Skip to main content

बाहुबली २

पहिला भाग बाहुबलीचा मी टीव्ही वर पहिला होता आणि म्हंटले होते की पुढचा भाग मी नक्की थेटर मध्ये बघणार. बस्स, बाहुबली २ रिलीज  झाला आणि अगदी दुसऱ्याच दिवशी आम्ही बघायला गेलो.
उत्कंठा तर होतीच, नयनरम्य ग्राफिक्स बघायची पण त्याहूनही जास्त मला अमरेंद्र बाहुबली ला प्रभास नी कसे पोर्ट्रे केलं आहे ते बघायचं होतं. अमरेंद्र बाहुबली ला मी मनात घरी घेऊनच परत आले एवढा छान न्याय या भूमिकेला प्रभास नी दिलाय. पहिल्या भागात सुध्दा अमरेंद्र बाहुबली होतेच पण ह्या भागात जरा अजून छान व्यक्तिमत्व दाखवलं आहे असे मला वाटले.
मोहक स्मित, साधा चेहरा आणि लोकांसाठी करण्याची वृत्ती (हे सांगणे नं लगे)ह्यामुळे ही अमरेंद्र बाहुबली चे महिष्मती मध्ये असलेलं फॅन फॉलोविंग अगदी बरोबर आहे असे वाटते.  


अनुष्का फारच  सुंदर दिसली आहे. तिची देवसेना पण मनात घर करून राहते. तामिळ मध्ये तिचे डायलॉग्ज एकदम कातिल आहेत. कुठेही अति अभिनय नाही. एकदम समतोल भूमिका केली आहे. राजामौळी यांनी तिला खूप सुंदर दाखवण्याचा प्रयत्न केला जो अगदी यशस्वी झाला. ती खरोखरी राणी वाटते आणि राजकन्येपासून राणी होण्यापर्यंत चा प्रवास तिने खूप छान प्रकारे आपल्या भूमिकेतून साकारला.



 राणी असल्यावरचा तिचा पॉइस थोड्यावेळाकारता थक्क करून जातो. वेषभूषा टीम ला  १०० मार्क्स! प्रत्येक भूमिकेची वेशभूषा फारच विचार करून केलेली आहे. काय नवीन त्यात? मागच्या भागातही अशीच तर वेशभूषा होती. हो होती, पण ह्यावेळी प्रत्येक भूमिकेच्या वयाचा फरक ही ध्यानात घेण्यासारखी बाब. अमरेंद्र बाहुबली तिशीच्या आसपास आणि थोडी लहान देवसेना, मधल्या वयातली देवी शिवगामी आणि तिशीतला बल्लाळदेव. 

 अमरेंद्र  बाहुबली चे कपडे त्यांच्या वयाचा आणि मुख्यतः हुद्द्याकडे लक्ष देऊन ठरवले आहेत असे वाटले. गुलाबी, मरून , मोरपंखी, हिरवे शेड्स असे गडद चे रंग वापरून आधीच उमदा दिसणारा प्रभास अजूनच छान दिसतो आणि खरोखरीच राजा वाटतो.  हत्तीवरचा तो स्टंट तर एकदम पाहण्याजोगा आहे खरोखरी लार्जर दॅन लाईफ अनुभव.



 महिष्मती च्या द्वाराशी  असलेले  दोन हत्तीची  शिल्पं केवळ कलात्मकतेचा कळस. 
देवसेनेचा प्रासाद फार सुंदर दाखवला आहे. एक मला विसंगती जाणवली ती म्हणजे, देवसेनेचा प्रदेश बर्फाळ दाखवला आहे, पण तिथेच बरेचसे शेतकरी आणि त्यांची शेती दाखवली आहे. विसंगत आहे खरं  पण तेवढी क्रिएटिव्ह लिबर्टी आपण द्यायला हवी. 

राणा बल्लाळदेवाच्या भूमिकेला न्याय देतो. वेशभूषा, आणि बॉडी लँग्वेज अगदी छान जमवून आणली आहे राणा ने. काही सिक्वेन्स मध्ये बल्लाळदेव भाव खाऊन जातो अमरेंद्र बाहुबली पेक्षा. दोघांनीही शरीर सौष्ठव कमावले आहे आणि त्या त्या भूमिकेला अजून उठाव आणण्याचा प्रयत्न केलाय. याबाबतीत मोठेमोठे सलमान, ह्रितिक यांना पाणी पाजवण्याचे काम राणा आणि प्रभास नी केलेय असे वाटले. 
अनुष्का आणि प्रभास चे एकच गाणे ग्राफिक्स नी अतिशय सुंदर केले आहे. प्रत्येक ठिकाणी काहीतरी सिम्बॉलिक आहेच, हे गाणे ही खूप अंशी सिम्बॉलिक गाणे आहे असे मला वाटले.  
कटप्पा ची भूमिका साकारणाऱ्या सत्यराज बद्दल तामिळ नाडू मध्ये काही प्रॉब्लेम झाला होता. म्हणून २८ ला इथे रिलीज झाला नाही चित्रपट. पण त्यांनी दुसऱ्या भागाच्या पहिल्या अंकात थोडी विनोदी भूमिका छान निभावली आहे. प्रभास ने पण त्या विनोदी भूमिकेला बरीच साथ दिलीये. नासिर बद्दल तर सांगायलाच नको. मला बऱ्याच अंशी शकुनी मामा आठवले (महाभारतातले) नासिर ला बघून. 
राजमाता शिवगामी - रम्या कृष्णन एकदम सुंदर दिसते. तिच्या मनातली घालमेल, तिचे चुकलेले निर्णय आणि लगेच चुकीची माफी मागण्याची प्रवृत्ती तिने अभिनयातून फार छान चितारली आहे. यावेळेला तिच्या भूमिकेला थोडा ग्रे शेड दिला गेलाय पण ती त्यातही छानच दिसते. साड्या तशाच एक से एक. दागिने राजमातेला साजेसे आणि त्यात तिचे ते ठळक कुंकू. अतिशय सुंदर. 
राजमौळीं यांनी लोकांच्या उत्कंठेला न्याय दिला आणि पहिल्या भागाइतकाच दुसरा भागही छान जमलाय. मला तर बाहुबली ३ पण बघायला आवडेल. 



Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटा...

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...