Skip to main content

Posts

Showing posts with the label पोटोबा

फ़ॉरएवर समर विथ नायजेला!!

काही दिवसांपासुन डिस्कवरी च्या ट्रॅवल लिविंग चॅनेल वर फ़ॉरएवर समर विथ नायजेला हा कार्यक्रम बघतेय...सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा तो कार्यक्रम बघितला तेव्हा नायजेला नावाच्या सुत्रधारीणी ला बघुन आणि इम्प्रेस होऊन..तीचं एखादी पाककृती सांगणं आणि करुन दाखवणं इतकं सुखद असतं की सतत बघत रहावं असंच वाटावं..ती जे पदार्थ करते ते मी मुळीच करु शकणार नाही हे मला माहिती असूनही मी तो कार्यक्रम खुप तन्मयतेने बघत असते.पहिलेपासुनच या सगळ्या कुकरी शो मधली मला आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचं शो पुरतं मांडलेलं स्वयंपाकघर...पण नायजेला च्या या शो मध्ये ती खर्‍याखुर्‍या स्वयंपाकघरात रेसिपी बनवते.तिची सगळी भांडी, मोठ्ठाजात फ़्रीज, मोठ्ठं ब्लेंडर आणि तिचा बार्बेक्यु..ह्या माझ्या तिच्या स्वयंपाकघरातल्या आवडणार्‍या वस्तु..कुठलाही पदार्थ करत असतांना ती इतकी त्या पदार्थाबद्दल पॅशनेट असते की मलाही आजकाल तिच्यासारखं पॅशनेट होऊन स्वयंपाक करावा वाटतो.........तिने बनवलेले कप केक्स तर इतके सुंदर होते की त्यांना टी.व्ही तुन उचलुन घ्यावं असं वाटलं होतं मला. विशेष म्हणजे सगळी सामग्री तिने कुठुन आणली इथपर्यंत ती सगळा तपशील देत अस...