Skip to main content

...

खुप दिवसांनी कुणीतरी रागवलं मला आज..अचानक वाटलं..आपण हे फ़ीलींग विसरुनच गेलो होतो की..
लहानपणी हे करु नकोस, ते करु नकोस पासुन बर्याच गोष्टींसाठी मी रागवणं खाल्लंय...पण आताशा सगळंच काही परफ़ेक्ट करण्याच्या नादात मी कुठलीही चूक केली नाही आणि पर्यायाने कुणी कुणी म्हणुन रागवलं नाही..कसं मिळमिळीत वाटत होतं आत्तापर्यंत असं वाटायला लागलं आणि कुठेतरी त्या रागवणार्या माणसाचे माझ्यातल्या खोडकर मुलीने आभार मानले...
आजचं रागावणं स्पेशल या करीता की, दिवाळीच्या सुट्टीचा याच्याशी थेट संबंध आहे...दिवाळीत नवीन ड्रेस, फ़टाके फ़राळ या सोबत कुठल्याही छोट्याश्या खोडीसाठी आवडत्या मामा किंवा मावशी कडुन डोक्यावर पडलेला टप्पू पण माझ्यासाठी स्पेशल असायचा तसंच हे झालं योगायोगाने...
लहानपणी कुणीही रागवलं की, लगेच माझे डोळे भरुन यायचे, नाक लाल व्हायचं आणि गोबरे गाल पार उतरुन जायचे. कुणासमोर गेलं अश्या अवतारात की लगेच सगळी विचारपूस होत असे आणि मला खुप अवघडल्यासारखं वाटत असे. मग हे अवघडलेपणच येऊ नये अश्या प्रयत्नात मी चुका करायलाच विसरले...आणि मोठी झाले..आज मात्र माझं बालपण परत येऊन मला मी मोठी झाल्याचं सांगुन गेलं.

Comments

  1. "आज मात्र माझं बालपण परत येऊन मला मी मोठी झाल्याचं सांगुन गेलं." मस्त , हे वाक्य खुप आवडलं. या पोस्ट ला नाव का नाही दिलसं तु?

    ReplyDelete
  2. अगं मुग्धा पण मुद्याचे राहीलेच ना....म्हणजे कशासाठी आणि कोण रागावले गं तुला?:)अश्या अवतारात गेलं की सगळी विचारपूस होत असे....हो गं मेलं सांत्वन राहीलं दूर पुन्हा पुन्हा कढ उतू जायचे....
    मस्त गं.

    ReplyDelete
  3. हं... :) छान आहे.. आता रडायचं कारण काय असायचं...की उगिच रडायचं??

    ReplyDelete
  4. @ajay : अरे सुचलंच नाही नाव मला! मग काय असंच टिंब टिंब टिंब..भावना पोचल्या मंजी झालं.. :)
    @YD : धन्यवाद कंटाळा सम्राट!! :)
    @bhaanasa : रागवणारे असले की माझ्यासारखे लोक जास्तं शेफ़ारत नाहीत म्हणुन कधी कधी कुणी रागवलं की मजा येते..
    @mahendra :
    कुणी रागवलं की रडायचं...हेच किती मोठ्ठ कारण आहे.
    सगळ्यांना धन्यवाद..नवीन घरी येऊन पूर्वीसारखाच प्रतिसाद दिल्याबद्दल :)

    ReplyDelete
  5. sandarbha nastanna sudhaa maaaast lihala aahes....
    by the way... saamna cancer shi... was the best... ultimate..!!
    keep writing...

    ReplyDelete
  6. thank you ashuraaj...keep visiting.. :)

    ReplyDelete
  7. कोण रागवलं गं? तु काही बोलली नाहिस. असो. हे मात्र खरय. कोणी काय झालं विचारलं की रागाने आणि रडण्याने लाल झालेले नाक आणि डोळे लपवु म्हणता लपत नाही :).

    ReplyDelete
  8. ho aga rohini....kahi khas karan nahi..boluya kadhitari...:)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटा...

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...