Skip to main content

भटकंती...१

१ फ़ेब्रुवारीला लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं..गेलं एक वर्ष मी आयुष्यातले खुप आगळेवेगळे दिवस पाहिले ज्याचा ध्यानी मनी स्वप्नी विचारच नव्हता केला..इथे आल्यापासुन प्रत्येक दिवस एक मोठ्ठं आव्हान घेऊन यायचा. पण खुप मजा आली. रोज काहीतरी नवीन असावं असं वाटणार्या मला देवाने खुप नवीन नवीन गोष्टी करायला दिल्या  याचंच खुप समाधान वाटलं मला या लग्नाच्या वाढदिवशी..
तमिल नाडु सारख्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या राज्यात राहणे हे माझे अहोभाग्यच पण त्यासोबत  माझ्यासारख्याच आवडी असणारा नवरा मिळाला हे ही माझे भाग्यच.
आम्ही दोघेही स्थापत्य अभियंता असल्याने स्थापत्य शास्त्राचे प्राचीन नमुने आमच्यासाठी नेहमीच कुतुहलाचा विषय राहिलेले आहेत. आणि एवढी प्राचीन स्मारकांची संपत्ती लाभलेल्या या प्रदेशात भटकंती न केल्यास नवल..
इथली देवस्थाने आणि शिल्प हा आमच्या दोघांचा जिव्हाळ्याचा विषय. आम्ही गेल्या एका वर्षात भेट दिलेल्या पर्यटन स्थळांबद्दल आणि त्यांच्या इतिहासाबद्दल इथे लिहायचा प्रयत्न करतेय.
________________________________________________________________________________
तमिळ संस्कृतीत देवस्थानांना खुप महत्वाचं स्थान आहे. असं म्हणतात की तमिल नाडुत जवळपास ३३००० प्राचीन देवस्थाने आहेत.
भारताच्या दक्षिणेकडील ह्या भागावर ७ व्या दशकात पल्लवांनी ८ व्या दशकात पांड्यांनी आणि ९ व्या दशकात चोला राजांनी राज्य केलं. प्रत्येक राजवटीत राजांनी आपापल्या कारकीर्दीत बांधलेली ही वास्तुशिल्पं आणि देवस्थाने म्हणजे शिल्पकलेचे आणि स्थापत्यशास्त्राचे अत्यंत सुंदर नमुने आहेत. असं म्हणतात की या राजवटी म्हणजे दक्षिण भारतातील स्थापत्यशास्त्रासाठी आणि शिल्पशास्त्रासाठी सुवर्णकाळ होता. प्रत्येक राजवटीत बांधलेल्या वास्तुंची मांडणी वेगवेगळी आहे हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे.
पल्लव राजे राजसिम्हावर्मन आणि नरसिम्हावर्मन यांच्या काळातली शिल्पं चेन्नै पासुन जवळच असलेल्या महाबलीपुरम इथे आहेत.

ही शिल्प तीन प्रकारात विभागल्या गेली आहेत. गुहेसारखी मंदिरं, एकाच दगडापासुन तयार केलेली शिल्पं, एकाच रिलीफ़ असलेल्या दगडावर केलेले कोरीव काम, आणि दगडावर दगडं ठेवुन केलेलं बांधकाम.
एकाच दगडापासुन कोरलेल्या शिल्पात पांडवांच्या वेगवेगळ्या पंचरथांचा समावेश होतो.





 ह्या रथाला असलेल्या खांबांवर खाली सिंह कोरलेले दिसतात पण काही खांब कोरीव नाहीत. काही रथं थोडेसे अर्धवट अवस्थेतही दिसतात.


इथे एक खुप अनोखी गोष्ट पहायला मिळाली ती ही की, शिल्पकार दगड फ़ोडायला प्रत्येक मोठ्या दगडाला एका ओळीत चौकोनी छिद्र करुन त्यात त्याच आकाराचे लाकडी ठोकळे भरायचे. एका पावसानंतर हे लाकडी ठोकळे फ़ुगतील आणि दगडाला तडा जाईल असा साधा सोपा विचार त्यामागे असे..अमेझिंग...


इथलं शोअर टेंपल पाहण्यासारखं आहे. ही शोअर टेंपल ची वास्तु अगदी समुद्राकाठी आहे. असं म्हणतात की समुद्राच्या आत अशीच सात मंदिरं आहेत.हे मंदिर एकाच दगडात कोरलेलं नसुन याचे पाच मजले एकावर एक दगडं ठेवुन बांधलेले आहेत. या मंदिरात शिव ही मुख्य देवता आहे. पण विष्णुचंही छोटसं मंदिर आहे. आता या मंदिराच्या आत जायला मनाई आहे.



गावाच्या मध्यभागी एकाच रिलिफ़ असलेल्या दगडावर बरंचसं कोरीव काम केलं आहे त्यात अर्जुनाची तपश्चर्या आणि पौराणिक कथांचा समावेश होतो.
 हे सगळं ग्रेनाईटवर कोरलेलं आहे, त्या दगडाला तोडणं खुप कठिण काम असल्याने कदाचित एकाच मोठ्या दगडाचा कैनवास वापरला असावा.


महाबलीपुरम मध्ये होणार्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी हा मोठा दगड मागच्या पडद्यासारखं काम करतो.. आणखीही बरीच शिल्पे आहेत इथे पण वेळ नेहमीच कमी पडतो. त्यावेळच्या लोकांची शिल्पकलेतली निपुणता थक्क करुन टाकते. कुठ्लीही मशीन नसताना केवळ हाताच्या सहाय्याने केलेलं काम बघता बघता हरखुन जायला होतं.. आणि मग आपण वळतो एखाद्या दुकानाकडॆ ज्यात असाच एखादा शिल्पकलेचा नमुना मिळेल जो महाबलीपुरम आणि तिथल्या कुशल कारागीरांची आठवण म्हणुन घरात ठेवता येईल.

Comments

  1. खूपच छान फोटो आहेत. मागे पॉंन्डीचेरीला जाताना तिरुवनमलाईच्या देवस्थानाला भेट दिली होती. त्या नंतर कधी तामीळनाडूला जाणे झाले नाही. मदुराईला जायची इच्छा आहे. पाहु.

    ReplyDelete
  2. खूपच छान फोटो आणि हो टेम्प्लेट पण मस्त आहे गं....आता कॉफ़ी घेऊन बसलीयस असंच वाटतं आणि बाजुला बिल्डिंगी...(हो बिल्डिंगीच....ही ही...)
    तामिळनाडूला फ़क्त कोडाईच्या वेळीच गेले पण हे सर्व पाहायला जायला हवं..
    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...

    ReplyDelete
  3. मस्त आहेत फोटोस....लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...God Bless you

    ReplyDelete
  4. मस्तच आहेत गं फोटो....माहितीही दिलीस त्यामुळे बारकावे समजले....
    लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा....

    ReplyDelete
  5. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! फोटो सुंदर आले आहेत. कॉलेजमधे इतिहासाचं एक प्रोजेक्ट केलं होतं, त्यावेळेस असे फोटो जमा केले होते, त्याची आठवण झाली. दगडाला तडा जाण्यासाठी वापरलेली युक्ती मस्तच आहे. दक्षिण भारत पाहिलेला नाही पण फोटोंमधून तो किती सुंदर आहे, हे कळलं.

    ReplyDelete
  6. जीवेत शरदः शतम ! छान! लेख आणि फोटॊ दोन्ही !
    SavadhanS Blogs

    ReplyDelete
  7. छान माहिती! सुंदर फोटो!

    ReplyDelete
  8. @sidhdharth: vel kadhun pahaava ha pradesh khup kahi baghnyasarkha aahe..blog war svagat :)
    @aparna: malahi template khup aavdla...lady blogger "mugdha" basliye coffee gheun asa vatata..:) aata aalis ki vel kadhun ye nakki..
    @suhas: dhanyvad suhas
    @tanvi:dhans ga tanvi..majha guide jhalay TN madhye aalyapasun ;)
    @kanchan: asa vatata sagala sodun deun ashich bhtakanti karaavi aani lokannaahi karavaavi..
    itihaas aajkal majha fav subject jhalay
    @purushottam: dhanyavaad aani blog war svagat :)
    @anand: thank you :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटा...

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...