मागच्या आठवड्यात द ग्रेट गॅटस्बी नॉवेल वाचायला घेतलं. खूप उत्सुकता होती मला. पुस्तकाची सुरुवात खूप साधी पण आत ओढून घेणारी वाटली. पुस्तक सुरु करण्या आधीची प्रस्तावना तर भन्नाट. स्कॉट फित्झगेराल्ड हा लेखक आहे द ग्रेट गॅटस्बी या पुस्तकाचा. १०० वर्षांपूर्वी लिहिलेलं पुस्तक, एक खिळवून ठेवणारं कथानक. जे गॅटस्बी, या अतिशय गूढ अभिव्यक्ती असलेल्या माणसाभोवती रेखाटलेलं. निक कारावे, हा या पुस्तकाचा नरेटर, वॉल स्ट्रीट च्या एका कंपनीत काम करत असतो. तो इस्ट एग या शहरात राहायला आल्यावर त्याच्याबाजूलाच असणाऱ्या मोठ्या, अवाढव्य बंगल्याशी त्याची ओळख होते. आणि हळूहळू त्या बंगल्या च्या मालकाशी म्हणजे जे गॅटस्बी, या व्यक्तीशी झालेली अगदी साधी ओळख त्याचं आयुष्य कसं बदलून टाकते याचे निक नीच घेतलेला मागोवा म्हणजे हे पुस्तक.
स्कॉट फित्झगेराल्ड यांची भाषा ओघवती आहे. १०० वर्षानंतरही त्यांनी वर्णन केलेल्या अमेरिकेशी आपण समरस होऊ शकतो, इतके की आपणच इस्ट एग मध्ये आहोत असे वाटते. जे गॅटस्बी, आणि त्याची व्यक्तीरेखा स्कॉट नी अतिशय छान उभी केली आहे. त्याची राहणी, त्याचा भूतकाळ, त्याची डेझी (म्हणजे निक करावे ची चुलत बहीण) हे सगळे पुस्तक वाचून ३ दिवस झाले तरीही डोळ्यासमोर तसे च्या तसे उभे राहतात.
जे गॅटस्बी उमदा ऑक्सफर्ड मध्ये शिकलेला माणूस, सध्या एक खूप मोठा व्यापारी, सगळे शनिवार रविवार खूप मोठया पार्टीस देणारा पण स्वतः अतिशय कोरडा राहणार.. निक एक असा एकमेव व्यक्ती असतो ज्याला गॅटस्बी ने पार्टी चं खास निमंत्रण दिलं असतं. भव्य पार्टी मध्ये निक आणि जॉर्डन पोचतात आणि त्यांना कळतं कि जे ह्या सगळ्या पार्टीस डेसी, निक ची चुलत बहीण यावी म्हणून देत असतो. जे आणि डेसी याचं प्रेम.. जे वेळेवर पोहचू नं शकल्याने डेसी नी स्वतः च टॉम बुखानान शी केलेलं लग्नं आणि नंतर ५ वर्षांनी जे गॅटस्बी नी त्याच शहरात, एक भव्य दिव्य बंगल्यात राहणं..डेसी ची रोज वाट बघणं, तिच्या डॉक वर असलेल्या निळ्या दिव्याला सतत पाहत राहणं सगळं अगदी एपिक.
जे ची निक ला किंवा कोणालाही बोलावंतांना "ओल्ड स्पोर्ट" म्हणण्याची लकब तर अतिशय दिलखेचक आहे.
गॅटस्बी ची पार्श्वभूमी खूप दरिद्री आणि वाईट्ट दाखवली आहे, पण जे ला नेहेमीच एक मोठा माणूस व्हायचं असतं, त्याला नियती साथ देतेही. पण डेसी काही त्याला मिळत नाही, डेसी मिळावी म्हणून केलेला खटाटोप पुस्तकात मांडला आहे.
आजकालच्या पुस्तकांसारखा कोठेही चिप वल्गर असा भाग अख्ख्या पुस्तकात नाही. सगळं अगदी तरलतेने मांडण्यात स्कॉट फित्झगेराल्ड नी अगदी बाजी मारली. १५० पानांच्या पुस्तकात एखाद्या व्यक्ती बद्दल वाचकाला इतकं काही सांगून जाणे म्हणजे एकदम किमया आहे. जादू केल्यासारखे आपण पानावरुन पान वाचत जातो आणि पुस्तकाचा शेवट कसा होतो हे कळतही नाही.
चित्रपट पाहण्यासारखा आहे, पण पहिले पुस्तक वाचन केले तर बरे. मला लिओनार्डो गॅटस्बी च्या भूमिकेत प्रचंड आवडला. तसा तो जॉर्डन बेलफोर्ड च्या भूमिकेतही आवडलाच आणि टायटॅनिक च्या जॅक मधेही. ही भूमिका अगदी लक्षात राहण्यासारखी. बाकी सगळी कास्ट त्या त्या ठिकाणी छानच आहे. इतक्या सुंदर पुस्तकाला एकदम न्याय दिल्यासारखा आहे हा चित्रपट.
काही काही वाक्य मी कदाचित आयुष्यात विसरणार नाही.
“So we beat on, boats against the current, borne back ceaselessly into the past.” ...
“Let us learn to show our friendship for a man when he is alive and not after he is dead.”
This was so profound.
“There are only the pursued, the pursuing, the busy and the tired.”
“Reserving judgements is a matter of infinite hope.”
“Life starts all over again when it gets crisp in the fall.”
“I am one of the few honest people that I have ever known.”
“Life is much more successfully looked at from a single window.”
बस बाकी वाचनीय आहेत.
Comments
Post a Comment