Skip to main content

Posts

Showing posts from 2017

अविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी

मागच्या आठवड्यात द ग्रेट गॅटस्बी नॉवेल वाचायला घेतलं. खूप उत्सुकता होती मला. पुस्तकाची सुरुवात खूप साधी पण आत ओढून घेणारी वाटली. पुस्तक सुरु करण्या आधीची प्रस्तावना तर भन्नाट. स्कॉट फित्झगेराल्ड हा लेखक आहे द ग्रेट गॅटस्बी या पुस्तकाचा. १०० वर्षांपूर्वी लिहिलेलं पुस्तक, एक खिळवून ठेवणारं कथानक. जे गॅटस्बी, या अतिशय गूढ अभिव्यक्ती असलेल्या माणसाभोवती रेखाटलेलं. निक कारावे, हा या पुस्तकाचा नरेटर, वॉल स्ट्रीट च्या एका कंपनीत काम करत असतो. तो इस्ट एग या शहरात राहायला आल्यावर त्याच्याबाजूलाच असणाऱ्या मोठ्या, अवाढव्य बंगल्याशी त्याची ओळख होते. आणि हळूहळू त्या बंगल्या च्या मालकाशी म्हणजे  जे गॅटस्बी, या व्यक्तीशी झालेली अगदी साधी ओळख त्याचं आयुष्य कसं बदलून टाकते याचे निक नीच घेतलेला मागोवा म्हणजे हे पुस्तक. स्कॉट फित्झगेराल्ड यांची भाषा ओघवती आहे. १०० वर्षानंतरही त्यांनी वर्णन केलेल्या अमेरिकेशी आपण समरस होऊ शकतो, इतके की आपणच इस्ट एग मध्ये आहोत असे वाटते. जे गॅटस्बी, आणि त्याची व्यक्तीरेखा स्कॉट नी अतिशय छान उभी केली आहे. त्याची राहणी, त्याचा भूतकाळ, त्याची डेझी (म्हणजे निक करावे ची

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती - मुरुक्कू

मुरुक्कू म्हणजे तांदळाच्या पिठाची केलेली चकली. हा माझ्या घरातल्या सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. थोडक्यात थोडे कुरुम कुरुम काहीही आवडणारे माझ्या घरचे गडी आहेत त्यात मग पापड, चिप्स, मुरुक्कू, अगदी फरसाणही चालून जातं. जेवतांना रोज पापड हवाच असा हट्ट आमच्याकडे रोज असतो आणि तो पूर्ण करावाच लागतो. तर दिंटीकल  वरून येतांना असेच एक मुरुक्कू चे गाव लागले त्याचे नाव "माणप्पारै ". इथले मुरुक्कू फारच फेमस आहेत म्हणून रस्त्याच्या कडेला थांबलो एका दुकानात. तिथे जवळपास १० प्रकारचे वेगवेगळे मुरुक्कू होते.एवढ्या प्रकारचे मुरुक्कू मी पहिल्यांदाच बघत होते. चकल्या जश्या आपण घरी करतो तसे मुरुक्कू ही करतात पण खूप वेळ लागतो आणि आजकाल सगळे दुकानात मिळत असल्याने दिवाळीशिवाय कुणी मुरुक्कू करायला धजत नाही. तर माणप्पारै या गावी हे मुरुक्कू अगदी स्वस्त, तेलविरहित मिळतात. माणप्पारै  बऱ्यापैकी कावेरी  नदीच्या तीरावर वसलेलं आहे. हे मुरुक्कू तांदळाचे केलेले असतात. तिथे पिकणारा तांदूळ आणि पिढ्यानपिढ्या मुरुक्कू करणारे कारागार हे तंत्र जुळले आहे त्यामुळेही ह्या पदार्थाला एक वेगळी चव असते. दुकानात पु

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती - सुंडल

चेन्नई तिरुचिरापल्ली हायवे वर ९९ नावाचे एक हॉटेल आहे.परवा दिंटिकल ला जातांना तिथे थांबलो. ऐन छोट्या भुकेची वेळ. कॉफी पण प्यायची होती. नेहेमी ग्रँड स्वीट्स किंवा अड्यार आनंद भवन मध्ये मिळणारी खाण्याची वस्तू, अशी हायवे वरच्या हॉटेलात मिळेल असे वाटलेही नव्हते. पण मस्तपैकी शेंगदाण्याचे सुंडल (साधेच), केळफुलाचे वडे, आणि कॉफी चा आस्वाद घेतला.  वेरकडलाई सुंडल  सुंडल हा प्रकार अतिशय सोपा, वेळेनुरूप आहे असे मला नेहेमी वाटते. ४-५ वाजता पोटात कावळे ओरडायला लागतात, तेव्हा अगदी खूप जास्त नाही आणि कमीही नाही असे "काहीतरी" खायला हवे असते. असेच काहीतरी म्हणजे सुंडल. चणे, शेंगदाणे, चवळी, हिरवे मूग, राजमा, कुळीथ असे कुठलेही कडधान्य सुंडल मध्ये वापरता येते. अगदी साधी सोपी पद्धत आहे सुंडल करण्याची, लक्षात ठेवून कुठलेही कडधान्य आदल्या रात्री भिजत घालावीत, सकाळी त्यातून पाणी निथळू द्यावे , एका सुती कापडात बांधून ठेवावे. मूग, मोट आणि मोड येणारी कडधान्ये थोडी एक दिवस जास्त बांधून ठेवायला लागतात. पण काळे चणे, काबुली चणे, राजमा, चवळी, शेंगदाणे वगैरे ला रात्री भिजवून छानपैकी उकळून घेतले

कथा कहे सो कथक !

माणूस मोठा जरी झाला नं, तरी त्याला लहानपणी दिलेले संस्कार आणि अजून काही त्याला  आवडलेल्या गोष्टी कधीच सोडू शकत नाही. बस्स थोडा वेळ मिळावा आणि राहून गेलेल्या आवडत्या गोष्टी, छंद जोपासण्याची संधी मिळावी. आजकालच्या धकाधकीच्या काळात मी छंद जोपासण्याला कोपिंग मेकॅनिसम म्हणते. हल्ली बऱ्याच गोष्टीला मी रिलेट करू शकत नाही. जसे व्हाट्स अँप, फेसबुक, आजूबाजूचे अगदी बदललेले सतत धावणारे जग. लहानपणी हे असे नव्हते, साधे सोपे आणि सरळ होते असं मला वाटतं. तेवढा वेळ पुन्हा मागे जाऊन येणे शक्य नाही हे ही माहिती आहे, पण मनाला तेवढी शांतता देता यावी ह्या उद्देशाने मी कथक शिकायला सुरु केलं. खरंतर अजून ३ वर्षे थांबली असती तर कदाचित कृष्णवी सोबतच शिकता आलं असतं. पण आपण आधी शिकावे म्हणजे तिला जरा सांगता येईल असे वाटले.  चेन्नई म्हणजे भरतनाट्यम, भरतनाट्यम म्हणजे चेन्नई असं समिकरण वर्षानुवर्षे घट्ट बसलेलं आहे. मार्गळी महिना पूर्ण भरतनाट्यम चे चेन्नईत मोठे प्रोग्रॅम्स होत असतात. म्युसिक अकॅडेमी, नारद गान सभा, कृष्ण गान सभा, मैलापुर फाईन आर्ट्स क्लब, अश्या मोठ्या आणि नामवंत हॉल्स मध्ये मोठे मोठे कलाकार परफॉर्म

One for the road!!

३ दिवसात जवळपास १००० किमी चा पल्ला गाठत आम्ही चेन्नई ला परतणार होतो. कूर्ग वरून सरळ घरी नं येता, आम्ही केरळ ला जायचे ठरवले. मी १० वर्षांपासून तामिळ नाडू त राहते पण मी आजवर कधी केरळ ला गेले नव्हते. ऐकून आश्चर्य वाटेल पण माझ्या दोन अतिशय खास मैत्रिणी केरळ च्याच आहेत. वेळ यायला लागते कदाचित कुठेही जायची. कूर्ग वरून निघालो ते वटकरा या गावी जायला, आमचे खूप प्रिय मित्र श्रीजीत ह्यांचे तिथे घर आहे आणि अनायासे ते संपूर्ण कुटुंबासकट आपल्या गावी होते. सकाळी लवकर निघायचे ते जरा उशिराच निघालो. ब्रेकफास्ट केला तो कर्नाटकी कोळुकट्टइ (म्हणजे तांदुळाचे मुठिये) आणि छानसा सांबर, बटाट्याची भाजी आणि गरमागरम डोसे, गंगाधरन सरांच्या घरी हा मेनू होता. पद्मा मावशींनी म्हणजे गंगाधरन सरांच्या बायकोनीं सगळी सुंदर व्यवस्था केली होती. ५० वर्षे पद्मा मावशी घराची धुरा साम्भाळतायत.  प्लांटेशन्स मध्ये आयुष्य खूप सोपे नसते कधी. कोणी येणार नाही, जाणार नाही, घर आणि एकटेपणा अशी बरीच वर्षे पद्मा मावशींनी गंगाधरन सरांसोबत काढली आहेत, त्यांना आम्ही गेल्याने फारच छान वाटले. त्यांनी केलेल्या कॉफी चा स्वाद अगदी वेगळा होता.  निघ

साहेबाचा बंगला आणि चिरतरुण कॉफी

होसूर - कूर्ग  गुलमोहर  खूप सुंदर असा रस्ता, आजूबाजूला गुलमोहराची झाडे, तेवढ्या गर्मीत आणि उन्हात दिमाखात आपली सुंदर लाल फुले घेऊन उभी असलेली. मजल दरमजल करत आणि वाट चुकत चुकत आम्ही कूर्ग ला पोचलो. खरेतर कूर्ग ला गेलोच नाही, कूर्ग ला बायपास करून टाटा ची कोटाबेट्टा कॉफी इस्टेट आहे, तिकडे निघालो. जसे जसे उंचावर जात होतो तसे तसे थंड वाटत होते. उंचावर येता येता गुलमोहराची साथ केव्हा सुटली कळालेच नाही. आजूबाजूला कॉफी ची झाडे आणि अधून मधून एखादे काळीमिरीच्या वेलाच्या मिठीत असल्यासारखे सिल्वर ओक चे झाड.  बस विराजपेट पासून सुरु झालेले हे कॉफी चे जंगल अगदी परतीच्या प्रवासात सुध्दा बहुतांशी सोबत होते. दुपारच्या टळटळत्या उन्हात सुध्दा ही झाडे एकदम छान टवटवीत दिसत होती.  मन कसं असतं नं? थोडं काही नवीन दिसलं कि रमलं तिथेच. पण कॉफी इस्टेट मला काही नवीन नव्हती. मला फक्त पुन्हा पहिल्यासारखा आस्वाद घ्यायचा होता, ह्या सुंदर कॉफी आणि चहा नि लगडलेल्या भव्य डोंगरांचा.. त्यांची युगायुगांपासून सुरु असलेली साधना मला पुन्हा अनुभवायची होती. ह्या डोंगरांचा सतत सुरु असलेला "सोहम" चा