Skip to main content

Posts

Showing posts from 2009

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स

टॅगले कुणी मला...

उत्तरे द्यायला बराच उशीर होतोय..पण मुहुर्तच येत नव्हता निवांत बसुन लिहायचा.. Where is your cell phone? बॅगमध्ये आहे... 2.Your hair? आज आनंदी आहेत.. 3.Your mother? माझं दैवत... 4.Your father? कूलेस्ट.... 5.Your favorite food? मांसाहार सोडुन काहीही... 6.Your dream last night?  खुप सारे सांताक्लॉज बेल्स वाजवतायत... 7.Your favorite drink? रेड वाईन... 8.Your dream/goal? स्वतःचं फुड चेन सुरु करायची आहे... 9.What room are you in? ऑफिसमध्ये 10.Your hobby? गाणं म्हणणे...तसा रोज नवीन छंद जडतो मला... 11.Your fear? एकटेपणा... 12.Where do you want to be in 6 years? एक यशस्वी व्यावसायिक... 13.Where were you last night? घरी 14.Something that you aren’t diplomatic? लाईफ़... 15.Muffins? नवर्याला आवडतात.. 16.Wish list item? हजारॊं ख्वाईशें ऐसी... 17.Where did you grow up? भंडारा, नागपूर.. 18.Last thing you did? घरुन ऑफिसला आले.. 19.What are you wearing? सलवार कुर्ता... 20.Your TV? तमिळ बोलत असतो सारखा... 21.Your pets? नाहियेत... 22.Fri

ये जमीं चांद से बेहतर नजर आती है हमें..

जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें.. ये जमीं चांद से बेहतर नजर आतीं है हमें.. सुर्ख फुलोंसे मेहक उठती हैं दिल की राहें दिन ढलें यूं तेरी आवाज बुलाती हैं हमें... याद तेरी कभी दस्तक कभी सरगोशी से रात के पीछ्ले प्रहर रोज जगाती है हमें.. हर मुलाकात का अंजाम जुदाई क्युं है.. अब तो हर वक्त यही बात सताती है हमें.. ये जमीं चांद से बेहतर नजर आती है हमें.. वर्गात बसुन डेस्कवर सुंदर सुंदर गाणी लिहीणार्या माझ्या मैत्रिणीसाठी..नेहासाठी...!!

आवर्तन

आज पुन्हा पावसाचं येणं एखाद्या जुन्या पावसासारखंच वाटलं....आजही बाहेर पडणार्या पावसाचा आवाज तस्साच येतोय जसा पूर्वी यायचा..मला आजीकडे असतांनाचा पावसाळा आठवत नाही. महालातल्या घराला मोठे अंगण नव्हते तरीही आम्ही मुले हरदासांच्या अंगणात जाउन पाऊस बघायचो...हे नक्की आठवतं..घराच्या दारापुढे पावसाचे पाणी वाहत असतांना येणारे बुडबुडे अजुनही तस्सेच आहेत..त्यांचा वाहत जायचा ओघ ही तसाच...तोच थोडा कथ्था थोडा चॊकलेटी रंग पावसाच्या पाण्याचा...काही गोष्टी कधीच बदलत नाहीत.. ------------------------------------------------------------------------------------------------------------- आपल्या आजुबाजुला होणार्या गोष्टी नुसत्या एकेरी होत नसतात तर संपूर्ण आयुष्यात त्यांची आवर्तने होत असतात असं नवीन घरात आल्यापासुन असं वाटत आहे शिफ़्ट झाल्यापासुन नव्या घराबद्दल लिहीणंच झालं नाही...लहानपणी हरदास काकुकडॆ डायनींग टेबल ला लागुन एक मोठ्ठी खिडकी होती..मोठ्ठी म्हणजे त्यावेळी माझ्या मानाने मोठी...मोठ्या, उभ्या गजांआडुन बाजुचं विश्व पाहण्यात मजा येत असे. त्यात मी अगदी मांडी घालुन बसायची..आणि काकूनी दिलेला आव्वा खायची

तेरा होने लगा हुं....

एखाद्या गाण्यानी वेड लावायची ही काही पहीलीच वेळ नव्हे..याआधीही असंख्य गाणी आवडली अगदी वेड्यासारखी पुन्हा पुन्हा ऐकली, गळ्यात उतरवली, मैत्रीणींसमोर गायली, सख्यासाठी गुणगुणली. पण नव्या गाण्यांमध्ये बर्याच दिवसांनी मला हे गाणं खुप आवडलं. प्रत्येक सूर प्रत्येक शब्द अगदी थेट काळजाचा ठाव घेतो. मी हा चित्रपट पाहीला नाही.. ह्या गाण्याच्या क्लिप्स पण बघितल्या नाहीत पण कोण जाणे एक एक शब्द इतका छान गुंफ़लाय की आपल्याला आतवर कुठेतरी गाणं ऐकल्याचं समाधान मिळत राहतं.. सख्याचं आपल्या प्रेयसीला साद घालणं आणि तिचंही त्याचं प्रेम स्विकार करतांना " माझंही तुझ्यावर प्रेम आहे" हे सांगणं मला खुप भावलं. अतिफ़ अस्लम चा आवाज आणि त्याचा प्रत्येक स्वर एखाद्या प्रेमात पडलेल्या मुलीला तिच्याच प्रियकराचा वाटावा इतका नेमका आहे. अलिशाचा आवाज एकदम सेंशुअस. गाण्याची सुरुवातच मुळी अप्रतिम... Shining in the setting sun like a pearl upon the ocean come on feel me Girl feel me Shining in the setting sun like a pearl upon the ocean come on heal me Girl heal me हे ऐकुन तर सुर्यास्ताच्या वेळीचा समुद्राला सुखावण

मी हरवली आहे....

पूर्वीची सकाळ वेगळी असायची. प्रसन्नतेला आपल्या कवेत घेत दिवस सुरू करायचा तोच मुळी आपल्या शर्थीवर प्रत्येक क्षण जगण्याच्या ऊर्मीसकट. वाफाळलेल्या चहाचे घोट गैलरीत निवांत उभं राहून स्वतःच्याच सोबतीत घशात रिचवायचे. खूपच भूक लागली असेल तर भल्या मोठ्या बर्गर ला आपल्या तोंडाची वाट मोकळी करून द्यायची फारशी डाएट वगैरे ची भिती नं बाळगता. सगळ्या गोष्टीची शोधाशोध करत तयारी करायची आणि १० मिनिटे रोज उशीराच कामावर जायचं, दुसऱ्या दिवशीही तेवढंच उशीरा जायचं हे ठरवून, अजिबात वाईट नं वाटू देता. कँटीनमध्ये मस्तं पैकी जेवण हादडून "आज मूड नही है" असं रोजच म्हणत कामाला उद्यावर टाकायचं आणि नेटवर एखादं गाणं शोधून डाउनलोड करायचं, ऐकण्याची तलब आली म्हणून. दुपारी ४ च्या सुमारास प्यायचा एक फक्कड गरम चहा..तोवर ह्याच्याशी गप्पा मारायच्या, माझं काय चाललंय यापासून तो अगदी अनभिज्ञ. त्याने पाहिलेली मी ही अशीच एखाद्या ब्रेकमध्ये. संध्याकाळी घेऊन फिरायचं कधी गप्प, कधी शांत तर कधी समुद्रासारखं मन....कधी कुठल्या मॉल मध्ये तर कधी निवांत बगिच्यात..आणि फोन करायचा त्याला तुझी आठवण येतेय म्हणून...अतिशय आर्त होऊ

...

खुप दिवसांनी कुणीतरी रागवलं मला आज..अचानक वाटलं..आपण हे फ़ीलींग विसरुनच गेलो होतो की.. लहानपणी हे करु नकोस, ते करु नकोस पासुन बर्याच गोष्टींसाठी मी रागवणं खाल्लंय...पण आताशा सगळंच काही परफ़ेक्ट करण्याच्या नादात मी कुठलीही चूक केली नाही आणि पर्यायाने कुणी कुणी म्हणुन रागवलं नाही..कसं मिळमिळीत वाटत होतं आत्तापर्यंत असं वाटायला लागलं आणि कुठेतरी त्या रागवणार्या माणसाचे माझ्यातल्या खोडकर मुलीने आभार मानले... आजचं रागावणं स्पेशल या करीता की, दिवाळीच्या सुट्टीचा याच्याशी थेट संबंध आहे...दिवाळीत नवीन ड्रेस, फ़टाके फ़राळ या सोबत कुठल्याही छोट्याश्या खोडीसाठी आवडत्या मामा किंवा मावशी कडुन डोक्यावर पडलेला टप्पू पण माझ्यासाठी स्पेशल असायचा तसंच हे झालं योगायोगाने... लहानपणी कुणीही रागवलं की, लगेच माझे डोळे भरुन यायचे, नाक लाल व्हायचं आणि गोबरे गाल पार उतरुन जायचे. कुणासमोर गेलं अश्या अवतारात की लगेच सगळी विचारपूस होत असे आणि मला खुप अवघडल्यासारखं वाटत असे. मग हे अवघडलेपणच येऊ नये अश्या प्रयत्नात मी चुका करायलाच विसरले...आणि मोठी झाले..आज मात्र माझं बालपण परत येऊन मला मी मोठी झाल्याचं सांगुन गे

नवं घर..नवा पत्ता!

आपणास कळविण्यास आनंद होतोय की, मुग्धाचा "गुलमोहर!!" आता ब्लॉगर च्या नव्या अंगणात फ़ुलणार आहे. वाचकांनी कृपया नव्या पत्त्याची नोंद घ्यावी.. www.mugdhaaajoshi.blogspot.com आजवर जसे तुम्हा सगळ्यांचे भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळालेत तसे इथून पुढेही मिळावेत आणि माझा गुलमोहर सतत फुलत रहावा अशी छोटीशी इच्छा!! -मुग्धा

हुरहुर...

दिवाळी जवळ येतेय आणि माझं माहेरी जाणंही. या वर्षी सगळेच सण नवे नवे होते. नवी जागा, नवीन प्रथा, नवे लोकं आणि नवी हुरहुर सणासुदीच्या दिवसात कधीही नं लागलेली. सुरुवात झाली ती गणेशोत्सवाने. इथे गणेशोत्सव जरी असला तरी महाराष्ट्राइतक्या प्रमाणावर साजरी केला जात नाही. गणपतीच्या दहा दिवसांत प्रत्येक दिवशी माझं मन तिथल्या आठवणीने खट्टु होत होतं. गणेशचतुर्थीला २१ दुर्वांच्या २१ जुड्यां तोडायला निघालेली माझी स्वारीच माझ्या डोळ्यापुढे आली. ते एक काम मी फ़ार मनोभावे करत असे. बरं फ़क्त २१ च जुड्या नसायच्या त्यात आजीसाठी एक, बाबांसाठी एक, आईसाठी एक अश्या जास्तंच्या ५ जुड्या तोडाव्या लागायच्या. मग अथर्वशीर्षाचे २१ आवर्तनं. आईने केलेला मोदकांचा नैवेद्य. सगळं सगळं डोळ्यापुढे येत होतं प्रत्येक दिवशी. आई गेली आणि ती करत असलेले सणंही गेले. गणपती बाप्पांना मनोमन पुढच्या वर्षी लवकर या म्हंटले आणि आमच्या घरी नक्की या ही स्पेशल रिक्वेस्ट ही केली.. हरतालिका हे मी तिसरीपासुन करत असलेलं व्रत मी याही वर्षी केलं. माझ्या मनाजोगता नवरा दिल्याबद्दल शिवशंकराचे स्पेशल आभार मानले मी यावेळी; ) विदर्भात महालक्ष्म्यांचा सण

रिऍलिटी शोज

रिऍलिटी शोज आजकाल भारतात चांगल्यापैकी चालतात. मला हे शोज कुठुन सुरु झाले वगैरे माहित नाही पण केवळ उत्सुकतेपायी मी ही काल परवा पासुन "बिग बॉस" बघायला लागले आहे (हे माझं प्रामाणिक कन्फ़ेशन!).काही गोष्टी तश्या अमेरिका किंवा तसल्या विकसित देशातील लोकांनाच शोभुन दिसतात हे माझे मत होऊ लागले आहे हल्ली. या सगळ्या शोज चं एक अवलोकन केलं असता पाश्चात्यांनी त्यांची मनोवृत्ती,कुटुंबसंस्था, राहणीमान, संस्कृती, नवरा बायकोचे मुलांचे एकमेकांसोबत असलेले नाते, शिक्षण पध्दती या सगळ्यां गोष्टी सुधारण्यासाठी कदाचित या शोज चा अवलंब केला असावा असे मला वाटते. आणि त्यानुसार हे जे शोज आहेत त्यामध्ये टी आर पी ह्याच एका मुद्द्याचा विचार नं करता बाकी सगळ्या मनोवृत्ती,कुटुंबसंस्था इ इ गोष्टी अगदी जाणीवपूर्वक नीट हाताळल्या गेल्या आहेत. कदाचित कुटुंब, विवाहसंस्था इ इ गोष्टी टिकवुन ठेवणे ही काळाची गरज आहे असे त्यांना वाटले असावे. टी व्ही हेच लोकांना प्रबोधित करण्याचे साधन आहे म्हणुन हे शोज सुरु केले असावेत. अर्थात मी ह्या सगळयाचा खुप सकारात्मक विचार करतेय पण या निमित्ताने का होईना लोक त्यांच्या नातेसंबंधाबद्द

झोपीलागी जीवा....

आताशा पुन्हा मला "झोप" फारच आवडायला लागली आहे. आताशा "पुन्हा" म्हणण्याचे कारण हे की मला समज आल्यापासूनच मला झोप प्रचंड आवडते पण मध्ये जरा गडबड झाली होती. गेली चार वर्षे मी हवी तितकी झोपली नाही असं मला मनापासून वाटतं(तसं माझ्याव्यतिरिक्त माझ्या घरात कुणालाही वाटत नाही याची मला खात्री आहे ) ;) तीझोपेचा आई बाबांना आणि मलाही शोध लागला. त्यांच्यामते (माझ्यामते नाही) मी खूप झोपायचे. ८ ते ९ तास साधारण मनुष्याने झोपावे असं विज्ञान सांगतं हे आई बाबांना कोण सांगणार? त्यांच्यामते मला अभ्यासाचं, परीक्षेचं टेन्शनच नाही असं सिद्धं झालं होतं. आणि मला रोज मला हे काय होतंय? असं वाटायला लागलं. खरं पाहिलं तर असं कुठे लिहिलंय की दहावीच्या विद्यार्थ्यांनी कमी झोपावं?? पण हे बाबा रोज मला इतके रागावायचे की मी उठल्याक्षणी आपण आठ तासापेक्षा किती जास्त झोपलो हे मोजायची. :p , तिला कुठलं तरी टेन्शन आहे म्हणून ती जास्त झोपते" असं Doctor म्हणाले, त्यामुळे मला कुणीही फार झोपते असं म्हटलं की मी सरळ माझ्यावर असलेल्या अतीव ढोंगी टेन्शन ची आठवण करून देत असे. बाबांनी मात्र लगेच त्या Doctor ला मू

शबरीमलय!

विजयादशमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! दक्षिण भारतात आल्यापासुन प्रत्येक चालीरीतींबद्दल दिसागणिक माझं निरीक्षण सुरु आहे अर्थात पहीलेही होतंच पण आता थोडं जास्तं..त्यानुसार इथल्या काही प्रचलित चालीरीतींबद्दल या आणि पुढील लेखांत लिहीणार आहे. १० दिवसांपूर्वी "इकडली स्वारी" शबरीमलय ला जाऊन आली. लग्नाआधी जेव्हा पहिल्यांदा शाम म्हणाला की मी शबरीमलय ला जाणार आहे तेव्हा मला तो एक्दम काळ्या वेष्टीत खुप सार्या माळा घातलेल्या अवतारात दिसला आणि मी घाबरुन लगेच त्याला नको जाउ असं म्हणाले. शबरीमला ला जाणारी मी पाहीलेली सगळीच पब्लिक काळ्या लुंग्या घालुन अनवणी पायानेच असायची..त्यांचा तो अवतार बघुन हे अय्यप्पा स्वामी म्हणजे काही सोपं प्रकरण नव्हे असं वाटायचं मला. पण शाम म्हणाला की काळे कपडे घालायची गरज नाही, भगव्या रंगाचं धोतर घालु शकतो आणि कार्यालयात जातांना नेहमीचे कपडॆ आणि अनवाणी न राहता बुट घालता येतॊ. कुठल्याही नेमात अश्या प्रकारे बदल माझ्यासाठी सुखावह होता. शबरीमलय ला सहसा समुहाने जातात. त्या समुहाच्या म्होरक्याला "गुरुस्वामी" असे म्हणतात. जे पहील्यांदा जातायत त्यांना &q

सामना…कर्करोगाशी(2)

टाटा मेमोरिअल मधे तर जणु काही जत्राच भरली होती..पहिल्या दिवशी आईला डे केअर मध्ये किमोथेरेपी घ्यायला सांगितली...तिला अजिबात सहन न झाल्याने चार दिवसांची लांब किमो सुरु केली..टाटा मेमोरिअल ही एक खुप मोठी संस्था आहे..कुठेतरी सगळेच सुन्न असल्यासारखे वाटतात तिथे...एक मात्र लक्षात आलं तिथे कॅंसर ची कुठलीच जात नाही...टाटाला सगळेच सारखे.. तिथे राहणे हा एक भयंकर अनुभव होता...आईजवळ हॉस्पिटल मध्ये फ़क्त एकच व्यक्ती राहु शकायची त्यामुळे आम्हाला बाहेर कुठेतरी लॉज बघणं आवश्यक होतं..परेल सारख्या ठिकाणी लॉज मिळणं कठीण..शेवटी आमच्या बजेटमधली रहायची जागा गवसली...आईची एक किमो झाल्यावर २ महिन्यानी पुन्हा मुंबईला यायला सांगितलं होतं..नागपुरला अजुन २ किमोथेरेपीच्या सायकल्स घेउन मग पुन्हा मुंबईला जायचं होतं..किमोथेरेपी ने तिच्या अन्ननलिकेभोवती असलेलं लेजन कमी व्हायला हवं होतं.. नागपुरला आल्यावर जरा हायसं वाटलं..हा तिच्यासोबत घालवलेला सुंदर काळ होता.. तिला हे माहित होतं की आता आपले केस जाणार आपण विचित्र दिसणार..पण सुदैवाने असं काही झालं नाहि..तिला त्रास व्हायचा खुप जेवतान्ना..मुग्धा मल नं लोणचं भात खाव वाटतो ग

सामना...कर्करोगाशी

लिसा रे ला कँसर झाला आणि कँसर ला ग्लॅमर प्राप्त झालं.. :) आहे ही तो रोग तसा..रोगांचा राजा म्हणु शकतो आपण त्याला..हळुचकन कुठलीही चाहुल नं लागता येतो आणि आपली धांदल उडवतो.. आपल्या देशाच्या कॅंसरच्या इतिहासावर एकदा या निमित्त्याने नजर टाकुया..यावरुन लक्षात येईल की कुणालाही म्हणजे अगदी कुणालाही हा रोग होऊ शकतो..माझ्या माहितीप्रमाणे रामकृष्ण परमहंस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सिने सॄष्टीतल्या नरगिस दत्त यांसारख्या दिग्गजांना पण या रोगानेच पछाडले होते. माझ्या ओळखिच्या अगदी साळसूद, कुठल्याही प्रकारची वाईट सवय नसलेल्या व्यक्तींनाच या रोगाने ग्रासले होते. लहानपणी दारु पिणार्‍यांना, सिगारेट ओढणार्‍यांनाच कॅंसर होतो अशी माझी ठाम समजुत होती.. १ वर्षापासुन आईला काहीही खाल्लं की तिखट लागत असे..अगदी साधं वरण सुध्दा, तिचं वजन कमी व्हायला लागलं होतं, चिड्चीड वाढली होती...आम्हाला वाटायचं की उपास करते म्हणुन कदाचित वजन कमी होत असावं, आमचे फ़ॅमिली डॉक्ट्र म्हणायचे काही हरकत नाही हो वजन कमी असलं तरी..असंच एके दिवशी जेवता जेवता आईला प्रचंड उलटी झाली डॉ कडे गेले असता त्यांनी ताबडतोब एंडोस्कोपी करायला सांगितल

भुलाबाई आणि भुलोजी

:) बरेच दिवस झाले अनुदिनीकडे पाहुन..म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस तसं काहीसं झालं असावं. लहानपणी नवीन फ़्रॉक, चप्पल, कंपॉस किंवा काहीही घेतलं तरी मला रात्रभर झोपेतही छान वाटत असे. तसंच काहीसं या अनुदिनीबाबतीत झालं. विषय शोधायला लागले मी आपोआप आणि उतरवत गेले जसं वाटेल तसं..काहीवेळा हातच्या कामाकडे दुर्लक्ष करुन, रविवार असाच वाया नं घालवता सकाळी उठुन अशी काहीशी माझ्याही अनुदिनी ची पाने भरली आणि त्याला योग्य ते प्रतिसादही मिळाले... एका नववधूची एका नव्या जागेत नव्या वातावरणात होणारी गम्मत..तिला तिच्या भाषेचं, तिच्या लोकांचं वाटणारं कौतुक, सणंवारं, माहेरची सतत येणारी आठवण हे सगळं भरभरुन मला इथे उतरवता आलं.. नुकतीच माहेरी जाऊन आले...माझी बर्‍याच दिवसाची इच्छा पूर्ण झाली...येतांना एकटीच आली कारण श्रीमंत आधीच परतले होते :) मग काय गाडीने जसा जसा वेग घेतला तशी तशी मी अंतर्मुख होऊ लागले.. आम्ही लहानपणी भुलाबाई बसवत असु..अजुनही विदर्भात कोजागिरीला भुलाबाई बसवतात..आणि वेगवेगळे पदार्थ प्रसादाकरिता बनवुन मोहल्ल्यातल्या पोरी गाणी म्हणतात..त्यादिवशी घरातल्या मोठ्या अपत्याला खास नविन ड्रेस दिल्या जातो. त्

रॅंडम थॉट्स...

कित्येक दिवसांपासुन मी काही लिहिलेलंच नाहीए. कितीदा माझ्या डोक्यात विषय आले..अगदी पॅराग्राफ चे पॅराग्राफ तयार झाले पण टायपता मात्र आले नाही... अनेक घडामोडी झाल्या काही अपेक्षित काही अनपेक्षित..आजकाल काहीही झालं ना की माझ्या मनात एक विचित्र प्रकारची भिती भरते..आता उद्यापासुन श्राध्द पक्षाचे दिवस सुरु होणार...आई म्हणायची हे दिवस चांगले नसतात. Science च्या दृष्टीने पण पावसाळयात पाण्यात होणारे बदल, हवामानात होणारे बदल यांमुळे थोडं सर्दी पडसं ताप हे सगळं येणारंच त्यामुळे मलाही आजकाल हे खरं वाटू लागलंय. बाबांची ५ दिवसापासुन तब्येत बरी नाही. नेहमी हसता खेळता माणुस असा तापाने हैराण असला की खरंच वाईट वाटतं..माझं लक्षंच नाहिए कशात परवापासुन...त्यांची तब्येत बरी नाहिए आणि मी इथुन काहीच करु शकत नाही हे फ़ीलींग खुप बेकार आहे..इथुन डायरेक्ट फ़्लाईट का नाही नागपुरसाठी हा प्रश्न मला नेहमीच पडतो. :( आज बाप्पा जाणार गावाला. इतके दिवस स्वाईन फ़्लु च्या भितीत घालवल्यावर बाप्पाचे आगमन खरंच खुप आनंददायी होते."थांबा हो अजुन थोडे दिवस" असं म्हणावं वाटतंय बाप्पाला. ६ व्या दिवशी मोदक केले,छान झाले असं

डायरी...

काल "सहजच ब्लॉग" वरील "आज मै खुशं हूं" पोस्ट वाचता वाचता अचानक लक्षात आलं की आपण बरेच दिवसांत डायरी लिहिली नाहिए.. लहानपणापासून मला वाटायचं की डायरी लिहिणारी पब्लिक खूप मोठ्ठी होत असते. म्हणजे जे सगळे पुढारी, क्रांतीकारी, लेखक वगैरे असतात ते सगळे डायरी लिहितात हा माझा मीच करून घेतलेला (गैर) समज होता. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला बाबांना कार्यालयाकडून डायरी मिळत असे. १० वी पास झाल्यावर मी बाबांना ही नवी कोरी डायरी मागून घेतली. त्यात नियमित लिहिणं होणार आहे का नाही, मी काय लिहिणार आहे वगैरे गोष्टींचा मला तेव्हा अजिबात पत्ता नव्हता. बस्स!! मला डायरी लिहायचीय हेच माहीत होतं. १० वीत चांगले गुण मिळवूनही मी जरा नाराजंच होते. माझ्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नसल्याने मला लिहिण्यासाठी पहिला वहीला विषय मिळाला. भरभर मला काय वाटतं ते लिहिलं आणि छान हलकं वाटायला लागलं. मुळात कुणीतरी आपलं ऐकतंय हीच कल्पना किती छान आहे. मला खूप सांगायचं असायचं त्या दिवसात पण कुणाला सांगू? हा कायम प्रश्न असायचा माझ्यासमोर. आई, बाबा, छकु होतेच, पण आई एक वेगळीच मैत्रीण होती. वेळोवेळी चुकलं की सावध क

चीड आणणारे काही..

चीड आणणारे काही.. जोरजोरात बोलणे विशेषतः फ़ोनवर. मोबाईल च्या जोरजोरात वाजणार्या कर्कश्श रिंगटोन्स काही बोलत असतांना, महत्वाचे घरगुती काम करत असतांना टि.व्ही चा आवाज, मोबाईलचा आवाज. खुप जोरात चालणारा पंखा, कुलर, ए.सी आणि त्यांचे आवाज स्वयंपाकघराच्या ओट्यावरची अस्वच्छता. फ़ालतुचं होंकिंग घरात असलेली पाल (प्रत्यक्षात मला काहिही करत नसली तरी ),मुंग्या,किडे रात्री झोपतांना सुरु असलेला लाईट आणि त्याने होणारी गरमी फ़ुरके मारुन चहा पिणे. जेवण झाल्यावर सगळ्यांसमोर जोरदार ढेकर देणे(घरी किंवा पंक्तीत बसले असल्यास ठीक आहे, पण ओफ़िसमध्ये???) नको तिथे फ़िलोसोफ़ि झाडणे. आपणंच किती दुःखी आहोत हे वारंवार सांगणारे लोकं.. तार सप्तकात म्हंटलेली गाणी विशेषकरुन तमिळ गाणी ज्यात नको तिथे तार सप्तक वापरले आहे. आजकालचे रेडिओ मिरची आणि बरेचसे एफ़.एम चैनेल्स आणि त्यावरच्या तथाकथित आर. जे ची वायफ़ळ बडबड. हमाम ची जाहिरात... तमाम सास बहू सिरियल्स. गर्दी...विशेषत: देवळातली. फ़ोनवर बोलतांना खुप पाल्हाळ लावणारी माणसं. "मी महान" चा नारा असलेली माणसं फ़ोर्वर्ड इमेल्स आणि मेसेजेस.. अरेव्वा! बरीच लांब झालीए लिस्ट

जिमस्य कथा!!

जिमस्य कथा!! आज शुक्रवार, जिम ला रुजु होऊन हाश्श हुश्श!! करत आठ दिवस पूर्ण झाले. डाएट अगदी जोमात सुरु आहे. दिवसातुन ७ वेळा पोटोबा करण्याला कुठ्लं डाएट म्हणतात कुणास ठाऊक? पण मी मात्र मजेत आहे. व्यायामामुळे जरी अजुन खुप वजन कमी झालं नाही तरी भाताच्या जंजाळातुन कायमची सुटका झाल्याचा आनंद काय वर्णावा. भात नं खाल्ल्यास मला वाईट वगैरे वाटेल असं वाटुन माझ्या डाएटीशिअन नी एक वेळा भात खायची परवानगी दिलीए..तिला मात्र मी ठासुन सांगितलं की कृपा करुन मला भात खायला सांगु नकोस..हे ऐकुन तिच्या चेहर्यावरचे आश्चर्याचे भाव मला जणुकाही एकदम "तुम्ही कसं काय भात नं खाता राहु शकता?" हा प्रश्न विचारुन गेले. खरं सांगायचं झालं तर मी लहानपणापासुनच लठठ आहे. ओबेसिटी, बि.एम. आय वगैरे मोजमाप उपलब्ध नसण्याचा तो सुखद काळ. तेव्हा फ़ार फ़ार तर लोक मी ८ वीत असतांना "दहावीत आहे का हो तुमची मुलगी?" असं विचारायचे आईला. आईही जास्तं माईंड करायची नाही असले कमेंट्स. तिने मला कधीही तु लठ्ठ आहेस असं म्हंटलेलं आठवत नाही...ती फ़क्त "तु हेल्थी आहेस" असं म्हणायची. माझं वजन मात्र नेहमीच थोडं जास्तं असाव