Skip to main content

फ़ॉरएवर समर विथ नायजेला!!

काही दिवसांपासुन डिस्कवरी च्या ट्रॅवल लिविंग चॅनेल वर फ़ॉरएवर समर विथ नायजेला हा कार्यक्रम बघतेय...सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा तो कार्यक्रम बघितला तेव्हा नायजेला नावाच्या सुत्रधारीणी ला बघुन आणि इम्प्रेस होऊन..तीचं एखादी पाककृती सांगणं आणि करुन दाखवणं इतकं सुखद असतं की सतत बघत रहावं असंच वाटावं..ती जे पदार्थ करते ते मी मुळीच करु शकणार नाही हे मला माहिती असूनही मी तो कार्यक्रम खुप तन्मयतेने बघत असते.पहिलेपासुनच या सगळ्या कुकरी शो मधली मला आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचं शो पुरतं मांडलेलं स्वयंपाकघर...पण नायजेला च्या या शो मध्ये ती खर्‍याखुर्‍या स्वयंपाकघरात रेसिपी बनवते.तिची सगळी भांडी, मोठ्ठाजात फ़्रीज, मोठ्ठं ब्लेंडर आणि तिचा बार्बेक्यु..ह्या माझ्या तिच्या स्वयंपाकघरातल्या आवडणार्‍या वस्तु..कुठलाही पदार्थ करत असतांना ती इतकी त्या पदार्थाबद्दल पॅशनेट असते की मलाही आजकाल तिच्यासारखं पॅशनेट होऊन स्वयंपाक करावा वाटतो.........तिने बनवलेले कप केक्स तर इतके सुंदर होते की त्यांना टी.व्ही तुन उचलुन घ्यावं असं वाटलं होतं मला. विशेष म्हणजे सगळी सामग्री तिने कुठुन आणली इथपर्यंत ती सगळा तपशील देत असते. पण नेहमीच्या भारतीय कुकरी शो सारखे सामग्री आणि कृती लिहुन घ्या असं मात्र ती कधीच म्हणत नाही..तिच्या सारखा मला एकही पदार्थ बनवता आला ना तरी मला आनंद होईल...

पुढे काही विडिओज देतेय नक्की पहा..कपकेक वाला विडिओ काही सापडला नाही..;)



















Comments

  1. Tila pahat rahane pan ek sukhad anubhav aahe.

    ReplyDelete
  2. ho na! mala tar ti prachanda aavadate..bagha kadhi ticha program TV var..you will really appreciate her,..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटा...

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...