काल "सहजच ब्लॉग" वरील "आज मै खुशं हूं" पोस्ट वाचता वाचता अचानक लक्षात आलं की आपण बरेच दिवसांत डायरी लिहिली नाहिए.. लहानपणापासून मला वाटायचं की डायरी लिहिणारी पब्लिक खूप मोठ्ठी होत असते. म्हणजे जे सगळे पुढारी, क्रांतीकारी, लेखक वगैरे असतात ते सगळे डायरी लिहितात हा माझा मीच करून घेतलेला (गैर) समज होता. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला बाबांना कार्यालयाकडून डायरी मिळत असे. १० वी पास झाल्यावर मी बाबांना ही नवी कोरी डायरी मागून घेतली. त्यात नियमित लिहिणं होणार आहे का नाही, मी काय लिहिणार आहे वगैरे गोष्टींचा मला तेव्हा अजिबात पत्ता नव्हता. बस्स!! मला डायरी लिहायचीय हेच माहीत होतं. १० वीत चांगले गुण मिळवूनही मी जरा नाराजंच होते. माझ्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नसल्याने मला लिहिण्यासाठी पहिला वहीला विषय मिळाला. भरभर मला काय वाटतं ते लिहिलं आणि छान हलकं वाटायला लागलं. मुळात कुणीतरी आपलं ऐकतंय हीच कल्पना किती छान आहे. मला खूप सांगायचं असायचं त्या दिवसात पण कुणाला सांगू? हा कायम प्रश्न असायचा माझ्यासमोर. आई, बाबा, छकु होतेच, पण आई एक वेगळीच मैत्रीण होती. वेळोवेळी चुकलं की सावध क...
गप्पागोष्टी, खाद्यभ्रमंती आणि सगळ्या मनाला भिडलेल्या गोष्टींची बखर!