जिमस्य कथा!! आज शुक्रवार, जिम ला रुजु होऊन हाश्श हुश्श!! करत आठ दिवस पूर्ण झाले. डाएट अगदी जोमात सुरु आहे. दिवसातुन ७ वेळा पोटोबा करण्याला कुठ्लं डाएट म्हणतात कुणास ठाऊक? पण मी मात्र मजेत आहे. व्यायामामुळे जरी अजुन खुप वजन कमी झालं नाही तरी भाताच्या जंजाळातुन कायमची सुटका झाल्याचा आनंद काय वर्णावा. भात नं खाल्ल्यास मला वाईट वगैरे वाटेल असं वाटुन माझ्या डाएटीशिअन नी एक वेळा भात खायची परवानगी दिलीए..तिला मात्र मी ठासुन सांगितलं की कृपा करुन मला भात खायला सांगु नकोस..हे ऐकुन तिच्या चेहर्यावरचे आश्चर्याचे भाव मला जणुकाही एकदम "तुम्ही कसं काय भात नं खाता राहु शकता?" हा प्रश्न विचारुन गेले. खरं सांगायचं झालं तर मी लहानपणापासुनच लठठ आहे. ओबेसिटी, बि.एम. आय वगैरे मोजमाप उपलब्ध नसण्याचा तो सुखद काळ. तेव्हा फ़ार फ़ार तर लोक मी ८ वीत असतांना "दहावीत आहे का हो तुमची मुलगी?" असं विचारायचे आईला. आईही जास्तं माईंड करायची नाही असले कमेंट्स. तिने मला कधीही तु लठ्ठ आहेस असं म्हंटलेलं आठवत नाही...ती फ़क्त "तु हेल्थी आहेस" असं म्हणायची. माझं वजन मात्र नेहमीच थोडं जास्तं असाव...
गप्पागोष्टी, खाद्यभ्रमंती आणि सगळ्या मनाला भिडलेल्या गोष्टींची बखर!