Skip to main content

चेन्नईची खाद्ययात्रा - १

शुक्रवार संध्याकाळची वेळ, संपूर्ण आठवडा धावपळीत गेलेला, एका मीटिंग वरुन येतांना आता घरी जाऊन चहा करण्यापेक्षा संगीता मधे छानपैकी कॉफी घेऊ असा विचार करत मी आणि माझी बहिण संगीताजवळ येऊन ठेपलो.
चेन्नई मधे 10 वर्षे झालीत आणि अलवारपेट, आर ए पुरम मधे राहायला येऊन 2-3 वर्षे. चेन्नई मधे आल्यावर "अरे किती तो भात खायचा?" "कंटाळलो बुवा भाताला!" वगैरे दुषणं मी कधीच दिली नाहीत कारण माझ्या मते चेन्नई हे शाकाहारी लोकांसाठी अतिशय अनुकूल खाद्यसंस्कृती असलेलं शहर आहे. गरज असते ती ही संस्कृती समजून घेण्याची. जशी मी चेन्नईत आले तसे माझ्या सासऱ्यांनी मला मैलापुर मधल्या अतिशय प्रसिद्ध अश्या मेस मधे नेले. त्यांना भेटण्यासाठी आम्ही कर्पगंबाल मेस मधे गेलो, तेव्हाची जूनी मेस..जुने बसायचे बाकं, एम् एस अम्मांचे सुप्रभातम आणि अप्पांनी ऑर्डर केलेले पोंगल, वडा, सांबर अजूनही माझ्या लक्षात आहे. नंतर गरोदर असतांना कीरई अड़ै खायचे डोहाळे पण मी तिथेच जाऊन पुरवले.अर्थात कुठे गेल्यावर काय खायचे हा संस्कार माझ्यावर बऱ्यापैकी माझ्या नवऱ्यानी केला. चेन्नईमधे होटेलिंग हा प्रकार फक्तं पनीर आणि नान पुरता मर्यादित नाही. इथे 3 ते 4 प्रकारचे होटेल्स बघायला मिळतात.
1. टिफिन, मील्स हॉटेल्स
2. मेसेस ( शाकाहारी, मांसाहारी)
3. थीम हॉटेल्स
4. कैफेस
टिफिन, मील्स हॉटेल्स
- संगीता, सरवना भवन, अड्यार आनंद भवन, वसंता भवन हे तीन शाकाहारी टिफिन आणि मील्स साठी उत्तम आहेत. संगीता हॉटल चं जेवण आणि सर्विस मला त्यातल्या त्यात आवडते. घाईच्या वेळेस, खुप भुकेच्या वेळेस संगीता हॉटेल बेस्ट असते. आता सध्या टिफिन म्हणजे ब्रेकफास्ट साठी मला मुरुगन इडली हॉटेल पण आवडायला लागले आहे. सर्विस एकदम छान असते मुरुगन इडली वाल्यांची. विशेष म्हणजे या सगळ्या हॉटेल्स ची चेन संपूर्ण तमिल नाडु मधे पसरली आहे.
- काय काय खावे
- संगीता
- त्यावेळला काय गरम आणि ताजे आहे हे विचारुन मग ऑर्डर द्यावा. आर ए पुरम च्या संगीताचा नॉर्थ इंडियन मेनू छान असतो. चाट वगैरे पण मस्त. आप्पे, डोसा, अड़ै अवियल, उत्तपम, इडली इत्यादी नसेल खायचे तर छोले भटूरे एकदम छान असतात. पाव भाजी पण मस्त. आजकाल मंगलौर बन आणि एला अड़ै पण सर्व करतात असे ऐकून आहे. संगीतात जाऊन पनीर ऑर्डर करू नये. दुपारच्या जेवणकरता गेला असाल तर मील्स ( फुल किंवा मिनी) वेराइटी राईस पण छान असतो.
- वसंता भवन
- मैलापुर च्या साऊथ माडा स्ट्रीट वरचे वसंता भवन पण वरच्या सगळ्या आइटम्स साठी छान आहे. त्यातल्या त्यात वसंता भवन मील्स प्रसिद्ध आहेत. कॉफी तर उत्तमच.
- सरवना भवन
- ईस्ट माडा स्ट्रीट वर सरवना भवन आहे. मेनू तोच पण गरम काय आहे हे नक्की विचारुन घ्यावे. मला स्वतःला अशोक नगर सरवना भवन जरा बरे वाटते.
- अड्यार आनंद भवन चे मील्स माझे आवडते आहे. पोटभर आणि छान. संध्याकाळी पणियारम, अड़ै, दोसे, उरिद वडा, केलफुलाचे वडे वगैरे इथे एकदम मस्त मिळतात. ताम्बरम ला असलेले अड्यार आनंद भवन एकदम छान आहे. एकतर भरपूर जागा आहे बसायला आणि सर्विस छान. अड्यार चे पण छानच आहे. सकाळी टिफिन साठी एकदम मस्त.
- मुरुगन इडली
- एकदा हॉटेल ला जायचे असे ठरल्यावर मला नवरा म्हणाला चल मुरुगन इडली ला जाऊ, तेव्हा मला त्याचा एवढा राग आला की मुरुगन इडली म्हणजे नवीन जोडप्याने जायची जागा आहे काय? तेव्हापासून मागच्या वर्षापर्यंत ..I have despised मुरुगन इडली, पण काही दिवसांपूर्वी वेल्लोर ला जातांना अप्पांनी मुरुगन इडली ला गाडी थांबवली. To my surprise मला प्रचंड आवडले ते हॉटेल. पोडी इडली, पोडी डोसा आणि तऱ्हेतऱ्हेच्या chutnya.. खूपच छान जेवण आणि सर्विस.
मील्स म्हणजे काय?
संपूर्ण जेवण
गरमा गरम भात आणि
सांबर, रसम, कूटू, पोरियल, कोळंब, मोर कोळंब, दही, पापड, एक गोड. त्यात पोळी पण असते.
मिनी मील्स म्हणजे काय?
वेराइटी राईस ( सांबर राइस, पुलिओगरे, लेमन राईस, दही भात,एक गोड)
भात थोडा कमी खावा, पण ह्या इतक्या भाज्या असतात त्या भरपूर खाव्या..फुल मील्स म्हणजे पोटभरीचा प्रोग्राम. 175-200 रुपयामधे पोटभर आणि छान जेवण असते.
मेसेस
- आंध्र मेस, मदुरै कुमार मेस, करपगंबाल मेस, विश्वनाथन मेस, वलाल्लार मेस अश्या ठिकाणी केळीच्या पानावरचे जेवण असते, ते वाट्यांमधे नं देता वाढल्या जाते. म्हणून मला अतिप्रिय आहे. खाण्याची वेळ दुपारी 12.00 ते 3.00
थीम हॉटेल्स
- मोठ्या स्टार हॉटेल्स मधे असलेले रेस्टॉरेंट्स थीम्ड असतात
- आय टी सी ग्रैंड चोला चे मद्रास पैविलियन खुप फेमस आहे.
- क्राउन प्लाजा मधले दक्षिण पण खुप छान आहे.
- सवेरा हॉटेल मधले मालगुडी पण मला खुप आवडते. एकदम हलके पण छान तमिळ जेवण.
- वुडलैंड्स मधले वृन्दावनम.. आणि असे बरेच.
- अमड़ावाडी - गुजराती जेवण एकदम फर्स्ट क्लास..
चेन्नई च्या संस्कृती वर फ्रेंच लोकांचा पगडा आहे. इराणी, मिडल ईस्ट च्या लोकांचा पण बराच प्रभाव दिसून येतो म्हणून इथे बुहारी सारखे हॉटेल खुप चालू शकते. ईरानी चहा, बन मस्का आणि तत्सम पदार्थ खायचे असल्यास बुहारी इज बेस्ट. चिकन 65 चा शोध चेन्नई च्या बुहारी हॉटेल नी लावला आहे.
मालाबार बरोटा खायचा असेल तर बुहारी, पाम शोर नाहीतर सॅमको हॉटेल्स लाच जायला हवे.
कॅफेस एंड बिस्ट्रो:
खुपच रोमॅंटिक जागा, सुंदर इंटीरियर आणि वेल प्लेस्ड अश्या कॅफेस चेन्नईत जागोजागी पहायला मिळतात. चामिएर्स, The English Tea Room, अमेथीस्ट , लॉयड्स टी रूम, पम्पकिन टेल्स, सोल गार्डन, अश्विता बिस्ट्रो अशी अनेक सुंदर ठिकाणं आहेत. इथे गेलात तर खुप गप्पा आणि कॉफ़ी चहा ची तलब सोबत घेऊन जावी.
थोडक्यात काय तर शोधला तर देवही सापडतो, चेन्नई मधे अश्या अनेक जागा आहेत जिथे छान पोटाला हलके, स्वस्तं आणि मस्त जेवण मिळते..नवीन येणाऱ्यांनी फक्तं सोबत खूप सकारात्मक दृष्टिकोण आणावा..चेन्नई आपलेसे वाटेल..
मालगुडी हॉटेल ची थाळी 

Comments

Popular posts from this blog

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे.

तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;)

काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे?

मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट.

संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित्रीकरण केले आहे…

नवाबाचे शहर आणि हैदराबाद

आपलीकडे सुट्टीच्या दिवसात मामाच्या गावाला जायचा प्रघात आहे, आता उद्या शाळा सुरु होतेय तेव्हा सुट्टीत काय काय केले हा प्रश्न सालाबादाप्रमाणे विचारला जाईलच म्हणून ही छोटी निबंधवजा पोस्ट :)  यावेळी मामाच्या गावाला तर आम्ही गेलोच पण त्याहीपेक्षा exciting अश्या नवाबाच्या गावाला जायचा योग आला. कामानिमित्त हैदराबाद ला ६-७ महिने राहिले आहे, तेव्हा काही खूप प्रगत नव्हते शहर. एकच जागा होती पॅरॅडाईस. बावर्ची पण अगदी नवेच होते तेव्हा. आणि मी अगदी शहराबाहेर होते राहायला, त्यामुळे माझा शहराशी जास्त संबंध आलाच नाही. माझा पहिला जॉब असल्याने मला जास्त फटकता आले नाही तेव्हा. यावेळी मात्र हॉलिडे मूड मध्ये असल्याने बऱ्यापैकी फिरणे झाले. 
पहिला स्टॉप म्हणजे कामथ हॉटेल, आम्ही नामपल्ली रेल्वे स्टेशन ला उतरलो, सकाळची वेळ होती, ड्राइवर नी पिक अप केल्यावर, चहा प्यायला थांबलो कामथ ला, हॉटेल स्टेशन च्या अगदी जवळ आहे. चेन्नई च्या संगीता, सर्वना भवन ची सवय असलेलो आम्ही. चहा बोलावला, इडली, डोसा ऑर्डर केला. लगेच छानपैकी चहा, गरम इडल्या,परपु पोडी, गोडसर असा कानडी सांबार आणि दोन चटण्या आल्यापण टेबल वर. आमची दाक्षिणात…