काही दिवस कसे सुन्न असतात. कशा कशात म्हणुन लक्ष लागत नाही. बरं वाटावं म्हणुन काम करायची केविलवाणी धडपड अजुनच त्रास देवुन जाते. ह्या सगळ्याचं कारण म्हणजे क्षुल्लक कारणावरुन आपल्याच व्यक्तीने हृदयावर उमटवलेले ओरखडे.
अश्याच वेळी मला "एकला चलो रे" कि काय म्हणतात ते आठवतं..आणि जगातलं अगाध तत्वद्न्यान मेंदुचे दरवाजे ठोठावायला लागतं. अगदी श्रीकृष्णापासुन सगळे आठवतात..हे सांगणारे की "एकटेच आला आहात जगात, जमवलेलं हे सगळं गोतावळ पुन्हा कधीतरी सोडुन जायचं आहेच पुढ्च्या वाटचालीसाठी" मग माझंच मला हसु येतं एवढा साक्षात्कार घडवायला मन दुखावलं गेलंच पाहिजे नाहितर आपल्याच धुन्दीत जगणार्या मज पामराला एवढी बुदधी होणे नाही..
मला तर हे जगच एक आभास आहे असं वाटतं कधी कधी..मग त्या आभासात दुखावणे काय किंवा सुखावणे काय? सगळे सारखेच..त्या आभासाची जाणीव मात्र अजुन झाली नाहीए..
जाणीव होण्याकरता त्याच्याशी समरुप व्हावं लागत असावं..जगातल्या सगळ्या संतांप्रमाणं..
आपण असाच प्रवास करायचा कधी हसत कधी रडत. आणि एकदिवस संपवायची आपली यात्रा कुणालाही "येतो हं मी" नं सांगता..निमूटपणे.मग कसले ओरखडॆ कसले हसु. सगळे सारखेच होऊन जात असावे. नदी जेव्हा तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तं मोठ्ठ्या सागराला मिळते तेव्हा कुठे सांगत बसते तिला वाटेतील पाषाणांमुळे झालेली दुखापत.
तिचा सागरापर्यंतचा प्रवास हेच तिचं जीवन आणि तिचं त्याच्याशी मीलन हाच मृत्यु...तिच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात.
सारं जीवन हे त्याच एका मिलनासाठी..मग तिथे मनुष्याठायी असलेले सगळे भाव क्षणात विरघळुन जात असावेत.म्हणुनच मृत्यु साजरा करावा. सुटका म्हणुन नव्हे तर जल्लोष म्हणुन..जल्लोष करावा आत्म्याच्या जगद्व्यापी शक्तिशी होणार्या मीलनाचा..
अर्थात, हे सगळं उमगण्यासाठी मन मात्र दुखावलं गेलंच पाहिजे हे नक्की. मनोमन म्हणुनच मी मला कुठल्या नं कुठल्या कारणाने दुखावणार्यांचे आभार मानत असते. त्यांच्यामुळेच तर मला अनुभुती होते माझ्यातल्या मी ची...माझ्यातल्या जगद्व्यापी शक्तीच्या अंशाची..!!काही दिवस कसे सुन्न असतात. कशा कशात म्हणुन लक्ष लागत नाही. बरं वाटावं म्हणुन काम करायची केविलवाणी धडपड अजुनच त्रास देवुन जाते. ह्या सगळ्याचं कारण म्हणजे क्षुल्लक कारणावरुन आपल्याच व्यक्तीने हृदयावर उमटवलेले ओरखडे.
अश्याच वेळी मला "एकला चलो रे" कि काय म्हणतात ते आठवतं..आणि जगातलं अगाध तत्वद्न्यान मेंदुचे दरवाजे ठोठावायला लागतं. अगदी श्रीकृष्णापासुन सगळे आठवतात..हे सांगणारे की "एकटेच आला आहात जगात, जमवलेलं हे सगळं गोतावळ पुन्हा कधीतरी सोडुन जायचं आहेच पुढ्च्या वाटचालीसाठी" मग माझंच मला हसु येतं एवढा साक्षात्कार घडवायला मन दुखावलं गेलंच पाहिजे नाहितर आपल्याच धुन्दीत जगणार्या मज पामराला एवढी बुदधी होणे नाही..
मला तर हे जगच एक आभास आहे असं वाटतं कधी कधी..मग त्या आभासात दुखावणे काय किंवा सुखावणे काय? सगळे सारखेच..त्या आभासाची जाणीव मात्र अजुन झाली नाहीए.
जाणीव होण्याकरता त्याच्याशी समरुप व्हावं लागत असावं..जगातल्या सगळ्या संतांप्रमाणं..
आपण असाच प्रवास करायचा कधी हसत कधी रडत. आणि एकदिवस संपवायची आपली यात्रा कुणालाही "येतो हं मी" नं सांगता..निमूटपणे.मग कसले ओरखडॆ कसले हसु. सगळे सारखेच होऊन जात असावे. नदी जेव्हा तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तं मोठ्ठ्या सागराला मिळते तेव्हा कुठे सांगत बसते तिला वाटेतील पाषाणांमुळे झालेली दुखापत.
तिचा सागरापर्यंतचा प्रवास हेच तिचं जीवन आणि तिचं त्याच्याशी मीलन हाच मृत्यु...तिच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात.
सारं जीवन हे त्याच एका मिलनासाठी..मग तिथे मनुष्याठायी असलेले सगळे भाव क्षणात विरघळुन जात असावेत.म्हणुनच मृत्यु साजरा करावा. सुटका म्हणुन नव्हे तर जल्लोष म्हणुन..जल्लोष करावा आत्म्याच्या जगद्व्यापी शक्तिशी होणार्या मीलनाचा..
अर्थात, हे सगळं उमगण्यासाठी मन मात्र दुखावलं गेलंच पाहिजे हे नक्की. मनोमन म्हणुनच मी मला कुठल्या नं कुठल्या कारणाने दुखावणार्यांचे आभार मानत असते. त्यांच्यामुळेच तर मला अनुभुती होते माझ्यातल्या मी ची...माझ्यातल्या जगद्व्यापी शक्तीच्या अंशाची..!!
काही दिवस कसे सुन्न असतात. कशा कशात म्हणुन लक्ष लागत नाही. बरं वाटावं म्हणुन काम करायची केविलवाणी धडपड अजुनच त्रास देवुन जाते. ह्या सगळ्याचं कारण म्हणजे क्षुल्लक कारणावरुन आपल्याच व्यक्तीने हृदयावर उमटवलेले ओरखडे.
अश्याच वेळी मला "एकला चलो रे" कि काय म्हणतात ते आठवतं..आणि जगातलं अगाध तत्वद्न्यान मेंदुचे दरवाजे ठोठावायला लागतं. अगदी श्रीकृष्णापासुन सगळे आठवतात..हे सांगणारे की "एकटेच आला आहात जगात, जमवलेलं हे सगळं गोतावळ पुन्हा कधीतरी सोडुन जायचं आहेच पुढ्च्या वाटचालीसाठी"
मग माझंच मला हसु येतं एवढा साक्षात्कार घडवायला मन दुखावलं गेलंच पाहिजे नाहितर आपल्याच धुन्दीत जगणार्या मज पामराला एवढी बुदधी होणे नाही..
मला तर हे जगच एक आभास आहे असं वाटतं कधी कधी..मग त्या आभासात दुखावणे काय किंवा सुखावणे काय? सगळे सारखेच..त्या आभासाची जाणीव मात्र अजुन झाली नाहीए..
जाणीव होण्याकरता त्याच्याशी समरुप व्हावं लागत असावं..जगातल्या सगळ्या संतांप्रमाणं..
आपण असाच प्रवास करायचा कधी हसत कधी रडत. आणि एकदिवस संपवायची आपली यात्रा कुणालाही "येतो हं मी" नं सांगता..निमूटपणे.मग कसले ओरखडॆ कसले हसु. सगळे सारखेच होऊन जात असावे. नदी जेव्हा तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तं मोठ्ठ्या सागराला मिळते तेव्हा कुठे सांगत बसते तिला वाटेतील पाषाणांमुळे झालेली दुखापत.
तिचा सागरापर्यंतचा प्रवास हेच तिचं जीवन आणि तिचं त्याच्याशी मीलन हाच मृत्यु...तिच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात.
सारं जीवन हे त्याच एका मिलनासाठी..मग तिथे मनुष्याठायी असलेले सगळे भाव क्षणात विरघळुन जात असावेत.म्हणुनच मृत्यु साजरा करावा. सुटका म्हणुन नव्हे तर जल्लोष म्हणुन..जल्लोष करावा आत्म्याच्या जगद्व्यापी शक्तिशी होणार्या मीलनाचा..
अर्थात, हे सगळं उमगण्यासाठी मन मात्र दुखावलं गेलंच पाहिजे हे नक्की. मनोमन म्हणुनच मी मला कुठल्या नं कुठल्या कारणाने दुखावणार्यांचे आभार मानत असते. त्यांच्यामुळेच तर मला अनुभुती होते माझ्यातल्या मी ची...माझ्यातल्या जगद्व्यापी शक्तीच्या अंशाची..!!
जैसे तिलमें तेल है,ज्यो चकमकमें आग,
ReplyDeleteतेरा साई तुझमें है, तू जान सके तो जाग.
एखाद्या टोचणीशिवाय ही अनुभूती येत नाही हेही खरच!
aavarjun reply dilat aani to hi itaka chhan tyabaddal khup khup aabhaar..!!
ReplyDeleteashich bhet det raha.