Skip to main content

सैलाब



१९९६ चा काळ होता तो. एकच टीव्ही चॅनेल तेव्हा तुफान प्रसिद्ध होतं ते म्हणजे झी टीव्ही. 

बऱ्याच मालिका हिट पण होत्या. माझ्या टीव्ही प्रेमाची सुरुवात झाली शांती या मालिकेने, स्वाभिमान आणि मग एखाद वर्षाने देख भाई देख. या मालिकांनी डेली सोप चं दुकान उघडलं होतं. मग झी वर तारा, बनेगी अपनी बात, हम पांच, आणि असे अनेक धारावाहिक सुरु झाले. वेळ पण लागोपाठ असायची, संध्याकाळी अभ्यास करून झाला की बस सुरु व्हायचे हे कार्यक्रम. थोडे मोठे झाल्यावर एक खूप साधी मालीका सुरु झाली सैलाब नावाची. रेणुका शहाणे, सचिन खेडेकर, प्राजक्ती देशमुख हे प्रमुख कलाकार, रोहिणी हट्टंगडी, निनाद कामत आणि बाकीचेही दर्जेदार कलाकार यात होते. साधी स्टोरी पण सगळ्यांचा अभिनय मात्र लाजवाब. प्रत्येक एपिसोड असा वाटायचा की अगदी बाजूलाच घडतंय सगळं. 

शिवानी आणि रोहित चं एकमेकांवरचे प्रेम, त्याला होणारा विरोध आणि पर्यायाने शिवानी चे लग्न अविनाश ( महेश ठाकूर) सोबत असा साधा प्लॉट होता. पण घेतलेली सेटिंग, प्रत्येक एपिसोड चे डायलॉग म्हणजे एकदम दिल खल्लास. 
रेणुका शहाणे, शिवानी च्या भूमिकेत छान वाटली पण सगळ्यात भावली ती प्राजक्ती देशमुख गायत्री च्या भूमिकेत. एके काळी शिवानीची असणारी घनिष्ट मैत्रीण गायत्रीचे रोहित सोबत लग्न होते. आणि सगळेच बदलते. रोहित आणि शिवानी काही वर्षांनी भेटतात आणि त्यांच्यात असलेला दुरावा त्यांच्यात एक ओढ निर्माण करतो. 

त्या ओढीने त्यांचे एकमेकांना भेटणे सुरु होते, हळूहळू ते एकमेकांना पुन्हा उलगडतात आणि त्यांच्या लक्षात येतं की आता ते एकमेकांच्या आयुष्यात रेलेव्हन्ट नाहीयेत. पण ते उलगडेपर्यंत चा प्रवास फार छान दाखवला आहे. आणि सगळ्या एपिसोड्स ला असलेली जगजीत सिंग च्या गझल्स ची साथ. 

सैलाब मधले काही सीन्स म्हणजे 
गायत्रीचे रोहित ला म्हणणे की "पता है रोहित, जो इन्सान एक दुसरे से प्यार करते है वो एक जैसा नही होता. एक इन्सान ज्यादा प्यार करता है और एक कम".  हा खूपच एपिक सीन आहे. एकदम लक्षात राहण्यासारखा. फारसा मेकअप नाही की खूप नेपथ्य नाही. दोघेही त्यांच्या घराच्या खिडकीत बसलेले दाखवले आहेत आणि परस्पर असा संवाद. आजकाल इतके शांत संवाद ऐकायला सुध्दा मिळत नाहीत असे मला वाटते. 

शिवानीचे रोहित ला म्हणणे " जब सामने से तूफ़ान आता हुआ दिख रहा हो तो कश्ती का रुख़ बदलना ही समझदारी है!" हा प्रसंग म्हणजे ह्या मालिकेचा माईलस्टोन असे म्हणता येईल. इथूनच रोहितच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडून येतात. ज्या दिवशी शिवानी चे लग्न होते त्याच दिवशी त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी त्याला कळते,आणि एकाच दिवशी दोन लोक त्याच्या आयुष्यातून जातात. हे पुन्हा कधीतरी आठवताना रोहित म्हणतो " किसी इन्सान का जिंदगी से चले जाना ये अपने आप में एक बहोत बड़ी घटना है." 

रोहित परत मुंबईत आल्यावर त्याच्याकडे काम नसते, तो आजारी असतांना गायत्री त्याची आर्थिक मदत करते, आणि म्हणते "इंसानियत के नाते मैंने जो भी कुछ किया वो कोई भी करता". पण हळूहळू रोहित ला गायत्री हवीहवीशी वाटायला लागते. शिवानी नसल्यामुळे असे होतेय की खरंच रोहित चे गायत्री वर प्रेम आहे ह्या द्वंद्वात प्रेक्षक असतांनाच गायत्री घरच्यांशी भांडून रोहित शी लग्न करते.. आणि मग सुरु होतो रोहितचा यशस्वी प्रवास. जेव्हा रोहित ला बेस्ट डायरेक्टर चा अवार्ड मिळतो तेव्हा  आधीच तयार केलेलं नोट ऑफ थँक्स  म्हणतांना आवर्जून तो आवर्जून सांगतो की "आज मैं जो कुछ भी हु वो मेरी बीवी गायत्री के वजह से, जिसने मेरा कदम कदम पर साथ दिया" हे टीवी वर पाहून शिवानी ला वाईट वाटते आणि पश्चातापही होतो. पण वेळ निघून गेली असते. 

रोहित च्या  एक्स्ट्रा marital अफेयर ची खबर गायत्री ला लागताच तिचे एबॉर्शन होते आणि रोहित साठी गायत्री ने मोठ्या मेहनतीने आणि प्रेमाने बांधलेले घर कोसळायला लागते. त्यांच्यातला तणाव सचिन खेडेकर आणि प्राजक्ती देशमुख नी खूप छान दाखवला आहे. गायत्रीच्या घरी बाळ येणार हे ऐकल्यावर शिवानी थोडी डिस्टर्ब होते. ती म्हणतेही" इन सब चीजोंमे मैं अपना घर कभी बना ही नहीं पायी" पण लवकरच अविनाश ला शिवानी आणि रोहित च्या भेटींबद्दल कळते. हळूहळू हा तिढा सुटतो पण एक सैलाब येऊन गेल्यावर. 

अपनी मंजिल से कहां अपने सफर के हम है... 
रुख़ हवाओंका जिधर का है उधर के हम हैं | 

जगजीत सिंह आणि निदा फ़ाज़ली हे समीकरण एकदम फेमस झालं त्या काळात. 

बेनाम सा ये दर्द ठहर क्यों नहीं जाता 
जो बीत गया वो गुजर क्यों नहीं जाता 

वो एक ही चेहरा तो नहीं सारे जहाँ में
जो दूर है वो दिल से उतर क्यों नहीं जाता

जो बीत गया वो गुज़र क्यों नहीं जाता 

ही अजुन एक जगजीत सिंह ची ग़ज़ल आहे निदा फ़ाज़ली के शब्दों में.

९० एपिसोडस आणि सगळे एपिसोड्स एकदम Subtle.. खूप ड्रामा नाही.. 

माझ्या ब्लॉग ला या महिन्यात १० वर्षे पूर्ण होतायत त्याकरता माझ्या अतिशय आवडत्या  मालिकेची पोस्ट. :) 





Comments

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...