आताशा पुन्हा मला "झोप" फारच आवडायला लागली आहे. आताशा "पुन्हा" म्हणण्याचे कारण हे की मला समज आल्यापासूनच मला झोप प्रचंड आवडते पण मध्ये जरा गडबड झाली होती. गेली चार वर्षे मी हवी तितकी झोपली नाही असं मला मनापासून वाटतं(तसं माझ्याव्यतिरिक्त माझ्या घरात कुणालाही वाटत नाही याची मला खात्री आहे ) ;)
तीझोपेचा आई बाबांना आणि मलाही शोध लागला. त्यांच्यामते (माझ्यामते नाही) मी खूप झोपायचे. ८ ते ९ तास साधारण मनुष्याने झोपावे असं विज्ञान सांगतं हे आई बाबांना कोण सांगणार? त्यांच्यामते मला अभ्यासाचं, परीक्षेचं टेन्शनच नाही असं सिद्धं झालं होतं. आणि मला रोज मला हे काय होतंय? असं वाटायला लागलं. खरं पाहिलं तर असं कुठे लिहिलंय की दहावीच्या विद्यार्थ्यांनी कमी झोपावं?? पण हे बाबा रोज मला इतके रागावायचे की मी उठल्याक्षणी आपण आठ तासापेक्षा किती जास्त झोपलो हे मोजायची. :p
, तिला कुठलं तरी टेन्शन आहे म्हणून ती जास्त झोपते" असं Doctor म्हणाले, त्यामुळे मला कुणीही फार झोपते असं म्हटलं की मी सरळ माझ्यावर असलेल्या अतीव ढोंगी टेन्शन ची आठवण करून देत असे. बाबांनी मात्र लगेच त्या Doctor ला मूर्खात काढलं.
बस्स!! पहाटे पहाटे बाबा मला उठवायचे. पण यार ४ वाजता उठणं म्हणजे माझ्या आकलना पालीकडलं होतं. एवढ्या लवकर उठून करायचं काय हा मला प्रश्न पडायचा. मग काय घेऊन बसायची पुस्तक..डुलक्या मारत मारत अभ्यास व्हायचा, त्यांतूनही माझ्यावर बाबांचा डॊळा असायचा, डुलकी लागली की "मुग्धाssss" अश्या बाबांच्या हाकेने मी खडबडून जागी व्हायची.माझ्या डुलकी लागण्याची आणि बाबांनी मला हाक मारायची एकच गाठ कशी पडायची हे मला नं उमगलेलं कोडं आहे.
नाही म्हणायला चांगले ८०% मार्क पडले मला १० वीला. सकाळी नं उठल्यामुळे तुला कमी मार्क्स मिळाले हे बाबांना कायमचं कोलीत हातात मिळालं. आणि ते माझ्या बारावीच्या अभ्यासामागे लागले. बारावीतही "पहाटे उठत जा" ह्याची अविरत पारायणे झाली. मी सकाळी उठलीच पाहिजे म्हणून त्यांनी मला ६.०० वाजताचा रसायनशास्त्राचा क्लास लावून दिला. मास्तरही जरा कडकच होते. पण माझी झोप त्यांहूनही कडक होती.प्राण गेला तरी बेहत्तर पण झोपेची कास मी सोडणार नाही असं वचन दिलं होतं मी स्वतःला ;) त्यानुसार रसायनशास्त्राच्या क्लासात मास्तर ला नं समजू देता झोप कशी मारायची ह्यात मी मास्टरी मिळवली होती. अगदीच प्रामाणिक होण्याची इच्छा झालीच तर पहिल्या रांगेत बसून नं झोपता नोटस घेणे असेही उद्योग केले..पण असले उद्योग लिमिटेड कारण तेच आपलं झोपेची कास सोडणार नाही वालं वचन.. ;)
यनशास्त्राने दगा दिलाच आणि आपल्या अपमानाचा वचपा काढत मला सगळ्यात कमी मार्क बहाल केले. organic chemistry खूप वोलाटाईल असतं म्हणे. म्हणूनच कदाचित असं झालं असावं अशी मीच माझी समजूत काढली रिझल्ट नंतर. हे जे काही झालं त्यात सतत डोळ्यावर विराजमान असलेल्या झोपेचा तीळमात्रही संबंध नाही असं मी बाबा सोडून सगळ्यांना पटवून दिलं होतं. एखाद दुसऱ्या वेळला ४ वाजता उठून प्रामाणिकपणे डुलक्या नं घेता अभ्यास केल्यामुळे बाबाही जरा खूशच होते नाही म्हणायला. त्यामुळे "सकाळी उठली होती यावेळला मी..पण तरीही चांगले मार्क नाही मिळाले बघितलं नं???" असं बाबांना म्हणून मी मोकळी झाले.
सकाळी उठण्याचा आणि चांगले मार्क मिळण्याचा तीळमात्र ही संबंध नाही हे मला दहावीतच कळून चुकलं होतं. ;)
असल्या क्षुल्लक कारणापायी उगाच कशाला झोपेचं खोबरं करा?? असं वाटून मी उन्हाळ्याच्या सुट्टीत बारावीच्या काळात दुर्लक्षिलेल्या झोपेची भरपाई करण्यास सरसावले.
]भियांत्रिकीची चार वर्षे हॉस्टेल मध्ये गेली. सकाळी ९.०० वाजता क्लासमध्ये हजर असायला लागायचं..मग काय ८.४० पर्यंत झोप. १० मिनिटात अंघोळ आणि ९.०० ला क्लासमध्ये हजर :) असं साधं सोपं समीकरण होतं. त्याला आता कुणाचीही आडकाठी नव्हती. त्यामुळे तो काळ अगदी सुखाचा गेला. रविवारी १० मिनिटे जास्त झोपायला मिळायचं. कारण ९.०० ला मेसमध्ये न्याहारी मिळणं बंद होत असे. सकाळी ८.५० ला उठणे, ब्रश करून मेस मध्ये जाणे, न्याहारीनंतर पुन्हा झोप काढणे नाहीतर अंघोळ करून पुन्हा फ्रेश झोपणे असा नियम असायचा. चार वर्षात मी चुकूनही पहाटे उठली नाही. जो काही अभ्यास केला तो सकाळी ६.०० पासून रात्री ११.०० च्या कालावधीत कारण रात्री ११.०० नंतर माझ्या मेंदूची कवाडे बंद होतात. त्यानंतर कुठलं ही ज्ञानार्जन मला वर्ज्य आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.
पुढल्या शिक्षणासाठी असतानाही थोड्याफार बदलाने हाच टाईमटेबल होता. पण एकूण त्या विद्यार्जनाच्या काळात मी झोपेला माझ्या नेत्राआड कधीच होऊ दिले नाही. अगदी प्रेमात धप्पकन पडल्यावर सुद्धा "मुझे नींद नं आये" असं माझं कधीही झालं नाही. उलट पुण्यासारख्या थंड हवामानाच्या जागी मी झोपेला अगदी योग्य न्याय दिला असेच आजवर मला वाटत आले आहे. माझ्याठायी एकमेकांचे शत्रु असलेले झोप आणि प्रेम हे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होते.
पुढे टेन्शन आणि झोप यांचं इन्वर्सली प्रोपोर्शनल ( Doctor च्या म्हणण्यानुसार) तंत्र थोडं डायरेक्टली प्रोपोरशनल व्हायला लागलं. हळुहळु मला झोप येईनाशी झाली. कदाचित झोपेला मी एव्हाना गृहित धरले होते. थोडेदिवसासाठी...
मुंबईत नोकरी लागल्यावर झोपेचं खोबरं झालं. शिफ़्ट्स मुळे झोप व्हायची नाही. आणि मी मग १२ तास-१६ तास अशी लागोपाठ झोपायची.
एवढं सगळं रामायण मला आठवण्याचं कारण म्हणजे कार्यालयात थोड्यावेळाकरीता पावर कट झाला होता...डिजी चा ही काही प्रोब्लेम होता. म्हणून दिली ताणुन...काय मस्तं झोप लागली म्हणून सांगु? खूप दिवसांनंतर झोपुन उठल्यावर अतीव समाधान मिळालं..आताशा भर क्लासमध्ये स्वप्न पडेस्तोवर झोपायचा चांस मिळेनासा झालाय. मोठेपणा वगैरे म्हणतात तो हाच असावा कदाचित ;) हे शल्य मनाला बोचत असतांनाच मिळालेल्या सुवर्णसंधीचं सोनं करायला मिळालं आज.....
चला आता थोडी कॉफी ढोसुन येऊ....
हे सगळं वाचुन तुम्हाला जर झोप आली तर माझ्या झोपसाधनेचं चीज झालं असंच मी समजेन. ;)
आताशा पुन्हा मला "झोप" फारच आवडायला लागली आहे. आताशा "पुन्हा" म्हणण्याचे कारण हे की मला समज आल्यापासूनच मला झोप प्रचंड आवडते पण मध्ये जरा गडबड झाली होती. गेली चार वर्षे मी हवी तितकी झोपली नाही असं मला मनापासून वाटतं(तसं माझ्याव्यतिरिक्त माझ्या घरात कुणालाही वाटत नाही याची मला खात्री आहे ) ;)दहावीत माझ्या अतीझोपेचा आई बाबांना आणि मलाही शोध लागला. त्यांच्यामते (माझ्यामते नाही) मी खूप झोपायचे. ८ ते ९ तास साधारण मनुष्याने झोपावे असं विज्ञान सांगतं हे आई बाबांना कोण सांगणार? त्यांच्यामते मला अभ्यासाचं, परीक्षेचं टेन्शनच नाही असं सिद्धं झालं होतं. आणि मला रोज मला हे काय होतंय? असं वाटायला लागलं. खरं पाहिलं तर असं कुठे लिहिलंय की दहावीच्या विद्यार्थ्यांनी कमी झोपावं?? पण हे बाबा रोज मला इतके रागावायचे की मी उठल्याक्षणी आपण आठ तासापेक्षा किती जास्त झोपलो हे मोजायची. :p
माझ्या अतीझोपेमुळे बाबा मला एकदा Doctor कडॆ घेऊन गेले असता"अहो, तिला कुठलं तरी टेन्शन आहे म्हणून ती जास्त झोपते" असं Doctor म्हणाले, त्यामुळे मला कुणीही फार झोपते असं म्हटलं की मी सरळ माझ्यावर असलेल्या अतीव ढोंगी टेन्शन ची आठवण करून देत असे. बाबांनी मात्र लगेच त्या Doctor ला मूर्खात काढलं.
बस्स!! पहाटे पहाटे बाबा मला उठवायचे. पण यार ४ वाजता उठणं म्हणजे माझ्या आकलना पालीकडलं होतं. एवढ्या लवकर उठून करायचं काय हा मला प्रश्न पडायचा. मग काय घेऊन बसायची पुस्तक..डुलक्या मारत मारत अभ्यास व्हायचा, त्यांतूनही माझ्यावर बाबांचा डॊळा असायचा, डुलकी लागली की "मुग्धाssss" अश्या बाबांच्या हाकेने मी खडबडून जागी व्हायची.माझ्या डुलकी लागण्याची आणि बाबांनी मला हाक मारायची एकच गाठ कशी पडायची हे मला नं उमगलेलं कोडं आहे.
नाही म्हणायला चांगले ८०% मार्क पडले मला १० वीला. सकाळी नं उठल्यामुळे तुला कमी मार्क्स मिळाले हे बाबांना कायमचं कोलीत हातात मिळालं. आणि ते माझ्या बारावीच्या अभ्यासामागे लागले. बारावीतही "पहाटे उठत जा" ह्याची अविरत पारायणे झाली. मी सकाळी उठलीच पाहिजे म्हणून त्यांनी मला ६.०० वाजताचा रसायनशास्त्राचा क्लास लावून दिला. मास्तरही जरा कडकच होते. पण माझी झोप त्यांहूनही कडक होती.प्राण गेला तरी बेहत्तर पण झोपेची कास मी सोडणार नाही असं वचन दिलं होतं मी स्वतःला ;) त्यानुसार रसायनशास्त्राच्या क्लासात मास्तर ला नं समजू देता झोप कशी मारायची ह्यात मी मास्टरी मिळवली होती. अगदीच प्रामाणिक होण्याची इच्छा झालीच तर पहिल्या रांगेत बसून नं झोपता नोटस घेणे असेही उद्योग केले..पण असले उद्योग लिमिटेड कारण तेच आपलं झोपेची कास सोडणार नाही वालं वचन.. ;)
रसायनशास्त्राने दगा दिलाच आणि आपल्या अपमानाचा वचपा काढत मला सगळ्यात कमी मार्क बहाल केले. organic chemistry खूप वोलाटाईल असतं म्हणे. म्हणूनच कदाचित असं झालं असावं अशी मीच माझी समजूत काढली रिझल्ट नंतर. हे जे काही झालं त्यात सतत डोळ्यावर विराजमान असलेल्या झोपेचा तीळमात्रही संबंध नाही असं मी बाबा सोडून सगळ्यांना पटवून दिलं होतं. एखाद दुसऱ्या वेळला ४ वाजता उठून प्रामाणिकपणे डुलक्या नं घेता अभ्यास केल्यामुळे बाबाही जरा खूशच होते नाही म्हणायला. त्यामुळे "सकाळी उठली होती यावेळला मी..पण तरीही चांगले मार्क नाही मिळाले बघितलं नं???" असं बाबांना म्हणून मी मोकळी झाले.
सकाळी उठण्याचा आणि चांगले मार्क मिळण्याचा तीळमात्र ही संबंध नाही हे मला दहावीतच कळून चुकलं होतं. ;)
असल्या क्षुल्लक कारणापायी उगाच कशाला झोपेचं खोबरं करा?? असं वाटून मी उन्हाळ्याच्या सुट्टीत बारावीच्या काळात दुर्लक्षिलेल्या झोपेची भरपाई करण्यास सरसावले.
अभियांत्रिकीची चार वर्षे हॉस्टेल मध्ये गेली. सकाळी ९.०० वाजता क्लासमध्ये हजर असायला लागायचं..मग काय ८.४० पर्यंत झोप. १० मिनिटात अंघोळ आणि ९.०० ला क्लासमध्ये हजर :) असं साधं सोपं समीकरण होतं. त्याला आता कुणाचीही आडकाठी नव्हती. त्यामुळे तो काळ अगदी सुखाचा गेला. रविवारी १० मिनिटे जास्त झोपायला मिळायचं. कारण ९.०० ला मेसमध्ये न्याहारी मिळणं बंद होत असे. सकाळी ८.५० ला उठणे, ब्रश करून मेस मध्ये जाणे, न्याहारीनंतर पुन्हा झोप काढणे नाहीतर अंघोळ करून पुन्हा फ्रेश झोपणे असा नियम असायचा. चार वर्षात मी चुकूनही पहाटे उठली नाही. जो काही अभ्यास केला तो सकाळी ६.०० पासून रात्री ११.०० च्या कालावधीत कारण रात्री ११.०० नंतर माझ्या मेंदूची कवाडे बंद होतात. त्यानंतर कुठलं ही ज्ञानार्जन मला वर्ज्य आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.
पुण्याला पुढल्या शिक्षणासाठी असतानाही थोड्याफार बदलाने हाच टाईमटेबल होता. पण एकूण त्या विद्यार्जनाच्या काळात मी झोपेला माझ्या नेत्राआड कधीच होऊ दिले नाही. अगदी प्रेमात धप्पकन पडल्यावर सुद्धा "मुझे नींद नं आये" असं माझं कधीही झालं नाही. उलट पुण्यासारख्या थंड हवामानाच्या जागी मी झोपेला अगदी योग्य न्याय दिला असेच आजवर मला वाटत आले आहे. माझ्याठायी एकमेकांचे शत्रु असलेले झोप आणि प्रेम हे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होते.
पुढे टेन्शन आणि झोप यांचं इन्वर्सली प्रोपोर्शनल ( Doctor च्या म्हणण्यानुसार) तंत्र थोडं डायरेक्टली प्रोपोरशनल व्हायला लागलं. हळुहळु मला झोप येईनाशी झाली. कदाचित झोपेला मी एव्हाना गृहित धरले होते. थोडेदिवसासाठी...
मुंबईत नोकरी लागल्यावर झोपेचं खोबरं झालं. शिफ़्ट्स मुळे झोप व्हायची नाही. आणि मी मग १२ तास-१६ तास अशी लागोपाठ झोपायची.
एवढं सगळं रामायण मला आठवण्याचं कारण म्हणजे कार्यालयात थोड्यावेळाकरीता पावर कट झाला होता...डिजी चा ही काही प्रोब्लेम होता. म्हणून दिली ताणुन...काय मस्तं झोप लागली म्हणून सांगु? खूप दिवसांनंतर झोपुन उठल्यावर अतीव समाधान मिळालं..आताशा भर क्लासमध्ये स्वप्न पडेस्तोवर झोपायचा चांस मिळेनासा झालाय. मोठेपणा वगैरे म्हणतात तो हाच असावा कदाचित ;) हे शल्य मनाला बोचत असतांनाच मिळालेल्या सुवर्णसंधीचं सोनं करायला मिळालं आज.....
चला आता थोडी कॉफी ढोसुन येऊ....
हे सगळं वाचुन तुम्हाला जर झोप आली तर माझ्या झोपसाधनेचं चीज झालं असंच मी समजेन. ;)
अग बाई हे असं काही माझ्या नवऱ्याने वाचलं तर आमचे पुन्हा ’त्याचे झोपणे’ याविषयावर भांडण होइल....तु मस्त लिहीलयेस!!!माझा नवरा असाच केव्हाही, कुठेही आणि कितीही वेळ झोपू शकतो आणि उठल्यावर आज काही मनासारखी झोप झाली नाही गड्या म्हणतो!!!
ReplyDeleteयावर मी पण एक पोस्ट टाकलीये...’झोप’ या नावाने वेळ मिळाला तर बघ.....
झोपाळु व्यक्तींमध्ये तुझ्या नवर्याची भर ;)
ReplyDeleteनक्की वाचते..बहुदा वाचलाही असेल तुझा लेख...
मार्च महिन्याच्या मी टाकलेल्या पोस्टमधे आहे बघ ती पोस्ट,खरं सांगते तुला कमाल झोपाळू माणसाशी संसार चाललाय माझा.....दर सुट्टीला भांडण होते आमचे त्याच्या दुपारच्या झोपेमुळॆ......
ReplyDeleteझोप! जगातला सगळ्यात आनंदी सोहळा! मी पण झोपेच्या बाबतीत बरीच सुदैवी आहे! कुठेही, कशीही, कधीही झोप येते मला!
ReplyDeleteमस्त आहे झोप प्रकरण. आमच्या इथे माझी कावळ्याची झोप असते. रात्री उशिरा जरी झोपलो तरी सकाळी ५ वाजता उठतो मी रोज. सौ.चं पण झोपेशी खुपच सख्य. फक्त रविवार मिळतो तिला. आणि मी सकाळी उठुन किचनमधे चहासाठी खुड्बुड सुरु केली की तिला जाग येते आणि मग माझा उध्दार.. एक दिवस मिळतो, तेवढं पण सुखानी झोपु देत नाही... वगैरे वगैरे... सगळे प्रसंग डोळ्यापुढे उभे केले आहेत.
ReplyDeleteतुमच्याच प्रमाणे माझी धाकटी बहिण झोपाळु. आमच्या घरी एक पोपट होता ( २४ वर्षं) . बडिल रोज सकाळी तिला म्हणायचे संध्या उठ.. ती आपली डोक्यावरुन पांघरुण घेउन झोपायची. शेवटी आमच्या घरचा पोपट पण म्हणायला शिकला.एकदा वडिलांनी म्हंटलं संध्या उठ, की मग तो पोपट जप सुरु करायचा.. संध्या उठ चा. पण ती पठ्ठी कधी उठली नाही. :)
मुग्धा, एकदम मस्त झालेय तुझे ’ झोप ’ प्रकरण. मीही तुझ्यात सामील. कधीही, कुठेही मी झोपू शकते. कदाचित ही १७ वर्षे लोकल प्रवासाची देणगी असेल. लोकलमध्ये तर मधल्या पॆसेजमध्ये खच्चून भरलेल्या गाडीतही मी उभ्या उभ्या गाढ झोपत असे. अग पाठीला पाठ लागलेली असल्यावर पडायचीही भिती नाही ना ग:D. बाकी परिक्षा आणि अनावर झोप व आईचा ओरडा यांनी माझी पाठ काही सोडली नाही. मात्र पॊवरकटमुळे का होईना पण चक्क तू ऒफिसमध्येही झोपून घेतलेस हे भाग्य मात्र मला कधी लाभले नाही.:(
ReplyDeletetujhi post vachun mala hi "majhi zop" ya vishayavara lihavasa vatata aahe, anyways zop yayala lagliye mala aataa :-)
ReplyDeleteतुमचं झोप प्रकरण वाचून लहानपणीचा किस्सा आठवला. माझ्या शेजारी ’गुड्डी’ नावाची मुलगी रहात असे. एकदा घरी एकटी असताना ती दुपारी जी गाढ झोपली ती उठेचना! दरवाज्यावरच्या व्हेंटिलेटरमधून आत पाणी टाकलं तिच्या बिछान्यावर, तेव्हा जागी झाली. वर नाजूक हसून म्हणाली, "आज बहोत गहरी निंद लगी थी।" सगळ्या बिल्डींगला तो किस्सा आठवडाभर पुरून उरला होता.
ReplyDeleteजमाना झोपाळु लोगोंका दुश्मन होता है असं मला आजवर वाटत आलं आहे. तुमच्या सौं ना आणि बहीणीला ही असंच वाटत असणार नक्की.
ReplyDeleteप्रतिसादाकरीता आभार... :)
धन्स भाग्यश्री. चला ओळखीच्या झोपाळु व्यक्तींमध्ये तुझी एक भर :)
ReplyDeleteया लोकल झोपेमुळे मी एकदा पुढ्ल्या स्टेशन वर पोचता पोचता राहिले.
आधीच मुंबईत नवीन त्यात हे असे उद्योग..नशीब वेळेवर उठली :)
घरी तर सतत ओरडा खाल्ला आहे मी तुझ्यासारखा..अजुनही बाबा रागवतात.
लवकर लिहीते व्हा!! झोप आली ना लेख वाचुन..माझ्या निद्रासाधनेचं चीज झालं म्हणायचं ;)
ReplyDeleteमी नाईट शिफ़्ट्स करतांना असा घॊळ होईल याची माझ्या रुममेट्स ना खात्री होती म्हणुनच आम्हा सगळ्यांकडॆ वेगळ्या चाव्या होत्या. आणि आतुन कडी लावायची नाही हा नियम होता ;)
ReplyDeleteनाहीतर मी ही अशीच उठायचे “आज बहोत गहरी निंद लगी थी।” म्हणुन :)
प्रतिसादाकरता धन्यवाद..!!
मुग्धा,
ReplyDeleteझोपेला आमच्या पर्यंत छानच पोच्व्लेस.
अनुजा
thank you anuja!!
ReplyDeleteझोप आली तर माझ्या झोपसाधनेचं चीज झालं >>>hahahaha aali aahe pan ajun khooooooop kaam aahe :(
ReplyDeletetu kadhee aai baabna gharabaher aakhee raatr daar vaajvt thevlys ka??
mi thevly! 2da :)
nahi ajun asa kahi jhala nahi..:)
ReplyDelete