Skip to main content

चीड आणणारे काही..

चीड आणणारे काही..
जोरजोरात बोलणे विशेषतः फ़ोनवर.
मोबाईल च्या जोरजोरात वाजणार्या कर्कश्श रिंगटोन्स
काही बोलत असतांना, महत्वाचे घरगुती काम करत असतांना टि.व्ही चा आवाज, मोबाईलचा आवाज.
खुप जोरात चालणारा पंखा, कुलर, ए.सी आणि त्यांचे आवाज
स्वयंपाकघराच्या ओट्यावरची अस्वच्छता.
फ़ालतुचं होंकिंग
घरात असलेली पाल (प्रत्यक्षात मला काहिही करत नसली तरी ),मुंग्या,किडे
रात्री झोपतांना सुरु असलेला लाईट आणि त्याने होणारी गरमी
फ़ुरके मारुन चहा पिणे.
जेवण झाल्यावर सगळ्यांसमोर जोरदार ढेकर देणे(घरी किंवा पंक्तीत बसले असल्यास ठीक आहे, पण ओफ़िसमध्ये???)
नको तिथे फ़िलोसोफ़ि झाडणे.
आपणंच किती दुःखी आहोत हे वारंवार सांगणारे लोकं..
तार सप्तकात म्हंटलेली गाणी विशेषकरुन तमिळ गाणी ज्यात नको तिथे तार सप्तक वापरले आहे.
आजकालचे रेडिओ मिरची आणि बरेचसे एफ़.एम चैनेल्स आणि त्यावरच्या तथाकथित आर. जे ची वायफ़ळ बडबड.
हमाम ची जाहिरात...
तमाम सास बहू सिरियल्स.
गर्दी...विशेषत: देवळातली.
फ़ोनवर बोलतांना खुप पाल्हाळ लावणारी माणसं.
"मी महान" चा नारा असलेली माणसं
फ़ोर्वर्ड इमेल्स आणि मेसेजेस..
अरेव्वा! बरीच लांब झालीए लिस्ट. आमच्या कंपनीत एकदा प्रश्न विचारला होता की "तुम्हाला कुठल्या गोष्टीची प्रचंड चीड आहे?" तेव्हा मला काहीच सुचलं नाही. वरचे सगळे पोइन्ट्स लिहिले असते तर पैकी च्या पैकी मार्क्स मिळाले असते नाही? आणणारे काही..जोरजोरात बोलणे विशेषतः फ़ोन आणणारे काही..
  1. जोरजोरात बोलणे विशेषतः फ़ोनवर.
  2. मोबाईल च्या जोरजोरात वाजणार्‍या रिंग टोन्स
  3. काही बोलत असतांना, महत्वाचे घरगुती काम करत असतांना जोरात सुरु असलेला टी.व्ही , मोबाईलचा आवाज.
  4. खुप जोरात चालणारा पंखा, कुलर, ए.सी आणि त्यांचे आवाज
  5. स्वयंपाकघराच्या ओट्यावरची अस्वच्छता.
  6. फ़ालतुचं Honking
  7. घरात असलेली पाल (प्रत्यक्षात मला काहिही करत नसली तरी ),मुंग्या,किडे
  8. झोपतांना सुरु असलेला लाईट आणि त्याने होणारी गरमी
  9. फ़ुरके मारुन चहा पिणे.
  10. जेवण झाल्यावर सगळ्यांसमोर जोरदार ढेकर देणे (घरी किंवा पंक्तीत बसले असल्यास ठीक आहे, पण ऑफिस मध्ये??)
  11. नको तिथे फिलोसोफी झाडणे.
  12. आपणंच किती दुःखी आहोत हे वारंवार सांगणारे लोकं..
  13. तार सप्तकात म्हंटलेली गाणी विशेषकरुन तमिळ गाणी ज्यात नको तिथे तार सप्तक वापरले आहे.
  14. आजकालचे रेडिओ मिरची आणि बरेचसे एफ़.एम आणि त्यावरच्या तथाकथित आर. जे ची वायफ़ळ बडबड.
  15. हमाम ची जाहिरात...
  16. तमाम सास बहू सिरियल्स.
  17. गर्दी...विशेषत: देवळातली.
  18. फ़ोनवर बोलतांना खुप पाल्हाळ लावणारी माणसं.
  19. "मी महान" चा नारा असलेली माणसं
  20. फॉरवर्ड इमेल्स आणि मेसेजेस..
अरेव्वा! बरीच लांब झालीए लिस्ट. आमच्या कंपनीत एकदा प्रश्न विचारला होता की "तुम्हाला कुठल्या गोष्टीची प्रचंड चीड आहे?" तेव्हा मला काहीच सुचलं नाही. वरचे सगळे पॉइंट्स लिहिले असते तर पैकी च्या पैकी मार्क्स मिळाले असते नाही?
बरेच दिवसांपासून वर लिहिलेल्या सगळ्याच गोष्टींचा मला संताप येतो..काहीही केलं तरी दुर्लक्ष कस्सं म्हणुन करता येत नाही ..म्हणुन म्हंटलं लिहुन पहावं ब्लॉग वर थोडा तरी आराम होईल ;)

Comments

  1. अगदी बरोबर, मनातले !

    ReplyDelete
  2. सहमत आहे.. एक महत्वाची व्यक्ती विसरलात, अशा लोकांना न फटकारता येणारे आपण स्वतः... ( स्वतःची पण चीड येते नां?आपल्याला काहिच करता येत नाही म्हणून??)

    ReplyDelete
  3. :), मला वाटते वरच्यापैकी निम्म्या गोष्टी मी करतो
    ...
    # फ़ुरके मारुन चहा पिणे.
    # जेवण झाल्यावर सगळ्यांसमोर जोरदार ढेकर देणे (घरी किंवा पंक्तीत बसले असल्यास ठीक आहे, पण ऑफिस मध्ये??)
    # नको तिथे फिलोसोफी झाडणे.
    *
    BTW मी नेहमी वाचतो तुमचा ब्लॉग [बरेचसा वाचून होहो बरोबर, असं वाटत आणि मग काही कमेंट टाकत नाही]

    ReplyDelete
  4. ajunahi baryachashya goshti aahet..pan kay kay lihinar??
    pratisadabaddal dhanyavad!!

    ReplyDelete
  5. हे सगळं कधी खुप जवळच्या, किंवा वयाने मोठ्या व्यक्तिंकडुन घडतं ज्यांना काही म्हणता येत नाही किंवा अश्या कुणाकडुन तरी घडतं ज्याच्याशी आपला काहीही संबंध नाही..कुणा कुणाला रागवणार??
    खरंच अश्या वेळी स्वतःचीच चीड येते....आपल्याला काहिच करता येत नाही म्हणून??

    ReplyDelete
  6. पोस्ट लिहितांना वाटलंच होतं तुमचा असा कमेंट येईल म्हणुन...इंट्युशन का काय असं झालं होतं..:)
    ह्यावेळी आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद !!

    ReplyDelete
  7. पटले सगळेच मुद्दे.....खरच फार चिड येते अश्या वेळी.......त्यात आणि एक भर विनाकारण स्वत:ला काम नाही म्हणून आपल्याकडे येउन बसणारे लोक...आणि आपल्या भिडस्त वगैरे स्वभावामुळे विनाकारण त्यांचे मनोरंजन करणारे आपण.....

    ReplyDelete
  8. baki sagla pattala pan hamam chi jahirat ka bar ? :-)

    ReplyDelete
  9. bagha ek wel hamam chi..."Sneha ek saban aan ga!" wali jahirat..ani ekda pahun cheed nahi aali tar varamvar bagha..
    nakki cheed yeil ;)

    ReplyDelete
  10. ho na..to hi ek point hou shakato...
    pratisadabaddal manapasun dhanyavad..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...