चीड आणणारे काही..
जोरजोरात बोलणे विशेषतः फ़ोनवर.
मोबाईल च्या जोरजोरात वाजणार्या कर्कश्श रिंगटोन्स
काही बोलत असतांना, महत्वाचे घरगुती काम करत असतांना टि.व्ही चा आवाज, मोबाईलचा आवाज.
खुप जोरात चालणारा पंखा, कुलर, ए.सी आणि त्यांचे आवाज
स्वयंपाकघराच्या ओट्यावरची अस्वच्छता.
फ़ालतुचं होंकिंग
घरात असलेली पाल (प्रत्यक्षात मला काहिही करत नसली तरी ),मुंग्या,किडे
रात्री झोपतांना सुरु असलेला लाईट आणि त्याने होणारी गरमी
फ़ुरके मारुन चहा पिणे.
जेवण झाल्यावर सगळ्यांसमोर जोरदार ढेकर देणे(घरी किंवा पंक्तीत बसले असल्यास ठीक आहे, पण ओफ़िसमध्ये???)
नको तिथे फ़िलोसोफ़ि झाडणे.
आपणंच किती दुःखी आहोत हे वारंवार सांगणारे लोकं..
तार सप्तकात म्हंटलेली गाणी विशेषकरुन तमिळ गाणी ज्यात नको तिथे तार सप्तक वापरले आहे.
आजकालचे रेडिओ मिरची आणि बरेचसे एफ़.एम चैनेल्स आणि त्यावरच्या तथाकथित आर. जे ची वायफ़ळ बडबड.
हमाम ची जाहिरात...
तमाम सास बहू सिरियल्स.
गर्दी...विशेषत: देवळातली.
फ़ोनवर बोलतांना खुप पाल्हाळ लावणारी माणसं.
"मी महान" चा नारा असलेली माणसं
फ़ोर्वर्ड इमेल्स आणि मेसेजेस..
अरेव्वा! बरीच लांब झालीए लिस्ट. आमच्या कंपनीत एकदा प्रश्न विचारला होता की "तुम्हाला कुठल्या गोष्टीची प्रचंड चीड आहे?" तेव्हा मला काहीच सुचलं नाही. वरचे सगळे पोइन्ट्स लिहिले असते तर पैकी च्या पैकी मार्क्स मिळाले असते नाही? आणणारे काही..जोरजोरात बोलणे विशेषतः फ़ोन आणणारे काही..
- जोरजोरात बोलणे विशेषतः फ़ोनवर.
- मोबाईल च्या जोरजोरात वाजणार्या रिंग टोन्स
- काही बोलत असतांना, महत्वाचे घरगुती काम करत असतांना जोरात सुरु असलेला टी.व्ही , मोबाईलचा आवाज.
- खुप जोरात चालणारा पंखा, कुलर, ए.सी आणि त्यांचे आवाज
- स्वयंपाकघराच्या ओट्यावरची अस्वच्छता.
- फ़ालतुचं Honking
- घरात असलेली पाल (प्रत्यक्षात मला काहिही करत नसली तरी ),मुंग्या,किडे
- झोपतांना सुरु असलेला लाईट आणि त्याने होणारी गरमी
- फ़ुरके मारुन चहा पिणे.
- जेवण झाल्यावर सगळ्यांसमोर जोरदार ढेकर देणे (घरी किंवा पंक्तीत बसले असल्यास ठीक आहे, पण ऑफिस मध्ये??)
- नको तिथे फिलोसोफी झाडणे.
- आपणंच किती दुःखी आहोत हे वारंवार सांगणारे लोकं..
- तार सप्तकात म्हंटलेली गाणी विशेषकरुन तमिळ गाणी ज्यात नको तिथे तार सप्तक वापरले आहे.
- आजकालचे रेडिओ मिरची आणि बरेचसे एफ़.एम आणि त्यावरच्या तथाकथित आर. जे ची वायफ़ळ बडबड.
- हमाम ची जाहिरात...
- तमाम सास बहू सिरियल्स.
- गर्दी...विशेषत: देवळातली.
- फ़ोनवर बोलतांना खुप पाल्हाळ लावणारी माणसं.
- "मी महान" चा नारा असलेली माणसं
- फॉरवर्ड इमेल्स आणि मेसेजेस..
अरेव्वा! बरीच लांब झालीए लिस्ट. आमच्या कंपनीत एकदा प्रश्न विचारला होता की "तुम्हाला कुठल्या गोष्टीची प्रचंड चीड आहे?" तेव्हा मला काहीच सुचलं नाही. वरचे सगळे पॉइंट्स लिहिले असते तर पैकी च्या पैकी मार्क्स मिळाले असते नाही?
बरेच दिवसांपासून वर लिहिलेल्या सगळ्याच गोष्टींचा मला संताप येतो..काहीही केलं तरी दुर्लक्ष कस्सं म्हणुन करता येत नाही ..म्हणुन म्हंटलं लिहुन पहावं ब्लॉग वर थोडा तरी आराम होईल ;)
अगदी बरोबर, मनातले !
ReplyDeleteसहमत आहे.. एक महत्वाची व्यक्ती विसरलात, अशा लोकांना न फटकारता येणारे आपण स्वतः... ( स्वतःची पण चीड येते नां?आपल्याला काहिच करता येत नाही म्हणून??)
ReplyDelete:), मला वाटते वरच्यापैकी निम्म्या गोष्टी मी करतो
ReplyDelete...
# फ़ुरके मारुन चहा पिणे.
# जेवण झाल्यावर सगळ्यांसमोर जोरदार ढेकर देणे (घरी किंवा पंक्तीत बसले असल्यास ठीक आहे, पण ऑफिस मध्ये??)
# नको तिथे फिलोसोफी झाडणे.
*
BTW मी नेहमी वाचतो तुमचा ब्लॉग [बरेचसा वाचून होहो बरोबर, असं वाटत आणि मग काही कमेंट टाकत नाही]
ajunahi baryachashya goshti aahet..pan kay kay lihinar??
ReplyDeletepratisadabaddal dhanyavad!!
हे सगळं कधी खुप जवळच्या, किंवा वयाने मोठ्या व्यक्तिंकडुन घडतं ज्यांना काही म्हणता येत नाही किंवा अश्या कुणाकडुन तरी घडतं ज्याच्याशी आपला काहीही संबंध नाही..कुणा कुणाला रागवणार??
ReplyDeleteखरंच अश्या वेळी स्वतःचीच चीड येते....आपल्याला काहिच करता येत नाही म्हणून??
पोस्ट लिहितांना वाटलंच होतं तुमचा असा कमेंट येईल म्हणुन...इंट्युशन का काय असं झालं होतं..:)
ReplyDeleteह्यावेळी आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद !!
पटले सगळेच मुद्दे.....खरच फार चिड येते अश्या वेळी.......त्यात आणि एक भर विनाकारण स्वत:ला काम नाही म्हणून आपल्याकडे येउन बसणारे लोक...आणि आपल्या भिडस्त वगैरे स्वभावामुळे विनाकारण त्यांचे मनोरंजन करणारे आपण.....
ReplyDeletebaki sagla pattala pan hamam chi jahirat ka bar ? :-)
ReplyDeletebagha ek wel hamam chi..."Sneha ek saban aan ga!" wali jahirat..ani ekda pahun cheed nahi aali tar varamvar bagha..
ReplyDeletenakki cheed yeil ;)
ho na..to hi ek point hou shakato...
ReplyDeletepratisadabaddal manapasun dhanyavad..