ब्लॉग वर परत येतांनाकारण काहीही असो ब्लॉग वर परत यावंसं वाटलं..काहीतरी लिहावसं वाटलं हे महत्वाचं..गम्मत आहे नाही? ब्लॉग ला एखाद्या मित्रासारखं बोलता आलं असतं न तर कडाक्याचं भांडण होणं हे निश्चित पण नशीब माझं सध्यातरी ब्लॉग बोलत नाहीये..:)
२०१० २०११ २०१२ २०१३ बरीच पाने उलटून गेली..बरेच बदल झाले...२०१० मध्ये ब्लॉग वर १८००० लोक येउन गेलेत...हे आधी अगदी बघितलंच नाही..
बर्याच मैत्री झाल्या..हर्षद जोशी, भाग्यश्री सरदेसाई, महेंद्र कुलकर्णी, अनिकेत समुद्र हि नावं अगदी जवळ असल्यासारखी वाटू लागली..त्यात हर्षद शी तर बोलणेही झाले दोन तीन दा, पंकज झरेकर चा ट्रेक वाला ब्लॉग...संवादिनी चा ब्लॉग वाचते आहे आणि वाटही बघते नवीन पोस्टची...कुठेतरी मीच पण हरवलीये...हरवणे काही नवं नाही..हरवत हरवत आपणच आपल्याला सापडत जातो कदाचित!! पुन्हा लिहेनच...

Created using "Marathi for iPhone" App http://bit.ly/gsbUhe

Comments

  1. हायल्ला... माझं नाव इथे? चक्क चक्क !! :-o

    -पंक्या
    www.pankajz.com

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी

बाहुबली २

भुलाबाई आणि भुलोजी