मी हरवली आहे....पूर्वीची सकाळ वेगळी असायची. प्रसन्नतेला आपल्या कवेत घेत दिवस सुरू करायचा तोच मुळी आपल्या शर्थीवर प्रत्येक क्षण जगण्याच्या ऊर्मीसकट. वाफाळलेल्या चहाचे घोट गैलरीत निवांत उभं राहून स्वतःच्याच सोबतीत घशात रिचवायचे. खूपच भूक लागली असेल तर भल्या मोठ्या बर्गर ला आपल्या तोंडाची वाट मोकळी करून द्यायची फारशी डाएट वगैरे ची भिती नं बाळगता.

सगळ्या गोष्टीची शोधाशोध करत तयारी करायची आणि १० मिनिटे रोज उशीराच कामावर जायचं, दुसऱ्या दिवशीही तेवढंच उशीरा जायचं हे ठरवून, अजिबात वाईट नं वाटू देता. कँटीनमध्ये मस्तं पैकी जेवण हादडून "आज मूड नही है" असं रोजच म्हणत कामाला उद्यावर टाकायचं आणि नेटवर एखादं गाणं शोधून डाउनलोड करायचं, ऐकण्याची तलब आली म्हणून.

दुपारी ४ च्या सुमारास प्यायचा एक फक्कड गरम चहा..तोवर ह्याच्याशी गप्पा मारायच्या, माझं काय चाललंय यापासून तो अगदी अनभिज्ञ. त्याने पाहिलेली मी ही अशीच एखाद्या ब्रेकमध्ये.

संध्याकाळी घेऊन फिरायचं कधी गप्प, कधी शांत तर कधी समुद्रासारखं मन....कधी कुठल्या मॉल मध्ये तर कधी निवांत बगिच्यात..आणि फोन करायचा त्याला तुझी आठवण येतेय म्हणून...अतिशय आर्त होऊन..पलीकडे अशीच आर्तता जाणवली की मात्र लगेच शांत व्हायचं..कातरवेळला अशी तगमग का जाणवते हे उमगलं असं वाटुन...

घरी परततांना आजुबाजुच्या इमारतीतील घरांमध्ये लागलेले दिवे पाहुन विचार करायचा आपलंही असं असेल कधी छोटंसं घर, दिवेलागणीला असेच लागतील त्यातही दिवे. तोवर आई बाबांकडॆ मनातल्या मनात एक फ़ेरफ़टका मारुन यायचा...आईला कवेत घेऊन एक गोड पापा द्यायचा..आणि बाबांना एक गाढ मिठी देऊन यायची..छकुशी थोड्याश्या गप्पा मारायच्या...हसत खिद्ळत साजरी करायची संध्याकाळ.

पुन्हा घरी परतायचं..रात्रीच्या आभाळाकडॆ बघत बघत...चंद्र,चांदण्यांच्या टोपलीला सोबत घेऊन.."चंद्र खुप छान दिसतोय आज नक्की बघ" असं त्याला सांगत सांगत.

रात्रीच्या पोटोबाची फोनवरंच सोय करायची आणि रुममेटसोबत गप्पांत झोकुन द्यायचं स्वतःला...जेवणासाठी ब्रेक घ्यायचा आणि गप्पा कंटिन्युड....

शनिवार रविवार फक्तं फिरायचं उगाचंच, सगळया दुकानांत फेरफटका मारत. एखादं पुस्तक विकत घ्यायचं पुढच्या आठवड्याची तयारी म्हणुन...आणि त्याचा रविवारी रात्रीच फडशा पाडायचा...

एखाद्या आइसक्रिम पार्लर मध्ये जाऊन आवडतं आइसक्रीम खायचं.. मैत्रिणींच्या गाडीवर बसून रस्त्याने जाता जाता त्याचा आस्वाद घ्यायचा....

लग्नं झाल्याला काल ९ महीने झाले हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा जाणवलं की "तो" मिळाला खरा पण माझ्यातली "मी" मात्र हरवली आहे...

Comments

 1. अजून दोघेच आहात....पुढे पुढे बघ आधि कशी होतीस तेच आठवणार नाही!!!! आठवलंच नाही म्हणजे ’हरवल्याचे’ दु:ख नाही!!! तेव्हा जे आपण असतो तेच खरे आपण असे वाटायला लागते....
  छान झालीये पोस्ट....

  ReplyDelete
 2. खुपच सुंदर झाली आहे पोस्ट

  -अजय

  ReplyDelete
 3. धन्यवाद तन्वी, अजय आणि हरेकॄष्ण जी...
  तन्वी हो ना..अजुन तर दोघेच आहोत..पुढे मज्जा येणार आहे..:)

  ReplyDelete
 4. तन्वी म्हणतेय ते खर गं बाई. दोघांत तिसरा आला ना की बघ कशी मजा येते ते :). छान झालीये पोस्ट. आहेस कुठे आणि? गायबच झालीस. भेट लवकर :).

  ReplyDelete
 5. मुग्धा दोघांत तिसरे आले की ते घरट्यातून उडेस्तोचे दिवस मंतरलेले असतात. आजचे तुझे दिवस पुन्हाही येणार आहेत( सध्या माझे आलेले आहेत...:( अगं १७ वर्षीच उडाला न शोमू-आजकाल सगळीच लेकरं लवकरच पळतात...) पण तेव्हांही दोघेच असाल पण चित्र एकदम वेगळे.मस्त मजा करून घे गं आज.पुढेही मज्जा आहेच पण.....:)
  पोस्ट मस्त.

  ReplyDelete
 6. thanks bhagyashree..khup moththaa palla gathayachaa aahe ajun... :)

  ReplyDelete
 7. :) kahi nahi re..ugachach kahitari watat asta...pratyek veli asa vatla aani break ghetla tar mag kathinach aahe..:)

  ReplyDelete
 8. Hey Mugdha, Kay chan lihtes tu.... khup avadala tuza blog... English madhe bhavna vyakt karne manala patla nahi ani marathi type karta yet nahi manhun asa lihit ahe... anand zala tuza blog vachun...


  ** FAN ***

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

बाहुबली २