Skip to main content

उन्नै मरंदिड मुडियादे (तुला विसरणं शक्य नाही)..रहमान..:)

गेले काही दिवस मनात हे गाणं सारखं चालुच आहे. एक निखळ प्रेमाची कथा आणि ए. आर रहमान चं संगीत आणि खुप सुंदर शब्द..खरंतर तमीळ भाषा म्हणजे माझ्यासाठी "काला अक्शर भैस बराबर" आहे..पण हे गाणं थेट काळजालाच भिडतं...याचं कारण म्हणजे ए.आर रहमान..त्यानी गाण्यात केलेला शहनाईचा उत्तम वापर. हे गाणं म्हणजे क्लासिकल आणि पाश्चिमात्य संगिताची उत्तम सांगड आहे..
गाण्याची सुरुवात टाळांनी होते..ध्रुपद सुरु होण्यापूर्वी आपण एखाद्या लग्नात गेलो आहोत असा काहीसा भास होतो(पण विडिओत असं काही दाखवलं नाहीए)..
मल्यालम आणि तमीळ भाषेत मुलींना "पोण्णं" असं म्हणतात..ओमाना पेण्णे याचा अर्थ लाघवी, आणि सुंदर मुलगी..पोण्णं च पेण्णं हा साहित्यिक उल्लेख..ओमाना पेण्णे याचा हे सुंदर मुली असा तर अर्थ पण मराठीत असं लिहीणं मलाच विचित्र वाटतं..म्हणुन आपण ओमाना पेण्णे चा अर्थ "प्रिये" घेऊ..
ओ माना पेण्णे म्हणजे वधु..म्हणुनच कदाचित शहनाईचा वापर केला आहे रहमान नी....फ़ील यावा म्हणुन..

आहा आडडा पेण्णे..उन अळगिल.. नान कण्णे सिमटवुम मरंदेन..हे आनल हे कंडेन हे ओर आयरम कणवं..हे कयरुम येन आयरम इरवं..

म्हणजे प्रिये, मी तुझ्या सौंदर्यामुळे अवाक झालो..आणि डॊळे नं मिटताच तु दाखवलेल्या हजार स्वप्नांचा साक्शी झालो..प्रत्येक रात्र विरघळली त्या सुंदर स्वप्नांत..

नी दान वंदाय सेन्ड्राय( तू तर सारखी येतेस, जातेस आणि माझ्या काळजाचा ठाव घेतेस..)..येन विरिगल इरंडेय पिरडी कोंड्राय..(माझं चोरलेलं मन मला परत करशील का?)
ओमाना पेण्णे ओमाना पेण्णे ओमाना..ओमाना पेण्णे..
उन्नै मरंदिड मुडियादे..(प्रिये, तुला विसरणं शक्य नाही...)

ओमाना पेण्णे उयिर तरवद सरिडादे..(प्रिये माझं आयुष्य तुला देऊन टाकणंच योग्य आहे...)

नी पोगुम वळियिल निळलावे (मी तुझ्या आयुष्याच्या मार्गावरील प्रेमाची सावली होईन..)
काट्रिल..असैगिरथ उन सेलै..(तुझ्या दुःखावर फ़ुंकर घालीन)
विडैगिरद उन कालै..(माझा दिवस तुझ्या बोलण्याने तुझ्या बघण्याने सुरु होतो)
उन पेच उन पार्वै..नगरिडथुम  पगलै इरवै..ओहोहोहो...
इरंथालुम,पिरंथालुम (जरी आपण सोबत राहीलो किंवा दूर झालो)
उयिर कुटिल..सरी पाथि उनथे..(तरी माझं हृदय तुझंच राहील)
उन इन्बम, उन तुन्बम..एनद(तुझी सुखंदुःख सदैव माझीच राहतील)
येन उदलोड मुडी वानई..(तू माझ्या आयुष्यातला अविभाज्य अंग झाली आहेस..माझी प्रिया झाली आहेस)
ओमाना पेण्णे ओमाना पेण्णे ओमाना पेण्णे...उन्नै मरंदिड मुडियादे..(प्रिये, तुला विसरणं शक्य नाही...)
ओमाना पेण्णे उयिर तरवद सरिडादे..(प्रिये माझं आयुष्य तुला देऊन टाकणंच योग्य आहे...)

आता सुरु होतो तो एक अतिशय सुंदर भाग या गाण्याचा..मल्यालम ही सांगीतिक भाषा आहे असं म्हणतात..कल्याणी मेनन नी लिहीलेल्या आणि गायलेल्या ह्या चार ओळीतून मल्यालम या सुंदर भाषेचं सांगीतिक रुप आपल्या समोर येतं..अगदी हळुच..याचं फ़ुल क्रेडीट मोझार्ट ऒफ़ मद्रास ला जातं..

मरगद तुट्टीलिल ( पाचूंसारख्या सुंदर जंगलात..) केरळ्चं हिरवी पैठणी घातलेलं रुप लगेचच डोळ्यासमोर येतं हे ऐकलं की..
मलयाली गल तरट्टूम..(मलयाली लोक अंगाई गातायत तुझ्यासाठी)....पेण अळगे (हे सुंदर मुली!) कल्याणी मेनन नी हे "पेण अळगे" इतकं सुंदर गायलंय की मोतिया रंगाची सोनेरी जरी घातलेली सुंदर मल्याली मुलगीच डॊळ्यासमोर उभी राहते..
माथंगल तोप्पुगलील.. (दोन सुंदर पक्षी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतायत..)
पुंगुइलुन इन चेर्न..(तेच तिच्यासाठी सुंदर गाणी म्हणतायत)
पुल्लागुळल उथुगयान
मिन अळगे..मिन अळगे.. (तीच सुंदर मुलगी नं तुझी प्रेमिका?).. (तीच सुंदर मुलगी नं तुझी प्रेमिका?)

तल्ली पोनाल..थै पिरईन (तो चंद्र बघ आकाशातला..तोही हळुहळु अस्ताला जातोय..)
आगाया वेण्णीलावे..अंगयेह निंड्रीराथे..(तू तिथेच नको राहुस..तुला माझ्याजवळ यायचंय..)
नी वेंडुम..अरुघे..ओरु पार्वै, सिरु पार्वै..उडिर्थाल उडिर्थाल पिळैपेन...पिळैपेन...पोडियन(एक वेळ बघ ना माझ्याकडे...मी जगेन..तुझ्या एकदा पाहण्याने माझे श्वास पुन्हा सुरु होतील)...

ओमाना पेण्णे ओमाना पेण्णे ओमाना पेण्णे...उन्नै मरंदिड मुडियादे..(प्रिये, तुला विसरणं शक्य नाही...)
ओमाना पेण्णे उयिर तरवद सरिडादे..(प्रिये माझं आयुष्य तुला देऊन टाकणंच योग्य आहे...)

पोस्ट इंटरनैशनल अवार्डस रहमान कडुन असलेल्या अपेक्षा खुप उंचावल्या होत्या.त्याने नव्याने संगीत दिलेल्या "विनैतांडी वरुवाया"  या चित्रपटातलं हे गाणं आहे...अर्थातच सगळीच गाणी अतिशय सुंदर आहेत पण त्यात हे एक कमी गती असलेलं गाणं..इथे लिहीतेय.भाषा सुंदर असतेच पण संगीत सगळ्या भाषा, जातपात, धर्म यांच्या पलिकडे आहे हे पुन्हा एकदा रहमान नी स्पष्टपणे जाणवुन दिलंय...
नक्की ऐका..
http://www.youtube.com/watch?v=VKNYviyRcwQ&feature=related


रहमान ला एकच म्हणावं वाटतं...उन्नै मरंदिड मुडियादे (तुला विसरणं शक्य नाही)..रहमान..:)

(इंग्रजी भाषांतर (http://euphonicreflections.blogspot.com/) वरुन मराठीत अनुवाद केला आहे)

Comments

  1. मस्तच गं.....आम्ही कॉलेजला असताना बॉम्बे चे ’कहेना ही क्या’ असेच तामिळमधे पाठ केले होते.....अजुनही बरेचदा मी तेच म्हणते....
    कण्णालने येनद कण्णे नेट्रोद काणविल्ले
    येन्कंगलै परित्त कोंडूं येन ईन्नम पेस विल्लै
    आलान उरसेदी आरियामलै
    आलयपायूम सिरबैदी नानं
    उनपेरुम येन्पेरुमं तेरियामलै
    उल्लंगळ येडमारुं येनौ
    वायपेसवे वायपिल्लये वलितीर वणियुमौ.....

    आता पुर्ण गाणं आठवत नाही, पण तुझी पोस्ट वाचून भुतकाळ (हॉस्टेलमधला ) आठ्वला बघ....असे रोजा, हिंदुस्तानीचेही गाणी तामिळमधे पाठ केली होती....

    ReplyDelete
  2. खुपच छान. हे वाचल्यावर मला ’दिल से’ मधल्या जिया जले ची आठवण आली. त्यात सुध्दा असेच काहीसे शब्द आहेत जे आपल्या मराठी बोलणाऱ्यांना बिलकुल कळत नाहीत. परंतु ऎकायला मात्र मधुर असतात.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...