Skip to main content

ऑर्गनायझेशन आणि पिंटरेस्ट

गेले काही दिवस, सतत कार्टन्स मधे भरुन आणलेलं घर लावणं सुरु होतं. घर शिफ्टिंग ची गम्मत असते.. आपण पुष्कळ गोष्टी पुन्हा जगत असतो.. जुन्या घरात बरेच कार्यक्रम झाले....माझी लेक चालायला लागली, बहिणी चे लग्न झाले, नणंदेचे लग्न झाले.... आणि बरेच काही आयुष्यातले महत्वाचे टप्पे आम्ही त्या घरात पूर्ण केले. स्पेशल होतेच ते घर, आणि मोठे होते खूप, छान जाईचा वेल, मधुमालतीचा वेळ आणि बरीच झाडे. विशेष म्हणजे पारिजातक... 
मधू मालती जाई आणि पारिजातक मध्ये मोगरा आणि यल्लो बेल्स 


नवीन घरात जायचे जायचे करत खूप घालमेलही झाली..पण  वाटले नाही, की जुने सोडू नये.. हाच एक शकुन समझला आणि बस्स सामान बांधायला लागले... 
५ वर्षे मला तरी खूप मोठा कालावधी वाटतो.. मी खूप ऑर्गनाइज्ड वगैरे अजिबात नाही... वेंधळी जास्त आहे... मला मुळात कामे करायचा महा कंटाळा असायचा लहानपणी.. आई कशीतरी माझ्याकडून कामे उरकून घेई.. हळूहळू तिला लक्षात यायला लागलं की मला घरची  कामे सांगणे म्हणजे तिचा वेळ घालवणे आहे..मग तिने बाहेरची कामे सांगायला सुरुवात केली..दळण आणणे, तिला ऑफिस ला सोडून देणे, किराणा आणणे, भाज्या आणणे ही कामे मी मनापासून करीत असे.. 
तर.. जुन्या घरात  खूप वर्षे राहिलो म्हणून खूपं पसारा झाला होता. आम्हा दोघांनाही हे ठेव ते ठेव ची खूप सवय आहे...फेकून देणे हि अतिशय वाईट गोष्ट आहे असे त्याला वाटते आणि आम्ही ती करत नाही... अगदी कोणी घराला नावे ठेवली तरी चालेल... असे काहीसे ५ वर्षातले सगळे दिवस गेले...आता खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे आ वासून उभा होता की एवढं सामान कसे हलवायचे आणि नेतांना असे कसे न्यायचे ज्यांनी नवीन घरात लावणे सोपे जाईल... 
 थोडं ऑर्गनाईझशन बद्दल हळूहळू वाचायला लागले, सायली राजाध्यक्ष खूप छान ब्लॉग लिहितात.. साडी आणि बरेच काही..त्यात त्यांनी बर्याच टिप्स दिल्या आहेत.. तो माझा बेस ठेवला...मग शोधाशोध केली ती काही मदती ची... 
माणूस खूप हुशार प्राणी आहे....आणि सोबतच आळशीही आहे कमालीचा..छान काही दिसले की लगेच अनुकरण करायला मला फार सोपे वाटते.. 
पिंटरेस्ट ची अँप टाकली फोन वर आणि सुरु झाला माझा ऑर्गनायझेशन चा प्रवास. मला एकट्याने कामे करायला आवडते ...मी खूप अशी टीम प्लेअर वगैरे नाही... काय आहे एक तर एकट्याने काम केला कि क्रेडिट ही भरगोस मिळते आणि समाधानही.. कोणालाही इन्व्हॉल्व्ह करायचे नाही शक्यतो असा मी निश्चय केला आधी आणि मग लिस्ट बनवायला सुरु केली. 
काही काही गोष्टी लिस्ट नी वगैरे अजिबात होत नसतात त्यांना मनाची तयारीच लागत असते..म्हणून काही आवरासावर मनाच्या तयारीसाठी ठेवली... 
पिंटरेस्ट वर ऑर्गनायझेशन वर असंख्य पोस्स्ट्स आहेत.. पण सगळेच लागू होईल आपल्याला असे नाही त्यामुळे.. जे लागू होत नाही ते वगळायला सुरुवात केली.. आधीच खूप आवरा सावरी ची सवय नसल्याने मला फारसा अनुभव नव्हता आणि विचारायलाही फार विचित्र वाटे..तरीही मी माझ्या मैत्रिणी, माझी बहीण आणि ती जे जे करते त्यातून शिकलेल्या गोष्टी नुसार कामे करणे सुरु केले.. सगळ्यात पहिले... घर कसे आहे हे समजावून घेऊन त्यात काय काय बसू शकते ह्याचा अंदाज बांधला.. अगदी जास्त सामान येणे नाही अगदी मोह झाला तरीही नाही हि खूणगाठ मनाशी ठेवली.. 
आठवडा भरा पासून कपडे आवरायला सुरुवात केली... पण त्याआधीही कपड्याला मिळतात तसे ऑर्गनायझर्स घेतले.... चार च्या सेट मध्ये लहान कपड्यांकरिता, आणि साडी कव्हर्स वेगळे.. सायली ताईच्या ब्लॉग मध्ये ती साडी कव्हर्स वापरात नाही असे लिहिले आहे पण मी तरी ट्राय करायचे ठरवले.. ऍमेझॉन वर छान साडी कव्हर्स आणि ऑर्गनायझर्स मिळतात. 
ऍमेझॉन.इन 


कपडे अगदी सोपी होते आवरायाला.. ह्यावरही पिंटरेस्ट च्या असंख्य पोस्टी मला उपयोगी वाटल्या... अगदी कपड्याच्या घड्या कश्या करू शकतो कि जागा अतिशय कमी लागेल इथपासून तर काय काय फेकल्या जाऊ शकते ..प्रत्येक कपड्याच्या आयुष्याबद्दल अनेक लोकांनी अगदी छान लिहिलंय. मला हे करणे भाग पडले आणि मी सगळं प्रॅक्टिकल करून बघितले एवढेच काय माझे श्रेय! 
पॅक करताना खूप सोयीच्या अश्या काही गोष्टी लक्षात घेतल्या... 
- कपडे - ऑर्गनाइजर्स मधेच टाकले त्यामुळे आल्यावर लावणे फारच सोपे झाले. जुने कपडे देण्याकरता एका एनजीओ ची मदत झाली.. ती इन्फॉर्मशन पण आधीच घेऊन नोंद करून ठेवली होती. 
ऍमेझॉन.इन 

- जुने ऑर्फन भांडे ...ऑर्फन याकरता कि बरेचदा डबे आणि त्यांची झाकणे ह्यांची ताटातूट झाली असते.. माझ्याकडे बरेच असे बरेच ऑफन्ड डबे होते जे मी अगदी टाकून दिले (यात मोठेपणा नाही वेंधळेपणा जास्त आहे) .. प्लास्टीक चा वापर करायचा नाही हे निग्रहाने ठरवलेच होते त्यामुळे फेकून देताना वाईट वाटले नाही. काचेचे भांडे जे माझ्याकडे अगदी कमी आहेत ते एका डब्यात ठेवले बाकी सामानाची स्वंयपाकघरात कसे लागेल यानुसार मांडणी केली आणि तसेच पॅक केले. कटलरी ला पारदर्शक फॉईल मध्ये बांधल्याने आल्या आल्या ठेवायला सोपे गेले, सेमी विथ पळ्या. 
क्रीटीव्हिटीबीन.कॉम 


         
- पुस्तके - यांची एक छान लिस्ट केली आणि १० वर्षे आणि वरचे वय असलेले पुस्तक लाइब्ररीला देऊन टाकले. बाकी असलेल्या जनरल पुस्तकांना ही लायब्ररीत देऊन टाकले..अगदी खूप स्पेशल पुस्तके ठेवली आणि त्यांची ही लिस्ट करून ठेवली. 
- महत्वाची कागदे - हा विषय फारच कठीण होता माझ्याकरता, पण नवरोबा नी आवरून आधीच ठेवल्याने जरा मदत झाली 
- बिल्स, मेडिकल रिपोर्ट्स, बैंक स्टेटमेंट्स - चालू वर्षाचे कागदपत्रच सोबत ठेवले..बाकी पध्धतशीरपणे श्रेड केली... श्रेडींग  मशीन घरात असावी ही  याकरता. 
- चादरी ब्लँकेट्स आणि तत्सम - ऑर्गनायझर्स पुन्हा एकदा मदतीला घेतले...पिंटरेस्ट च्या पोस्ट्स ला धन्यवाद.. बघायला छोट्या वाटत असल्या तरी ह्या ऑर्गनाईझर बैग्स मला बर्याच मोठ्या वाटल्या.. विशेष म्हणजे सगळ्या चादरी, ब्लँकेट्स, क्विल्टस आरामात मावल्या... ठेवायला ही अगदी सोपे झाले. 
ऍमेझॉन.इन 



- देवघर - माझं देवघर खूप छोटं आहे पण नवीन घरात खूप मोठं आहे.. त्यामुळे मला त्याबाबतीत अजिबात काळजी करावी लागली नाही. जे सगळं होतं ते तसंच घेऊन आले. आणि देवघर सगळ्यात आधी शिफ्ट झाले. 
- बाथरूम इससेन्शिअलस- सगळे संपत यावे असेच बाथरूम इससेन्शिअलस प्लॅन केले होते त्यामुळे कपडे धुण्याची बॅग आणि दोन कपड्याच्या पावडरी चे बॉक्स एवढाच काय ते आणायचे होते. 
- इ कचरा - बर्यापैकी देऊन टाकला... तरीही पहिला लॅपटॉप, आहेच.. सगळ्या प्रकारचे चार्जर्स छोट्या लूप्स मध्ये बांधून एका छोट्या डब्यात पॅक केले. 
- बांगड्या आणि इतर एक्सेसरीज: एका मेकअप बॉक्स मध्ये येतील इतक्याच काचेच्या बांगड्या ठेवल्या आणि ऑर्गनायझर्स मध्ये पॅक केल्या. 
- जिम चे सामान - आम्ही दोघेही जिम घरीच करतो... बर्यापैकी सामान आहे... ६ फीट च्या बारबेल पाससून तर ३-५-१० किलो चे डंबेल्स, जिम बॉल्स २, मी अधून मधून सायकलिंग ला जाते त्यामुळे एक सायकल.. असे सगळे सामान..जसे च्या तसे हालवले...कारण शिफ्टिंग जरी सुरु असली तरी जिम ला विराम नाही दिला.. १ तास रोज दोघेही व्यायाम करायचोच.. त्याकरता जागा केली स्टडी रूम च्या वॉर्डरोब मध्ये...म्हणजे पसारा दिसायला नको... 
- खेळणी- ५ वर्षे खूप सारी खेळणी जमा झाली होती... त्यातली अगदी कार्यक्षम खेळणीच सोबत घेतली.. ... चालू वर्षांची पुस्तके आणि पुढील वर्षांची पुस्तके, गोष्टींची पुस्तके ह्या तिघांनाही ऑर्गनाईझर मध्ये टाकले, लेबल केले. 
ऍमेझॉन.इन 

- ऑफिस - आम्ही दोघेही घरून काम करतो... त्यामुळे ऑफिस असणे खूप महत्वाचे होते... खूप महत्वाच्या वस्तूच  लेबल केल्या..कलर कोडिंग ला पर्याय नाही.. 
महत्वाचे म्हणजे..सगळे डबे  लेबल केले , आणि कलर कोड केले त्यामुळे गोंधळ झाला नाही...  झिपलॉक बॅग्स, कचऱ्याच्या पिशव्या, आणि कार्टन्स च्या वापराने सगळे सुसह्य झाले. 
तर असे  सगळे करून शेवटी आम्ही नवीन घरी स्थानापन्न  झालो आणि ते ही ९०% कमी पसारा घेऊन. 
महत्वाचा फरक इथे आल्यापासून असा झाला की नको ते लगेचच बिन मध्ये जायला लागले आहे.. वार्डरोब ऑरगॅझईज्ड आहेच पण अजून १० % काम आहेच बाकी... मला मात्र बाबांनी अगदी पाठीवर शाबासकीची थाप दिली.. त्यांना वाटलेही नसेल कधी की मी एवढं व्यवस्थित शिफ्ट करू शकेल.... त्यांना अजून मी पिंटरेस्ट चं सीक्रेट सांगितलं नाहीये कै ;) 





Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटा...

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...