी तर बावरूनच गेले होते. बाबांना पहिला दिवस छान गेला म्हणूनच सांगितले पण नंतर मात्र डायरीत मी सगळं लिहिलं मोकळेपणाने...हळूहळू दिवस जात होते. माझ्या सारख्या २ मैत्रिणी मिळाल्या आणि सगळं सोपा व्हायला लागलं.. :)
त्या दिवसानंतर मी हक्काने प्रत्येक गोष्ट डायरीला सांगू लागली..
अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षी आईपासून दूर राहताना डायरीच होती सोबतीला. मी खूपच रोंदु होते तेव्हा (असं आता वाटतंय मला :) ) जे जे काही खटकलं ते ते पहिल्या वर्षी डायरीत लिहिलं....माझे पहिले वहीले बैक लोग्स, मला आवडणारी गाणी, नावडणारे प्रोफ़ेसर्स, आवडणारे प्रोफ़ेसर्स..क्लासमधल्या गमती जमती, हॉस्टेल मधल्या, रूम मधल्या गमती जमती, रिझल्टचा धिंगाणा सगळं सगळं लिहायचे मी अगदी आवडीने नं विसरता. माझी सही नव्या प्रकारे करण्याची हुक्की ही मला तेव्हाच आली..
नव्या जागेतला नवा पाऊस मनाला चाळवल्याशिवाय कसा राहील? मग सुरू झाल्या कविता...आणि मुळात काहीतरी हक्काचं असं लिहायला असलं ना तर हे असले सगळे प्रयोग करण्याला मजा येते. हळूहळू डायरी लिहिताना स्केचपेन्स वापरून एक एक पान सुंदर बनवायचा प्रयत्न होऊ लागला.
कुठेतरी या माध्यमातून आपण जाणाऱ्या क्षणांना सोबतच ठेवतोय ही जाणीव व्हायला लागली....
अभियांत्रिकीचं शेवटचं वर्ष खूप मजेदार असतं. ट्रेडिशनल डे, रोज डॆ, फ़ोर्मल डे सगळं सगळं साजरं करून आल्यावर झालेल्या घडामोडी मी डायरीत नमूद करू लागली. सोबत असायचं एकच समाधान की माझं डायरी रूपाने कुणीतरी सहप्रवासी आहे.
प्रत्येक वर्षी माझ्या बाबांनी,मैत्रिणींनी, मित्रांनी, भावांनी मला डायरी आणून देण्याची, किंवा गिफ्ट करायची मोलाची कामगिरी बजावली आहे. आपल्या पुढ्यातील सुंदर डायरी दुसऱ्या कुणाला गिफ्ट करायचं धैर्य मला अजूनही प्राप्त झालेलं नाही. ह्या सगळ्यांनी मात्र माझे हे लाड अगदी मनापासून पुरवले आहेत यात काही वाद नाही.
पुढे पुण्यात आल्यावरही माझं डायरी लेखन अविरत सुरू होतं...हक्काचा सखा मिळाल्यावरही मला वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी मी लिहीत गेले. त्यामुळे माझे डायरीशी असणारे बंधही बळकट झाले होते.
पुढे घडत गेलेल्या वाईट प्रसंगांची माझ्या मनातली नोंदच इतकी घावासारखी होती की डायरीत ते सगळं लिहून मला अजून वाईट वाटवून घ्यायचं नव्हतं कदाचित..म्हणूनच एका काळानंतर मी अनियमितपणे पण...लिहीत गेले. आयुष्य बरंच काही शिकवून गेलं ३ वर्षांच्या काळात...डायरी होतीच माझी सहप्रवासी म्हणून पण मीच नाही जास्त तसदी दिली तिला.
काही गोष्टी नं लिहिलेल्याच बऱ्या असतात मुग्धा असं आई नेहमी म्हणायची..ती गेल्यावर मला हे पुरतं जाणवलं. तरीही अधून मधून "आज बरेच दिवसांनी लिहितेय" या मजकुरासकट डायरी लिहिणं जे सुरू होई ते अर्ध्या पानातच संपत असे...
माझा सखा माझ्या आयुष्यात जोडीदार म्हणून आला ते सोनेरी क्षण मात्र मी माझ्या डायरीत जपून ठेवले आहेत...डायरी ही एक साक्षीदार होती त्याच्या आणि माझ्या प्रेमाची, एखाद्या चोरट्या कटाक्षाची, निखळ प्रेमळ गप्पांची..
काल मला डायरीची कळवळून आठवण आली..बरेच क्षण आपण जपून ठेवलेच नाही असं मला प्रामाणिकपणे वाटलं..म्हणूनच आज पुन्हा जुनीच डायरी उघडणार आहे....त्यात नियमित पणे लिहिणं होणार आहे का नाही, मी काय लिहिणार आहे वगैरे गोष्टींचा मला अजूनही अजिबात पत्ता नाही बस्स!! डायरी लिहायचीय हेच पक्कं माहीत आहे...
काल "सहजच ब्लॉग" वरील "आज मै खुशं हूं" पोस्ट वाचता वाचता अचानक लक्षात आलं की आपण बरेच दिवसांत डायरी लिहिली नाहिए...

लहानपणापासून मला वाटायचं की डायरी लिहिणारी पब्लिक खूप मोठ्ठी होत असते. म्हणजे जे सगळे पुढारी, क्रांतीकारी, लेखक वगैरे असतात ते सगळे डायरी लिहितात हा माझा मीच करून घेतलेला (गैर) समज होता.

प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला बाबांना कार्यालयाकडून डायरी मिळत असे. १० वी पास झाल्यावर मी बाबांना ही नवी कोरी डायरी मागून घेतली. त्यात नियमित लिहिणं होणार आहे का नाही, मी काय लिहिणार आहे वगैरे गोष्टींचा मला तेव्हा अजिबात पत्ता नव्हता. बस्स!! मला डायरी लिहायचीय हेच माहीत होतं.

१० वीत चांगले गुण मिळवूनही मी जरा नाराजंच होते. माझ्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नसल्याने मला लिहिण्यासाठी पहिला वहीला विषय मिळाला. भरभर मला काय वाटतं ते लिहिलं आणि छान हलकं वाटायला लागलं.

मुळात कुणीतरी आपलं ऐकतंय हीच कल्पना किती छान आहे. मला खूप सांगायचं असायचं त्या दिवसात पण कुणाला सांगू? हा कायम प्रश्न असायचा माझ्यासमोर. आई, बाबा, छकु होतेच, पण आई एक वेगळीच मैत्रीण होती. वेळोवेळी चुकलं की सावध करणारी आणि मोठेपणी मुलींनी कसं वागावं कसं राहावं हे सांगणारी. बाबा माझे बेस्ट फ़्रेंड..मस्तं मजा करायची मी त्यांच्यासोबत. माझ्या परीक्षांच्या वेळी मला सकाळी उठवणे, मला झोप येऊ नये म्हणून माझ्यासोबत जागणे हे ते अगदी प्रेमाने करत असत. कुठलाही चित्रपट बघताना त्यांच्यासारखी कंपनी मला कधीच मिळाली नाही. माझी बहीण माझ्यापेक्षा वयाने लहान होती. मला बऱ्याच गोष्टी शेअर करता यायच्या तिच्याशी.

हे तिघे एवढे मोकळे आणि छान असताना खरंतर मला अजून कुणाची आवश्यकताच नव्हती मन मोकळं करण्यासाठी . पण तरीही आपल्या मनातला एक कोपरा असा असतो म्हणतात की त्यातल्या गोष्टी कुणालाही सांगण्यासारख्या नसतात. तसंच काहीसं होतं त्यावेळी. अश्याच जपून ठेवलेल्या अनेक गोष्टीचा घडा मी डायरी जवळ वेळॊवेळी रिता केला.

११ वीत मला जे महाविद्यालय मिळालं ते ख्रिस्ती मिशनरीज चं होतं. तिथे सगळ्या मुली स्कर्ट्स, फ्रॉक, जीन्स वगैरे घालून यायच्या. इंग्रजी बोलायच्या. मी त्यातल्या त्यात काकूबाई असल्याने तेव्हा मला हे सगळं नवीनच होतं. नवीन लोक, नवीन जागा, नवीन तऱ्हा.. बापरे! :( मी तर बावरूनच गेले होते. बाबांना पहिला दिवस छान गेला म्हणूनच सांगितले पण नंतर मात्र डायरीत मी सगळं लिहिलं मोकळेपणाने...हळूहळू दिवस जात होते. माझ्या सारख्या २ मैत्रिणी मिळाल्या आणि सगळं सोपा व्हायला लागलं.. :)

त्या दिवसानंतर मी हक्काने प्रत्येक गोष्ट डायरीला सांगू लागली..

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षी आईपासून दूर राहताना डायरीच होती सोबतीला. मी खूपच रोंदु होते तेव्हा (असं आता वाटतंय मला :) ) जे जे काही खटकलं ते ते पहिल्या वर्षी डायरीत लिहिलं....माझे पहिले वहीले बैक लोग्स, मला आवडणारी गाणी, नावडणारे प्रोफ़ेसर्स, आवडणारे प्रोफ़ेसर्स..क्लासमधल्या गमती जमती, हॉस्टेल मधल्या, रूम मधल्या गमती जमती, रिझल्टचा धिंगाणा सगळं सगळं लिहायचे मी अगदी आवडीने नं विसरता. माझी सही नव्या प्रकारे करण्याची हुक्की ही मला तेव्हाच आली..

नव्या जागेतला नवा पाऊस मनाला चाळवल्याशिवाय कसा राहील? मग सुरू झाल्या कविता...आणि मुळात काहीतरी हक्काचं असं लिहायला असलं ना तर हे असले सगळे प्रयोग करण्याला मजा येते. हळूहळू डायरी लिहिताना स्केचपेन्स वापरून एक एक पान सुंदर बनवायचा प्रयत्न होऊ लागला.

कुठेतरी या माध्यमातून आपण जाणाऱ्या क्षणांना सोबतच ठेवतोय ही जाणीव व्हायला लागली....

अभियांत्रिकीचं शेवटचं वर्ष खूप मजेदार असतं. Traditional Day, Rose Day, Formal Day सगळं सगळं साजरं करून आल्यावर झालेल्या घडामोडी मी डायरीत नमूद करू लागली. सोबत असायचं एकच समाधान की माझं डायरी रूपाने कुणीतरी सहप्रवासी आहे.

प्रत्येक वर्षी माझ्या बाबांनी,मैत्रिणींनी, मित्रांनी, भावांनी मला डायरी आणून देण्याची, किंवा गिफ्ट करायची मोलाची कामगिरी बजावली आहे. आपल्या पुढ्यातील सुंदर डायरी दुसऱ्या कुणाला गिफ्ट करायचं धैर्य मला अजूनही प्राप्त झालेलं नाही. ह्या सगळ्यांनी मात्र माझे हे लाड अगदी मनापासून पुरवले आहेत यात काही वाद नाही.

पुढे पुण्यात आल्यावरही माझं डायरी लेखन अविरत सुरू होतं...हक्काचा सखा मिळाल्यावरही मला वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी मी लिहीत गेले. त्यामुळे माझे डायरीशी असणारे बंधही बळकट झाले होते.

पुढे घडत गेलेल्या वाईट प्रसंगांची माझ्या मनातली नोंदच इतकी घावासारखी होती की डायरीत ते सगळं लिहून मला अजून वाईट वाटवून घ्यायचं नव्हतं कदाचित..म्हणूनच एका काळानंतर मी अनियमितपणे पण...लिहीत गेले. आयुष्य बरंच काही शिकवून गेलं ३ वर्षांच्या काळात...डायरी होतीच माझी सहप्रवासी म्हणून पण मीच नाही जास्त तसदी दिली तिला.

काही गोष्टी नं लिहिलेल्याच बऱ्या असतात मुग्धा असं आई नेहमी म्हणायची..ती गेल्यावर मला हे पुरतं जाणवलं. तरीही अधून मधून "आज बरेच दिवसांनी लिहितेय" या मजकुरासकट डायरी लिहिणं जे सुरू होई ते अर्ध्या पानातच संपत असे...

माझा सखा माझ्या आयुष्यात जोडीदार म्हणून आला ते सोनेरी क्षण मात्र मी माझ्या डायरीत जपून ठेवले आहेत...डायरी ही एक साक्षीदार होती त्याच्या आणि माझ्या प्रेमाची, एखाद्या चोरट्या कटाक्षाची, निखळ प्रेमळ गप्पांची..

काल मला डायरीची कळवळून आठवण आली..बरेच क्षण आपण जपून ठेवलेच नाही असं मला प्रामाणिकपणे वाटलं..म्हणूनच आज पुन्हा जुनीच डायरी उघडणार आहे....त्यात नियमित पणे लिहिणं होणार आहे का नाही, मी काय लिहिणार आहे वगैरे गोष्टींचा मला अजूनही अजिबात पत्ता नाही... बस्स!! डायरी लिहायचीय हेच पक्कं माहीत आहे...

Comments

  1. मनापासून लिहीलास लेख.....तुझ्या माझ्या माहेरात पुर्ण साम्य आहे......मी आई आणि बाबांवर पण एक एक पोस्ट टाकलेली आहे ...बघ वेळ मिळाल्यावर चाळ ती पाने माझ्या ’डायरी’ तली....जे वर्णन तु केलेस आई बाबांचे ते पहाता त्यातही साम्य नक्की आहे......
    माझेही डायरी लिहीणे हे असेच असते........सुरु होते पण रेग्युलर काही जमत नाही.....

    ReplyDelete
  2. Dhanyavad sahajach..
    aai, baba he majhe sagalyat pahile mitra maitrin hote. maajha asa kadhi attahasahi navhta ki majhi Diary kuni wachu naye pann tyanni mala ti space dili tyamule majha tyanchyavaracha vishvas ajunach drudh jhala.
    nakki wachen tujhya diary tali pane...
    ashich blog la bhet det raha...
    svatahasarakhi manase aahet jagat he aikun khup chhan vatata..

    ReplyDelete
  3. मुग्धा अगं माझ्या आजोबांच्याही अतिशय सुंदर अक्षरात लिहीलेल्या अनेक वह्या(Diary)मी पाहिल्यात मग आईच्या-बाबांच्या( जास्ती करून खर्च व ठळक घटनांची नोंद-:D) आईच्या मात्र अप्रतिम कवितांच्या. :) मग माझ्याही नकळत ही डायरी माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेली.
    आता माझ्या ठाण्याच्या घरी गेले ना की एकदा तरी पुन्हा पारायणे होतात, मला जणू मीच पुन्हा भेटते.
    खूप सुंदर लिहिलेस गं, आवडले.

    ReplyDelete
  4. धन्स गं भाग्यश्री..
    आजोबा, आजी यांनी लिहीलेलं वाचायला भाग्य लागतं नाही?? त्या वह्या नक्की तुला १९४० वगैरे च्या काळात घेऊन जात असणार..त्या काळचे संदर्भ एकदम पिरिअड फ़िल्म पाहिल्यासारखे..
    अवांतर :
    एकदा मला भारतीय वन संरक्षक यांच्या कार्यालयात जाण्याची संधी मिळाली..त्यांनी आम्हाला एका खोलीत नेले जिथे जुने नकाशे जुन्या नोंदी केलेल्या इंग्रजांच्या काळातल्या वह्या होत्या.
    त्या काळातले इंग्लिश वनसंरक्षक प्रत्येक जंगला बद्दल,तिथल्या प्राण्या पक्ष्यांबद्दल लिहीत असत..
    जुन्या पिवळट पानांवर त्यांची सुंदर हस्ताक्षरे पाहुन त्यांच्याच काळात गेल्यासारखे वाटले...
    हे सगळं लिहुन ठेवुन त्यांनी पुढ्च्या पिढीला आपला अनुभवच जणू देउ केला होता...नाही?
    यावरुन एवढेच वाटते की डायरी हे एक प्रभावी माध्यम आहे....आपण आपल्या पुढच्या पिढीला आपल्या पश्चात अनुभवांची डायरीच देउ शकतो..अजुन काही नाही...

    ReplyDelete
  5. मलाही खूप डायर्‍या मिळायच्या नातेवाईकांकडून पण मला त्या कोर्‍याच ठेव्याव्याशा वाटायच्या, अगदी कोणी वापरू नये असं वाटायचं, त्या डायरीतले नकाशे, चित्र बघण्यात मी बराच वेळ घालवायचो. दिदि ओरडायची की "काही लिहित तर नाहीस त्यात, मग नुसत्या साठवून तरी का ठेवतोस?" मग मी "जा ना तुला काय करायचय?" अशी उलट उत्तरही द्यायचो. भांडूनभांडून दरवर्षी पाचसहा डायर्‍या तरी साठ्याला ठेवायचो. मला तर डायरी मळेल म्हणून त्यावरचं प्लॅस्टिकही काढू नये असं वाटायचं. दिदिला एखादी डायरी दिली की ती त्यात गणितं सोडवायची. पुढे मी डायरीच्या पानाच्या आत पक्षांची पिसं, पानं, फुलं, चॉकलेटचे सोनेरी कागद, वर्तमानपत्रातली चित्र जमवायला लागलो. पुढे केव्हातरी कवितांचं वेड लागलं, कविता करायला सुरवात झाली, आणि मग हळूहळू डायर्‍या एकामागून एक वापरात येत गेल्या. मला डायरी लिहायचा झटका वरचेवर येतो, पण सलग महिनाभर डायरी लिहिणंही मला जमत नाही, महिनाभर कसलं आठवडाभरही नाही.

    'लहानपणापासून मला वाटायचं की डायरी लिहिणारी पब्लिक खूप मोठ्ठी होत असते. म्हणजे जे सगळे पुढारी, क्रांतीकारी, लेखक वगैरे असतात ते सगळे डायरी लिहितात हा माझा मीच करून घेतलेला (गैर) समज होता.'

    मला आजही असंच वाटत कारण मला कसं ते जमतच नाही एका जागी स्थिर बसून रोजच्यारोज दिवसभराचं लिहायला.

    असो या सगळ्याला उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक