Skip to main content

Posts

दाक्षिणात्य खाद्य संस्कृती - रसम

चेन्नई मध्ये यावर्षी जास्त पाऊस झाला नाही. त्यावर्षी खूप थंडी असते त्यावर्षी पाऊस नसतोच असे आहे. एवढी थंडी मला तरी १० वर्षात पहिल्यांदाच जाणवली. थंडी आणि आर्द्रता सोबत असल्याने डोके सुन्न झाल्यासारखे वाटते आणि त्यावर एकाच उपाय घरोघरी वापरल्या जातो तो म्हणजे "रसम". मिरे, धने, जिरे , हिंग, लसूण टाकून केलेले आंबटगोड पण झणझणीत रसम म्हणजे या थंडीच्या दिवसात हवे हवेसे वाटते. त्याबरोबर मस्तपैकी गुरगुट्या भात आणि पापड म्हणजे अगदी स्वर्गसुख. रसम हे अनेक प्रकारे केल्या जाते. प्रत्येक घरची जवळपास पद्धत वेगळी असते. मी माझ्या यजमानांकडून  रसम शिकलेय. अप्रतिम रसम करतात ते आणि त्यांनी मला लगेच शिकवलेही. एकदम पाण्यासारखा  पातळ पण अतिशय गुणी असा हा पदार्थ माझ्या सगळ्यात आवडता आहे. आमच्या घरी कोणालाही सर्दी, ताप, खोकला झाला की रसम अगदी लगेच मदतीला धावून येते. औषधी गुणधर्म आणि अफलातून चव यांचा उत्तम मेळ म्हणजे रसम. सार म्हणजे रसम नव्हे. कर्नाटकात केले जाणारे सारू आणि आंध्रात केले जाणारे पूलसु हे सगळे सारखेच जरी वाटत असले तरी त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आजी मसालेभाताबरोबर जे सार कराय...

डिशवॉशर बद्दल बोलू कौतुके

डिशवॉशर बद्दल बोलू कौतुके मग आता डिशवॉशर घेतलाय का? काय फायदा सगळी भांडी धुवूनच तर लावावी लागतात वगैरे दूषणे देऊन माझ्या घरी एकदाचे डिशवॉशर चे आगमन झाले. बरेचसे कुतूहल आणि आपण घेतलाय खरा पण भारतीय भांड्यांकरता वापरता येईल का हे काही प्रश्न मला सतत भेडावत होते. चांगले ६-७ महिने अभ्यास करून मी ब्रँड ठरवला होता आणि अगदी वापरूनही पहिला डिशवॉशर मनातल्या मनात म्हणा ना ;). काल पुलं च्या अपूर्वाई पुस्तकात इंग्लिश माणसाबद्दल बरेच वाचले. अतिशय सुंदर वर्णन आणि त्यात त्या काळातल्या लंडन च्या जीवनशैलीमध्ये त्यांनी अत्याधुनिक उपकरणांचा केलेला उल्लेख थोडा सुखावह होता. सुखावह असण्यास कारण हे  की  ५० वर्षानंतर का होईना माझ्यासारखी सर्वसामान्य भारतीय गृहिणी डिशवॉशर सारखे अत्याधुनिक उपकरण घेऊ शकते. आणि वापरही करते बऱ्यापैकी. मेट्रो किंवा ट्यूब  बद्दल हि बरेच काही लिहिले होते, इतक्यात चेन्नई मध्ये मेट्रो साठी खणलेल्या भुयाराजवळून बस गेल्याने एक भयंकर खड्डा पडला रस्त्याला, त्यामुळे भारताची प्रगती गृहिणींनी केलेल्या उपकरणांच्या वापरावर अवलंबून नाही हे मला खटकन लक्षात आले :) डिशवॉशर ...

अविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी

मागच्या आठवड्यात द ग्रेट गॅटस्बी नॉवेल वाचायला घेतलं. खूप उत्सुकता होती मला. पुस्तकाची सुरुवात खूप साधी पण आत ओढून घेणारी वाटली. पुस्तक सुरु करण्या आधीची प्रस्तावना तर भन्नाट. स्कॉट फित्झगेराल्ड हा लेखक आहे द ग्रेट गॅटस्बी या पुस्तकाचा. १०० वर्षांपूर्वी लिहिलेलं पुस्तक, एक खिळवून ठेवणारं कथानक. जे गॅटस्बी, या अतिशय गूढ अभिव्यक्ती असलेल्या माणसाभोवती रेखाटलेलं. निक कारावे, हा या पुस्तकाचा नरेटर, वॉल स्ट्रीट च्या एका कंपनीत काम करत असतो. तो इस्ट एग या शहरात राहायला आल्यावर त्याच्याबाजूलाच असणाऱ्या मोठ्या, अवाढव्य बंगल्याशी त्याची ओळख होते. आणि हळूहळू त्या बंगल्या च्या मालकाशी म्हणजे  जे गॅटस्बी, या व्यक्तीशी झालेली अगदी साधी ओळख त्याचं आयुष्य कसं बदलून टाकते याचे निक नीच घेतलेला मागोवा म्हणजे हे पुस्तक. स्कॉट फित्झगेराल्ड यांची भाषा ओघवती आहे. १०० वर्षानंतरही त्यांनी वर्णन केलेल्या अमेरिकेशी आपण समरस होऊ शकतो, इतके की आपणच इस्ट एग मध्ये आहोत असे वाटते. जे गॅटस्बी, आणि त्याची व्यक्तीरेखा स्कॉट नी अतिशय छान उभी केली आहे. त्याची राहणी, त्याचा भूतकाळ, त्याची डेझी (म्हणजे निक करावे...

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटा...

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत क...

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती - मुरुक्कू

मुरुक्कू म्हणजे तांदळाच्या पिठाची केलेली चकली. हा माझ्या घरातल्या सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. थोडक्यात थोडे कुरुम कुरुम काहीही आवडणारे माझ्या घरचे गडी आहेत त्यात मग पापड, चिप्स, मुरुक्कू, अगदी फरसाणही चालून जातं. जेवतांना रोज पापड हवाच असा हट्ट आमच्याकडे रोज असतो आणि तो पूर्ण करावाच लागतो. तर दिंटीकल  वरून येतांना असेच एक मुरुक्कू चे गाव लागले त्याचे नाव "माणप्पारै ". इथले मुरुक्कू फारच फेमस आहेत म्हणून रस्त्याच्या कडेला थांबलो एका दुकानात. तिथे जवळपास १० प्रकारचे वेगवेगळे मुरुक्कू होते.एवढ्या प्रकारचे मुरुक्कू मी पहिल्यांदाच बघत होते. चकल्या जश्या आपण घरी करतो तसे मुरुक्कू ही करतात पण खूप वेळ लागतो आणि आजकाल सगळे दुकानात मिळत असल्याने दिवाळीशिवाय कुणी मुरुक्कू करायला धजत नाही. तर माणप्पारै या गावी हे मुरुक्कू अगदी स्वस्त, तेलविरहित मिळतात. माणप्पारै  बऱ्यापैकी कावेरी  नदीच्या तीरावर वसलेलं आहे. हे मुरुक्कू तांदळाचे केलेले असतात. तिथे पिकणारा तांदूळ आणि पिढ्यानपिढ्या मुरुक्कू करणारे कारागार हे तंत्र जुळले आहे त्यामुळेही ह्या पदार्थाला एक वेगळी चव अस...

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती - सुंडल

चेन्नई तिरुचिरापल्ली हायवे वर ९९ नावाचे एक हॉटेल आहे.परवा दिंटिकल ला जातांना तिथे थांबलो. ऐन छोट्या भुकेची वेळ. कॉफी पण प्यायची होती. नेहेमी ग्रँड स्वीट्स किंवा अड्यार आनंद भवन मध्ये मिळणारी खाण्याची वस्तू, अशी हायवे वरच्या हॉटेलात मिळेल असे वाटलेही नव्हते. पण मस्तपैकी शेंगदाण्याचे सुंडल (साधेच), केळफुलाचे वडे, आणि कॉफी चा आस्वाद घेतला.  वेरकडलाई सुंडल  सुंडल हा प्रकार अतिशय सोपा, वेळेनुरूप आहे असे मला नेहेमी वाटते. ४-५ वाजता पोटात कावळे ओरडायला लागतात, तेव्हा अगदी खूप जास्त नाही आणि कमीही नाही असे "काहीतरी" खायला हवे असते. असेच काहीतरी म्हणजे सुंडल. चणे, शेंगदाणे, चवळी, हिरवे मूग, राजमा, कुळीथ असे कुठलेही कडधान्य सुंडल मध्ये वापरता येते. अगदी साधी सोपी पद्धत आहे सुंडल करण्याची, लक्षात ठेवून कुठलेही कडधान्य आदल्या रात्री भिजत घालावीत, सकाळी त्यातून पाणी निथळू द्यावे , एका सुती कापडात बांधून ठेवावे. मूग, मोट आणि मोड येणारी कडधान्ये थोडी एक दिवस जास्त बांधून ठेवायला लागतात. पण काळे चणे, काबुली चणे, राजमा, चवळी, शेंगदाणे वगैरे ला रात्री भिजवून छानपैकी उकळून घेतले ...