मागच्या आठवड्यात द ग्रेट गॅटस्बी नॉवेल वाचायला घेतलं. खूप उत्सुकता होती मला. पुस्तकाची सुरुवात खूप साधी पण आत ओढून घेणारी वाटली. पुस्तक सुरु करण्या आधीची प्रस्तावना तर भन्नाट. स्कॉट फित्झगेराल्ड हा लेखक आहे द ग्रेट गॅटस्बी या पुस्तकाचा. १०० वर्षांपूर्वी लिहिलेलं पुस्तक, एक खिळवून ठेवणारं कथानक. जे गॅटस्बी, या अतिशय गूढ अभिव्यक्ती असलेल्या माणसाभोवती रेखाटलेलं. निक कारावे, हा या पुस्तकाचा नरेटर, वॉल स्ट्रीट च्या एका कंपनीत काम करत असतो. तो इस्ट एग या शहरात राहायला आल्यावर त्याच्याबाजूलाच असणाऱ्या मोठ्या, अवाढव्य बंगल्याशी त्याची ओळख होते. आणि हळूहळू त्या बंगल्या च्या मालकाशी म्हणजे जे गॅटस्बी, या व्यक्तीशी झालेली अगदी साधी ओळख त्याचं आयुष्य कसं बदलून टाकते याचे निक नीच घेतलेला मागोवा म्हणजे हे पुस्तक. स्कॉट फित्झगेराल्ड यांची भाषा ओघवती आहे. १०० वर्षानंतरही त्यांनी वर्णन केलेल्या अमेरिकेशी आपण समरस होऊ शकतो, इतके की आपणच इस्ट एग मध्ये आहोत असे वाटते. जे गॅटस्बी, आणि त्याची व्यक्तीरेखा स्कॉट नी अतिशय छान उभी केली आहे. त्याची राहणी, त्याचा भूतकाळ, त्याची डेझी (म्हणजे निक करावे...
गप्पागोष्टी, खाद्यभ्रमंती आणि सगळ्या मनाला भिडलेल्या गोष्टींची बखर!