Skip to main content

Posts

Showing posts with the label मनातले

डायरी...

काल "सहजच ब्लॉग" वरील "आज मै खुशं हूं" पोस्ट वाचता वाचता अचानक लक्षात आलं की आपण बरेच दिवसांत डायरी लिहिली नाहिए.. लहानपणापासून मला वाटायचं की डायरी लिहिणारी पब्लिक खूप मोठ्ठी होत असते. म्हणजे जे सगळे पुढारी, क्रांतीकारी, लेखक वगैरे असतात ते सगळे डायरी लिहितात हा माझा मीच करून घेतलेला (गैर) समज होता. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला बाबांना कार्यालयाकडून डायरी मिळत असे. १० वी पास झाल्यावर मी बाबांना ही नवी कोरी डायरी मागून घेतली. त्यात नियमित लिहिणं होणार आहे का नाही, मी काय लिहिणार आहे वगैरे गोष्टींचा मला तेव्हा अजिबात पत्ता नव्हता. बस्स!! मला डायरी लिहायचीय हेच माहीत होतं. १० वीत चांगले गुण मिळवूनही मी जरा नाराजंच होते. माझ्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नसल्याने मला लिहिण्यासाठी पहिला वहीला विषय मिळाला. भरभर मला काय वाटतं ते लिहिलं आणि छान हलकं वाटायला लागलं. मुळात कुणीतरी आपलं ऐकतंय हीच कल्पना किती छान आहे. मला खूप सांगायचं असायचं त्या दिवसात पण कुणाला सांगू? हा कायम प्रश्न असायचा माझ्यासमोर. आई, बाबा, छकु होतेच, पण आई एक वेगळीच मैत्रीण होती. वेळोवेळी चुकलं की सावध क...

चीड आणणारे काही..

चीड आणणारे काही.. जोरजोरात बोलणे विशेषतः फ़ोनवर. मोबाईल च्या जोरजोरात वाजणार्या कर्कश्श रिंगटोन्स काही बोलत असतांना, महत्वाचे घरगुती काम करत असतांना टि.व्ही चा आवाज, मोबाईलचा आवाज. खुप जोरात चालणारा पंखा, कुलर, ए.सी आणि त्यांचे आवाज स्वयंपाकघराच्या ओट्यावरची अस्वच्छता. फ़ालतुचं होंकिंग घरात असलेली पाल (प्रत्यक्षात मला काहिही करत नसली तरी ),मुंग्या,किडे रात्री झोपतांना सुरु असलेला लाईट आणि त्याने होणारी गरमी फ़ुरके मारुन चहा पिणे. जेवण झाल्यावर सगळ्यांसमोर जोरदार ढेकर देणे(घरी किंवा पंक्तीत बसले असल्यास ठीक आहे, पण ओफ़िसमध्ये???) नको तिथे फ़िलोसोफ़ि झाडणे. आपणंच किती दुःखी आहोत हे वारंवार सांगणारे लोकं.. तार सप्तकात म्हंटलेली गाणी विशेषकरुन तमिळ गाणी ज्यात नको तिथे तार सप्तक वापरले आहे. आजकालचे रेडिओ मिरची आणि बरेचसे एफ़.एम चैनेल्स आणि त्यावरच्या तथाकथित आर. जे ची वायफ़ळ बडबड. हमाम ची जाहिरात... तमाम सास बहू सिरियल्स. गर्दी...विशेषत: देवळातली. फ़ोनवर बोलतांना खुप पाल्हाळ लावणारी माणसं. "मी महान" चा नारा असलेली माणसं फ़ोर्वर्ड इमेल्स आणि मेसेजेस.. अरेव्वा! बरीच लांब झालीए लिस्ट...

तुझे आहे तुजपाशी...

येतो असा एखादा क्षण जेव्हा तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजता, असं बर्याच वेळा होतं माझ्याबाबतीत. सकाळ पासून मूड जरा खराबच असतो, सकाळचा पहीला चहाही नीट केल्या जात नाही, देवालाही कसाबसाच नमस्कार होतो. ऒफ़िसला जायला पावलं घरातून बाहेर पडता पडत नाहीत. रस्त्याला लागल्यावरही आजुबाजुला फ़कत बघ्यासारखं बघणं सुरु असतं अगदी तटस्थपणे. काम खुप असलं तरी करायची तसुभरही इच्छा होत नाही. मग येतो एखादा ओळखीचा फोन आणि होतात गप्पा. "माझा आज मूड ठिक नाहीए गं." नेहमीच्या स्वरात मी सुरु होते. "का? काय झालं मूड ठीक नसायला?" तिकडचा आवाज म्हणतो.. मी सांगते मग माझी सगळी व्यथा अगदी अथ पासून इती पर्यंत. आज बाई आली नाही पासुन, एवढ्या दूर येण्याजाण्याचा आता मला आता कंटाळा आलाय इथपर्यंत. आतापर्यंत शांत आणि आपलासा वाटणारा आवाज आता जरा बदलायला लागतो. "तुला नं सवय झाली आहे, सगळं चांगलं असतांना चिंतेत रहायची..आजी, आई या सगळयांना लग्नं झाल्यावर किती कामं करायला लागायची माहिती आहे नं तुला?" इथपासुन तिकडचा आवाज मला गृहिणींना रोजच किती खपावं लागतं वगैरे सांगतो... मी आपली मान डोलावते. "त्याम...

आईचा वाढदिवस!!

रोज पहाटे उठून आई पहिले पोळ्या करायची.भात वरणाचा कुकर लावून आमच्या चहा दुधाची व्यवस्था करायची.तिचा वावर झोपेतही जाणवायचा.तिच्या हातातल्या बांगड्य़ांची किणकीण मनाला मोहून घ्यायची. चहा झाल्यावर लगेच अंघोळीला जाऊन सोहळ्यानिशी देवासाठी पाणी भरायची.मग पूजा चालू होत असे.पुजा करायच्या आधी ओट्यावरच भाजी चिरून पटकन फोडणी घालत असे.मग पूजेत बसली की मला गॅस बंद करायला लावत असे.. ९.३० च्या बस ने सेमिनरी हिल्स हून गांधीबाग ला ऑफिसला जायचे असायचे आणि त्याआधी हा सगळा खटाटॊप. "देवा, आज अशीच पुजा आटपली तुमची" हे तिचे आरती झाल्यावरचे वाक्य आणि कितीही लवकर उठलं तरीही पुजा मात्र घाईतच होते गं मुग्धा असं ती नेहमी मला म्हणत असे. संध्याकाळी घरी आल्यावर थोडावेळ बसून नीट हातपाय धुऊन दिवा लावणे,शुभंकरोती म्हणणे आणि मग स्वयंपाकाला लागणे हा तिचा नित्याचा कार्यक्रम. सणावारी तर तिचा उत्साह आणि मेहनत कळस गाठायची.सगळं साग्रसंगीत झालं पाहिजे हा तिचा सतत आग्रह असायचा.मग काय आषाढी एकादशी,गुरुपौर्णिमा, नागपंचमी, श्रावण सोमवार, गणपती, देवीचं नवरात्र सगळे सण थाटात व्हायचे.आषाढी एकादशीला साबुदाण्याची उसळ, बटाट्याची...

प्रश्न...!!

काय गम्मत आहे नाही... दिवसापाठोपाठ रात्र..रात्रीपाठोपाठ दिवस.. न थांबता..न संपता... कालचक्र चालतच आहे युगायुगांपासुन.. कधी हीच चाल खुप धीरगंभीर वाटते.. कधी उच्छ्ल जललहरीसारखी... जरा कुठे विसावलं..जरा कुठे थांबलं की आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देते पायाखालची वाळू सरकवून.. आपण मात्र चढतच राहतॊ .. बांधत राहतो कोळ्यासारखी घरटी.. नियतीने येऊन निस्तनाबूत करायला.. कधी कधी प्रश्न पडतॊ... तुटण्यासाठीच बांधायचं असतं का घरटं? मरण्यासाठीच जगायचं असतं का? काय गम्मत आहे नाही... दिवसापाठोपाठ रात्र..रात्रीपाठोपाठ दिवस.. न थांबता..न संपता... कालचक्र चालतच आहे युगायुगांपासुन.. कधी हीच चाल खुप धीरगंभीर वाटते.. कधी उच्छ्ल जललहरीसारखी... जरा कुठे विसावलं..जरा कुठे थांबलं की आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देते पायाखालची वाळू सरकवून.. आपण मात्र चढतच राहतॊ .. बांधत राहतो कोळ्यासारखी घरटी.. नियतीने येऊन निस्तनाबूत करायला.. कधी कधी प्रश्न पडतॊ... तुटण्यासाठीच बांधायचं असतं का घरटं? मरण्यासाठीच जगायचं असतं का?