विजयादशमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! दक्षिण भारतात आल्यापासुन प्रत्येक चालीरीतींबद्दल दिसागणिक माझं निरीक्षण सुरु आहे अर्थात पहीलेही होतंच पण आता थोडं जास्तं..त्यानुसार इथल्या काही प्रचलित चालीरीतींबद्दल या आणि पुढील लेखांत लिहीणार आहे. १० दिवसांपूर्वी "इकडली स्वारी" शबरीमलय ला जाऊन आली. लग्नाआधी जेव्हा पहिल्यांदा शाम म्हणाला की मी शबरीमलय ला जाणार आहे तेव्हा मला तो एक्दम काळ्या वेष्टीत खुप सार्या माळा घातलेल्या अवतारात दिसला आणि मी घाबरुन लगेच त्याला नको जाउ असं म्हणाले. शबरीमला ला जाणारी मी पाहीलेली सगळीच पब्लिक काळ्या लुंग्या घालुन अनवणी पायानेच असायची..त्यांचा तो अवतार बघुन हे अय्यप्पा स्वामी म्हणजे काही सोपं प्रकरण नव्हे असं वाटायचं मला. पण शाम म्हणाला की काळे कपडे घालायची गरज नाही, भगव्या रंगाचं धोतर घालु शकतो आणि कार्यालयात जातांना नेहमीचे कपडॆ आणि अनवाणी न राहता बुट घालता येतॊ. कुठल्याही नेमात अश्या प्रकारे बदल माझ्यासाठी सुखावह होता. शबरीमलय ला सहसा समुहाने जातात. त्या समुहाच्या म्होरक्याला "गुरुस्वामी" असे म्हणतात. जे पहील्यांदा जातायत त्यांना ...
गप्पागोष्टी, खाद्यभ्रमंती आणि सगळ्या मनाला भिडलेल्या गोष्टींची बखर!