Skip to main content

रोडट्रिप!

रोडट्रीप: 
चेन्नई - आंबूर 

हे वर्ष अतिशय व्यस्त असे काही सुरु झाले, जानेवारी मध्ये माझा कथक चा प्रोग्रॅम होता त्याची प्रॅक्टिस, मग मॅरेथॉन पोस्टपोन होत होत अगदी प्रोग्रॅम च्या आजू बाजूलाच ठरली होती.. हे सगळे होते ना होते तेच माझ्या नणंदेचं लग्न आणि नंतर माझ्या बहिणीची डिलिव्हरी. डिलिव्हरी नुकतीच संपते आणि ती थोडी सेटल होते ना होते तोवर आमचे शिफ्टिंग चे सुरु झाले.. त्यात जवळपास १ आठवडा गेला. मी आणि कृष्णवी दोघींनी ठरवलेच होते की जश्या सुट्ट्या लागल्या तसे कुठेतरी जायचेच. कदाचित हीच अगदी बरोबर वेळ होती बाहेर निघायची आणि थोडा आराम करायची. एका दिवसात प्रोग्रॅम ठरला आणि आम्ही निघालो रोडट्रीप ला. पहिली रोड ट्रिप!  दरवर्षी कृष्णवी लहान म्हणून आम्ही जवळच्या ठिकाणी जाऊन परत येत असू. पण ह्यावेळी तिनेच आग्रह धरला की बाबा दूर जाऊया. आम्ही दोघेही जीआयएस प्रोफेशनल्स असल्याने एक १० वर्षांपूर्वी कॉफ़ी, चहा एस्टेट्स चा सर्वे केला होता, आणि कूर्ग हे ठिकाण तेव्हा आम्हाला फार आवडलं होतं. विशेष म्हणजे तेव्हा तिथे राहण्याचा बंदोबस्त एका ब्रिटिशकालीन  बंगल्यात केला होता. २०१० मधेही गेलो होतो कूर्ग ला पण ती ट्रिप मडिकेरी, थंलकावेरी वगैरे प्रेक्षणीय स्थळे बघण्यात गेली. काही नं ठरवता निघण्यात फार मजा असते, यावेळी एवढंच माहिती होते की कूर्ग ला जायचे.. 
पहिला स्टॉप ओव्हर होता होसूर.. 
पण खूप उशीरा निघाल्याने आंबुर ला थांबलो.. आंबूर बिर्याणी साठी अतिशय प्रसिद्ध आहे. आंबूर ची जिरगसंबा तांदुळाची केलेली बिर्याणी म्हणजे बिर्याणी प्रेमींसाठी पर्वणी. कृष्णवी आणि तिचे बाबा या दोघांनाही बिर्याणी म्हणजे जीव की प्राण. पण आंबूर ला पोचेस्तोवर  ११. ३० वाजून गेले होते.. स्टार बिर्याणी हे हायवे वरचे रेस्टॉरंट आहे, आम्ही रात्री पोहोचलो म्हणून थोडेच लोक होते, पण एरवी खूप गर्दी असते . 
स्टार बिर्याणी 
दुकानदाराने जरा कुणकुण करतंच बिर्याणी च्या ऑर्डर्स घेतल्या. मी नॉन व्हेज खात नसल्याने मला त्या हॉटेल च्या वातावरणाखेरीज काहीच बघण्यासारखे नव्हते :( पण... 
हॉटेल च्या अगदी बाजूलाच लेदर च्या बॅग्स, जोडे, चपला आणि बाकी वस्तूंची २ दुकाने होती. विशेष म्हणजे अश्या बॅग्स मी मुंबई आणि पुण्याव्यतिरिक्त कुठे बघितल्या नव्हत्या. जाऊन बघितले तर मी एकदम उडालेच. मलबेरी, जिमी चू, अश्या नामवंत कंपनीस च्या बॅग्स अगदी परवडेबल किमतीत विकायला होत्या. मला फार आश्चर्य वाटले, कारण नुकतीच कोणीतरी मलबेरी ची बॅग १.५ लाखाला घेतली असे ऐकले होते ती ही चायना वरून आणलेली. १. ५ लाख एखाद्या पर्स साठी म्हणजे काहींच्या काहीच असे माझे प्रामाणिक मत आहे. असावी एखादी छान बॅग पण एवढी महाग...मग इथे मलबेरी पाहून मला खुप अप्रूप वाटले. दुकानदार हिंदी भाषिक होते, ते म्हणाले की जगभरात असलेले मोठे मोठे ब्रॅण्ड्स इथूनच लेदर घेऊन जातात आणि काही काही इथूनच बॅग्स बनवून घेऊन जातात. मलबेरी, जिमी चू हे त्यातले एक. आंबूर ला लेदर फॅक्टरीस आहेत. पुर्वी चेन्नई च्या क्रोम्पेट या जागी लेदर च्या फॅक्टरीस होत्या ज्या राणीपेट आणि आंबूर अश्या ठिकाणी हलवल्या गेल्या. माझ्या बहिणीच्या सासऱयांचा लेदर च्या केमिकल्स चा बिसिनेस आहे आणि त्यांची आंबूरलाच  फॅक्टरी आहे हे ही मला त्याच दिवशी कळाले ;) 
आपल्या देशातून बहुतेक सगळ्या देशांना लेदर चा पुरवठा होतो आणि आपण ब्रँड च्या मागे हजारो रुपये त्यामागे खर्च करतो. गो ग्लोबल थिंक लोकल ही संकल्पना अमलात आणायला हवी हे प्रकर्षाने जाणवले. आंबुर वरून होसूर ला येईस्तोवर पहाट झाली होती, होसूर मध्ये सकाळचा ब्रेकफास्ट एक्दम तामिळ पद्धतीचा होता. आमच्या डोसा प्रिय जनतेचे पोट आणि मन भरल्यावर तिथून पुढची मजल गाठायचे ठरले. पुढील मजल होती, मांड्या, चेन्नपटना आणि म्हैसूर...म्हैसूर ला थांबलो नाही, बायपास केले, पण मांड्या, चेन्न पटना हा भाग अतिशय सुंदर आहे . 
होसूर मधले claresta हॉटेल  

मांड्या या शहराच्या रस्त्यावरची झाडे 

रस्त्यावरच्या हिरव्यागार वृक्षांनी मला प्रसन्न तर वाटलेच पण कर्नाटक शासनाने प्रत्येक वृक्ष जपून रस्ते आणि बाकीचे बांधकाम केले आहे ह्याचे पण कौतुक वाटले. 

Comments

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

झोपीलागी जीवा....

आताशा पुन्हा मला "झोप" फारच आवडायला लागली आहे. आताशा "पुन्हा" म्हणण्याचे कारण हे की मला समज आल्यापासूनच मला झोप प्रचंड आवडते पण मध्ये जरा गडबड झाली होती. गेली चार वर्षे मी हवी तितकी झोपली नाही असं मला मनापासून वाटतं(तसं माझ्याव्यतिरिक्त माझ्या घरात कुणालाही वाटत नाही याची मला खात्री आहे ) ;) तीझोपेचा आई बाबांना आणि मलाही शोध लागला. त्यांच्यामते (माझ्यामते नाही) मी खूप झोपायचे. ८ ते ९ तास साधारण मनुष्याने झोपावे असं विज्ञान सांगतं हे आई बाबांना कोण सांगणार? त्यांच्यामते मला अभ्यासाचं, परीक्षेचं टेन्शनच नाही असं सिद्धं झालं होतं. आणि मला रोज मला हे काय होतंय? असं वाटायला लागलं. खरं पाहिलं तर असं कुठे लिहिलंय की दहावीच्या विद्यार्थ्यांनी कमी झोपावं?? पण हे बाबा रोज मला इतके रागावायचे की मी उठल्याक्षणी आपण आठ तासापेक्षा किती जास्त झोपलो हे मोजायची. :p , तिला कुठलं तरी टेन्शन आहे म्हणून ती जास्त झोपते" असं Doctor म्हणाले, त्यामुळे मला कुणीही फार झोपते असं म्हटलं की मी सरळ माझ्यावर असलेल्या अतीव ढोंगी टेन्शन ची आठवण करून देत असे. बाबांनी मात्र लगेच त्या Doctor ला मू...