पुनरागमन!! नवीन सुरुवात.... 


अमिताभ बच्चन चा ब्लॉग मी नियमित वाचते.. अगदी भक्तीने आणि आता ठरवलंय कि मी पण रोज लिहिणार.. काही न काहीतरी लिहिणार.. त्यांची प्रत्येक पोस्त मनाला भिडते..असं सतत वाटत असतं केवढा हुशार माणूस आहे हा.. ओघवती भाषा ...कुठेही खूप साहित्यिक लिहिल्याचा आव नाही.. म्हणूनच कदाचित एवढे लोक वाचतात त्यांचा ब्लॉग..
आपलं जगणं आणि मरण आपल्याच हातात देवानी थोड्या अंशाने का होईना देऊन ठेवलंय असंही मला सतत वाटत राहतं त्यांच्याकडे बघून.. राजेश खन्ना हि ७० वर्षांचेच् होते पण दारूमुळए कसली नासाडी होते माणसाच्या शरीराची.. आणि अर्थात कुटुंब सुख हे हि माणसाच्या जीवनाला एक वेगळा अर्थ देतं...
वाचन, किंवा कुठलाही व्यासंग माणसाच्या जीवनात एक नाविन्य आणत असतं हे मात्र नक्की...
उद्या भेटूया...

मुग्धा


Created using "Marathi for iPhone" App http://bit.ly/gsbUhe

Comments

  1. Thank you very much pankaj...your comment matters a lot to me...keep visiting...:)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी

बाहुबली २

भुलाबाई आणि भुलोजी