Skip to main content
जिन्नस
- १५० ग्रॅ. मद्रास सुरण
- ६-७ फ़रसबी
- १ बटाटा
- १ गाजर
- १ शेवग्याची शेंग
- २ वाटया दही किंवा ताक
- ३-४ हिरव्या मिरच्या
- १/२ बोटाएवढं आलं
- १ चमचा जीरं
- ४ चमचे नारळाचा किस..
- कढिपत्ता
- १/२ चमचा नारळाचे किंवा गोडे तेल
- हळद
मार्गदर्शन
- सुरण धुऊन त्याचे उभे मध्यम बारीक काप करावेत.
- फरसबी बारीक चिरून घ्यावी.
- बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा नेहमी प्रमाणे चिराव्या.
- गाजराचे उभे काप करावेत.. (अर्ध्या बोटाएवढे)
- कढई ता नेमके पाणी घेऊन या सगळ्या भाज्या उकळायला ठेवाव्यात...
- हिरव्या मिरच्या, जिरे, आलं, नारंळ . मीरे आणि चवीप्रमाणे मीठ यांची पेस्ट तयार करावी..
- भाज्या उकळल्यावर, थोडे पाणी कढईत ठेवून बाकीचे(जास्त असल्यास) टाकून द्यावे..
- तयार केलेली पेस्ट कढईत घालावी आणि २ मिनिटे हालवावे
- दह्याचे ताक करावे आणि त्यात थोडीशी हळद घालावी.
- हे ताक कढईत टाकावे..
- वरून दोन ते तीन कढीपत्त्याची पाने घालावीत
- २ चमचे साधे किंवा नारळाचे तेल घालावे.
- २ मिनिटांनंतर आचे वरून काढावे..
टीपा
- अवियल हा मलयाली पदार्थ आहे.
- गरम भाताबरोबर किंवा फुलक्याबरोबर या पदार्थाची गट्टी छान जमते.
- यात तोंडली, वांगी, दुधी भोपळा अश्या अनेक भाज्या टाकता येतात.
- वर लिहितांना मद्रास सुरण असे लिहिले आहे कारण दोन प्रकारचे सुरण महाराष्ट्रात मिळते. साध्या सुरणाला चिरून चिंचेच्या पाण्यात घालून ठेवतात घश्याला खाज येऊ नये म्हणुन...
- आपण महाराष्ट्रातही कोहळ्याची, किंवा दुधीची दह्याची भाजी करतो.. पण वरून हिंग, मिरची, हळद अशी फोडणी घालतो..
- तसाच हा पदार्थ आहे.. पण ह्यात असलेल्या हिरवी मिरची, आलं आणि जिऱ्याच्या स्वादाने ही भाजी चमचमीत लागते..
- नारळाच्या तेलाने थोडासा केरळचा फील येतो..
मुग्धमणी, माझे अतिशय आवडते आहे अवियल. साधारण अशीच कृती. आता अगदी तुझ्या पध्द्तीनेही करून पाहीन. :)
ReplyDeletemy favorite. so many times i travel all the way to matunga to eat pongal avial
ReplyDeletehey, mugdha mhantalas tari chaalel...nakki karun bagh...mi pahilyandach kele aani mala khup aavadale..
ReplyDeletesang ha mala kasa jhala hota te!
pratisad dilyabaddal dhanyawad!!
mala mahit navhata harekrishnaji ki ya padarthache chaahate mumbaitahi asatil mhanun..:)
ReplyDeletewachun kharach bara vatala..
mala kharatar photos takayache hote..pudhlya veli kela ki takel..
pratisadabaddal dhanyavad..