Skip to main content

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

सामना…कर्करोगाशी(2)

टाटा मेमोरिअल मधे तर जणु काही जत्राच भरली होती..पहिल्या दिवशी आईला डे केअर मध्ये किमोथेरेपी घ्यायला सांगितली...तिला अजिबात सहन न झाल्याने चार दिवसांची लांब किमो सुरु केली..टाटा मेमोरिअल ही एक खुप मोठी संस्था आहे..कुठेतरी सगळेच सुन्न असल्यासारखे वाटतात तिथे...एक मात्र लक्षात आलं तिथे कॅंसर ची कुठलीच जात नाही...टाटाला सगळेच सारखे.. तिथे राहणे हा एक भयंकर अनुभव होता...आईजवळ हॉस्पिटल मध्ये फ़क्त एकच व्यक्ती राहु शकायची त्यामुळे आम्हाला बाहेर कुठेतरी लॉज बघणं आवश्यक होतं..परेल सारख्या ठिकाणी लॉज मिळणं कठीण..शेवटी आमच्या बजेटमधली रहायची जागा गवसली...आईची एक किमो झाल्यावर २ महिन्यानी पुन्हा मुंबईला यायला सांगितलं होतं..नागपुरला अजुन २ किमोथेरेपीच्या सायकल्स घेउन मग पुन्हा मुंबईला जायचं होतं..किमोथेरेपी ने तिच्या अन्ननलिकेभोवती असलेलं लेजन कमी व्हायला हवं होतं.. नागपुरला आल्यावर जरा हायसं वाटलं..हा तिच्यासोबत घालवलेला सुंदर काळ होता.. तिला हे माहित होतं की आता आपले केस जाणार आपण विचित्र दिसणार..पण सुदैवाने असं काही झालं नाहि..तिला त्रास व्हायचा खुप जेवतान्ना..मुग्धा मल नं लोणचं भात खाव वाटतो ग...