Skip to main content

Posts

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे
Recent posts

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित्रीक

चेन्नईची खाद्ययात्रा - १

शुक्रवार संध्याकाळची वेळ, संपूर्ण आठवडा धावपळीत गेलेला, एका मीटिंग वरुन येतांना आता घरी जाऊन चहा करण्यापेक्षा संगीता मधे छानपैकी कॉफी घेऊ असा विचार करत मी आणि माझी बहिण संगीताजवळ येऊन ठेपलो. चेन्नई मधे 10 वर्षे झालीत आणि अलवारपेट, आर ए पुरम मधे राहायला येऊन 2-3 वर्षे. चेन्नई मधे आल्यावर "अरे किती तो भात खायचा?" "कंटाळलो बुवा भाताला!" वगैरे दुषणं मी कधीच दिली नाहीत कारण माझ्या मते चेन्नई हे शाकाहारी लोकांसाठी अतिशय अनुकूल खाद्यसंस्कृती असलेलं शहर आहे. गरज असते ती ही संस्कृती समजून घेण्याची. जशी मी चेन्नईत आले तसे माझ्या सासऱ्यांनी मला मैलापुर मधल्या अतिशय प्रसिद्ध अश्या मेस मधे नेले. त्यांना भेटण्यासाठी आम्ही कर्पगंबाल मेस मधे गेलो, तेव्हाची जूनी मेस..जुने बसायचे बाकं, एम् एस अम्मांचे सुप्रभातम आणि अप्पांनी ऑर्डर केलेले पोंगल, वडा, सांबर अजूनही माझ्या लक्षात आहे. नंतर गरोदर असतांना कीरई अड़ै खायचे डोहाळे पण मी तिथेच जाऊन पुरवले.अर्थात कुठे गेल्यावर काय खायचे हा संस्कार माझ्यावर बऱ्यापैकी माझ्या नवऱ्यानी केला. चेन्नईमधे होटेलिंग हा प्रकार फक्तं पनीर आणि नान पुरता म

सैलाब

१९९६ चा काळ होता तो. एकच टीव्ही चॅनेल तेव्हा तुफान प्रसिद्ध होतं ते म्हणजे झी टीव्ही.  बऱ्याच मालिका हिट पण होत्या. माझ्या टीव्ही प्रेमाची सुरुवात झाली शांती या मालिकेने, स्वाभिमान आणि मग एखाद वर्षाने देख भाई देख. या मालिकांनी डेली सोप चं दुकान उघडलं होतं. मग झी वर तारा, बनेगी अपनी बात, हम पांच, आणि असे अनेक धारावाहिक सुरु झाले. वेळ पण लागोपाठ असायची, संध्याकाळी अभ्यास करून झाला की बस सुरु व्हायचे हे कार्यक्रम. थोडे मोठे झाल्यावर एक खूप साधी मालीका सुरु झाली सैलाब नावाची. रेणुका शहाणे, सचिन खेडेकर, प्राजक्ती देशमुख हे प्रमुख कलाकार, रोहिणी हट्टंगडी, निनाद कामत आणि बाकीचेही दर्जेदार कलाकार यात होते. साधी स्टोरी पण सगळ्यांचा अभिनय मात्र लाजवाब. प्रत्येक एपिसोड असा वाटायचा की अगदी बाजूलाच घडतंय सगळं.  शिवानी आणि रोहित चं एकमेकांवरचे प्रेम, त्याला होणारा विरोध आणि पर्यायाने शिवानी चे लग्न अविनाश ( महेश ठाकूर) सोबत असा साधा प्लॉट होता. पण घेतलेली सेटिंग, प्रत्येक एपिसोड चे डायलॉग म्हणजे एकदम दिल खल्लास.  रेणुका शहाणे, शिवानी च्या भूमिकेत छान वाटली पण सगळ्यात भावली ती प्राजक्

नवाबाचे शहर आणि हैदराबाद

आपलीकडे सुट्टीच्या दिवसात मामाच्या गावाला जायचा प्रघात आहे, आता उद्या शाळा सुरु होतेय तेव्हा सुट्टीत काय काय केले हा प्रश्न सालाबादाप्रमाणे विचारला जाईलच म्हणून ही छोटी निबंधवजा पोस्ट :)  यावेळी मामाच्या गावाला तर आम्ही गेलोच पण त्याहीपेक्षा exciting अश्या नवाबाच्या गावाला जायचा योग आला. कामानिमित्त हैदराबाद ला ६-७ महिने राहिले आहे, तेव्हा काही खूप प्रगत नव्हते शहर. एकच जागा होती पॅरॅडाईस. बावर्ची पण अगदी नवेच होते तेव्हा. आणि मी अगदी शहराबाहेर होते राहायला, त्यामुळे माझा शहराशी जास्त संबंध आलाच नाही. माझा पहिला जॉब असल्याने मला जास्त फटकता आले नाही तेव्हा. यावेळी मात्र हॉलिडे मूड मध्ये असल्याने बऱ्यापैकी फिरणे झाले.  पहिला स्टॉप म्हणजे कामथ हॉटेल, आम्ही नामपल्ली रेल्वे स्टेशन ला उतरलो, सकाळची वेळ होती, ड्राइवर नी पिक अप केल्यावर, चहा प्यायला थांबलो कामथ ला, हॉटेल स्टेशन च्या अगदी जवळ आहे. चेन्नई च्या संगीता, सर्वना भवन ची सवय असलेलो आम्ही. चहा बोलावला, इडली, डोसा ऑर्डर केला. लगेच छानपैकी चहा, गरम इडल्या,परपु पोडी, गोडसर असा कानडी सांबार आणि दोन चटण्या आल्यापण टेबल वर. आमची दाक

दाक्षिणात्य खाद्य संस्कृती - पोंगल

जरा उशिराच का होईना, मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. अख्खा महाराष्ट्र जिथे मकर संक्रमण आणि उत्तरायण अनुभवत असतो तिथे थोड्या दूरवर ;) म्हणजे आपल्या तामिळनाडूमध्ये कापण्या सुरु झाल्या असतात आणि पोंगल चा सण अगदी दिवाळीसारखा थाटामाटात साजरा केला जातो. उसाचे ढीग, ओल्या हळदीचे धांडे आणि शेतातून नुकताच आलेला भात यासगळ्यांनी मन आणि घर अगदी भरून जातं. पोंगल म्हणजे तामिळ लोकांची दिवाळी असे म्हणायला  हरकत नाही. दिवाळी हे लोक अगदी एकंच दिवस साजरा करतात. पण पोंगल मात्र ४ दिवसांचा असतो. भोगी , थई पोंगल, माटू पोंगल, काणूम पोंगल असे चार दिवस सगळीकडे सुट्टी असते, सगळे आपापल्या गावी जातात म्हणजे चेन्नई हुन. तर असा हा पोंगल. पोंगल हे खरेतर एका पदार्थाचे नाव आहे. पोंग म्हणजे उतू जाणे. उतू जाणे म्हणजे समृद्धीचे लक्षण मानले जाते आणि पोंगल करतांना वरचे फेसाळलेले पाणी उतू जाऊ देतात पोंगल च्या दिवशी आणि पोंगालो पोंगल असे म्हणतात. मार्गळी महिना संपून थई महिना सुरु झाला म्हणूनही पोंगल ला थई पोंगल असे म्हणतात. भोगी च्या दिवशी सकाळी भयंकर धूर होता आकाशात,  जुन्या वस्तू जाळून घर स्वच्छ केल्या जाते ह्या दिवशी 

दाक्षिणात्य खाद्य संस्कृती - रसम

चेन्नई मध्ये यावर्षी जास्त पाऊस झाला नाही. त्यावर्षी खूप थंडी असते त्यावर्षी पाऊस नसतोच असे आहे. एवढी थंडी मला तरी १० वर्षात पहिल्यांदाच जाणवली. थंडी आणि आर्द्रता सोबत असल्याने डोके सुन्न झाल्यासारखे वाटते आणि त्यावर एकाच उपाय घरोघरी वापरल्या जातो तो म्हणजे "रसम". मिरे, धने, जिरे , हिंग, लसूण टाकून केलेले आंबटगोड पण झणझणीत रसम म्हणजे या थंडीच्या दिवसात हवे हवेसे वाटते. त्याबरोबर मस्तपैकी गुरगुट्या भात आणि पापड म्हणजे अगदी स्वर्गसुख. रसम हे अनेक प्रकारे केल्या जाते. प्रत्येक घरची जवळपास पद्धत वेगळी असते. मी माझ्या यजमानांकडून  रसम शिकलेय. अप्रतिम रसम करतात ते आणि त्यांनी मला लगेच शिकवलेही. एकदम पाण्यासारखा  पातळ पण अतिशय गुणी असा हा पदार्थ माझ्या सगळ्यात आवडता आहे. आमच्या घरी कोणालाही सर्दी, ताप, खोकला झाला की रसम अगदी लगेच मदतीला धावून येते. औषधी गुणधर्म आणि अफलातून चव यांचा उत्तम मेळ म्हणजे रसम. सार म्हणजे रसम नव्हे. कर्नाटकात केले जाणारे सारू आणि आंध्रात केले जाणारे पूलसु हे सगळे सारखेच जरी वाटत असले तरी त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आजी मसालेभाताबरोबर जे सार करायची ते आणि