Skip to main content

जाहिरातींचं विश्व!!

बर्याच जाहिरातींना आपण नावं ठेवतो. मला काही जाहिराती अजिबात आवडत नाहीत. पण एखादी जाहिरात इतकी डोकं लावुन तयार केलेली असते की तिला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. लहानपणी पासुन मला प्रत्यक्ष कार्यक्रमापेक्षा जाहिराती बघणंच आवडत असे. कृष्ण-धवल टि.व्ही च्या जमान्यात रात्रीच्या बातम्यांनंतर एखादी मालिका असायची. त्यातही एकच विश्रांती असायची. त्या एकाच विश्रांती साठी तो अख्खा कार्यक्रम बघणे हा माझा नित्याचा कार्यक्रम. जाहीरातीचं विश्व तेव्हा फ़ारसं मोठ्ठं नव्हतं. निवडक प्रोड्क्ट्स च्या निवडक जाहीराती. त्यात कोलगेट, प्रॊक्टर आणि गैम्बल, पामोलिव, गोदरेज, सनड्रोप,सर्फ़ अश्या काही जाहीराती मला आठवतात. सर्फ़ ची ललिता जी वाली जाहिरात तर झकासच...
मला लेसान्सी नावाच्या साबणाची जाहीरात आवडायची. त्यातील "लेसान्सी, खुब चले चलती जाये" आणि "राहुल, पानी चला जायेगा" ही वाक्य तर मला अजुनही आठवतात. त्या साबणाच्या वेगळ्या आकारामुळे तर मी हट्ट करुन बाबांना ती साबण आणुन मागायचे. आता "वो खुब चली की नही" हे मात्र आता आठवत नाही ;)
निरमा पावडर ची जाहीरात तर लहान थोरांना माहीती आहेच. मला "निर्मा सुपर निली डिटर्जंट टिकीया" वाली दिपिका(सीतेची भुमिका करणारी) ची जाहिरात अजुनही पाठ आहे.
दुकानदार: आईये आईये दिपिका जी लिजिए आपका सब सामान तयार.....
दिपिका: ये नही वो .निर्मा सुपर निली डिटर्जंट टिकीया..
दुकानदार: मगर आप तो वो हमेशा महेंगीवाली टिकीया...लेती थी..
दिपिका: मगर वही मेहेंगे दामोवाली क्वालिटी वही सफ़ेदी वही झाग अगर कम दामो मे मिले तो कोइ ये क्यु ले..वो ना ले?
दुकानदार: मान गये.... किसे?आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनोको..
आमच्या घरी निरमा साबण मात्र कधी कुणीही वापरल्याचं मला आठवत नाही...जाहीरातीमुळे खप जरी नसेल वाढला तरी आज २० वर्षांनंतरही मला ती जाहिरात लक्षात आहे ह्यातच जाहीरात तयार करणार्यांचं श्रेय आहे नाही का?
काहीवेळा जुनी गाणी सुध्दा वापरली आहेत जाहिरातीत आणि गम्मत म्हणजे गाणी गुणगुणतांना जाहिरातच कितीतरी दा गुणगुणल्या जाते माझ्याकडुन..उदा.विडिओकॊन च्या रेफ़्रीजरेटर ची जाहीरात..
भली भली सी एक सुरत भला सा एक नाम
हर मौसम मे काम आये सुबह हो या शाम
कौन है वो हमसफ़र..जेट मैटीक रेफ़्रीजरेटर..
गाण्यापेक्षा जाहिरातीच गुणगुणायला जास्त मजा यायची..मला तर अजुनही मजा वाटते.....
थोडी मोठी झाले आणि "रफ़ल्स लेस रफ़ल्स लेस...नो वन कैन ईट जस्ट वन" ह्या जाहीरातीने भारतीयांच्या तोंडात चिप्स भरवले कारण यानंतरच लेज चिप्स चं प्रस्थ सुरु झालं.लैकमे च्या जाहीराती तर मला त्यात दाखवत असलेल्या सुंदर सुंदर मोडेल्स आणि कोस्मेटिक्स मुळे प्रचंड आवडायच्या. ऐश्वर्या राय ची ही जाहिरात पहा
"I am Sanjana, got another pepsi" ही ऐश्वर्या आणि आमिर ची जाहीरात..आठवणीतल्यापैकी एक....
२००० सालापर्यंत जाहिरातींचं विश्व बरंच फ़ोफ़ावलं, नविन नविन आयडियास आणि नव्या नव्या तांत्रिकी सुधारणांमुळे प्रत्येक जाहिरात अपीलिंग करायचा जसा काही जाहिरात कंपन्यांनी चंगच बांधला...
क्रमश:
बर्याच जाहिरातींना आपण नावं ठेवतो. मला काही जाहिराती अजिबात आवडत नाहीत. पण एखादी जाहिरात इतकी डोकं लावुन तयार केलेली असते की तिला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. लहानपणी पासुन मला प्रत्यक्ष कार्यक्रमापेक्षा जाहिराती बघणंच आवडत असे. कृष्ण-धवल टि.व्ही च्या जमान्यात रात्रीच्या बातम्यांनंतर एखादी मालिका असायची. त्यातही एकच विश्रांती असायची. त्या एकाच विश्रांती साठी तो अख्खा कार्यक्रम बघणे हा माझा नित्याचा कार्यक्रम.

जाहीरातीचं विश्व तेव्हा फ़ारसं मोठ्ठं नव्हतं. निवडक प्रोड्क्ट्स च्या निवडक जाहीराती. त्यात कोलगेट, प्रॊक्टर आणि गैम्बल, पामोलिव, गोदरेज, सनड्रोप,सर्फ़ अश्या काही जाहीराती मला आठवतात. सर्फ़ ची ललिता जी वाली जाहिरात तर झकासच...

मला लेसान्सी नावाच्या साबणाची जाहीरात आवडायची. त्यातील "लेसान्सी, खुब चले चलती जाये" आणि "राहुल, पानी चला जायेगा" ही वाक्य तर मला अजुनही आठवतात. त्या साबणाच्या वेगळ्या आकारामुळे तर मी हट्ट करुन बाबांना ती साबण आणुन मागायचे. आता "वो खुब चली की नही" हे मात्र आता आठवत नाही ;)

निरमा पावडर ची जाहीरात तर लहान थोरांना माहीती आहेच. मला "निर्मा सुपर निली डिटर्जंट टिकीया" वाली दिपिका(सीतेची भुमिका करणारी) ची जाहिरात अजुनही पाठ आहे.

दुकानदार: आईये आईये दिपिका जी लिजिए आपका सब सामान तयार.....

दिपिका: ये नही वो .निर्मा सुपर निली डिटर्जंट टिकीया..

दुकानदार: मगर आप तो वो हमेशा महेंगीवाली टिकीया...लेती थी..

दिपिका: मगर वही मेहेंगे दामोवाली क्वालिटी वही सफ़ेदी वही झाग अगर कम दामो मे मिले तो कोइ ये क्यु ले..वो ना ले?

दुकानदार: मान गये.... किसे?आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनोको..

आमच्या घरी निरमा साबण मात्र कधी कुणीही वापरल्याचं मला आठवत नाही...जाहीरातीमुळे खप जरी नसेल वाढला तरी आज २० वर्षांनंतरही मला ती जाहिरात लक्षात आहे ह्यातच जाहीरात तयार करणार्यांचं श्रेय आहे नाही का?

काहीवेळा जुनी गाणी सुध्दा वापरली आहेत जाहिरातीत आणि गम्मत म्हणजे गाणी गुणगुणतांना जाहिरातच कितीतरी दा गुणगुणल्या जाते माझ्याकडुन..उदा.विडिओकॊन च्या रेफ़्रीजरेटर ची जाहीरात..

भली भली सी एक सुरत भला सा एक नाम

हर मौसम मे काम आये सुबह हो या शाम

कौन है वो हमसफ़र..जेट मैटीक रेफ़्रीजरेटर..

गाण्यापेक्षा जाहिरातीच गुणगुणायला जास्त मजा यायची..मला तर अजुनही मजा वाटते.....

थोडी मोठी झाले आणि "रफ़ल्स लेस रफ़ल्स लेस...नो वन कैन ईट जस्ट वन" ह्या जाहीरातीने भारतीयांच्या तोंडात चिप्स भरवले कारण यानंतरच लेज चिप्स चं प्रस्थ सुरु झालं.लैकमे च्या जाहीराती तर मला त्यात दाखवत असलेल्या सुंदर सुंदर मोडेल्स आणि कोस्मेटिक्स मुळे प्रचंड आवडायच्या. ऐश्वर्या राय ची ही जाहिरात पहा

"I am Sanjana, got another pepsi" ही ऐश्वर्या आणि आमिर ची जाहीरात..आठवणीतल्यापैकी एक....

२००० सालापर्यंत जाहिरातींचं विश्व बरंच फ़ोफ़ावलं, नविन नविन आयडियास आणि नव्या नव्या तांत्रिकी सुधारणांमुळे प्रत्येक जाहिरात अपीलिंग करायचा जसा काही जाहिरात कंपन्यांनी चंगच बांधला...

क्रमश:

Comments

  1. tula ti ad aathavate ka, Coir Boardchi ? like ' it's coir decor from coir board " that one was nice.

    ReplyDelete
  2. nahi aathwat...tula exact ad aathvate ka kon kon hota wagaire...??

    ReplyDelete
  3. जुन्या जाहिराती मस्तच असायच्या... मी तर कधी कधी फक्त जाहिरातीच बघायचो ... पण मला हल्ली ती मजा येत नाही (काही अपवाद सोडल्यास) सगळ्या जाहिराती मला खोट्या अणि बाजारू वाटतात.
    पाट्या टाकल्यासारख्या... एक जाहिरात आहे बघा एक बाई आपल्या मुलीला साबन आणायला सांगते आणि मग बोलते मी नाव नाही सांगितला साबणाचे... कसला उछाद मांडलाय त्यात...
    तरी काही जाहिराती पाहण्यासारख्या असतात हे मान्य करावे लागेल (ती कुठलासे चिंगम खाऊन दात चमकतात ते... मस्तच आहे ती जाहिरात ...भन्नाट डोके लावलय...आणि चित्रित पण सही केलय )

    अजुन लिहा जुन्या जाहिरातिन्वर...मजा आली वाचून.

    ReplyDelete
  4. aajkalachyaa jahiraati tar sumaarach...
    maagachaa kaal aathvaava mhanunach hi post lihitey..
    blog la ashich bhet det raha..
    dhanyavad

    ReplyDelete
  5. Hi Mugdha, sahiich lihily!! pan hya junya ads madhye ti surf ch ad naahi ka "kyon Mummy nahi hai kya" wali?? aani dairy milk chee pan! junee ti mulgee dhawt ground var yete ashich kahi taree aahe...

    khoop awdlaay ha blog aata poorn vaachen mhntoy reader varun! :)

    ReplyDelete
  6. तुमची प्रतिक्रिया नियंत्रणप्रक्रियेत आहे>>> hehehehe too good mi te aadhe chotya type mule NIMANTRAN prkriye t as vaachl :D

    ReplyDelete
  7. dhanyavad deep..
    kaahi classic ads rahunach gelya..tyaat hi cadbury chi aani "Lijjat papad" he he he wali sashyachi..pan raahun geli..

    ReplyDelete
  8. Enjoyed your post.

    Even before the ads you are talking about, the Indian ad industry was churning out really good stuff. Do you remember Garden Vareli? Oil of Olay? Or Bombay Dying's dream lover? Or, perhaps Pepsi's "are you ready for the magic" ad with Juhi & Remo?

    At a point of time, when Doordarshan was serving rubbish and satellite channels were non-existent, I used to watch only ads on TV for entertainment.

    ~ Your namesake :-)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटा...

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...