Skip to main content

स्वगत...!!

काही दिवस कसे सुन्न असतात. कशा कशात म्हणुन लक्ष लागत नाही. बरं वाटावं म्हणुन काम करायची केविलवाणी धडपड अजुनच त्रास देवुन जाते. ह्या सगळ्याचं कारण म्हणजे क्षुल्लक कारणावरुन आपल्याच व्यक्तीने हृदयावर उमटवलेले ओरखडे.
अश्याच वेळी मला "एकला चलो रे" कि काय म्हणतात ते आठवतं..आणि जगातलं अगाध तत्वद्न्यान मेंदुचे दरवाजे ठोठावायला लागतं. अगदी श्रीकृष्णापासुन सगळे आठवतात..हे सांगणारे की "एकटेच आला आहात जगात, जमवलेलं हे सगळं गोतावळ पुन्हा कधीतरी सोडुन जायचं आहेच पुढ्च्या वाटचालीसाठी" मग माझंच मला हसु येतं एवढा साक्षात्कार घडवायला मन दुखावलं गेलंच पाहिजे नाहितर आपल्याच धुन्दीत जगणार्‍या मज पामराला एवढी बुदधी होणे नाही..
मला तर हे जगच एक आभास आहे असं वाटतं कधी कधी..मग त्या आभासात दुखावणे काय किंवा सुखावणे काय? सगळे सारखेच..त्या आभासाची जाणीव मात्र अजुन झाली नाहीए..
जाणीव होण्याकरता त्याच्याशी समरुप व्हावं लागत असावं..जगातल्या सगळ्या संतांप्रमाणं..
आपण असाच प्रवास करायचा कधी हसत कधी रडत. आणि एकदिवस संपवायची आपली यात्रा कुणालाही "येतो हं मी" नं सांगता..निमूटपणे.मग कसले ओरखडॆ कसले हसु. सगळे सारखेच होऊन जात असावे. नदी जेव्हा तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तं मोठ्ठ्या सागराला मिळते तेव्हा कुठे सांगत बसते तिला वाटेतील पाषाणांमुळे झालेली दुखापत.
तिचा सागरापर्यंतचा प्रवास हेच तिचं जीवन आणि तिचं त्याच्याशी मीलन हाच मृत्यु...तिच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात.
सारं जीवन हे त्याच एका मिलनासाठी..मग तिथे मनुष्याठायी असलेले सगळे भाव क्षणात विरघळुन जात असावेत.म्हणुनच मृत्यु साजरा करावा. सुटका म्हणुन नव्हे तर जल्लोष म्हणुन..जल्लोष करावा आत्म्याच्या जगद्व्यापी शक्तिशी होणार्‍या मीलनाचा..
अर्थात, हे सगळं उमगण्यासाठी मन मात्र दुखावलं गेलंच पाहिजे हे नक्की. मनोमन म्हणुनच मी मला कुठल्या नं कुठल्या कारणाने दुखावणार्‍यांचे आभार मानत असते. त्यांच्यामुळेच तर मला अनुभुती होते माझ्यातल्या मी ची...माझ्यातल्या जगद्व्यापी शक्तीच्या अंशाची..!!काही दिवस कसे सुन्न असतात. कशा कशात म्हणुन लक्ष लागत नाही. बरं वाटावं म्हणुन काम करायची केविलवाणी धडपड अजुनच त्रास देवुन जाते. ह्या सगळ्याचं कारण म्हणजे क्षुल्लक कारणावरुन आपल्याच व्यक्तीने हृदयावर उमटवलेले ओरखडे.
अश्याच वेळी मला "एकला चलो रे" कि काय म्हणतात ते आठवतं..आणि जगातलं अगाध तत्वद्न्यान मेंदुचे दरवाजे ठोठावायला लागतं. अगदी श्रीकृष्णापासुन सगळे आठवतात..हे सांगणारे की "एकटेच आला आहात जगात, जमवलेलं हे सगळं गोतावळ पुन्हा कधीतरी सोडुन जायचं आहेच पुढ्च्या वाटचालीसाठी" मग माझंच मला हसु येतं एवढा साक्षात्कार घडवायला मन दुखावलं गेलंच पाहिजे नाहितर आपल्याच धुन्दीत जगणार्‍या मज पामराला एवढी बुदधी होणे नाही..
मला तर हे जगच एक आभास आहे असं वाटतं कधी कधी..मग त्या आभासात दुखावणे काय किंवा सुखावणे काय? सगळे सारखेच..त्या आभासाची जाणीव मात्र अजुन झाली नाहीए.
जाणीव होण्याकरता त्याच्याशी समरुप व्हावं लागत असावं..जगातल्या सगळ्या संतांप्रमाणं..
आपण असाच प्रवास करायचा कधी हसत कधी रडत. आणि एकदिवस संपवायची आपली यात्रा कुणालाही "येतो हं मी" नं सांगता..निमूटपणे.मग कसले ओरखडॆ कसले हसु. सगळे सारखेच होऊन जात असावे. नदी जेव्हा तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तं मोठ्ठ्या सागराला मिळते तेव्हा कुठे सांगत बसते तिला वाटेतील पाषाणांमुळे झालेली दुखापत.
तिचा सागरापर्यंतचा प्रवास हेच तिचं जीवन आणि तिचं त्याच्याशी मीलन हाच मृत्यु...तिच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात.
सारं जीवन हे त्याच एका मिलनासाठी..मग तिथे मनुष्याठायी असलेले सगळे भाव क्षणात विरघळुन जात असावेत.म्हणुनच मृत्यु साजरा करावा. सुटका म्हणुन नव्हे तर जल्लोष म्हणुन..जल्लोष करावा आत्म्याच्या जगद्व्यापी शक्तिशी होणार्‍या मीलनाचा..
अर्थात, हे सगळं उमगण्यासाठी मन मात्र दुखावलं गेलंच पाहिजे हे नक्की. मनोमन म्हणुनच मी मला कुठल्या नं कुठल्या कारणाने दुखावणार्‍यांचे आभार मानत असते. त्यांच्यामुळेच तर मला अनुभुती होते माझ्यातल्या मी ची...माझ्यातल्या जगद्व्यापी शक्तीच्या अंशाची..!!
काही दिवस कसे सुन्न असतात. कशा कशात म्हणुन लक्ष लागत नाही. बरं वाटावं म्हणुन काम करायची केविलवाणी धडपड अजुनच त्रास देवुन जाते. ह्या सगळ्याचं कारण म्हणजे क्षुल्लक कारणावरुन आपल्याच व्यक्तीने हृदयावर उमटवलेले ओरखडे.

अश्याच वेळी मला "एकला चलो रे" कि काय म्हणतात ते आठवतं..आणि जगातलं अगाध तत्वद्न्यान मेंदुचे दरवाजे ठोठावायला लागतं. अगदी श्रीकृष्णापासुन सगळे आठवतात..हे सांगणारे की "एकटेच आला आहात जगात, जमवलेलं हे सगळं गोतावळ पुन्हा कधीतरी सोडुन जायचं आहेच पुढ्च्या वाटचालीसाठी"

मग माझंच मला हसु येतं एवढा साक्षात्कार घडवायला मन दुखावलं गेलंच पाहिजे नाहितर आपल्याच धुन्दीत जगणार्‍या मज पामराला एवढी बुदधी होणे नाही..

मला तर हे जगच एक आभास आहे असं वाटतं कधी कधी..मग त्या आभासात दुखावणे काय किंवा सुखावणे काय? सगळे सारखेच..त्या आभासाची जाणीव मात्र अजुन झाली नाहीए..

जाणीव होण्याकरता त्याच्याशी समरुप व्हावं लागत असावं..जगातल्या सगळ्या संतांप्रमाणं..

आपण असाच प्रवास करायचा कधी हसत कधी रडत. आणि एकदिवस संपवायची आपली यात्रा कुणालाही "येतो हं मी" नं सांगता..निमूटपणे.मग कसले ओरखडॆ कसले हसु. सगळे सारखेच होऊन जात असावे. नदी जेव्हा तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तं मोठ्ठ्या सागराला मिळते तेव्हा कुठे सांगत बसते तिला वाटेतील पाषाणांमुळे झालेली दुखापत.

तिचा सागरापर्यंतचा प्रवास हेच तिचं जीवन आणि तिचं त्याच्याशी मीलन हाच मृत्यु...तिच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात.

सारं जीवन हे त्याच एका मिलनासाठी..मग तिथे मनुष्याठायी असलेले सगळे भाव क्षणात विरघळुन जात असावेत.म्हणुनच मृत्यु साजरा करावा. सुटका म्हणुन नव्हे तर जल्लोष म्हणुन..जल्लोष करावा आत्म्याच्या जगद्व्यापी शक्तिशी होणार्‍या मीलनाचा..

अर्थात, हे सगळं उमगण्यासाठी मन मात्र दुखावलं गेलंच पाहिजे हे नक्की. मनोमन म्हणुनच मी मला कुठल्या नं कुठल्या कारणाने दुखावणार्‍यांचे आभार मानत असते. त्यांच्यामुळेच तर मला अनुभुती होते माझ्यातल्या मी ची...माझ्यातल्या जगद्व्यापी शक्तीच्या अंशाची..!!

Comments

  1. जैसे तिलमें तेल है,ज्यो चकमकमें आग,
    तेरा साई तुझमें है, तू जान सके तो जाग.

    एखाद्या टोचणीशिवाय ही अनुभूती येत नाही हेही खरच!

    ReplyDelete
  2. aavarjun reply dilat aani to hi itaka chhan tyabaddal khup khup aabhaar..!!
    ashich bhet det raha.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक