Skip to main content

Posts

Showing posts from 2010

फ़्रेश...

आजकाल आंतरजालावर काही नवं,मनाला भिडणारं वाचायला मिळालं की पुर्वी कसं गाडीवरुन दूर दूर फ़ेरफ़टका मारुन आल्यानंतर फ़्रेश वाटायचं तसं वाटतं..वाचणे म्हणजे आपला आणि लेखकाचा संवाद..नेहमीच्या घरी होणार्या संवादापेक्षा वेगळा..वेगळा याकरता कारण ती लेखकाची एका विशिष्ट वेळेतली अभिव्यक्ती असते..लेखक अगदी त्याने लिहीलेल्या गोष्टीसारखा किंवा लेखासारखा असेल किंवा नसेल हे सांगता येत नाही.. म्हणुनच त्याच्या लिखाणाशी आपला जो संवाद होतो तो कदाचित इतका स्पेशल वाटत असावा..फ़्रेश वाटत असावा.. प्रत्येक माणसाशी बोलतांना ही इतकंच फ़्रेश वाटायला हवं नाही का? प्रत्येकाच्या स्वभावाला "अपेक्षेचं" लागलेलं ओझंच कदाचित त्याच्याशी साधलेल्या संवादाला कोमेजुन टाकत असावं..

उसासे..

ढगाळ वातावरण हातात चहाचा गरम प्याला , आणि ऐकावं "मी मज हरपून बसले गं" , दुस-या ओळीच्या शेवटी येणार्या "गं" वर एक लांब उसासा टाकावा..हा उसासा आपलं मन हरपून बसल्याच्या भावनेनं नाही तर आशाच्या कातील आवाजाने मनात उभ्या केलेल्या आपल्या नसलेल्या आणि गाणं म्हणता म्हणता तिच्या झालेल्या श्रीरंगाच्या आठवणीनं... असे कितीतरी उसासे टाकायला लावणारे आणि आपलं अस्तित्व जाणवुन पुढे जाणारे क्षण या सगळ्याच प्रतिभावान व्यक्तींनी मोठ्या ताकदीने उभे केले आहेत...मग आशाचं "तरूण आहे रात्र अजुनी" गाणं असो..किंवा गुलजारची कुठलीही कविता..प्रत्येक कलाकृती देवत्व लाभल्यासारखी...ती कलाकृती त्याला निर्माण करणार्यांनी जेवढी जगली त्याहीपेक्षा अधिक त्या कलाकृतींनी तिचा आस्वाद घेणार्यांना जगवलं...प्रत्येक ओळीगणिक , प्रत्येक स्वरागणिक त्या सगळ्याच कलाकृतींनी हृदयाचा ठाव घेतला आणि उसासा टाकायला भाग पाडलं.. असे कित्येक उसासे.. " रातराणीच्या फ़ुलांचा..गंध तू लुटलास का रे ?" म्हणतांनाचं आवाजातलं नेमकं मार्दव..आणि तेवढ्याच एका अनामिक आर्ततेनं म्हंटलेलं "सावन के कुछ मिठे मिठे पल रख्...

जिमस्य कथा..२

ही पोस्ट रोहन च्या या पोस्ट ला अगदी contrary आहे तेव्हा निषेध केलात तरी चालेल...पण काय आहे आजकाल अगदी नेट्वरही खाण्याचे लाखो कैलरीज ने युक्त असे पदार्थ पाहीले की वजन वाढेल अशी भिती वाटते... पहिल्यांदा जेव्हा तळवळकरांच्या जिम ची पायरी चढले तेव्हा मला खरंच वाटलं नव्ह्तं आयुष्य इतकं बदलेल म्हणुन..जिमकडे मी फ़ार फ़ार तर अतिशय मेहनत करायची जागा याच दॄष्टीने पाहत आले होते..पण तिथे गेल्यावर माझा सगळा आऊटलुकच बदलला...हे सगळं इथे लिहीण्याचं कारण हेच की मी जे अनुभवलं ते सगळं तुम्हा सगळयांना कळावं आणि या निमित्ताने का होईना ज्या लोकांना आपण व्यायाम करायला हवा असं वाटतं ते लोक ते वाटणं सिरिअसली घेतील.. " सिडेंटरी लाईफ़स्टाईल आणि वेळी अवेळी खाणं" हे वाक्य आपण नेहमीच वर्तमानपत्रात वगैरे वाचत असतो आणि बहुदा त्याकडे कानाडोळा करत असतो..."तुमचं वयच आहे रे खायचं" हे ही वाक्य आपण नेहमीच ऐकत असतो मोठ्या माणसांकडुन..पण खरंच आपण जे खातो त्यातला प्रत्येक अंश आपल्या शरीराला आवश्यक आहे का? हा विचार आपण करत नाही, अगदी मी ही करत नव्हते... सिडेंटरी लाईफ़स्टाईल असो किंवा धावपळ असो..व्यायामासाठी ...

ऊर्मी..

रोज काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी व्यक्त करण्याकरता तयार केलेल्या माझ्या नवीन ब्लोग ला नक्की भेट द्या.. http://doodlesofmugdha.blogspot.com/

घर असावे...

हे नवीन डुडल जुन्या धाटणीच्या घराची कल्पना डोक्यात ठेवून चितारलेले आहे...                    तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा..

डुडल्स..!!

आजकाल शब्द जरा रुसलेत...अगदी पेन पेपर घेउनही बसले ना तरी लिहायला सुचत नाही..मग अचानक एकेदिवशी  ही  डुडल्स चितारली..

संवाद....

आज काहीतरी वेगळं लिहावं म्हणतेय.. ह्म्म! काय वेगळं ?आज सकाळचा वेळ कसा मॆनेज केला? खायला काय केलं हेच ना? नाही..वेगळं म्हणजे खुप वेगळं...एकदम फ़्रेश...मनाला खुप आनंद देणारं.. मग बाकी जे आत्ता करतेय्स ते आनंद देत नाही वाट्टं.. असं नाहिए गं..पण सगळं छान चाललं असतांना लागत असलेली चुटपूट फ़ार विचीत्र असते बघ.. तुला ना उगाच नसत्या गोष्टींबद्दल विचार करायची सवय आहे.. असंच म्हण हवं तर..पण त्या नसत्या गोष्टीच खुप महत्वाच्या आहेत असं वाटतंय मनापासुन.. चेक कर स्वतःला काहीतरी गडबड आहे नक्की.. हो आहे ना गडबड माझं मी पण समजण्याचे हेच सिम्प्टम्स आहेत कदाचित.. "मी पण" हे काय नवीन?? नवीन नाही जुनंच..पण नव्याने सुचलेलं.. काय नवीन काय जुनं? सगळं गुंडाळुन ठेवावं लागतं पोटभरीच्या भानगडीत.. खरंय गं तुझं मी पण असाच विचार करत होते..आणि बर्यापैकी जमतही होतं सगळं.. पण मग मध्येच काय ही नवी भानगड?..नव्याची जुन्याची.. अगदी घामाघुम झालं असतांना थंड हवेची झुळूक कशी वाटते..सुखदायी..तसेच वाटतायत मला माझे नवीन विचार..नवे..जगण्याला अर्थ देणारे.. आता अजुन काय अर्थ शोधायचाय? जे काही हवं होतं ते मि...

आज रामनवमी!

आज रामनवमी! प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस... या दिवशी खुप छान वाटतं मला नेहमीच. नागपुरला तशी दोन राममंदिरं आहेत. एक रामनगरला आणि एक पोद्दारेश्वर मंदिर ..दोन्हीमंदिरांची शोभायात्रा म्हणजे उत्सुकतेची बाब असते दर राम नवमीला.. लहानपणी आजी मला दर रामनवमीला राम मंदिरात घेऊन जात असे.तिथली सुंदर संगमरवराची मूर्ती लहानपणीच मला खुप आवडायची. मुळात प्रत्येक देवी देवतेच्या मूर्ती पाहुन आपल्या मनात एक विशिष्ट भाव येतात. त्यानुसार मला रामाला पाहुन शांत, प्रसन्नच वाटायचं नेहमी...अश्या वयात जेव्हा शांत प्रसन्न या दोन शब्दांची माझी पुरेशी ओळखंही नव्हती. पुढे मोठी झाल्यावर नागपूरची शोभायात्रा पहायला जाणे हा नित्याचाच कार्यक्रम असे. आई, बाबा मी आणि छकु सगळेच सोबत रामाच्या दर्शनाला जात असु. आई आपल्यासोबत फुलं, गाठी आणि गुलाल घ्यायची आणि देवाला वहायची...होळीपासुन एक गाठी रामनवमीसाठी आणि एक प्रभु रामचंद्रासाठी असं तिचं ठरलेलं असायचं. राममंदिरात कितीही गर्दी असली तरी सगळ्यांना शांतपणे दर्शन व्हायचे आणि देवाच्या प्रसन्न मूर्तीला मनात घेऊन आम्ही घरी वापस यायचो.. रामटेकला गेल्यावर माझं आणि प्रभु रामचंद्राचं न...

उन्नै मरंदिड मुडियादे (तुला विसरणं शक्य नाही)..रहमान..:)

गेले काही दिवस मनात हे गाणं सारखं चालुच आहे. एक निखळ प्रेमाची कथा आणि ए. आर रहमान चं संगीत आणि खुप सुंदर शब्द..खरंतर तमीळ भाषा म्हणजे माझ्यासाठी "काला अक्शर भैस बराबर" आहे..पण हे गाणं थेट काळजालाच भिडतं...याचं कारण म्हणजे ए.आर रहमान..त्यानी गाण्यात केलेला शहनाईचा उत्तम वापर. हे गाणं म्हणजे क्लासिकल आणि पाश्चिमात्य संगिताची उत्तम सांगड आहे.. गाण्याची सुरुवात टाळांनी होते..ध्रुपद सुरु होण्यापूर्वी आपण एखाद्या लग्नात गेलो आहोत असा काहीसा भास होतो(पण विडिओत असं काही दाखवलं नाहीए).. मल्यालम आणि तमीळ भाषेत मुलींना "पोण्णं" असं म्हणतात..ओमाना पेण्णे याचा अर्थ लाघवी, आणि सुंदर मुलगी..पोण्णं च पेण्णं हा साहित्यिक उल्लेख..ओमाना पेण्णे याचा हे सुंदर मुली असा तर अर्थ पण मराठीत असं लिहीणं मलाच विचित्र वाटतं..म्हणुन आपण ओमाना पेण्णे चा अर्थ "प्रिये" घेऊ.. ओ माना पेण्णे म्हणजे वधु..म्हणुनच कदाचित शहनाईचा वापर केला आहे रहमान नी....फ़ील यावा म्हणुन.. आहा आडडा पेण्णे..उन अळगिल.. नान कण्णे सिमटवुम मरंदेन..हे आनल हे कंडेन हे ओर आयरम कणवं..हे कयरुम येन आयरम इरवं.. म्हणज...

Valentine Moments

तिने त्याला पाहीलं अगदी पहील्यांदा, ओझरतंच. ..मळकीच टी शर्ट घातलेला आणि घामघुम झालेला तो..तिला आवडला? कळलं नाही तिला तिचंच... क्लासमध्ये रोज उशीरानेच होणारी त्याची एंट्री..पण त्याच्या त्या उशीराच येण्याची वाट पाहणारी ती..तो दारात आल्या आल्या तिच्या काळजाचा ठोका चुकायचा... शेवटच्या बेंचवर बसुन सिंसिअरली क्लास अटेंड करणा~यापैकी तो, ती आणि आणखी काही मुलं...त्याच्या रेखीव बोटांना त्याच्या नकळत न्याहाळणारी ती..हरवुन बसायची स्वतःला.. त्याच्या येण्याने तिच्या मनातला गुलमोहर बहरला होता, त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण आपण आयुष्यात अनेकानेक वेळा अनुभवावा असं तिला सारखं वाटायचं..पण हे नक्की का होतंय याचा मात्र तिला अजिबात पत्ता लागत नव्हता... त्याचा सहवास तिच्यासाठी एक समृध्द करणारा अनुभव असायचा. आपली सगळी स्वप्न आपण याच्यासोबतंच पूर्ण करु शकु असा विश्वास तिला कोण जाणे कुठुन येत असे.  एक अशीच संध्याकाळ, सुर्याने आपल्या सुंदर रंगाची उधळण करुन फुलवलेली, ती आपल्या घराच्या गैलरीत संतूरवर वाजवलेला राग यमन ऐकत होती. वाफ़ाळत्या चहाच्या घोटाबरोबर त्याची स्वप्ने पाहण्यात रंगून गेली होती.  द...

भटकंती...१

१ फ़ेब्रुवारीला लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं..गेलं एक वर्ष मी आयुष्यातले खुप आगळेवेगळे दिवस पाहिले ज्याचा ध्यानी मनी स्वप्नी विचारच नव्हता केला..इथे आल्यापासुन प्रत्येक दिवस एक मोठ्ठं आव्हान घेऊन यायचा. पण खुप मजा आली. रोज काहीतरी नवीन असावं असं वाटणार्या मला देवाने खुप नवीन नवीन गोष्टी करायला दिल्या  याचंच खुप समाधान वाटलं मला या लग्नाच्या वाढदिवशी.. तमिल नाडु सारख्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या राज्यात राहणे हे माझे अहोभाग्यच पण त्यासोबत  माझ्यासारख्याच आवडी असणारा नवरा मिळाला हे ही माझे भाग्यच. आम्ही दोघेही स्थापत्य अभियंता असल्याने स्थापत्य शास्त्राचे प्राचीन नमुने आमच्यासाठी नेहमीच कुतुहलाचा विषय राहिलेले आहेत. आणि एवढी प्राचीन स्मारकांची संपत्ती लाभलेल्या या प्रदेशात भटकंती न केल्यास नवल.. इथली देवस्थाने आणि शिल्प हा आमच्या दोघांचा जिव्हाळ्याचा विषय. आम्ही गेल्या एका वर्षात भेट दिलेल्या पर्यटन स्थळांबद्दल आणि त्यांच्या इतिहासाबद्दल इथे लिहायचा प्रयत्न करतेय. ________________________________________________________________________________ तमिळ संस्कृतीत देवस्थानांना खुप...

एक कविता..

कौन कहता है शादी के बाद लड्के शहीद होते है... जरा लडकीयों से भी पुछो हाल उनके दिल का.. उठके सुबह सवेरे...किचन की राह पकडती है.. दुध उबालके जल्दी से.."उनके" लिये चाय बनाती है.. पहले कभी नं होती थी सुबह उसकी इतनी जल्दी.. उठते ही मां ला देती थी हाथ मे चाय की प्याली.. नाश्ते में क्या बनाना है ये सवाल रोज उठता है.. नाश्ते और खाने के बीच नहाने का पानी उबलता है.. "उनकी" तयारी करते करते..खो जाती है वो ऒफ़िस निकलती है बिना बाल सवारें वो.. दिनभर काम से नही फ़ुरसत बोस गुर्राता है. सहम सी जाती है वो.. पर काम तो करना पडता है.. वापस आते ही वहीं (खानेका) सवाल उठता है.. पैर कपकपाते है पर पेट आवाज करता है.. फिर बहू, बिवी का फ़र्ज..निभाना पडता है दिन भर के तनाव के बाद भी खाना बनाना पडता है.. कहा टि.व्ही कहा पिक्चर.. निंद कबकी बना लेती है आंखोंमे अपना घर.. सुबह सवेरे उठके सिलसिला वही शुरु होता है.. शहीद हो रहा हूं कहने कॊ लडकों का क्या जाता है..