Skip to main content

जिमस्य कथा!!

जिमस्य कथा!!
आज शुक्रवार, जिम ला रुजु होऊन हाश्श हुश्श!! करत आठ दिवस पूर्ण झाले. डाएट अगदी जोमात सुरु आहे. दिवसातुन ७ वेळा पोटोबा करण्याला कुठ्लं डाएट म्हणतात कुणास ठाऊक? पण मी मात्र मजेत आहे. व्यायामामुळे जरी अजुन खुप वजन कमी झालं नाही तरी भाताच्या जंजाळातुन कायमची सुटका झाल्याचा आनंद काय वर्णावा.
भात नं खाल्ल्यास मला वाईट वगैरे वाटेल असं वाटुन माझ्या डाएटीशिअन नी एक वेळा भात खायची परवानगी दिलीए..तिला मात्र मी ठासुन सांगितलं की कृपा करुन मला भात खायला सांगु नकोस..हे ऐकुन तिच्या चेहर्यावरचे आश्चर्याचे भाव मला जणुकाही एकदम "तुम्ही कसं काय भात नं खाता राहु शकता?" हा प्रश्न विचारुन गेले.
खरं सांगायचं झालं तर मी लहानपणापासुनच लठठ आहे. ओबेसिटी, बि.एम. आय वगैरे मोजमाप उपलब्ध नसण्याचा तो सुखद काळ. तेव्हा फ़ार फ़ार तर लोक मी ८ वीत असतांना "दहावीत आहे का हो तुमची मुलगी?" असं विचारायचे आईला. आईही जास्तं माईंड करायची नाही असले कमेंट्स. तिने मला कधीही तु लठ्ठ आहेस असं म्हंटलेलं आठवत नाही...ती फ़क्त "तु हेल्थी आहेस" असं म्हणायची. माझं वजन मात्र नेहमीच थोडं जास्तं असावं तेव्हाही.
लहानपणी आई रसगुल्ले आणुन ठेवायची फ़्रिज मध्ये, दुसरे दिवशी सकाळी शाळेत जातांना एक रसगुल्ला द्यायची..पुढे मागे एखादं सुकलेलं अंजीर, कधी बर्फ़ी, कधी आदल्या दिवशीचा पेढ्याचा प्रसाद, चतुर्थीच्या दुसर्या दिवशी राहिलेले मोदक असा माझा नाश्ता व्हायचा. डब्ब्यात मात्र भाजी पोळी. घरी आल्यावर "आई काहितरी कर नं" असं म्हंटल्यावर पुढे येणारे डीप फ़्राईड तांदळाचे पापड, कांदा भजी, पोहे, शिरा आणि काही नाही केलं तर बाहेरचे ढोकळे किंवा समोसे मिरची के साथ...असा मस्तं पैकी snacks चा कार्यक्रम व्हायचा, आणि मग रात्री गरम गरम पोळ्या भाजी, फ़ोडणीचं चिंच गुळ टाकुन केलेलं वरण आणि भात वरुन तुप..(गेले ते दिन गेले :( ) आता नुसतं गोड पाहिलं तरीही वजन वाढेल असं मला वाटायला लागलं आहे.
आता सकाळच्या रसगुल्ल्याचं स्थान ग्लासभर कोमट पाण्याने घेतलंय, चहा मात्र आपलं स्थान कायम टिकवुन आहे..पारले जी च्या बिस्कीटांना ढकलुन मारी किंवा मोनॅको बिस्कीटे स्थानारुढ झालेत.
ओट्स सारखा भयाण पदार्थ त्रिभुवनात नाही याबाबतीत तरी कुणाचेच दुमत नसावे. आता तो दुधात साखर नं घालता घ्यायचा असल्यास आजारी पडायचीच वेळ येईल असं वाटत होतं मला, लगेचच ताक माझ्या मदतीला धावून आल्याने माझी वर वर्णिलेल्या त्या भयंकर प्रसंगातुन सुटका झाली. (ताकासोबत ओट्स जरा बरे वाटतात.)
मला दिलेल्या डाएट मध्ये फ़ळांना भरपुर स्थान दिलंय. अगदी दिवसातुन ४ सर्विंग्स तरी पोटात ढकलायचेच असं सांगितलंय. त्यामुळे आमची स्वारी खुष, फ़क्त फ़ळं धुवुन, चिरुन खाण्यापर्यंत पेशन्स नी साथ दिली म्हणजे कमावली..:)
मी कधी फ़ळं अगदी स्वच्छ धुवुन, काप करुन खाल्ल्याचं आठवत नाही. आजीकडे डाळींब, पेरु, सीताफ़ळं,पपई यांची झाडंच होती. पेरु,पपई तर मी झाडावर चढुन तोडुनच खाल्ले आहेत लहानपणी. डाळींब, सीताफ़ळं ही घरचेच खाल्ले आहेत. मामा नाशिकला असल्याने द्राक्षांच्या मोसमात तो पेटीच पाठवायचा त्यामुळे पेटी संपेपर्यंत ईतर झाडांना माझा कमी त्रास व्हायचा. बोरं, करवंद, ऊस यांची आजीकडे रेलचेल असायची. आताशा प्लास्टीकच्या पिशवीत ऊसाची पेरं बंद पाहुन मला त्या ऊसाबद्दलच वाईट वाटतं, लहानपणी ऊस खायचा एक वेगळा कार्यक्रमच व्हायचा तुळशीच्या लग्नानंतर. ऊस खाऊन खाऊन तोंड सोलेपर्यंत मन भरत नसे. आंबे तर विचारायलाच नको.आबांच्या ओळखीच्या कुणाकडुन तरी खास त्यांच्या बागेतले आंबे यायचे घरी मग काय? आंब्याचा रस, आंब्याच्या पोळ्या, आंबा चोखुन खाणे...मजाच मजा. संत्र्याचा मोसम आला की बाबा डझनानी संत्री आणायचे. तेवढे दिवस आम्ही दुसर्या कुठल्याही फ़ळाला ढुंकुनही पाहत नसु.नागपुरचं चिखलाने भरलेलं संत्रा मार्केट, तिथलं बाबांच ठरलेलं दुकान, आणि तिथला मनमोकळेपणा. आता त्या पळमुदिर शोलई (इथलं फ़ळांचं दुकान) मध्ये जाऊन फ़ळं घेतांना उगाच अवघडल्यासारखं होतं.
फ़ळं आणुन त्याचे नीट काप करुन खाण्याची मजाही काही और असते हे ही तेवढंच खरंय. आम्ही होस्टेल मधे असतांना माझी एक मैत्रीण इतकी सफ़ाईने फ़ळं कापायची की मी तिच्याच मुळे फ़ळं नीट कापुन खायला शिकले..नाही तर "दिसलं फ़ळ की खा" हा माझा फ़ंडा होता. ;)
लग्नाआधी केलेल्या डाएटिंग मधे दही खायला मनाई होती. पण यावेळी नाही. त्यामुळे मी मनसोक्त फ़ेटलेलं दही खाऊ शकते. डाळींबाच्या लाल चुटुक दाण्यांसोबत मस्तं फ़ेटलेलं घट्टं दही खाणे म्हणजे स्वर्ग आहे (हे तुम्हालाही खाल्ल्यावरच कळेल ही आपली गैरेंटी).
दिवसभरातुन फ़क्त २ चमचेच तेल खायचे असल्याने कमीत कमी तेलात भाजी करणे रिसेंट आव्हान त्यातच शिमला मिरची चे काप १/२ चमचा ओलिव तेलात फ़्राय केल्यास भाजीला मस्तं स्वाद येतो ही मी काल केलेली डीस्कवरी ;)
फ़ोडणीच्या वरणातुन गुळ आणि चिंच जाऊन आता साधी दालफ़्राय खावी लागतेय...खाता येते हे ही नसे थोडके. भरपूर कडधान्ये, काकडी, टमाटर या सगळ्या मंडळींनी माझ्या ताटात डॅशिंग एन्ट्री मारली आहे. रोज कोशिंबिर खाऊन तर असं समाधान मिळतं म्हणुन सांगु? यासगळ्या सोबत जिममधे घाम गाळण्याचा आनंदच काही निराळा.
मुळात आठवडा भरापासुन मला हलकं वाटतंय. माझा स्टॅमिना जरा वाढलाय असं मला नवरा म्हणाला. मी घरातली कामं आणि ऑफ़िसातली कामं जास्तं उत्साहाने करु शकते.नाहितर घर सांभाळुन सगळं करणं माझ्या अवाक्याबाहेरचं काम होतं.
सगळ्या गृहिणींनी या चातुर्मासाच्या निमित्ताने आपापलं आरोग्य सुधारण्याचा संकल्प करावा असं मला या एका आठवड्यात प्रकर्षाने जाणवलं. चातुर्मास म्हणजे उपासांची भरमार, एक संपला की दुसरा, प्रत्येक आठवडा उत्सवाच्या दृष्टीने एकदम हॅपनिंग, लागोपाठ सणं त्यासाठी करावे लागणारे नैवेद्य, नैवेद्य तयार होईस्तोवर केलेला उपास..हे सगळं कितीतरी स्ट्रेसफ़ुल असतं. नुसती फ़ळं खाऊन किंवा दुध पिऊन दिवसभरात होणार्या श्रमांचा परिहार होणे शक्यच नसतं. मग तब्येतीच्या लहानसहान कुरबुरी सुरु होतात. प्रत्येक घरातील स्वयंपाकघराची काळजी त्या त्या घरातली आईच करु जाणे. ती जशी सगळ्यांची काळजी घेते तशीच घरातल्या प्रत्येकाने तिची काळजी घेऊन दिवसातुन तिला १ तास तिच्या तब्येतीसाठी काढायला लावणे हे अतिशय आवश्यक आहे. उपदेश जरा जास्तंच झाला नाही??? ;)
सध्यातरी माझं वजन फ़ारसं कमी झालेलं नाही. जेव्हा कमी होईल तेव्हा भेटुया.. बिफ़ोर आणि आफ़्टर च्या फ़ोटो सकट..एका नविन पोस्ट मध्ये..तोवर विश मी हॅपी जिमिंग..:)
आज शुक्रवार, जिम ला रुजु होऊन हाश्श हुश्श!! करत आठ दिवस पूर्ण झाले. डाएट अगदी जोमात सुरु आहे. दिवसातुन ७ वेळा पोटोबा करण्याला कुठ्लं डाएट म्हणतात कुणास ठाऊक? पण मी मात्र मजेत आहे. व्यायामामुळे जरी अजुन खुप वजन कमी झालं नाही तरी भाताच्या जंजाळातुन कायमची सुटका झाल्याचा आनंद काय वर्णावा?

भात नं खाल्ल्यास मला वाईट वगैरे वाटेल असं वाटुन माझ्या डाएटीशिअन नी एक वेळा भात खायची परवानगी दिलीए.तिला मात्र मी ठासुन सांगितलं की कृपा करुन मला भात खायला सांगु नकोस.हे ऐकुन तिच्या चेहर्‍यावरचे आश्चर्याचे भाव मला जणुकाही एकदम "तुम्ही कसं काय भात नं खाता राहु शकता?" हा प्रश्न विचारुन गेले.

खरं सांगायचं झालं तर मी लहानपणापासुनच लठ्ठ आहे. ओबेसिटी, बि.एम. आय वगैरे मोजमाप उपलब्ध नसण्याचा तो सुखद काळ. तेव्हा फ़ार फ़ार तर लोक मी ८ वीत असतांना "दहावीत आहे का हो तुमची मुलगी?" असं विचारायचे आईला. आईही जास्तं माईंड करायची नाही असले कमेंट्स. तिने मला कधीही तु लठ्ठ आहेस असं म्हंटलेलं आठवत नाही...ती फ़क्त "तु healthy आहेस" असं म्हणायची. माझं वजन मात्र नेहमीच थोडं जास्तं असावं तेव्हाही.

लहानपणी आई रसगुल्ले आणुन ठेवायची फ़्रिज मध्ये, दुसरे दिवशी सकाळी शाळेत जातांना एक रसगुल्ला द्यायची.पुढे मागे एखादं सुकलेलं अंजीर, कधी बर्फ़ी, कधी आदल्या दिवशीचा पेढ्याचा प्रसाद, चतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी राहिलेले मोदक असा माझा नाश्ता व्हायचा. डब्ब्यात मात्र भाजी पोळी. घरी आल्यावर "आई काहितरी कर नं" असं म्हंटल्यावर पुढे येणारे डीप फ़्राईड तांदळाचे पापड, कांदा भजी, पोहे, शिरा आणि काही नाही केलं तर बाहेरचे ढोकळे किंवा समोसे मिरची के साथ.असा मस्तं पैकी snacks चा कार्यक्रम व्हायचा, आणि मग रात्री गरम गरम पोळ्या भाजी, फ़ोडणीचं चिंच गुळ टाकुन केलेलं वरण आणि भात वरुन तुप..(गेले ते दिन गेले :( ) आता नुसतं गोड पाहिलं तरीही वजन वाढेल असं मला वाटायला लागलं आहे.

आता सकाळच्या रसगुल्ल्याचं स्थान ग्लासभर कोमट पाण्याने घेतलंय, चहा मात्र आपलं स्थान कायम टिकवुन आहे..पारले जी च्या बिस्कीटांना ढकलुन मारी किंवा मोनॅको बिस्कीटे स्थानारुढ झालेत. ओट्स सारखा भयाण पदार्थ त्रिभुवनात नाही याबाबतीत तरी कुणाचेच दुमत नसावे. आता तो दुधात साखर नं घालता घ्यायचा असल्यास आजारी पडायचीच वेळ येईल असं वाटत होतं मला, लगेचच ताक माझ्या मदतीला धावून आल्याने माझी वर वर्णिलेल्या त्या भयंकर प्रसंगातुन सुटका झाली. (ताकासोबत ओट्स जरा बरे वाटतात.)

मला दिलेल्या डाएट मध्ये फ़ळांना भरपुर स्थान दिलंय. अगदी दिवसातुन ४ सर्विंग्स तरी पोटात ढकलायचेच असं सांगितलंय. त्यामुळे आमची स्वारी खुष, फ़क्त फ़ळं धुवुन, चिरुन खाण्यापर्यंत पेशन्स नी साथ दिली म्हणजे कमावली..:)

मी कधी फ़ळं अगदी स्वच्छ धुवुन, काप करुन खाल्ल्याचं आठवत नाही. आजीकडे डाळींब, पेरु, सीताफ़ळं,पपई यांची झाडंच होती. पेरु,पपई तर मी झाडावर चढुन तोडुनच खाल्ले आहेत लहानपणी. डाळींब, सीताफ़ळं ही घरचेच खाल्ले आहेत. मामा नाशिकला असल्याने द्राक्षांच्या मोसमात तो पेटीच पाठवायचा त्यामुळे पेटी संपेपर्यंत ईतर झाडांना माझा कमी त्रास व्हायचा. बोरं, करवंद, ऊस यांची आजीकडे रेलचेल असायची.

आताशा प्लास्टीकच्या पिशवीत ऊसाची पेरं बंद पाहुन मला त्या ऊसाबद्दलच वाईट वाटतं, लहानपणी ऊस खायचा एक वेगळा कार्यक्रमच व्हायचा तुळशीच्या लग्नानंतर. ऊस खाऊन खाऊन तोंड सोलेपर्यंत मन भरत नसे. आंबे तर विचारायलाच नको.आबांच्या ओळखीच्या कुणाकडुन तरी खास त्यांच्या बागेतले आंबे यायचे घरी मग काय? आंब्याचा रस, आंब्याच्या पोळ्या, आंबा चोखुन खाणे.मजाच मजा. संत्र्याचा मोसम आला की बाबा डझनानी संत्री आणायचे. तेवढे दिवस आम्ही दुसर्‍या कुठल्याही फ़ळाला ढुंकुनही पाहत नसु.नागपुरचं चिखलाने भरलेलं संत्रा मार्केट, तिथलं बाबांच ठरलेलं दुकान, आणि तिथला मनमोकळेपणा. आता त्या पळमुदिर शोलई (इथलं फ़ळांचं दुकान) मध्ये जाऊन फ़ळं घेतांना उगाच अवघडल्यासारखं होतं.

फ़ळं आणुन त्याचे नीट काप करुन खाण्याची मजाही काही और असते हे ही तेवढंच खरंय. आम्ही होस्टेल मधे असतांना माझी एक मैत्रीण इतकी सफ़ाईने फ़ळं कापायची की मी तिच्याच मुळे फ़ळं नीट कापुन खायला शिकले.नाही तर "दिसलं फ़ळ की खा" हा माझा फ़ंडा होता. ;)

लग्नाआधी केलेल्या डाएटिंग मधे दही खायला मनाई होती. पण यावेळी नाही. त्यामुळे मी मनसोक्त फ़ेटलेलं दही खाऊ शकते. डाळींबाच्या लाल चुटुक दाण्यांसोबत मस्तं फ़ेटलेलं घट्टं दही खाणे म्हणजे स्वर्ग आहे (हे तुम्हालाही खाल्ल्यावरच कळेल ही आपली गैरेंटी).

दिवसभरातुन फ़क्त २ चमचेच तेल खायचे असल्याने कमीत कमी तेलात भाजी करणे रिसेंट आव्हान त्यातच शिमला मिरची चे काप १/२ चमचा ओलिव तेलात फ़्राय केल्यास भाजीला मस्तं स्वाद येतो ही मी काल केलेली डीस्कवरी ;)

फ़ोडणीच्या वरणातुन गुळ आणि चिंच जाऊन आता साधी दालफ़्राय खावी लागतेय.खाता येते हे ही नसे थोडके. भरपूर कडधान्ये, काकडी, टमाटर या सगळ्या मंडळींनी माझ्या ताटात डॅशिंग एन्ट्री मारली आहे. रोज कोशिंबिर खाऊन तर असं समाधान मिळतं म्हणुन सांगु? यासगळ्या सोबत जिममधे घाम गाळण्याचा आनंदच काही निराळा.

मुळात आठवडा भरापासुन मला हलकं वाटतंय. माझा स्टॅमिना जरा वाढलाय असं मला नवरा म्हणाला. मी घरातली कामं आणि ऑफ़िसातली कामं जास्तं उत्साहाने करु शकते.नाहितर घर सांभाळुन सगळं करणं माझ्या अवाक्याबाहेरचं काम होतं.

सगळ्या गृहिणींनी या चातुर्मासाच्या निमित्ताने आपापलं आरोग्य सुधारण्याचा संकल्प करावा असं मला या एका आठवड्यात प्रकर्षाने जाणवलं. चातुर्मास म्हणजे उपासांची भरमार, एक संपला की दुसरा, प्रत्येक आठवडा उत्सवाच्या दृष्टीने एकदम हॅपनिंग, लागोपाठ सणं त्यासाठी करावे लागणारे नैवेद्य, नैवेद्य तयार होईस्तोवर केलेला उपास..हे सगळं कितीतरी स्ट्रेसफ़ुल असतं?

नुसती फ़ळं खाऊन किंवा दुध पिऊन दिवसभरात होणार्या श्रमांचा परिहार होणे शक्यच नसतं. मग तब्येतीच्या लहानसहान कुरबुरी सुरु होतात. प्रत्येक घरातील स्वयंपाकघराची काळजी त्या त्या घरातली आईच करु जाणे. ती जशी सगळ्यांची काळजी घेते तशीच घरातल्या प्रत्येकाने तिची काळजी घेऊन दिवसातुन तिला १ तास तिच्या तब्येतीसाठी काढायला लावणे हे अतिशय आवश्यक आहे. उपदेश जरा जास्तंच झाला नाही??? ;)

सध्यातरी माझं वजन फ़ारसं कमी झालेलं नाही. जेव्हा कमी होईल तेव्हा भेटुया.. बिफ़ोर आणि आफ़्टर च्या फ़ोटो सकट..एका नविन पोस्ट मध्ये..तोवर विश मी हॅपी जिमिंग. :)

Comments

  1. जिम करुन एक आठवडा झाला तरी खुप दिवस जिम केल्यासारखं वाटत ना ? :-) आतापर्यंत जिम रेग्युलर करण्याचा संकल्प मला नेहमी पहिल्या आठवड्यामध्येच गुंडाळावा लागला आहे. तुला मात्र शुभेच्छा ! विश यु अ हॅपी अँड रेग्युलर जिमींग.

    -अजय

    ReplyDelete
  2. धन्यवाद अजय!!
    मजा येतेय खरंतर मला! So far so good!

    ReplyDelete
  3. hehe mepan mazya gymcha kissa blogwar takla hota.. kharay roj gymmadhe gham galala ki mast watt agadi. aani ata tar mala etaki wasay zaliye na gymmingchi ki ek diwas nahi gel ki ang dukhayala lagta...
    keep it up dear.. u'll sure enjoy it a lot.. :)

    ReplyDelete
  4. aga 'wasay' nahi bar ka 'saway' mhanayacha hot mala magchya comment madhe :)

    ReplyDelete
  5. काय प्रकार आहे हा जिम? आम्ही नाही ब्वॉ कधी फिरकलो तिकडे :-)

    - एकदम भल्या सकाली ४५ मिनीट जॉगींग
    - घरी आल्यावर घरातल्या सायकलवर ३० मिनीट किंवा ३५० कॅल. व्यायाम
    - ऑफीसला शक्यतो सायकल. इतर जवळपासच्या कामासाठीही प्राणप्रिय सायकल
    - नो लिफ्ट
    - नो डाएट खाण्या-पिण्यात

    मस्त वर्क झालं.. वजन घटवण्याच्या आपल्या उपक्रमास मनापासुन शुभेच्छा

    ReplyDelete
  6. माझा नेमका उल्टा प्रॉब्लेम आहे. कितीही आणि काहीही खाल्ल तरी मझ वजन जैसे थे राहत. गेली जवळपास 5-6 वर्षे 65 च्या आस पास आहे. उंचीच्या मानाने ते जवळपास्स 7 किलो ने कमी आहे. तुम्हाला तुमच्या जिम बद्दल शुभेच्छा :) अगोदर आणि नंतर च्या फोटोंची वाट पाहत आहे :)

    ReplyDelete
  7. धन्यवाद अपर्णा.
    जिमचा १.५ तास फ़क्त माझा असतो. आधी मला स्वतःसाठी वेळ काढ्णं शक्यच होत नव्हतं म्हणुन आता खुप बरं वाटतं.
    तुझाही अनुभव बहुदा सारखाच असावा..
    :)

    ReplyDelete
  8. तुझे बिफ़ोर आणि आफ़्टर चे फोटो पाहिले आहेतच. तुझा उपक्रम स्तुत्य आहेच त्यात काही वाद नाही. शेवटी काय "येन केन प्रकारेण" वजन कमी व्हायला हवं तेही व्यवस्थित आहार घेऊन...
    आत्ता कुठे नांदी झालीए या सगळ्या प्रकाराची...बघुया पुढे काय होतंय ते..
    धन्यवाद!

    ReplyDelete
  9. "कुंभ राशीच्या माणसांनी हवा जरी खाल्ली तरी ते जाडच राहणार" इति पु.लं इन बटाट्याची चाळ...
    माझीही कुंभ रास असल्याने मी आयुष्यभर लठ्ठ्च राहणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तरिही आजकाल च्या तांत्रिक सुविधा आणि आहारशात्राला लक्षात घेता वजन नीट कमी किंवा जास्तं करता येतं..म्हणुन हा प्रयास...
    तुमचं अभिनंदन वजन कमी असल्याबद्दल. :) थोडं कमी असेल तर चालतं हो..पण जास्तं नको.
    ला भेट देऊन आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल आभार. अशीच भॆट देत रहा.

    ReplyDelete
  10. देजावू प्रवीण, माझाही तोच प्रॉब्लेम आहे.. :)
    तुम्हाला शुभेच्छा ..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक