Pages

Thursday, October 22, 2009

...

खुप दिवसांनी कुणीतरी रागवलं मला आज..अचानक वाटलं..आपण हे फ़ीलींग विसरुनच गेलो होतो की..
लहानपणी हे करु नकोस, ते करु नकोस पासुन बर्याच गोष्टींसाठी मी रागवणं खाल्लंय...पण आताशा सगळंच काही परफ़ेक्ट करण्याच्या नादात मी कुठलीही चूक केली नाही आणि पर्यायाने कुणी कुणी म्हणुन रागवलं नाही..कसं मिळमिळीत वाटत होतं आत्तापर्यंत असं वाटायला लागलं आणि कुठेतरी त्या रागवणार्या माणसाचे माझ्यातल्या खोडकर मुलीने आभार मानले...
आजचं रागावणं स्पेशल या करीता की, दिवाळीच्या सुट्टीचा याच्याशी थेट संबंध आहे...दिवाळीत नवीन ड्रेस, फ़टाके फ़राळ या सोबत कुठल्याही छोट्याश्या खोडीसाठी आवडत्या मामा किंवा मावशी कडुन डोक्यावर पडलेला टप्पू पण माझ्यासाठी स्पेशल असायचा तसंच हे झालं योगायोगाने...
लहानपणी कुणीही रागवलं की, लगेच माझे डोळे भरुन यायचे, नाक लाल व्हायचं आणि गोबरे गाल पार उतरुन जायचे. कुणासमोर गेलं अश्या अवतारात की लगेच सगळी विचारपूस होत असे आणि मला खुप अवघडल्यासारखं वाटत असे. मग हे अवघडलेपणच येऊ नये अश्या प्रयत्नात मी चुका करायलाच विसरले...आणि मोठी झाले..आज मात्र माझं बालपण परत येऊन मला मी मोठी झाल्याचं सांगुन गेलं.

Sunday, October 11, 2009

नवं घर..नवा पत्ता!

आपणास कळविण्यास आनंद होतोय की, मुग्धाचा "गुलमोहर!!" आता ब्लॉगर च्या नव्या अंगणात फ़ुलणार आहे.
वाचकांनी कृपया नव्या पत्त्याची नोंद घ्यावी..
www.mugdhaaajoshi.blogspot.com
आजवर जसे तुम्हा सगळ्यांचे भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळालेत तसे इथून पुढेही मिळावेत आणि माझा गुलमोहर सतत फुलत रहावा अशी छोटीशी इच्छा!!
-मुग्धा

Thursday, October 8, 2009

हुरहुर...

दिवाळी जवळ येतेय आणि माझं माहेरी जाणंही. या वर्षी सगळेच सण नवे नवे होते. नवी जागा, नवीन प्रथा, नवे लोकं आणि नवी हुरहुर सणासुदीच्या दिवसात कधीही नं लागलेली.

सुरुवात झाली ती गणेशोत्सवाने. इथे गणेशोत्सव जरी असला तरी महाराष्ट्राइतक्या प्रमाणावर साजरी केला जात नाही. गणपतीच्या दहा दिवसांत प्रत्येक दिवशी माझं मन तिथल्या आठवणीने खट्टु होत होतं. गणेशचतुर्थीला २१ दुर्वांच्या २१ जुड्यां तोडायला निघालेली माझी स्वारीच माझ्या डोळ्यापुढे आली. ते एक काम मी फ़ार मनोभावे करत असे. बरं फ़क्त २१ च जुड्या नसायच्या त्यात आजीसाठी एक, बाबांसाठी एक, आईसाठी एक अश्या जास्तंच्या ५ जुड्या तोडाव्या लागायच्या. मग अथर्वशीर्षाचे २१ आवर्तनं. आईने केलेला मोदकांचा नैवेद्य. सगळं सगळं डोळ्यापुढे येत होतं प्रत्येक दिवशी. आई गेली आणि ती करत असलेले सणंही गेले. गणपती बाप्पांना मनोमन पुढच्या वर्षी लवकर या म्हंटले आणि आमच्या घरी नक्की या ही स्पेशल रिक्वेस्ट ही केली..

हरतालिका हे मी तिसरीपासुन करत असलेलं व्रत मी याही वर्षी केलं. माझ्या मनाजोगता नवरा दिल्याबद्दल शिवशंकराचे स्पेशल आभार मानले मी यावेळी; )

विदर्भात महालक्ष्म्यांचा सण खुप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सुंदर मुखवटे असलेल्या ज्येष्ठा कनिष्ठांना मी यावेळी मी प्रचंड मिस केलं. आईला कुणी विचारलं तिच्या मुलाबाळांबद्दल की ती आमचा उल्लेख ज्येष्ठा कनिष्ठा असा करत असे. आमच्या घरी महालक्ष्म्या मांडत नसु आम्ही, पण आई ओळखीच्या काकुकडे आणि मामांकडॆ जाऊन ओटी भरत असे. मामांकडल्या मुखवट्यांचे घारे डोळे माझ्यासाठी विशेष आकर्षण असायचे आणि अजुनही आहेत. तिथे जाऊन प्रत्यक्षात त्या मूर्ती बघण्याचा आनंद खरंच मी शब्दात मांडु शकत नाही. महालक्ष्मी पर्सोनिफ़ाईड असं म्हणता येईल कदाचित. असा महालक्ष्मी चा सणही विदर्भात आनंदाने साजरा केल्या गेला. मी नव्हते तिथे पण माझं मन मात्र होत्ं तिथेच छ्कुसोबत ओटी भरतांना.

म्हणता म्हणता नवरात्री येऊन ठेपली. आमची कुलदेवता रेणुकादेवी असल्याने आई घरी घट बसवायची आणि ते ९ दिवस ती सुट्टी घ्यायची म्हणुन आम्ही विशेष खुष असायचो..

लहानपणी आजीकडॆ घट बसायचे नाहीत पण बाजुलाच एक देवीचं देऊळ होतं(आहे) आजोबा देवीच्या देवळात सकाळी पुजा करायला जायचे रोज त्यामुळे तिथेच नवरात्र साजरा करायचो आम्ही. रोज सकाळ संध्याकाळ आरत्या आणि प्रसाद. एका नवरात्रात कुमारिका म्हणुन आजीने दिलेला खण आणि त्याचं शिवलेलं परकर पोलकं मला अजुनही आठवतं. अष्टमीचा उपास आणि नवमीच्या पारण्याच्या नैवेद्यानंतर लगेचच दसरा यायचा. लहानपणी आपट्याच्या पानाला सोनेरी रंग लावायचो मी आणि मामा. आणि ती पानं आपल्या आवडत्या स्पेशल व्यक्तींना द्यायचो. सीमोलंघन करायचो आणि घरी येउन लाकडाच्या तलवारीने तांदुळाचा रावण मारायचो. भारी मज्जा होती सगळी.

इकडे नवरात्रात घट बसवत नाहीत पण "कोलु" नावाचा प्रकार असतो. कोलु म्हणजे ३, ५, ७ या पैकी कितीही पायऱ्या तयार करुन त्यावर पुराणातील कथा लहान लहान बाहुल्यांच्या सहाय्याने मांडायच्या. सगळ्या शक्तींचं प्रतिक म्हणुन कलशही ठेवायचा. त्या कोलुमध्ये मांडलेल्या कथा रोज बदलायच्या म्हणजे ९ दिवसाच्या ९ कथा. लहान मुलांना या सगळ्या पौराणिक कथा समजावण्यासाठी कोलुचा उपयोग होतो असं मला शेजारच्या काकुंनी सांगितलं. मला ही पध्दत खुप आवडली. रोज संध्याकाळी कोलु जवळ बसुन श्लोक म्हणायचे आणि सुंडल(दाक्षिणी पध्दतीचे चणे) चा प्रसाद द्यायचा.

या नवरात्रात सगळ्यात जास्तं मला आठवण आली ती आरत्यांची. इथे कुणीच, कुठल्याही देवळात आरती करतांना दिसत नाही. फ़क्तं काहिसं पुट्पुटत कापुर ओवाळतात. असं अख्ख्या आरतीला गुंडाळण्यात इथल्या पंड्यांना काय मजा येते कुणास ठाऊक. एरवी प्रत्येक गोष्टीत डिटेल मध्ये जाणारे दाक्षिणात्य लोक इथेच कसा काय शॉर्टकट मारतात हे मला कळत नाही.

पुढच्या वर्षी कोलु बसवेनच पण त्याच्यासमोर मोठमोठ्याने अंबाबाईची आरती म्हंटल्याशिवाय राहणार नाही हे मात्र मी मनोमन ठरवले.

दिवाळी आठंच दिवसावर येऊन ठेपलीए. यावेळेस आमची पहीली दिवाळी... नवऱ्याबरोबर साजरा होणारा पहीला दीपोत्सव.. माहेरीच साजरा करायचा असल्याने.. सण वजा सगळ्या सणात वाटलेली हुरहुर..

आजकाल माहेरी जाता जाता चेन्नई सोडतांनाही मला कसंतरी वाटायला लागलं आहे. माहेर, माहेरचे सण आणि तिथली सगळी मंडळी यांचं गुणगान गात गात सासर कधी आपलंसं होउन जातं कळतंच नाही. आणि मग कधीमधी माहेरी असतांनाही आपण सासरचं कौतुक करायला लागतो आपल्या नकळत... :)

हालक्ष्म्यांचा सण खुप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सुंदर मुखवटे असलेल्या ज्येष्ठा कनिष्ठांना मी यावेळी मी प्रचंड मिस केलं. आईला कुणी विचारलं तिच्या मुलाबाळांबद्दल की ती आमचा उल्लेख ज्येष्ठा कनिष्ठा असा करत असे. आमच्या घरी महालक्ष्म्या मांडत नसु आम्ही, पण आई ओळखीच्या काकुकडे आणि मामांकडॆ जाऊन ओटी भरत असे. मामांकडल्या मुखवट्यांचे घारे डोळे माझ्यासाठी विशेष आकर्षण असायचे आणि अजुनही आहेत. तिथे जाऊन प्रत्यक्षात त्या मूर्ती बघण्याचा आनंद खरंच मी शब्दात मांडु शकत नाही. महालक्ष्मी पर्सोनिफ़ाईड असं म्हणता येईल कदाचित. असा महालक्ष्मी चा सणही विदर्भात आनंदाने साजरा केल्या गेला. मी नव्हते तिथे पण माझं मन मात्र होत्ं तिथेच छ्कुसोबत ओटी भरतांना.
म्हणता म्हणता नवरात्री येऊन ठेपली. आमची कुलदेवता रेणुकादेवी असल्याने आई घरी घट बसवायची आणि ते ९ दिवस ती सुट्टी घ्यायची म्हणुन आम्ही विशेष खुष असायचो..
लहानपणी आजीकडॆ घट बसायचे नाहीत पण बाजुलाच एक देवीचं देऊळ होतं(आहे) आजोबा देवीच्या देवळात सकाळी पुजा करायला जायचे रोज त्यामुळे तिथेच नवरात्र साजरा करायचो आम्ही. रोज सकाळ संध्याकाळ आरत्या आणि प्रसाद. एका नवरात्रात कुमारिका म्हणुन आजीने दिलेला खण आणि त्याचं शिवलेलं परकर पोलकं मला अजुनही आठवतं. अष्टमीचा उपास आणि नवमीच्या पारण्याच्या नैवेद्यानंतर लगेचच दसरा यायचा. लहानपणी आपट्याच्या पानाला सोनेरी रंग लावायचो मी आणि मामा. आणि ती पानं आपल्या आवडत्या स्पेशल व्यक्तींना द्यायचो. सीमोलंघन करायचो आणि घरी येउन लाकडाच्या तलवारीने तांदुळाचा रावण मारायचो. भारी मज्जा होती सगळी.
इकडे नवरात्रात घट बसवत नाहीत पण "कोलु" नावाचा प्रकार असतो. कोलु म्हणजे ३, ५, ७ या पैकी कितीही पायऱ्या तयार करुन त्यावर पुराणातील कथा लहान लहान बाहुल्यांच्या सहाय्याने मांडायच्या. सगळ्या शक्तींचं प्रतिक म्हणुन कलशही ठेवायचा. त्या कोलुमध्ये मांडलेल्या कथा रोज बदलायच्या म्हणजे ९ दिवसाच्या ९ कथा. लहान मुलांना या सगळ्या पौराणिक कथा समजावण्यासाठी कोलुचा उपयोग होतो असं मला शेजारच्या काकुंनी सांगितलं. मला ही पध्दत खुप आवडली. रोज संध्याकाळी कोलु जवळ बसुन श्लोक म्हणायचे आणि सुंडल(दाक्षिणी पध्दतीचे चणे) चा प्रसाद द्यायचा.
या नवरात्रात सगळ्यात जास्तं मला आठवण आली ती आरत्यांची. इथे कुणीच, कुठल्याही देवळात आरती करतांना दिसत नाही. फ़क्तं काहिसं पुट्पुटत कापुर ओवाळतात. असं अख्ख्या आरतीला गुंडाळण्यात इथल्या पंड्यांना काय मजा येते कुणास ठाऊक. एरवी प्रत्येक गोष्टीत डिटेल मध्ये जाणारे दाक्षिणात्य लोक इथेच कसा काय शॉर्टकट मारतात हे मला कळत नाही.
पुढच्या वर्षी कोलु बसवेनच पण त्याच्यासमोर मोठमोठ्याने अंबाबाईची आरती म्हंटल्याशिवाय राहणार नाही हे मात्र मी मनोमन ठरवले.
दिवाळी आठंच दिवसावर येऊन ठेपलीए. यावेळेस आमची पहीली दिवाळी... नवऱ्याबरोबर साजरा होणारा पहीला दीपोत्सव.. माहेरीच साजरा करायचा असल्याने.. सण वजा सगळ्या सणात वाटलेली हुरहुर..
आजकाल माहेरी जाता जाता चेन्नई सोडतांनाही मला कसंतरी वाटायला लागलं आहे. माहेर, माहेरचे सण आणि तिथली सगळी मंडळी यांचं गुणगान गात गात सासर कधी आपलंसं होउन जातं कळतंच नाही. आणि मग कधीमधी माहेरी असतांनाही आपण सासरचं कौतुक करायला लागतो आपल्या नकळत... :दिवाळी जवळ येतेय आणि माझं माहेरी जाणंही. या वर्षी सगळेच सण नवे नवे होते. नवी जागा, नवीन प्रथा, नवे लोकं आणि नवी हुरहुर सणासुदीच्या दिवसात कधीही नं लागलेली.
सुरुवात झाली ती गणेशोत्सवाने. इथे गणेशोत्सव जरी असला तरी महाराष्ट्राइतक्या प्रमाणावर साजरी केला जात नाही. गणपतीच्या दहा दिवसांत प्रत्येक दिवशी माझं मन तिथल्या आठवणीने खट्टु होत होतं. गणेशचतुर्थीला २१ दुर्वांच्या २१ जुड्यां तोडायला निघालेली माझी स्वारीच माझ्या डोळ्यापुढे आली. ते एक काम मी फ़ार मनोभावे करत असे. बरं फ़क्त २१ च जुड्या नसायच्या त्यात आजीसाठी एक, बाबांसाठी एक, आईसाठी एक अश्या जास्तंच्या ५ जुड्या तोडाव्या लागायच्या. मग अथर्वशीर्षाचे २१ आवर्तनं. आईने केलेला मोदकांचा नैवेद्य. सगळं सगळं डोळ्यापुढे येत होतं प्रत्येक दिवशी. आई गेली आणि ती करत असलेले सणंही गेले. गणपती बाप्पांना मनोमन पुढच्या वर्षी लवकर या म्हंटले आणि आमच्या घरी नक्की या ही स्पेशल रिक्वेस्ट ही केली..
हरतालिका हे मी तिसरीपासुन करत असलेलं व्रत मी याही वर्षी केलं. माझ्या मनाजोगता नवरा दिल्याबद्दल शिवशंकराचे स्पेशल आभार मानले मी यावेळी; )
विदर्भात महालक्ष्म्यांचा सण खुप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सुंदर मुखवटे असलेल्या ज्येष्ठा कनिष्ठांना मी यावेळी मी प्रचंड मिस केलं. आईला कुणी विचारलं तिच्या मुलाबाळांबद्दल की ती आमचा उल्लेख ज्येष्ठा कनिष्ठा असा करत असे. आमच्या घरी महालक्ष्म्या मांडत नसु आम्ही, पण आई ओळखीच्या काकुकडे आणि मामांकडॆ जाऊन ओटी भरत असे. मामांकडल्या मुखवट्यांचे घारे डोळे माझ्यासाठी विशेष आकर्षण असायचे आणि अजुनही आहेत. तिथे जाऊन प्रत्यक्षात त्या मूर्ती बघण्याचा आनंद खरंच मी शब्दात मांडु शकत नाही. महालक्ष्मी पर्सोनिफ़ाईड असं म्हणता येईल कदाचित. असा महालक्ष्मी चा सणही विदर्भात आनंदाने साजरा केल्या गेला. मी नव्हते तिथे पण माझं मन मात्र होत्ं तिथेच छ्कुसोबत ओटी भरतांना.
म्हणता म्हणता नवरात्री येऊन ठेपली. आमची कुलदेवता रेणुकादेवी असल्याने आई घरी घट बसवायची आणि ते ९ दिवस ती सुट्टी घ्यायची म्हणुन आम्ही विशेष खुष असायचो..
लहानपणी आजीकडॆ घट बसायचे नाहीत पण बाजुलाच एक देवीचं देऊळ होतं(आहे) आजोबा देवीच्या देवळात सकाळी पुजा करायला जायचे रोज त्यामुळे तिथेच नवरात्र साजरा करायचो आम्ही. रोज सकाळ संध्याकाळ आरत्या आणि प्रसाद. एका नवरात्रात कुमारिका म्हणुन आजीने दिलेला खण आणि त्याचं शिवलेलं परकर पोलकं मला अजुनही आठवतं. अष्टमीचा उपास आणि नवमीच्या पारण्याच्या नैवेद्यानंतर लगेचच दसरा यायचा. लहानपणी आपट्याच्या पानाला सोनेरी रंग लावायचो मी आणि मामा. आणि ती पानं आपल्या आवडत्या स्पेशल व्यक्तींना द्यायचो. सीमोलंघन करायचो आणि घरी येउन लाकडाच्या तलवारीने तांदुळाचा रावण मारायचो. भारी मज्जा होती सगळी.
इकडे नवरात्रात घट बसवत नाहीत पण "कोलु" नावाचा प्रकार असतो. कोलु म्हणजे ३, ५, ७ या पैकी कितीही पायऱ्या तयार करुन त्यावर पुराणातील कथा लहान लहान बाहुल्यांच्या सहाय्याने मांडायच्या. सगळ्या शक्तींचं प्रतिक म्हणुन कलशही ठेवायचा. त्या कोलुमध्ये मांडलेल्या कथा रोज बदलायच्या म्हणजे ९ दिवसाच्या ९ कथा. लहान मुलांना या सगळ्या पौराणिक कथा समजावण्यासाठी कोलुचा उपयोग होतो असं मला शेजारच्या काकुंनी सांगितलं. मला ही पध्दत खुप आवडली. रोज संध्याकाळी कोलु जवळ बसुन श्लोक म्हणायचे आणि सुंडल(दाक्षिणी पध्दतीचे चणे) चा प्रसाद द्यायचा.
या नवरात्रात सगळ्यात जास्तं मला आठवण आली ती आरत्यांची. इथे कुणीच, कुठल्याही देवळात आरती करतांना दिसत नाही. फ़क्तं काहिसं पुट्पुटत कापुर ओवाळतात. असं अख्ख्या आरतीला गुंडाळण्यात इथल्या पंड्यांना काय मजा येते कुणास ठाऊक. एरवी प्रत्येक गोष्टीत डिटेल मध्ये जाणारे दाक्षिणात्य लोक इथेच कसा काय शॉर्टकट मारतात हे मला कळत नाही.
पुढच्या वर्षी कोलु बसवेनच पण त्याच्यासमोर मोठमोठ्याने अंबाबाईची आरती म्हंटल्याशिवाय राहणार नाही हे मात्र मी मनोमन ठरवले.
दिवाळी आठंच दिवसावर येऊन ठेपलीए. यावेळेस आमची पहीली दिवाळी... नवऱ्याबरोबर साजरा होणारा पहीला दीपोत्सव.. माहेरीच साजरा करायचा असल्याने.. सण वजा सगळ्या सणात वाटलेली हुरहुर..
आजकाल माहेरी जाता जाता चेन्नई सोडतांनाही मला कसंतरी वाटायला लागलं आहे. माहेर, माहेरचे सण आणि तिथली सगळी मंडळी यांचं गुणगान गात गात सासर कधी आपलंसं होउन जातं कळतंच नाही. आणि मग कधीमधी माहेरी असतांनाही आपण सासरचं कौतुक करायला लागतो आपल्या नकळत... :)

Wednesday, October 7, 2009

रिऍलिटी शोज

रिऍलिटी शोज आजकाल भारतात चांगल्यापैकी चालतात. मला हे शोज कुठुन सुरु झाले वगैरे माहित नाही पण केवळ उत्सुकतेपायी मी ही काल परवा पासुन "बिग बॉस" बघायला लागले आहे (हे माझं प्रामाणिक कन्फ़ेशन!).काही गोष्टी तश्या अमेरिका किंवा तसल्या विकसित देशातील लोकांनाच शोभुन दिसतात हे माझे मत होऊ लागले आहे हल्ली.

या सगळ्या शोज चं एक अवलोकन केलं असता पाश्चात्यांनी त्यांची मनोवृत्ती,कुटुंबसंस्था, राहणीमान, संस्कृती, नवरा बायकोचे मुलांचे एकमेकांसोबत असलेले नाते, शिक्षण पध्दती या सगळ्यां गोष्टी सुधारण्यासाठी कदाचित या शोज चा अवलंब केला असावा असे मला वाटते. आणि त्यानुसार हे जे शोज आहेत त्यामध्ये टी आर पी ह्याच एका मुद्द्याचा विचार नं करता बाकी सगळ्या मनोवृत्ती,कुटुंबसंस्था इ इ गोष्टी अगदी जाणीवपूर्वक नीट हाताळल्या गेल्या आहेत. कदाचित कुटुंब, विवाहसंस्था इ इ गोष्टी टिकवुन ठेवणे ही काळाची गरज आहे असे त्यांना वाटले असावे. टी व्ही हेच लोकांना प्रबोधित करण्याचे साधन आहे म्हणुन हे शोज सुरु केले असावेत. अर्थात मी ह्या सगळयाचा खुप सकारात्मक विचार करतेय पण या निमित्ताने का होईना लोक त्यांच्या नातेसंबंधाबद्दल, मनोवृत्तीबद्दल विचार करायला लागतील किंवा लागले असतील . तर एकुण रिऍलिटी शोज हा पाश्चात्य रिऍलिटीच्या दृष्टीकोनातुन विचार केला असता चांगला प्रकार आहे.

जे काही पाश्चात्य देशात चालते ते भारतात तर चाललेच पाहिजे ह्या नियमाचा अवलंब करत आपणही ह्या सगळ्या रिऍलिटी शोज चं तंतोतंत अनुकरण करत आलो आहोत. अगदी "कौन बनेगा करोडपती" पासुन " पती पत्नी और वो" पर्यंत. पण भारतात आणि पाश्चात्य देशात खरंच तंतोतंत अनुकरण करण्याएवढं साम्य आहे का? हा विचार करायला आपण विसरलोय कदाचित. जो कार्यक्रम तिकडे प्रबोधन (चु.भु.दे.घे) करण्यास उपयुक्त ठरु शकतो तोच कार्यक्रम इथेही प्रबोधन करु शकेल का? हा विचार कुणीही केलेला दिसतंच नाहीए. मुळात ह्या शोज चा पर्पज काय आहे? आपण का म्हणुन हे सगळे शोज टी.व्ही वर दाखवतोय याचं कुणी नीट उत्तर देऊ शकेल असं मला वाटत नाही. हे शोज दाखवल्याने वाहिन्यांचं टी.आर.पी रेटींग वाढतं आणि फोन कंपन्यांचा फ़ायदा होतो एवढंच काय ते ध्यानात येतं माझ्या.

भारतातील परिस्थिती चा विचार करता आज अश्या कितीतरी समस्या आ वासुन उभ्या आहेत ज्याबद्दल आपण टि.व्ही द्वारे लोकांपर्यंत पोहचु शकतो. टि.व्ही हे फ़कतं मनोरंजनाचे साधन नं होता त्याद्वारे लोकांना माहीती देता आली, त्यांचे विचार बदलता आले तर किती बरे होईल याचा सगळ्या निष्णात क्रिएटीव्ह डायरेक्टर्स नी विचार केला पाहीजे.

एखादी मालिका अशी का असु शकत नाही जिथे लोक आपल्या नेत्याला त्यानी केलेल्या कार्याबद्दल प्रश्न विचारु शकतील (आप की अदालत किंवा रुबरु टाईप), एखाद्या सामान्य माणसावर किंवा शेतकर्यांवर असलेलं कर्ज मुक्तीचा एखादा कार्यक्रम का असु शकत नाही? झी मराठीने "हफ़्ता बंद" ही मालिका सुरु करुन खरंच या दृष्टीने पाऊल उचललं आहे असं मला मनापासुन वाटतं. विशेषतः हे सगळे कार्यक्रम जनतेला विचारुनच करावे म्हणजे टी आर पी पण उच्चच राहील.

एखादा असाही कार्यक्रम असु शकेल जिथे वयोवृध्द माणसे आपल्या आठवणी, त्यांच्या आयुष्यात आलेले चांगले क्षण आपल्याला सांगु शकतील. त्यांच्याजवळ आपल्याला समृद्ध करणारे बरेच काही असते असे मला नेहमी वाटत आले आहे. ह्या कार्यक्रमाने त्यांचे दुरावलेले नातेवाईक त्यांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न पण आपण करु शकतो.

एखाद्या गृहीणीचं तिच्या घराबद्दल कामाबद्दलचं मनोगत, तिला घरच्यांच मिळणारं सहकार्य ह्यावरही एखादा रिऍलिटी शो होऊ शकतो नाही का?

मुळात रिऍलिटी शो मधली रिऍलिटी विसरुन आपण बघतोय तो निव्वळ कुणी तरी आव आणल्याचा शो आहे असं मला वाटते. गरज आहे ती भारतातील वास्तव (रिऍलिटी) जाणायची....आणि आपण भारतीय आहोत ह्याची पुन्हा एकदा स्वतःला जाणीव करुन द्यायची..
जे काही पाश्चात्य देशात चालते ते भारतात तर चाललेच पाहिजे ह्या नियमाचा अवलंब करत आपणही ह्या सगळ्या रिऍलिटी शोज चं तंतोतंत अनुकरण करत आलो आहोत. अगदी "कौन बनेगा करोडपती" पासुन " पती पत्नी और वो" पर्यंत. पण भारतात आणि पाश्चात्य देशात खरंच तंतोतंत अनुकरण करण्याएवढं साम्य आहे का? हा विचार करायला आपण विसरलोय कदाचित. जो कार्यक्रम तिकडे प्रबोधन (चु.भु.दे.घे) करण्यास उपयुक्त ठरु शकतो तोच कार्यक्रम इथेही प्रबोधन करु शकेल का? हा विचार कुणीही केलेला दिसतंच नाहीए. मुळात ह्या शोज चा पर्पज काय आहे? आपण का म्हणुन हे सगळे शोज टी.व्ही वर दाखवतोय याचं कुणी नीट उत्तर देऊ शकेल असं मला वाटत नाही. हे शोज दाखवल्याने वाहिन्यांचं टी.आर.पी रेटींग वाढतं आणि फोन कंपन्यांचा फ़ायदा होतो एवढंच काय ते ध्यानात येतं माझ्या.

मुळात रिऍलिटी शो मधली रिऍलिटी विसरुन आपण बघतोय तो निव्वळ कुणी तरी आव आणल्याचा शो आहे असं मला वाटते. गरज आहे ती भारतातील वास्तव (रिऍलिटी) जाणायची....आणि आपण भारतीय आहोत ह्याची पुन्हा एकदा स्वतःला जाणीव करुन द्यायची..

Monday, October 5, 2009

झोपीलागी जीवा....

आताशा पुन्हा मला "झोप" फारच आवडायला लागली आहे. आताशा "पुन्हा" म्हणण्याचे कारण हे की मला समज आल्यापासूनच मला झोप प्रचंड आवडते पण मध्ये जरा गडबड झाली होती. गेली चार वर्षे मी हवी तितकी झोपली नाही असं मला मनापासून वाटतं(तसं माझ्याव्यतिरिक्त माझ्या घरात कुणालाही वाटत नाही याची मला खात्री आहे ) ;)
तीझोपेचा आई बाबांना आणि मलाही शोध लागला. त्यांच्यामते (माझ्यामते नाही) मी खूप झोपायचे. ८ ते ९ तास साधारण मनुष्याने झोपावे असं विज्ञान सांगतं हे आई बाबांना कोण सांगणार? त्यांच्यामते मला अभ्यासाचं, परीक्षेचं टेन्शनच नाही असं सिद्धं झालं होतं. आणि मला रोज मला हे काय होतंय? असं वाटायला लागलं. खरं पाहिलं तर असं कुठे लिहिलंय की दहावीच्या विद्यार्थ्यांनी कमी झोपावं?? पण हे बाबा रोज मला इतके रागावायचे की मी उठल्याक्षणी आपण आठ तासापेक्षा किती जास्त झोपलो हे मोजायची. :p
, तिला कुठलं तरी टेन्शन आहे म्हणून ती जास्त झोपते" असं Doctor म्हणाले, त्यामुळे मला कुणीही फार झोपते असं म्हटलं की मी सरळ माझ्यावर असलेल्या अतीव ढोंगी टेन्शन ची आठवण करून देत असे. बाबांनी मात्र लगेच त्या Doctor ला मूर्खात काढलं.
बस्स!! पहाटे पहाटे बाबा मला उठवायचे. पण यार ४ वाजता उठणं म्हणजे माझ्या आकलना पालीकडलं होतं. एवढ्या लवकर उठून करायचं काय हा मला प्रश्न पडायचा. मग काय घेऊन बसायची पुस्तक..डुलक्या मारत मारत अभ्यास व्हायचा, त्यांतूनही माझ्यावर बाबांचा डॊळा असायचा, डुलकी लागली की "मुग्धाssss" अश्या बाबांच्या हाकेने मी खडबडून जागी व्हायची.माझ्या डुलकी लागण्याची आणि बाबांनी मला हाक मारायची एकच गाठ कशी पडायची हे मला नं उमगलेलं कोडं आहे.
नाही म्हणायला चांगले ८०% मार्क पडले मला १० वीला. सकाळी नं उठल्यामुळे तुला कमी मार्क्स मिळाले हे बाबांना कायमचं कोलीत हातात मिळालं. आणि ते माझ्या बारावीच्या अभ्यासामागे लागले. बारावीतही "पहाटे उठत जा" ह्याची अविरत पारायणे झाली. मी सकाळी उठलीच पाहिजे म्हणून त्यांनी मला ६.०० वाजताचा रसायनशास्त्राचा क्लास लावून दिला. मास्तरही जरा कडकच होते. पण माझी झोप त्यांहूनही कडक होती.प्राण गेला तरी बेहत्तर पण झोपेची कास मी सोडणार नाही असं वचन दिलं होतं मी स्वतःला ;) त्यानुसार रसायनशास्त्राच्या क्लासात मास्तर ला नं समजू देता झोप कशी मारायची ह्यात मी मास्टरी मिळवली होती. अगदीच प्रामाणिक होण्याची इच्छा झालीच तर पहिल्या रांगेत बसून नं झोपता नोटस घेणे असेही उद्योग केले..पण असले उद्योग लिमिटेड कारण तेच आपलं झोपेची कास सोडणार नाही वालं वचन.. ;)
यनशास्त्राने दगा दिलाच आणि आपल्या अपमानाचा वचपा काढत मला सगळ्यात कमी मार्क बहाल केले. organic chemistry खूप वोलाटाईल असतं म्हणे. म्हणूनच कदाचित असं झालं असावं अशी मीच माझी समजूत काढली रिझल्ट नंतर. हे जे काही झालं त्यात सतत डोळ्यावर विराजमान असलेल्या झोपेचा तीळमात्रही संबंध नाही असं मी बाबा सोडून सगळ्यांना पटवून दिलं होतं. एखाद दुसऱ्या वेळला ४ वाजता उठून प्रामाणिकपणे डुलक्या नं घेता अभ्यास केल्यामुळे बाबाही जरा खूशच होते नाही म्हणायला. त्यामुळे "सकाळी उठली होती यावेळला मी..पण तरीही चांगले मार्क नाही मिळाले बघितलं नं???" असं बाबांना म्हणून मी मोकळी झाले.
सकाळी उठण्याचा आणि चांगले मार्क मिळण्याचा तीळमात्र ही संबंध नाही हे मला दहावीतच कळून चुकलं होतं. ;)
असल्या क्षुल्लक कारणापायी उगाच कशाला झोपेचं खोबरं करा?? असं वाटून मी उन्हाळ्याच्या सुट्टीत बारावीच्या काळात दुर्लक्षिलेल्या झोपेची भरपाई करण्यास सरसावले.
]भियांत्रिकीची चार वर्षे हॉस्टेल मध्ये गेली. सकाळी ९.०० वाजता क्लासमध्ये हजर असायला लागायचं..मग काय ८.४० पर्यंत झोप. १० मिनिटात अंघोळ आणि ९.०० ला क्लासमध्ये हजर :) असं साधं सोपं समीकरण होतं. त्याला आता कुणाचीही आडकाठी नव्हती. त्यामुळे तो काळ अगदी सुखाचा गेला. रविवारी १० मिनिटे जास्त झोपायला मिळायचं. कारण ९.०० ला मेसमध्ये न्याहारी मिळणं बंद होत असे. सकाळी ८.५० ला उठणे, ब्रश करून मेस मध्ये जाणे, न्याहारीनंतर पुन्हा झोप काढणे नाहीतर अंघोळ करून पुन्हा फ्रेश झोपणे असा नियम असायचा. चार वर्षात मी चुकूनही पहाटे उठली नाही. जो काही अभ्यास केला तो सकाळी ६.०० पासून रात्री ११.०० च्या कालावधीत कारण रात्री ११.०० नंतर माझ्या मेंदूची कवाडे बंद होतात. त्यानंतर कुठलं ही ज्ञानार्जन मला वर्ज्य आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.
पुढल्या शिक्षणासाठी असतानाही थोड्याफार बदलाने हाच टाईमटेबल होता. पण एकूण त्या विद्यार्जनाच्या काळात मी झोपेला माझ्या नेत्राआड कधीच होऊ दिले नाही. अगदी प्रेमात धप्पकन पडल्यावर सुद्धा "मुझे नींद नं आये" असं माझं कधीही झालं नाही. उलट पुण्यासारख्या थंड हवामानाच्या जागी मी झोपेला अगदी योग्य न्याय दिला असेच आजवर मला वाटत आले आहे. माझ्याठायी एकमेकांचे शत्रु असलेले झोप आणि प्रेम हे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होते.
पुढे टेन्शन आणि झोप यांचं इन्वर्सली प्रोपोर्शनल ( Doctor च्या म्हणण्यानुसार) तंत्र थोडं डायरेक्टली प्रोपोरशनल व्हायला लागलं. हळुहळु मला झोप येईनाशी झाली. कदाचित झोपेला मी एव्हाना गृहित धरले होते. थोडेदिवसासाठी...
मुंबईत नोकरी लागल्यावर झोपेचं खोबरं झालं. शिफ़्ट्स मुळे झोप व्हायची नाही. आणि मी मग १२ तास-१६ तास अशी लागोपाठ झोपायची.
एवढं सगळं रामायण मला आठवण्याचं कारण म्हणजे कार्यालयात थोड्यावेळाकरीता पावर कट झाला होता...डिजी चा ही काही प्रोब्लेम होता. म्हणून दिली ताणुन...काय मस्तं झोप लागली म्हणून सांगु? खूप दिवसांनंतर झोपुन उठल्यावर अतीव समाधान मिळालं..आताशा भर क्लासमध्ये स्वप्न पडेस्तोवर झोपायचा चांस मिळेनासा झालाय. मोठेपणा वगैरे म्हणतात तो हाच असावा कदाचित ;) हे शल्य मनाला बोचत असतांनाच मिळालेल्या सुवर्णसंधीचं सोनं करायला मिळालं आज.....
चला आता थोडी कॉफी ढोसुन येऊ....
हे सगळं वाचुन तुम्हाला जर झोप आली तर माझ्या झोपसाधनेचं चीज झालं असंच मी समजेन. ;)
आताशा पुन्हा मला "झोप" फारच आवडायला लागली आहे. आताशा "पुन्हा" म्हणण्याचे कारण हे की मला समज आल्यापासूनच मला झोप प्रचंड आवडते पण मध्ये जरा गडबड झाली होती. गेली चार वर्षे मी हवी तितकी झोपली नाही असं मला मनापासून वाटतं(तसं माझ्याव्यतिरिक्त माझ्या घरात कुणालाही वाटत नाही याची मला खात्री आहे ) ;)

दहावीत माझ्या अतीझोपेचा आई बाबांना आणि मलाही शोध लागला. त्यांच्यामते (माझ्यामते नाही) मी खूप झोपायचे. ८ ते ९ तास साधारण मनुष्याने झोपावे असं विज्ञान सांगतं हे आई बाबांना कोण सांगणार? त्यांच्यामते मला अभ्यासाचं, परीक्षेचं टेन्शनच नाही असं सिद्धं झालं होतं. आणि मला रोज मला हे काय होतंय? असं वाटायला लागलं. खरं पाहिलं तर असं कुठे लिहिलंय की दहावीच्या विद्यार्थ्यांनी कमी झोपावं?? पण हे बाबा रोज मला इतके रागावायचे की मी उठल्याक्षणी आपण आठ तासापेक्षा किती जास्त झोपलो हे मोजायची. :p

माझ्या अतीझोपेमुळे बाबा मला एकदा Doctor कडॆ घेऊन गेले असता"अहो, तिला कुठलं तरी टेन्शन आहे म्हणून ती जास्त झोपते" असं Doctor म्हणाले, त्यामुळे मला कुणीही फार झोपते असं म्हटलं की मी सरळ माझ्यावर असलेल्या अतीव ढोंगी टेन्शन ची आठवण करून देत असे. बाबांनी मात्र लगेच त्या Doctor ला मूर्खात काढलं.

बस्स!! पहाटे पहाटे बाबा मला उठवायचे. पण यार ४ वाजता उठणं म्हणजे माझ्या आकलना पालीकडलं होतं. एवढ्या लवकर उठून करायचं काय हा मला प्रश्न पडायचा. मग काय घेऊन बसायची पुस्तक..डुलक्या मारत मारत अभ्यास व्हायचा, त्यांतूनही माझ्यावर बाबांचा डॊळा असायचा, डुलकी लागली की "मुग्धाssss" अश्या बाबांच्या हाकेने मी खडबडून जागी व्हायची.माझ्या डुलकी लागण्याची आणि बाबांनी मला हाक मारायची एकच गाठ कशी पडायची हे मला नं उमगलेलं कोडं आहे.

नाही म्हणायला चांगले ८०% मार्क पडले मला १० वीला. सकाळी नं उठल्यामुळे तुला कमी मार्क्स मिळाले हे बाबांना कायमचं कोलीत हातात मिळालं. आणि ते माझ्या बारावीच्या अभ्यासामागे लागले. बारावीतही "पहाटे उठत जा" ह्याची अविरत पारायणे झाली. मी सकाळी उठलीच पाहिजे म्हणून त्यांनी मला ६.०० वाजताचा रसायनशास्त्राचा क्लास लावून दिला. मास्तरही जरा कडकच होते. पण माझी झोप त्यांहूनही कडक होती.प्राण गेला तरी बेहत्तर पण झोपेची कास मी सोडणार नाही असं वचन दिलं होतं मी स्वतःला ;) त्यानुसार रसायनशास्त्राच्या क्लासात मास्तर ला नं समजू देता झोप कशी मारायची ह्यात मी मास्टरी मिळवली होती. अगदीच प्रामाणिक होण्याची इच्छा झालीच तर पहिल्या रांगेत बसून नं झोपता नोटस घेणे असेही उद्योग केले..पण असले उद्योग लिमिटेड कारण तेच आपलं झोपेची कास सोडणार नाही वालं वचन.. ;)

रसायनशास्त्राने दगा दिलाच आणि आपल्या अपमानाचा वचपा काढत मला सगळ्यात कमी मार्क बहाल केले. organic chemistry खूप वोलाटाईल असतं म्हणे. म्हणूनच कदाचित असं झालं असावं अशी मीच माझी समजूत काढली रिझल्ट नंतर. हे जे काही झालं त्यात सतत डोळ्यावर विराजमान असलेल्या झोपेचा तीळमात्रही संबंध नाही असं मी बाबा सोडून सगळ्यांना पटवून दिलं होतं. एखाद दुसऱ्या वेळला ४ वाजता उठून प्रामाणिकपणे डुलक्या नं घेता अभ्यास केल्यामुळे बाबाही जरा खूशच होते नाही म्हणायला. त्यामुळे "सकाळी उठली होती यावेळला मी..पण तरीही चांगले मार्क नाही मिळाले बघितलं नं???" असं बाबांना म्हणून मी मोकळी झाले.

सकाळी उठण्याचा आणि चांगले मार्क मिळण्याचा तीळमात्र ही संबंध नाही हे मला दहावीतच कळून चुकलं होतं. ;)

असल्या क्षुल्लक कारणापायी उगाच कशाला झोपेचं खोबरं करा?? असं वाटून मी उन्हाळ्याच्या सुट्टीत बारावीच्या काळात दुर्लक्षिलेल्या झोपेची भरपाई करण्यास सरसावले.

अभियांत्रिकीची चार वर्षे हॉस्टेल मध्ये गेली. सकाळी ९.०० वाजता क्लासमध्ये हजर असायला लागायचं..मग काय ८.४० पर्यंत झोप. १० मिनिटात अंघोळ आणि ९.०० ला क्लासमध्ये हजर :) असं साधं सोपं समीकरण होतं. त्याला आता कुणाचीही आडकाठी नव्हती. त्यामुळे तो काळ अगदी सुखाचा गेला. रविवारी १० मिनिटे जास्त झोपायला मिळायचं. कारण ९.०० ला मेसमध्ये न्याहारी मिळणं बंद होत असे. सकाळी ८.५० ला उठणे, ब्रश करून मेस मध्ये जाणे, न्याहारीनंतर पुन्हा झोप काढणे नाहीतर अंघोळ करून पुन्हा फ्रेश झोपणे असा नियम असायचा. चार वर्षात मी चुकूनही पहाटे उठली नाही. जो काही अभ्यास केला तो सकाळी ६.०० पासून रात्री ११.०० च्या कालावधीत कारण रात्री ११.०० नंतर माझ्या मेंदूची कवाडे बंद होतात. त्यानंतर कुठलं ही ज्ञानार्जन मला वर्ज्य आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.

पुण्याला पुढल्या शिक्षणासाठी असतानाही थोड्याफार बदलाने हाच टाईमटेबल होता. पण एकूण त्या विद्यार्जनाच्या काळात मी झोपेला माझ्या नेत्राआड कधीच होऊ दिले नाही. अगदी प्रेमात धप्पकन पडल्यावर सुद्धा "मुझे नींद नं आये" असं माझं कधीही झालं नाही. उलट पुण्यासारख्या थंड हवामानाच्या जागी मी झोपेला अगदी योग्य न्याय दिला असेच आजवर मला वाटत आले आहे. माझ्याठायी एकमेकांचे शत्रु असलेले झोप आणि प्रेम हे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होते.