Skip to main content

जिमस्य कथा..२

ही पोस्ट रोहन च्या या पोस्ट ला अगदी contrary आहे तेव्हा निषेध केलात तरी चालेल...पण काय आहे आजकाल अगदी नेट्वरही खाण्याचे लाखो कैलरीज ने युक्त असे पदार्थ पाहीले की वजन वाढेल अशी भिती वाटते...
पहिल्यांदा जेव्हा तळवळकरांच्या जिम ची पायरी चढले तेव्हा मला खरंच वाटलं नव्ह्तं आयुष्य इतकं बदलेल म्हणुन..जिमकडे मी फ़ार फ़ार तर अतिशय मेहनत करायची जागा याच दॄष्टीने पाहत आले होते..पण तिथे गेल्यावर माझा सगळा आऊटलुकच बदलला...हे सगळं इथे लिहीण्याचं कारण हेच की मी जे अनुभवलं ते सगळं तुम्हा सगळयांना कळावं आणि या निमित्ताने का होईना ज्या लोकांना आपण व्यायाम करायला हवा असं वाटतं ते लोक ते वाटणं सिरिअसली घेतील..
" सिडेंटरी लाईफ़स्टाईल आणि वेळी अवेळी खाणं" हे वाक्य आपण नेहमीच वर्तमानपत्रात वगैरे वाचत असतो आणि बहुदा त्याकडे कानाडोळा करत असतो..."तुमचं वयच आहे रे खायचं" हे ही वाक्य आपण नेहमीच ऐकत असतो मोठ्या माणसांकडुन..पण खरंच आपण जे खातो त्यातला प्रत्येक अंश आपल्या शरीराला आवश्यक आहे का? हा विचार आपण करत नाही, अगदी मी ही करत नव्हते...
सिडेंटरी लाईफ़स्टाईल असो किंवा धावपळ असो..व्यायामासाठी वेगळा वेळ काढणे अत्यावश्यक आहे हे आपण जरासे विसरत चाललो आहे..असं मला वाटतं..
नुकतंच आमच्या ऒफ़िसमधल्या अगदी सडपातळ बांध्याच्या मुलीला कोलेस्टेरॊल आहे असं तिने मला सांगितलं तेव्हा मला फ़ार आश्चर्य वाटलं नाही कारण आम्ही दोघेही रोज सोबत डबा खातो...तिने आणलेले तळ्कट पदार्थ त्याबरोबर भात आणि भाज्यांचं किंवा कोशिंबीरींचं कमी प्रमाण, जोडीला दर विकांताला असणारं सामिष पदार्थांचं जेवण तिच्या जास्तं असणार्या कोलेस्टेरोल ची कहाणी सांगत होतं. तर मंडळी हे सांगायचं तात्पर्य हेच की वजन आणि शरीरातल्या फ़ैट चा काही एक संबंध नाही...तुम्ही वरुन जरी अगदी सडपातळ दिसत असाल तरी ही कोलेस्टेरॊल वगैरे मंडळी आत अगदी खोलवर गेलेली असु शकते..
इथे साउथ इंडियात एक पध्दत खुप चांगली आहे..ही लोकं रात्री ७ ८ वाजताच्या सुमारास पोळ्या, इड्ली, दोसा, आपम, उपमा असा काहितरी नाश्ता करतात. त्यामुळे काय होतं की झोपेपर्यंत पाचन होऊन जातं आणि शरिरात फ़ैट जमा होण्याचे चांसेस कमी असतात.
आपल्याइकडे आपण अगदी वरण भात भाजी पोळीचं चोपून जेवण करतो आणि झोपतो मग बिचारं शरीर :( त्याला फ़ैट जमा करण्याशिवाय काही उपायच उरत नाही..तर हे सगळं टाळण्यासाठी रात्री अगदी कमीत कमी पदार्थ पोटात ढकलायचे....पण भूक तर प्रचंड लागली असते हाच प्रश्न डोक्यात असेल तुमच्या हो नं? मग त्याकरता ऒफ़िसमधुन निघतांना पोटभर ताक, नारळ पाणी, किंवा टरबूज, पपई, डाळींब इत्यादी फळांचा ज्युस प्यायचा...आपोआप भूक शमते आणि जेवणावर परीणाम होतो..
असं म्हणतात की Eat your breakfast like a king, lunch like a prince and dinner like a pauper..त्यामुळे सकाळी उठुन पोटभर नाश्ता करायचा आणि मगच बाहेर पडायचं..आता म्हणाल वेळ कुणाकडे आहे एवढा? तर ज्यांच्या दिमत्तीला आई आहे त्यांचा काहीच प्रोब्लेम नाही, जे एकटे आहेत त्यांच्या साठी ब्रेकफ़ास्ट रेडी सिरीअल्स, कोर्न फ़्लेक्स पण हो हे सगळं भरपूर खाल्लं पाहीजे...कोर्न फ़्लेक्स आणि दुधाचा डबा कुठेही खाता येतो(स्वानुभव)..ज्यांच्या सकाळच्या ट्रेन्स असतात आणि जे ऒफ़िसला ८ वाजता पोचतात त्यांनी आपल्यासोबत ब्रेड चे स्लाईसेस एखादी हेल्थी चटणी लावुन नेले तरी पुरे आहे..लंच मधे भात पोळी दोन्ही नं खाता इदर भात किंवा पोळी खायची दोन्ही सोबत खाऊ नये..असं माझी डाएटीशीअन सांगत असते..त्यामागचं कारण तिला विचारुन नक्की पोस्ट करेन..
म्हणजे अश्या तर्हेने फ़क्तं जेवणात थोडासा बदल केलात तरी अगदी लाईट वाटायला लागेल...मग पुढची स्टेप व्यायाम तो ही अगदी इच्छुकांसाठी..
अता थोडं तळवळ्कर्स बद्दल..
अतिशय छान जिम, प्रत्येकाला दिलेलं अटेंशन खुप छान...असं सारखं वाटत राहतं की यु आर टेकन केअर ऒफ़..आणि तेच खुप आहे...त्यांच्या बहुतेक सगळ्या मोठ्या शहरात शाखा आणि ड्युअल मेंबरशिप सतत फ़िरतीवर असलेल्या लोकांसाठी उत्तम आहे...
प्रत्येक जिममध्ये असलेला ज्युस बार पोटभरीचं डिपार्ट्मेंट छान संभाळतो..
इथे मद्रास मध्ये "मधुकर तळवलकर" या माणसाचं जिम ५ ते ६ ठिकाणी असणं हीच माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे..
अता राहिला प्रश्न पैशाचा..तर एकदाच्या खादाडीत आपण ३५० ते ४०० रु सहज खर्च करतो, समजा महिन्यातनं तीनदा जरी बाहेर खादाडी  झाली तरी १२०० ची वाट...मग जिमसाठी प्रत्येक महिन्यात १२०० ते १५०० रु खर्च केले तर काय वाईट आहे? हं इंस्टालमेंटची सुविधा असती तर बरं झालं असतं असं मला सतत वाटत राहतं..पण ठिके...
मग कधी करताय सुरुवात?

* As I read through the post I feel like it could have been more complete but Chalta hai..:)
* Whatever is written above is my opinion..no offense meant to anybody.

Comments

  1. मुग्धा.... खरे आहे की तुझे म्हणणे... आपण खादाडी करतो त्याप्रकारे व्यायाम देखील महत्वाचा... जितक्या कालोरीज घेतो तितक्या खर्च देखील झाल्या पाहिजेत... आणि त्या मी करतो... :) इकडे नियमित व्यायाम आणि तिकडे आलो की सह्यभटकंती गेली ९ वर्षे सुरु आहे... :)

    माझा नो निषेध... :) अर्थात तुझाही माझ्या खादाडी पोस्टला निषेध नसावा अशी अपेक्षा आहे... :D

    ReplyDelete
  2. hey chan lihile... i like its background bubbley bubbley...pleasant

    ReplyDelete
  3. @rohan
    निषेध...हो करणार होते तुझ्या ब्लोग वरच्या खादाडीच्या फोटोंचा..अर्रे...तोंडाला पाणी सुटतं ऒफ़िसमध्ये बसले असतांना..;)
    काय ती साबुदाण्याची खिचडी, नान, पनीर भुर्जी..अहाहा...

    ReplyDelete
  4. पोस्ट खरंच चांगली शिकवणूक देणारी आहे. मागे एकदा तळवळकरच म्हणाले होते "If you think trying to stay fit is expensive, try sickness".

    व्यायाम आणि संतुलित आहार, हे गरजेचं आहे. उगीच उघड तोंड की खा असं करण्यात काहीही भलं होत नाही.

    ReplyDelete
  5. आहेस कुठे तू इकडे दिवस???? लिखाण बंद???

    बाय द वे.. मी माझा खादाडी ब्लॉग बंद केलाय... :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटा...

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...