Skip to main content

Posts

Showing posts from 2019

चेन्नईची खाद्ययात्रा - १

शुक्रवार संध्याकाळची वेळ, संपूर्ण आठवडा धावपळीत गेलेला, एका मीटिंग वरुन येतांना आता घरी जाऊन चहा करण्यापेक्षा संगीता मधे छानपैकी कॉफी घेऊ असा विचार करत मी आणि माझी बहिण संगीताजवळ येऊन ठेपलो. चेन्नई मधे 10 वर्षे झालीत आणि अलवारपेट, आर ए पुरम मधे राहायला येऊन 2-3 वर्षे. चेन्नई मधे आल्यावर "अरे किती तो भात खायचा?" "कंटाळलो बुवा भाताला!" वगैरे दुषणं मी कधीच दिली नाहीत कारण माझ्या मते चेन्नई हे शाकाहारी लोकांसाठी अतिशय अनुकूल खाद्यसंस्कृती असलेलं शहर आहे. गरज असते ती ही संस्कृती समजून घेण्याची. जशी मी चेन्नईत आले तसे माझ्या सासऱ्यांनी मला मैलापुर मधल्या अतिशय प्रसिद्ध अश्या मेस मधे नेले. त्यांना भेटण्यासाठी आम्ही कर्पगंबाल मेस मधे गेलो, तेव्हाची जूनी मेस..जुने बसायचे बाकं, एम् एस अम्मांचे सुप्रभातम आणि अप्पांनी ऑर्डर केलेले पोंगल, वडा, सांबर अजूनही माझ्या लक्षात आहे. नंतर गरोदर असतांना कीरई अड़ै खायचे डोहाळे पण मी तिथेच जाऊन पुरवले.अर्थात कुठे गेल्यावर काय खायचे हा संस्कार माझ्यावर बऱ्यापैकी माझ्या नवऱ्यानी केला. चेन्नईमधे होटेलिंग हा प्रकार फक्तं पनीर आणि नान पुरता म

सैलाब

१९९६ चा काळ होता तो. एकच टीव्ही चॅनेल तेव्हा तुफान प्रसिद्ध होतं ते म्हणजे झी टीव्ही.  बऱ्याच मालिका हिट पण होत्या. माझ्या टीव्ही प्रेमाची सुरुवात झाली शांती या मालिकेने, स्वाभिमान आणि मग एखाद वर्षाने देख भाई देख. या मालिकांनी डेली सोप चं दुकान उघडलं होतं. मग झी वर तारा, बनेगी अपनी बात, हम पांच, आणि असे अनेक धारावाहिक सुरु झाले. वेळ पण लागोपाठ असायची, संध्याकाळी अभ्यास करून झाला की बस सुरु व्हायचे हे कार्यक्रम. थोडे मोठे झाल्यावर एक खूप साधी मालीका सुरु झाली सैलाब नावाची. रेणुका शहाणे, सचिन खेडेकर, प्राजक्ती देशमुख हे प्रमुख कलाकार, रोहिणी हट्टंगडी, निनाद कामत आणि बाकीचेही दर्जेदार कलाकार यात होते. साधी स्टोरी पण सगळ्यांचा अभिनय मात्र लाजवाब. प्रत्येक एपिसोड असा वाटायचा की अगदी बाजूलाच घडतंय सगळं.  शिवानी आणि रोहित चं एकमेकांवरचे प्रेम, त्याला होणारा विरोध आणि पर्यायाने शिवानी चे लग्न अविनाश ( महेश ठाकूर) सोबत असा साधा प्लॉट होता. पण घेतलेली सेटिंग, प्रत्येक एपिसोड चे डायलॉग म्हणजे एकदम दिल खल्लास.  रेणुका शहाणे, शिवानी च्या भूमिकेत छान वाटली पण सगळ्यात भावली ती प्राजक्

नवाबाचे शहर आणि हैदराबाद

आपलीकडे सुट्टीच्या दिवसात मामाच्या गावाला जायचा प्रघात आहे, आता उद्या शाळा सुरु होतेय तेव्हा सुट्टीत काय काय केले हा प्रश्न सालाबादाप्रमाणे विचारला जाईलच म्हणून ही छोटी निबंधवजा पोस्ट :)  यावेळी मामाच्या गावाला तर आम्ही गेलोच पण त्याहीपेक्षा exciting अश्या नवाबाच्या गावाला जायचा योग आला. कामानिमित्त हैदराबाद ला ६-७ महिने राहिले आहे, तेव्हा काही खूप प्रगत नव्हते शहर. एकच जागा होती पॅरॅडाईस. बावर्ची पण अगदी नवेच होते तेव्हा. आणि मी अगदी शहराबाहेर होते राहायला, त्यामुळे माझा शहराशी जास्त संबंध आलाच नाही. माझा पहिला जॉब असल्याने मला जास्त फटकता आले नाही तेव्हा. यावेळी मात्र हॉलिडे मूड मध्ये असल्याने बऱ्यापैकी फिरणे झाले.  पहिला स्टॉप म्हणजे कामथ हॉटेल, आम्ही नामपल्ली रेल्वे स्टेशन ला उतरलो, सकाळची वेळ होती, ड्राइवर नी पिक अप केल्यावर, चहा प्यायला थांबलो कामथ ला, हॉटेल स्टेशन च्या अगदी जवळ आहे. चेन्नई च्या संगीता, सर्वना भवन ची सवय असलेलो आम्ही. चहा बोलावला, इडली, डोसा ऑर्डर केला. लगेच छानपैकी चहा, गरम इडल्या,परपु पोडी, गोडसर असा कानडी सांबार आणि दोन चटण्या आल्यापण टेबल वर. आमची दाक

दाक्षिणात्य खाद्य संस्कृती - पोंगल

जरा उशिराच का होईना, मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. अख्खा महाराष्ट्र जिथे मकर संक्रमण आणि उत्तरायण अनुभवत असतो तिथे थोड्या दूरवर ;) म्हणजे आपल्या तामिळनाडूमध्ये कापण्या सुरु झाल्या असतात आणि पोंगल चा सण अगदी दिवाळीसारखा थाटामाटात साजरा केला जातो. उसाचे ढीग, ओल्या हळदीचे धांडे आणि शेतातून नुकताच आलेला भात यासगळ्यांनी मन आणि घर अगदी भरून जातं. पोंगल म्हणजे तामिळ लोकांची दिवाळी असे म्हणायला  हरकत नाही. दिवाळी हे लोक अगदी एकंच दिवस साजरा करतात. पण पोंगल मात्र ४ दिवसांचा असतो. भोगी , थई पोंगल, माटू पोंगल, काणूम पोंगल असे चार दिवस सगळीकडे सुट्टी असते, सगळे आपापल्या गावी जातात म्हणजे चेन्नई हुन. तर असा हा पोंगल. पोंगल हे खरेतर एका पदार्थाचे नाव आहे. पोंग म्हणजे उतू जाणे. उतू जाणे म्हणजे समृद्धीचे लक्षण मानले जाते आणि पोंगल करतांना वरचे फेसाळलेले पाणी उतू जाऊ देतात पोंगल च्या दिवशी आणि पोंगालो पोंगल असे म्हणतात. मार्गळी महिना संपून थई महिना सुरु झाला म्हणूनही पोंगल ला थई पोंगल असे म्हणतात. भोगी च्या दिवशी सकाळी भयंकर धूर होता आकाशात,  जुन्या वस्तू जाळून घर स्वच्छ केल्या जाते ह्या दिवशी